✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काय जेवलात?

म
मनस्वी यांनी
Fri, 04/04/2008 - 13:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
31173 वाचन

💬 प्रतिसाद (87)

प्रतिक्रिया

ध
ध्रुव Fri, 04/04/2008 - 15:20 नवीन

मी

मस्त खुसखुशीत सांडगे व बटाटे घातलेली गवारीची भाजी, दही, पोळी, भात..... -- ध्रुव
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 04/04/2008 - 19:13 नवीन

आयला..

आयला मी चुकून 'लांडगे' वाचलं.... सॉरी..सॉरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ध्रुव
इ
इनोबा म्हणे Fri, 04/04/2008 - 15:37 नवीन

आजचा मेनू

आज आम्ही 'हवा' खाऊन 'पाणी' पिले...:) रात्री मस्तपैकी थंडगार बियर ढोसायची आणि मग बटर चिकन-तंदुरी रोटी वरपायची.... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 15:44 नवीन

धमु अरे

धमु अरे संत ज्ञानेश्वरांनी म्हटलंय ना? जो जे वांछिल, तो ते खाओ! मग कुणी काही खाल्लं तर तू असा दु:खी होऊ नकोस.....
च्च...चुकल॑च खर॑! असो, गुरुदेवा॑च्या आज्ञेनुसार मी जरा माझ॑ दु:ख सावरुन (की सावडून) घेतो! काय करणार...स॑दीपशेठ खर्‍या॑च्या कवितेप्रमाणे 'मौनाचेही असतात हजार अर्थ...आयुष्याच्या ह्या वेड्या वेळी कळणार कुठुन' अशी काहीशी अवस्था आहे आपली!
तू ही करुन पहा..सोपी आहे आणि सोपी असून चविष्ठ आहे,:) स्वाती
ह्म्म...करायलाच पाहिजे एकदा. निदान विका॑ताला तरी पोटात काहीतरी चा॑गल॑ जाईल ! - (सम॑जस) ध मा ल.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 04/04/2008 - 15:53 नवीन

वरण-भात (दररोजचाच)....

आणि त्यावर चितळेंचे साजुक तुप अन् लिंबाच्या लोणच्याची फोड.....आहाहा! दुपारी जेवताना गोरा साहेब बैलाच्या मांसाचे लचके तोडणार अन् आम्ही त्यासमोर डब्यात काल बनवलेला वरणभात खाणार. :( (वैतागलेला) टिंग्या :(
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 04/04/2008 - 19:27 नवीन

चितळ्यांकडचे...

चितळेंचे साजुक तुप चितळ्यांचे नाही हो....चितळ्यांकडचे म्हणा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 04/04/2008 - 21:20 नवीन

आयला......

पेठकरकाका, आज एकदम फॉर्मात दिसताय! - टिंग्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
सहज Fri, 04/04/2008 - 16:16 नवीन

लंच

सॅलेड [एव्होकॅडो, रोमन लेट्युस, लाल सिमला मिर्च, काकडी, टोमॅटो, ] ड्रेसींग - ऑलीव्ह ऑइल, लिंबु लसणाची फोडणीवाली मुगाची डाळ, ब्राउन राईस. कसे हेल्दी "वाटते" पण दोन काजु कतल्या खाउन सगळे पुण्य गमावले......
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/04/2008 - 16:23 नवीन

:)))))

हे असे रोजचेच ! :)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
आ
आर्य Fri, 04/04/2008 - 16:22 नवीन

आपल्याला

आपल्याला तरी ब॑गळूरात काही वा॑धा झाला नाही बॉ! मस्त आ॑ध्रा-थाळी घ्यायची..... झकास मजा येतीय ईकडे बेंगळूरात्........मसाला / बेण्णे दोसा, पुळीओगरे, पोंगल.....आणि मस्त फिल्टर कॉफी तिही पावसात...धमाल पाऊस चालू आहे ईथे. आता ऊद्या तर महाराष्ट्रात येणार आम्ही पाड्व्याला..........आधी जाऊन बटाटे वडा चापणार आणि घरी आईला साबूदाणा वडा / खिचडी करायला सांगणार
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 16:30 नवीन

हाय...

काय आठवण करुन दिलीस रे!!! फिल्टर 'कापी' प्यावी तर ब॑गळूरात (इतर कन्नड शहरा॑बद्दल फारशी माहिती नाहीय्ये). एकदम कात्तिल असते! आणि अय्य॑गार (की अय्यर?) बेकरीतली पेस्ट्री !!! - धमालअण्णा येरकु॑टकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आर्य
म
मनस्वी Fri, 04/04/2008 - 16:39 नवीन

अय्यंगार

त्यांच्या नानखटाईज पण मस्त असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
आ
आर्य Fri, 04/04/2008 - 16:43 नवीन

अरे ते

अरे ते सोड.......ईकडे ऐक वारीयार नावाची बेकरी आहे, (राजाजीनगर ४ था ब्लॉक मधे) काय आईट्म असतात स्पेशली - प्लंम केक, फ्रुट केक / ब्रेड, खारी अरे......स्वर्ग .................च फक्त
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 04/04/2008 - 16:44 नवीन

