आज आम्ही 'हवा' खाऊन 'पाणी' पिले...:)
रात्री मस्तपैकी थंडगार बियर ढोसायची आणि मग बटर चिकन-तंदुरी रोटी वरपायची....
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
धमु अरे संत ज्ञानेश्वरांनी म्हटलंय ना? जो जे वांछिल, तो ते खाओ!
मग कुणी काही खाल्लं तर तू असा दु:खी होऊ नकोस.....
च्च...चुकल॑च खर॑! असो, गुरुदेवा॑च्या आज्ञेनुसार मी जरा माझ॑ दु:ख सावरुन (की सावडून) घेतो!
काय करणार...स॑दीपशेठ खर्या॑च्या कवितेप्रमाणे 'मौनाचेही असतात हजार अर्थ...आयुष्याच्या ह्या वेड्या वेळी कळणार कुठुन' अशी काहीशी अवस्था आहे आपली!
तू ही करुन पहा..सोपी आहे आणि सोपी असून चविष्ठ आहे,:)
स्वाती
ह्म्म...करायलाच पाहिजे एकदा. निदान विका॑ताला तरी पोटात काहीतरी चा॑गल॑ जाईल !
- (सम॑जस) ध मा ल.
आपल्याला तरी ब॑गळूरात काही वा॑धा झाला नाही बॉ!
मस्त आ॑ध्रा-थाळी घ्यायची.....
झकास मजा येतीय ईकडे बेंगळूरात्........मसाला / बेण्णे दोसा, पुळीओगरे, पोंगल.....आणि मस्त फिल्टर कॉफी
तिही पावसात...धमाल पाऊस चालू आहे ईथे.
आता ऊद्या तर महाराष्ट्रात येणार आम्ही पाड्व्याला..........आधी जाऊन बटाटे वडा चापणार आणि घरी आईला साबूदाणा वडा / खिचडी करायला सांगणार
काय आठवण करुन दिलीस रे!!!
फिल्टर 'कापी' प्यावी तर ब॑गळूरात (इतर कन्नड शहरा॑बद्दल फारशी माहिती नाहीय्ये). एकदम कात्तिल असते! आणि अय्य॑गार (की अय्यर?) बेकरीतली पेस्ट्री !!!
- धमालअण्णा येरकु॑टकर
अरे ते सोड.......ईकडे ऐक वारीयार नावाची बेकरी आहे, (राजाजीनगर ४ था ब्लॉक मधे) काय आईट्म असतात स्पेशली - प्लंम केक, फ्रुट केक / ब्रेड, खारी अरे......स्वर्ग .................च फक्त
पोळ्या,फ्लॉवरची भाजी,शिक्रण (वेलची केळ्याची),कैर्या,मिरची,लिंबु यांचे मिश्र लोणचे(बेडेकर-केप्र),पालक घालुन केलेली आमटी हे सर्व पदार्थ आज सकाळी जेवताना माझ्या पानात आमच्या मातोश्रींनी वाढले होते.
अत्ता चहा बटर खात खात प्रतिक्रिया लिहुन मोकळा झालो.....
(आईच्या हातच अमृत चाखणारा)
मदनबाण
आम्ही काल रात्री -
पंमकीन सूप प्याले .
नंतर लाल भोपळ्याची भाजी ,लाल भोपळयाचे रायतं,पोळी (साधीच होती गव्हाच्या पीठाची.)
डेसर्ट --खीर अर्थातच लाल भोपळ्याची.
अगदी `हॅलोविन` पार्टी असल्याचा आनंद मिळाला.
काय मोठ्ठा मिळाला होता लाल भोपळा.
अजून ही आहे शिल्लक फ्रिज मधे.
झालंच तर घरातील लहान मुलांना चल रे भोपळ्या टुणुक टुणुक ची गोष्ट सांगा.
भोपळ्यांच्या बियांचा काही पदार्थ असेल तर तो करा (भाजून खातात असे ऐकले आहे).
भोपळ्याच्या सालीचा काही पदार्थ असेल.. चटणी वगैरे (जशी दोडक्याच्या सालीची करतात) तर तो करा.
राहीलेल्या भोपळ्याच्या भाजीची नाष्ट्याला कटलेट / धिरडी करा.
भोपळ्याची कोशिंबीरही उत्तम होते दही घालून. माझी फेव्हरेट आहे.
सध्यातरी येवढेच पर्याय आठवले :)
निबंध लिहायला हरकत नाही.
नीट जमला तर ठीक आहे नाहीतर गुरूजी द्यायचे अजून एक ............'भोपळा'.
