वा ओंकारराव,
आपण साला पहिल्यापासूनच तुमच्या रेखाटनांचे चाहते आहोत.
साध्या वहीच्या कागदावर काढलेले हे चित्र अतिशय आवडले, एका मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या स्वयंपाकघरात घेऊन गेले! :)
आणि अरे हे रे काय? ग्यॅस तर दोन्हीही सुरूच दिसताहेत! डावीकडच्या पातेल्यात काय बरं शिजत असेल? त्यात बहुतेक मिसळीचा रस्सा असेल! आणि उजवीकडे सर्व मिसळप्रेमींकरता चहाचं आधण ठेवलंलं दिसतं आहे! :)
आलोच सगळे तुझ्याकडे मिसळ खायला आणि चहा घ्यायला! :)
बाकी, एका आपुलकी आणि उत्तम पाहूणचार असलेल्या घराच्या स्वयंपाकघरात डोकावून आल्यासारखं वाटलं!
असो, चित्र छानच आहे...
आपला,
(घरगुती) तात्या.
फार सुंदर चित्र.
समोर त्या वस्तू नसताना केवळ आठवणीच्या बळावर इतके तपशील रेखाटणे म्हणजे कमाल. त्यात कप्पे, शेगडी वरील भांडी आणि सिलिंडर इत्यादिची खोली आणि गोलावा तर फार छान.
--लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
गॅसवरती एका शेगडीवर उसळ शिजते आहे, आणि दुसर्या शेगडीवर चहा बनतो आहे.
साधारणपणे आम्ही हॉटेलात जातो, पण तुमच्या आपुलकीच्या स्वयंपाकघरात येऊ दिलेत, धन्यवाद.
जुना काळ खरच जिवंत केला आहेत तुम्ही, लोणच्याच्या त्या बरण्या आता नामशेष झालेल्या दिसतात.
अवांतरः लोणच्याच्या बरणीला बांधलेले फडके- याला दादरा असे म्हणतात. 'दादरा' हा शब्द सुध्दा किती दिवसांनी वापरला!
स्वाती
भोकराच्या लोणच्याची अशीच बरणी आत्ता माझ्यापुढे आहे.
इथे, अमेरिकेत !
ही संस्कृतीचिन्हे नामशेष झालेली नाहीत, हे माझे म्हणणे.
भोकराचे लोणचे मला अतिशय आवडते.
त्यातूनच ह्या संस्कृतीचे जतन झालेले आहे, हे नमूद करावेसे वाटते.
- सर्किट
दादरा बांधलेली बरणी ? अमेरिकेत? मस्तच! मी तरी दादरा बांधलेली चिनीमातीची बरणी पाहून अनेक वर्ष लोटली, लोणची नाही नामशेष झाली,होणारही नाहीत,पण ती चिनीमातीच्या दादरा वाल्या बरण्यातून आता काचेच्या बरण्या आणि प्लॅस्टीक पाऊचमध्ये आलेली दिसतात.
स्वाती
लोणची बुटक्यात काढून घ्यावी तर अशा दादरा बांधलेल्या बरणीतूनच.
बेडेकर, पाठक, निरव ही आम्हाला आवडत नाहीत ती ह्यामुळेच. छान फडक्याने (दादर्याने) बंद केलेल्या बरण्या नसतात.
छोट्या कच्च्या कैर्यांचे लोणचे (कोयींसकट) किंवा वाळलेल्या लिंबाचे लोणचे.... अहाहा..
हे प्याकबंद एअर टाईट बरणितून खरेच चांगले लागत नाही.
त्याला का कोण जाणे ते फडके बांधलेली फळीवरची बरणीच हवी.
- (जुन्या पीढीतला) सर्किट बेडेकर
तुम्ही तर मला एकदम आमच्या जुन्या घरातच नेऊन ठेवलेत हो.. आता इथे कुठून आणू त्या दादरा बांधलेल्या चिनीमातीच्या बरण्या आणि ती बेडेकर,कुबल,केप्र,पाठक इ. कडे न मिळणारी केवळ घरातच बनलेली, आजी,आईच्या खास चवीची ,मेथीच्या फोडणीची, भोकरांची,कोयीसकटच्या बाळकैर्यांची ,खास उपासाची ,मऊभाताबरोबर खायची स्पेशल लिंबाची आणि अशी कितीतरी...
स्वाती
आहे.
ही संस्कृतीचिन्हे नामशेष झालेली नाहीत, हे माझे म्हणणे.
१००% सहमत आहे. माझ्या डोळ्यांसमोर आत्ता अगदी असेच 'दादरा' बांधलेले मिरचीचे लोणचे आहे. अमेरिकेत!
- बे.ला बेडेकर
माझ्या डोळ्यांसमोर आत्ता अगदी असेच 'दादरा' बांधलेले मिरचीचे लोणचे आहे. अमेरिकेत!
आणि बाथरूमच्या काचेच्या छोट्या कपाटात प्रिपरेशन एच आहे, असे कृपया स्पष्ट सांगा ;-)
- (मिर्चीचा फ्यान) सर्किट
दादरच्या राहत्या वन रूम किचनच्या स्वयंपाकघरात आईच्या हातून तयार झालेले लोणचे अंटार्क्टिकात जाऊन खाल्ले तरी प्रेप्-एच वगैरेची *ट गरज पडायची नाही!!!
(जुन्या पिढीतला नवीन)बेसनलाडू
याबद्दल अधिक माहिती द्याल का? कश्या प्रकारचे फळ आहे? लोणचे घरीच बनवतात की बाजारात मिळते? भोकर म्हणजे अंबाडी (आंबट-तुरटसे इलिप्सॉइडल फळ) नव्हे ना?
- बे.ला कुबल
भोकर म्हणजे अंबाडी नाही.