माझे दुपारचे जेवण

पोळ्या,फ्लॉवरची भाजी,शिक्रण (वेलची केळ्याची),कैर्‍या,मिरची,लिंबु यांचे मिश्र लोणचे(बेडेकर-केप्र),पालक घालुन केलेली आमटी हे सर्व पदार्थ आज सकाळी जेवताना माझ्या पानात आमच्या मातोश्रींनी वाढले होते. अत्ता चहा बटर खात खात प्रतिक्रिया लिहुन मोकळा झालो..... (आईच्या हातच अमृत चाखणारा) मदनबाण
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/04/2008 - 16:53 नवीन

आता

आम्ही उद्यापासुन ३ दिवस असेच काय काय हाणणार मी ! घरी चाल्लोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मीनल Fri, 04/04/2008 - 17:59 नवीन

लाल भोपळा

आम्ही काल रात्री - पंमकीन सूप प्याले . नंतर लाल भोपळ्याची भाजी ,लाल भोपळयाचे रायतं,पोळी (साधीच होती गव्हाच्या पीठाची.) डेसर्ट --खीर अर्थातच लाल भोपळ्याची. अगदी `हॅलोविन` पार्टी असल्याचा आनंद मिळाला. काय मोठ्ठा मिळाला होता लाल भोपळा. अजून ही आहे शिल्लक फ्रिज मधे.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 04/04/2008 - 19:16 नवीन

भोपळा....

म्हणजे फक्त 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' राहीले......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
स
स्वाती राजेश Fri, 04/04/2008 - 19:37 नवीन

उरलेल्या ...

उरलेल्या भोपळ्याच्या घार्‍या (घारगे) कर. ८ दिवस टिकतात, तेव्हा भोपळावीक साजरा कर.:))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
म
मनस्वी Fri, 04/04/2008 - 19:48 नवीन

अजून...

झालंच तर घरातील लहान मुलांना चल रे भोपळ्या टुणुक टुणुक ची गोष्ट सांगा. भोपळ्यांच्या बियांचा काही पदार्थ असेल तर तो करा (भाजून खातात असे ऐकले आहे). भोपळ्याच्या सालीचा काही पदार्थ असेल.. चटणी वगैरे (जशी दोडक्याच्या सालीची करतात) तर तो करा. राहीलेल्या भोपळ्याच्या भाजीची नाष्ट्याला कटलेट / धिरडी करा. भोपळ्याची कोशिंबीरही उत्तम होते दही घालून. माझी फेव्हरेट आहे. सध्यातरी येवढेच पर्याय आठवले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
ए
एक Fri, 04/04/2008 - 22:30 नवीन

भोपळा नीट कोरला गेला असेल...

तर वाळवून तंबोरा करा...:-) भोपळा एक कल्पवृक्ष असा निबंध लिहायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
प
प्रभाकर पेठकर Sat, 04/05/2008 - 12:19 नवीन

निबंध...

निबंध लिहायला हरकत नाही. नीट जमला तर ठीक आहे नाहीतर गुरूजी द्यायचे अजून एक ............'भोपळा'. आणि छडी घेऊन मागे लागले तर म्हणावे लागेल 'अरे! भोऽऽऽ पळा......'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
व
वरदा Fri, 04/04/2008 - 19:02 नवीन

मी

भेंडीची भाजी, पोळ्या, फ्लॉवर बटाटा, कांदा, सिमला मिरची रस्सा.. उरलेल्या पोळ्या आज डब्यात..रात्री काय करावं प्रश्न पडलाय्...एवढ्या रेसिपी दिसतायत एखादी करेन म्हणते...भाकरी खायचा किती मूड आलाय पण इथलं पीठ इतकं जुनं असतं भाकर्‍या तुटतात्..त्यात कणीक पण घालून पाहीली तर्री तेच.... भाकरी, वा.ग्याची भाजी, डाळि.ब्यांची उसळ, खूप वाट्या ताक.... ह्यावर्षी भारतात गेल्यावर खायच्या गोष्टींची यादी करतेय.....इथे तिथल्यासारखं ताक बनवता येईल का घरी? अवांतरः म्हशीच्या गोठ्यातून आणलेल्या दुधाचं आणि गोकुळच्या दुधाचं ताक वेगळं लागतं त्या गोठ्यातल्या दुधाच्या केलेल्या ताकाची चव अप्रतिम ती कशालाच येत नाही....
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 04/04/2008 - 19:10 नवीन

कालचं / आजचं सोडा..