आणि छडी घेऊन मागे लागले तर म्हणावे लागेल 'अरे! भोऽऽऽ पळा......'
भेंडीची भाजी, पोळ्या, फ्लॉवर बटाटा, कांदा, सिमला मिरची रस्सा.. उरलेल्या पोळ्या आज डब्यात..रात्री काय करावं प्रश्न पडलाय्...एवढ्या रेसिपी दिसतायत एखादी करेन म्हणते...भाकरी खायचा किती मूड आलाय पण इथलं पीठ इतकं जुनं असतं भाकर्या तुटतात्..त्यात कणीक पण घालून पाहीली तर्री तेच....
भाकरी, वा.ग्याची भाजी, डाळि.ब्यांची उसळ, खूप वाट्या ताक.... ह्यावर्षी भारतात गेल्यावर खायच्या गोष्टींची यादी करतेय.....इथे तिथल्यासारखं ताक बनवता येईल का घरी?
अवांतरः म्हशीच्या गोठ्यातून आणलेल्या दुधाचं आणि गोकुळच्या दुधाचं ताक वेगळं लागतं त्या गोठ्यातल्या दुधाच्या केलेल्या ताकाची चव अप्रतिम ती कशालाच येत नाही....
मी भारतात गेल्यावर पहिले १० दिवस मस्त पैकी गरम गरम तांदूळाची/ज्वारीची भाकरी आणी घट्ट दही... त्यासोबत लसूण चटणी आणि मस्तपैकी आईच्या हातची भरल्या वांग्याची (हिरव्या)भाजी ... हेच खाणार आहे. नंतरचे काही दिवस.. आमरस आणि पोळी.... पोळी आणि आमरस... सगळ्या परदेशस्थ मिसळपावकरांच्या नावनेही खाईन आमरस. ... आठवण काढत काढ्त.
मग कोकणांत जाणार आहे. आणि तिथे आत्याच्या घरच्या डाळींब्यांची उसळ, घरच्या फणसाची .. घरचाच नारळ घालून केलेली भाजी.. घरच्याच कोकमचं सरबत. आणी पुन्हा घरचेच हापूस आंबे...तेव्हाही तुम्हां सगळ्या मंडळींची आठवण काढेन हो...!
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
खरं तर.. पुण्यात मी १४ एप्रिल ला पोहोचेन. तेव्हा प्रभाकर पंत तुमची गाठ घेण्याचाही विचार आहे.. बघू कसं काय जमतं ते..
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
आम्ही आपले आज कसाबसा टेंपूरा ( पिठीसाखर घातलेली कोलंबीची भजी), सुशी (कच्चा मासा, कुठ्ला होता देव जाणे!) आणि ढिकळं असलेला भात खाल्ला!!
नशीब गां* तो क्या करेगा पांडू?:))
-डांबिसकाका
मी आज एक कप नूडल्स आणि रस्त्यावर बनवलेला अंडा पराठा खाल्ला. इथे चीनमधल्या छोट्या गावात ना Mcdonalds ना ऊडूपी!! आणि मा़झी चिनी हाटेलात जायची हिम्मत नाही होत बाबा! आता पुढच्या रविवारी घरी जाऊन (माझ्या) बायकोच्या हातची भाजी भाकरी खाईन.
खास आग्री पेशल काळ्या खेकड्याचा रस्सा ....
पाककृती द्या कीऽऽ!
आग्री पाकसिद्धीबद्दल मनात बरेच कुतुहल आहे. ठाणे - घोडबंदर रस्त्यावर 'आग्री फुड' अशी पाटी जाता-येता दिसते. पण अजून योग आला नाही. असो.
पाककृतींच्या प्रतिक्षेत.
प्रतिक्रिया
मी
आयला..
आजचा मेनू
धमु अरे
वरण-भात (दररोजचाच)....
चितळ्यांकडचे...
आयला......
लंच
:)))))
आपल्याला
हाय...
अय्यंगार
अरे ते
माझे दुपारचे जेवण
आता
लाल भोपळा
भोपळा....
उरलेल्या ...
अजून...
भोपळा नीट कोरला गेला असेल...
निबंध...
मी
कालचं / आजचं सोडा..
आम्हीही येऊ...
असं का!!
अहो जरूर या..
धन्यवाद..
आज रात्री
आजचे जेवण
पॅनकेक्स, मॅपल सिरप
बरं आहे बाबा तुमचं!:((
आम्रखंड
काल
कप नूडल्स
आमचा
पाककृती...
ही मिसळ खाच !