भोकर हे फळ आहे, ते झाडाला लागते.
ते हिरवे असते बाहेरून. आतून (म्हणजे फोडल्यास) पांढरट हिरवे असते.
ते फोडल्यास त्यातून चिकटसा द्रव बाहेर पडतो. त्यात पांधरट बीही असते.
भोकराचा चीक पतंगीच्या मांजासाठी काही लोक (म्हणजे मी) वापरतात.
एकदा ती बी आणि ते चिकटपण काढले की जे काही उरते, ते थोडेसे तुरट लागते. त्याचे लोणचे करावे. इतर कुठल्याही लोणच्यासारखे. मस्त लागते.
- सर्किट
(ता.क. व्यनितून पत्ता पाठवा, एक छोटीशी बाटली लोणचे फेडेक्स करीन.)
आमच्या घराच्या बागेत भोकराचे झाड आहे त्यामुळे दारात भोकरांचा सडा पडायचा! झाड बर्यापैकी उंच होऊ शकते. त्याची पाने गोळा करून आम्ही चैत्रगौरीच्या दिवशी त्यावर कैरीची डाळ घालून ती पन्ह्याबरोबर द्यायचो. ती पाने चांगली मजबूत असतात.
भोकराचा चीक अगदी शेंबडासारखा दिसतो! त्यामुळे लहानपणी भोकर आवडायचे नाही. आजी ती भोकरे आणायला पाठवायची.
बाकी लोणचे वगैरेच्या आठवणी छान.
जूना काळ उभा केलात चित्रकार तुम्ही.
प्रत्येक वस्तूकडे बघताना वेगळेच वाटयेत...:-) दोन बर्नरची स्टँड अलोन शेगडी....
गॅस चालू, पण बहूदा गृहस्वामीनी नको बाइ माझे चित्र म्हणून फ्रेमबाहेर.....:-)
खिडकीतून मंद झूळूक येतेय ना का वेडावाकडा स्टॉर्च झाला आहे टॉवेल ;-)....
मजा आली....
किंवा वरच्या मजल्याची गच्ची तरी. टॉवेलच्या वजनामुळे दोरी खाली ओढली गेली आहे - त्या ओढलेल्या आकारावरून दोरी फार लांब नाही असा माझा निष्कर्ष आहे. गच्चीत बांधलेलीही असू शकेल.
ॐकार स्वरुपा,
अरे मी जसा, संगणक दुरुस्ती साठी लेखन चालू केले आहे तसेच तु देखील चित्रे कशी काढावी ह्याची देखील लेखमालाच काढ ही विनंती, नाही चित्रकलेची मला खुप आवड आहे मी खुपदा मार देखील खल्ला आहे आगाशे सरांचा [ त्यांनी कधी ताब्यांचे चित्र काढायला सांगितलेल की मी मात्र घाघरीचे चित्र तरी जरुर काढले आहे]
हो घाघरी वरुन आठवले तुझ्या चित्रात एक घाघरीचीच कमी आहे म्हणजेच तुझे चित्र एक सोडून सर्व गोष्टी दाखवत आहे.
बाकी पेन ने चित्रकला खुप अवघड जरुर एकाच बैठकीमध्ये काढले असावेस कारण मला वाटते की एकदा पेन उचलून बाहेर ठेवला की पुन्हा तो सुर येतच नाही.. काय म्हणतोस बरोबर ना ?
राजे
(*हेच राज जैन आहेत)
पाण्याचे पिंप दिसले नाही त्यावरून मला पण शंका आली की बहूतेक सुखी माणसाचे घर आहे. अहो २४ तास नळाला पाणी म्हणजे काय कमी सुखी समजू नका. किंवा कदाचीत बाहेरच्या खोलीत फ्रीज असेल ज्यात तांब्यात पाणी भरून ठेवले असेल.
असो त्या स्वयंपाकघराच्या बाकीच्या ३ भिंतींची रेखाटने अजून बघायची आहेत. खरेतर ती पण काढून ३६० पॅनोरॅमीक व्ह्यू मधे सगळे एकत्र बघायला काय मजा येईल. (हॉलीवूड्च्या ऍनीमेशन ची सवय लागून माजलोय ना?)
रेखाटन आवडले! कुठचे गाव असावे त्याचा विचार चालू आहे.
खिडक्यांना अर्धवट उंचीचे पडदे नाहीत. पूर्वी पुण्यात असे छोटे पडदे असायचे - म्हणजे शिवाजीनगर वगैरे काही भागातल्या घरांत पाहिले आहेत. खिडकीबाहेर बर्यापैकी उजेड. गज आडवे आणि जवळ जवळ आहेत - खिडकी काहीशी रुंद आहे - म्हणजे खूप जुना वाडा नसावा. असे आपले अंदाज! चूक असल्यास सांगावे..
प्रतिक्रिया
आपुलकीचं स्वयंपाकघर! :)
क्या बात है..
सहमत
प्लेस फॉर एव्हरिथिंग, एव्हरिथिंग ऍट इट्स प्लेस
रेखाचित्र
अभियांत्र
वा
मिसळ आणि चहा
मस्त
लोणचे
जुना काळ
नामशेष ?
अरे वा!
खरं सांगू !
हो हो
पूर्ण सहमत
अहा हा !!
छे हो!
वा !!!
प्रिपरेशन एच ..
अधिक माहिती
धन्यवाद..
मिरच्या
हॅबनारो
भोकर
नाही
आठवण झाली
भोकर
वा!!
सुंदर
छान
तळमजला का हो?
किंवा गच्ची
होय होय
ॐकार
बरोबर
गाव कुठचे?
सुरेख
केवळ अप्रतिम
सापडले....!
घोडमं
वा, क्या बात है !
अगदी माझ्या