मी भारतात गेल्यावर पहिले १० दिवस मस्त पैकी गरम गरम तांदूळाची/ज्वारीची भाकरी आणी घट्ट दही... त्यासोबत लसूण चटणी आणि मस्तपैकी आईच्या हातची भरल्या वांग्याची (हिरव्या)भाजी ... हेच खाणार आहे. नंतरचे काही दिवस.. आमरस आणि पोळी.... पोळी आणि आमरस... सगळ्या परदेशस्थ मिसळपावकरांच्या नावनेही खाईन आमरस. ... आठवण काढत काढ्त. मग कोकणांत जाणार आहे. आणि तिथे आत्याच्या घरच्या डाळींब्यांची उसळ, घरच्या फणसाची .. घरचाच नारळ घालून केलेली भाजी.. घरच्याच कोकमचं सरबत. आणी पुन्हा घरचेच हापूस आंबे...तेव्हाही तुम्हां सगळ्या मंडळींची आठवण काढेन हो...! - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 04/04/2008 - 19:19 नवीन

आम्हीही येऊ...

कृपया आपला, भारतातला, संपर्क क्रमांक द्यावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
पिवळा डांबिस Sat, 04/05/2008 - 13:19 नवीन

असं का!!

:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Fri, 04/04/2008 - 19:21 नवीन

अहो जरूर या..

खरं तर.. पुण्यात मी १४ एप्रिल ला पोहोचेन. तेव्हा प्रभाकर पंत तुमची गाठ घेण्याचाही विचार आहे.. बघू कसं काय जमतं ते.. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 04/04/2008 - 19:29 नवीन

धन्यवाद..

धन्यवाद. माझा संपर्क क्रमांक :(+९१) ९८५०५ ८३००५
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
र
रामदास Fri, 04/04/2008 - 19:56 नवीन

आज रात्री

झासी रस्सा --दुपारचा कमळ काकडिची सुखी भाजी --रतलाम शेव -चविला पराठा .नो भात
  • Log in or register to post comments
प
प्रशांतकवळे Fri, 04/04/2008 - 20:29 नवीन

आजचे जेवण

आज मस्तपैकी कोंबडीचा रस्सा (थोडा ति़खट) व भात असा मेनू झाला.. आता स्वयंपाक जमायला लागलाय.. प्रशांत.
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Fri, 04/04/2008 - 22:19 नवीन

पॅनकेक्स, मॅपल सिरप

. व्यंकट
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 04/05/2008 - 12:57 नवीन

बरं आहे बाबा तुमचं!:((

आम्ही आपले आज कसाबसा टेंपूरा ( पिठीसाखर घातलेली कोलंबीची भजी), सुशी (कच्चा मासा, कुठ्ला होता देव जाणे!) आणि ढिकळं असलेला भात खाल्ला!! नशीब गां* तो क्या करेगा पांडू?:)) -डांबिसकाका
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 04/07/2008 - 00:31 नवीन

आम्रखंड

आम्रखंड आणि गुलाबजाम खाल्ले आज.....आता फार झोप येतेय...
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 04/07/2008 - 11:19 नवीन

काल

केळं घालून शिरा केलेला. आणि शुक्रवारी चिकन शोरबा, चिकन रेशमी कबाब, चिकन ढाबा, मुर्ग मलई. :)
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Mon, 04/07/2008 - 11:53 नवीन

कप नूडल्स

मी आज एक कप नूडल्स आणि रस्त्यावर बनवलेला अंडा पराठा खाल्ला. इथे चीनमधल्या छोट्या गावात ना Mcdonalds ना ऊडूपी!! आणि मा़झी चिनी हाटेलात जायची हिम्मत नाही होत बाबा! आता पुढच्या रविवारी घरी जाऊन (माझ्या) बायकोच्या हातची भाजी भाकरी खाईन.
  • Log in or register to post comments
न
नसनखवडी Mon, 04/07/2008 - 12:02 नवीन

आमचा

खास आग्री पेशल काळ्या खेकड्याचा रस्सा आनी मऊ मऊ तांदळाची भाकरी. प्रियाली
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 04/07/2008 - 12:45 नवीन

पाककृती...

खास आग्री पेशल काळ्या खेकड्याचा रस्सा .... पाककृती द्या कीऽऽ! आग्री पाकसिद्धीबद्दल मनात बरेच कुतुहल आहे. ठाणे - घोडबंदर रस्त्यावर 'आग्री फुड' अशी पाटी जाता-येता दिसते. पण अजून योग आला नाही. असो. पाककृतींच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नसनखवडी
आ
आर्य Wed, 04/09/2008 - 13:01 नवीन

ही मिसळ खाच !

झकास ! मिसळ खाल्ली यंदा कोकणात................ ऐका धरगुती समारंभा करीता रत्नागिरीला जाण्याचा योग आला तेव्हा आमचे खवैये काका आम्हाला सकाळी सकाळी मिसळ खायला घेऊन गेले राधाकृष्ण सिनेमा समोर.........गांधीची मिसळ.........दत्त कॅफे, रत्नागिरी....्ई मिसळ सोडू नकाच बाकी जेवायला म्हणाल तर मोदक, बटाट्याची सुकी भाजी, पुरी आणि........वरण भात (माझे आवडते पदार्थ) बाकी बरचं काही होत आणि खाल्लं पण .............यावर ताव मारला खवैया - आर्य
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा