ज ह ब ह र्या!!!!
खर॑च अस॑ होत॑ बॉ!
कधी-मधी मलाही असा शुद्ध मराठीचा झटका येतो आणि मग मी घरादाराला वात आणतो :-)
पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे ह॑! कारण काय आहे ना, की हल्ली मराठी वर्डस् रिमे॑बर करायला स्लाईटली डिफिकल्टच जात॑ हो. आता वर्डस् ची ही कथा तर तुम्हाला वस्तु काय मिळणार कप्पाळ?
बाकी, एकदम खुसखुशीत लेख हो!
आवडला आपल्याला.
आपला,
- (मराठीत) ध मा ल.
दादरला सुप्रसिद्ध कबुतरखाना आहे. तिथली दादरभर शीटा टाकत फिरणारी कबुतरे आणि त्यांचे
जैन बांधवांकडून होणारे अवास्तव लाड हा समस्त जुन्या दादरकरांचा रागाचा विषय आहे. तिथे जवळच एक राम मंदीर आहे.
एकदा माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांनी शीवहून येताना एक राममंदीर द्या असे थाटात त्या
थांब्याचे नाव सांगितले. त्यावर बस वाहकाच्या मेंदूची चक्र विचार करकरून थकली शेवटी तो म्हणाला, कुठे आले हे राममंदीर...
त्यावर ह्यांनी त्या वाहकाला जवळपासच्या सगळ्या खुणा सांगितल्या. शेवटी तो कंटाळून म्हणाला, अहो काका, त्यापेक्षा कबुतरखाना म्हणाला असतात तर लगेच कळले असते.
त्यावर ते मराठी-अभिमानी काका म्हणाले, काही नाही हो सकाळी सकाळी रामाचे नाव घेत होतो.
तो बसवाहक असला तडकला.
>
>
वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्हाटी बोलैन...
बिचारा राम तरी मराठी कुठे आहे? तो तर पक्का उत्तर प्रदेशी.......
जेव्हा राम वनवासासाठी नाशिकजवळ आला होता, तेव्हाही एक "परप्रांतीयाविरुद्ध आंदोलन" झाले होते, असे ऐकिवात आहे.
काही दाक्षिणात्य अतिरेक्यांनी तर ह्या परप्रांतीयाची बायकोच पळवून नेली म्हणतात !
कारण हे परप्रांतीय दक्षिणेत येऊन येथील दाक्षिणात्यांच्या चरितार्थाची साधने, म्हणजे यज्ञात विघ्ने निर्माण करणे, वगैरे हिरावून घेत होते !
- सर्किट
लेख मस्त आहे. बरीच करमणूक केली. मराठी भाषेने दुकान, रुमाल, मैदान पासून कोण कोणते शब्द दुसर्या भाषेतून घेतले आहेत ह्यावर विचार करून 'शुद्ध मराठीत' बोलायला गेले तर कोणाला कळणारही नाही असे वाटते. पण पिढ्या न् पिढ्या रुळलेले शब्द, पँट-शर्ट प्रमाणे, स्विकारून जमेल तितके आणि इतरांना समजताना कष्ट पडणार नाहीत इतके मराठी बोलत राहावे आणि निदान ह्या पुढे तरी मराठीचा र्हास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी, कसें?
धमाल = मजा/गंमत हा अर्थ घ्यावा. (मि.पा. च्या सदस्याचे नाव आहे म्हणून)
स्वातीताई,
मि.पा. च्या सदस्याचे नाव =धमाल = मजा/गंमत हाच अर्थ घ्यावा.
ही णम्र इन॑ती!
-ध मा ल (= मजा + ग॑मत)
मी कांही भाषातज्ञ नाही. पण माझ्या मते भाषा प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी. इंग्रजी भाषा तशी आहे. कॉम्प्यूटर युग आल्यापासून आणि विशेषतः इंटरनेटच्या प्रसारानंतर त्यात किती नवे शब्द आले आहेत आणि 'रन', 'सेव्ह', 'डिफॉल्ट', 'स्क्रॅप' आदि जुन्या शब्दांना नवे अर्थ प्राप्त झाले आहेत. चॅटिंगसाठी तर नवी लिपीच तयार झाली आहे. आपण ते सगळे सहजपणे वापरतो. त्यांऐवजी मराठीत 'धांवा', 'वाचवा' वगैरे म्हणतांना जीभ अडखळेल .
आपण ठरवू किंवा न ठरवू , आपल्या मनातले विचार आपोआप सोयीस्कररित्या व्यक्त होतात. माझे आईवडील ज्या बोलीत माझ्या लहानपणी बोलत असत, ज्या शब्दात मी माझ्या मुलांशी बोलत होतो आणि आता ज्या भाषेत ते त्यांच्या मुलांशी संभाषण करतात या मराठी भाषेच्याच तीन भिन्न त-हा मी एकाच आयुष्यात पाहिल्या आहेत. त्या वेळेस आपण व्याकरणाचा किंवा भाषाशुध्दतेचा विचार करत नाही. आपले सांगणे ऐकणा-याला लगेच समजणे हे जास्त महत्वाचे असते.
आपले लेखन वाचणारे अनेक लोक असतात. आपल्याला अभिप्रेत असलेला नेमका अर्थच त्यांना त्यातून कळावा यासाठी लेखनाच्या भाषेत शुध्दलेखनाचे थोडे पालन करणे आवश्यक असते.
प्रतिक्रिया
वाह...
आवडला
छान ...............
हेच म्हणतो....
माझा अनुभव
उत्तरप्रदेशी...
उत्तरप्रदेशी...
:-)
मस्त...
मस्त
असेच
कसा काय निसटून गेला वाचायचा?
अगदी सहमत..
छान लेख...
:-))
चांगला लेख !
खूप आवडला लेख.
खुसखुशीत
भाषा