✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

We Rbots.

भ
भागो यांनी
Fri, 02/28/2025 - 10:59  ·  लेख
लेख
जडव्यागळ असा असा कोणताही शब्द कोशात नाहीये, सर. तुम्हाला जगड्‌व्याळ असे म्हणायचे आहे का? नाही. पण असाच एक शब्द आहे. त्याचा अर्थ काहीसा असा आहे म्हणजे किचकट, गुंतागुंतीचे, समजण्यास अवघड. तुम्हाला जडजंबाळ असे म्हणायचे आहे का? थँक्यू. आवडली का? काय आवडली का, सर? कविता रे. सिंटक्स तपासला सर,बरोबर आहे. मला शब्दांच्या पलीकडले काही समजत नाही. असे म्हणजे मनात काही हलल्यासारखे वाटत नाही? गलबलल्यासारखे वाटत नाही? अंग मोहरून येत नाही? अंगावरून पीस फिरवल्यासारखे... कुठलीही गोष्ट हलण्यासाठी फोर्सची गरज लागते असे न्यूटनचे नियम सांगतात. तसा काही फोर्स इथे दिसत नाहीये. वस्तूच्या जडत्वावर मात... स्टॉप इट. येस सर. आजची बातमी वाचलीस? मला रडू आले. शक्य आहे.काही लोक वाजविपेक्षा जरा जास्त संवेदनाशील असतात. एका नवजात सोनूलीचा मृत देह कचराकुंडीत... तुला काही वाटत नाही? कचऱ्या पासून वीजनिर्मितीची प्रक्रिया अशी आहे की प्रथम ... तुला काहीच कसे वाटत नाही? We Robots don't feel anything. Robots don't Cry.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भाषा

प्रतिक्रिया द्या
1198 वाचन

💬 प्रतिसाद (1)

प्रतिक्रिया

बरोबर.

कंजूस
Mon, 03/10/2025 - 12:38 नवीन
बरोबर. काही वर्षांत हे असे रोबोट डोकेदुखी ठरणार आहेत. ही सुरुवात आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा