पाकड्यांच्या काळ्या कारवायांवर अमेरिका लगाम लावु शकली नाही हे त्यांचे(अमेरिकेचे) सर्वात मोठे अपयश आहे...
भारताने आपल्या मध्यम पल्ल्याच्या अण्वस्त्रवहनक्षम 'पृथ्वी' या क्षेपणास्त्राला पृथ्वीराज चौहान या बाराव्या शतकातल्या दिल्ली-अजमेरच्या राजाचे नाव दिले होते. पण या राजाचा घौरीने पराभव केला होता व म्हणून त्याचे नांव खानसाहेबांनी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्राला दिले.
मला तर पॄथ्वी हे नाव Earth या अर्थाने वापरली आहे असे वाटले होते...जर इतर क्षेपणास्त्रांची नावे पाहिली तरी तसाच आभास होतो..उदा. आकाश्,अग्नी.
हिंदुस्थानच्या क्षेपणास्त्रां बद्धल अधिक माहिती इथे मिळेल :---
http://en.wikipedia.org/wiki/Integrated_Guided_Missile_Development_Program
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
मला तर अमेरिकेचे सर्व वागणे म्हणजे "माहिती गोळा करायची, 'अरे बापरे' म्हणायचं आणि डोक्यावर पांघरूण घेऊन ताणून द्यायची" या प्रकारचं वाटतं!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/36uoebc
(प्रकरण सातवे)
>वागणे म्हणजे "माहिती गोळा करायची, 'अरे बापरे' म्हणायचं आणि डोक्यावर पांघरूण घेऊन ताणून द्यायची"
जर आकाशात तो परमेश्वर असेल तर तो असेच काहीसे करत असेल असा एक मतप्रवाह ऐकला आहे.
त्या न्यायाने अमेरीका अगदी देवासारखी आहे :-)
बाकी काळेकाकांच्या चिकाटीचे अतिशय कौतुक आहे. फार मोठी लेखमाला अतिशय नेटाने मराठीत आणली आहे तुम्ही. लवकरच मराठी अनुवाद पुस्तक निघावे ही सदिच्छा!
काळे काका,
या लेखमालिकेत तुम्ही पाकिस्तानचा अणुशक्ती प्रवास बराच सविस्तर दाखवलात. तसं पाहिलं तर भारत देखिल अणुशक्ती धारक देश आहे, पण आपल्यातर्फे युद्धाचि शक्यता फार कमि दिसते. पण पाकिस्तान (आणि आता उ.कोरिया)ची तयारी बघुन एका नविन महायुद्धाचि पायभरणी सुरु आहे असं वाटतं का तुम्हाला ?? कि हे केवळ अमेरिकेची मक्तेदारी मोडुन काढायला उर्वरीत जगाचा एक प्रयत्न म्हणुन सुरु आहे ?
(सचिंत) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
माझ्या मतें पाकिस्तान त्यांच्या दहशतवाद्यांकडून स्वत:च संपेल. उत्तर कोरियाचा खुन्नस फक्त दक्षिण कोरियापुरता मर्यादित असावा. त्यामुळे कांहीं दुर्दैवी, अघटित घटना न घडल्यास भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होईल असे वाटत नाहीं.
कदाचित् हे केवळ wishful thinking असण्याची शक्यताच जास्त आहे.
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/36uoebc
(प्रकरण सातवे)
सामंत काका,प्रो.देसाई व त्याच्या नातवाची आठवण येते.सामंत काका अमेरिकेला गेल्यापासुन त्याचे लिखाण थांबले. पण काळे काका अमेरिकेला गेल्यापासुन त्याचे लिखाण वाढत चालले आहे. असिफ झरदारीना जेवढी पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाची माहिती झाली नसेल तेवढी माहिती मला काळेकाकांच्या मुळे मिळाली. त्याबद्दल त्याचे मी आभार मानतो.
वेताळ
वेताळ-जी,
अमेरिकेत मुलगा, सून व नात दिवसभर कामावर/बालवाडीत असत त्यामुळे लिखाण करायला वेळच वेळ होता. त्याखेरीज 'सकाळ'वर ही मालिका प्रसिद्ध होऊ लागल्यामुळे पुढची प्रकरणे वेळेवर पाठविण्याची नैतिक जबाबदारी माझ्यावर आली त्यामुळे सारखे लि़खाण चालूच होते. पण १० दिवसांपूर्वी मी जाकार्ताला परत आलोय व 'पोटापाण्या'च्या कामाला लागलोय त्यामुळे आता वेळ फक्त रात्रीच मिळतो.
एकूण प्रस्तावना+२१ प्रकरणातली प्रस्तावना+८ प्रकाशित झाली असून १४ प्रकरणे मिपावर प्रकाशित झाली आहेत. (सहाचा 'लीड' आहे) 'सकाळ'मध्येही प्रतिसाद चांगला आहे. सध्या १५ व्या प्रकरणाचा अनुवाद सुरू आहे. २१ वे प्रकरण आधीच केले होते. त्यामुळे आणखी सहा प्रकरणे झाली कीं हुश्श!
आपल्या आस्थेबद्दल आभार!
रहाता राहिले जरदारीसाहेब! त्यांना सध्या कांहींही जबाबदारी नाहीं कारण नुकतीच पाकिस्तानच्या लोकसभेत घटनादुरुस्ती झाली व त्याद्वारे जरदारींचे अधिकार खूप कमी करण्यात आले आहेत. अनेक वर्षें अनेक आरोपांखाली तुरुंगवास भोगलेले जरदारी सध्या मजा करत आहेत. त्यांना पंतप्रधान गिलानी व लष्करशहा कयानी कांहीं सांगत असतील असे वाटत नाहीं!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2dhamdn (प्रकरण आठवे)
आजच्या टाइम्समधली ही बातमी वाचा. शीर्षक आहे "China on verge of signing nuke deal with Pakistan: Expert" दुवा आहे: http://tinyurl.com/2apeyuz
हे वाचल्यावर Nuclear Deception ची ही लेखमाला वेळेवरच प्रसिद्ध होत आहे असे वाटले.
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2dhamdn (प्रकरण आठवे)
आजच्या डॉन या कराचीहून प्रसिद्ध होणार्या वृत्तपत्रात एक बातमी वाचली कीं (पाकिस्तानी) पंजाब सरकारने जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेला ८ कोटी रुपये दिले आहेत असे पंजाब सरकारने कबूल केले. (जमात-उद-दावा हे लष्कर-ए-तोयबा या प्रतिबंधित संस्थेचे नवे नाव आहे व मुंबई नरसंहारात या संघटनेचा थेट स्वरूपात हात होता असे मानले जाते.)
http://tinyurl.com/29c48tk
वर पंजाब सरकारने अशीही मखलाशी केली आहे कीं हे पैसे त्या संघटनेने सुरू केलेली शाळा, दवाखाने व इस्पितळे यांसारखी सेवाभावी कामे (त्या संघटनेवर मुंबई नरसंहारानंतर बंदी आणल्यामुळे) बंद पडू नयेत म्हणून दिले आहेत. हे पैसे सरकारने नेमलेल्या administrator ला देण्यात आले आहेत.
व्वा भाई व्वा!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2dhamdn (प्रकरण आठवे)
प्रतिक्रिया
पाकड्यांच
अमेरिकेचे अपयश
:-)
अवघड आहे !!
भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होईल असे वाटत नाहीं
काळे काकांचे लेख वाचताना मला नेहमी
अमेरिकेत लिखाण करायला वेळच वेळ होता
चीन व पाकिस्तान पुन्हा परमाणू करारात बद्ध होणार? टाइम्स
व्वा भाई व्वा! काय हा दानशूरपणा!!