✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी काय चुकीचे केले??

अ
अमरेंद्र बाहुबली यांनी
गुरुवार, 04/11/2024 - 17:23  ·  लेख
लेख
मी काय चुकीचे केले?? “कुणी दहावीचा विद्यार्थी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना दिसल्यास त्याला लिफ्ट द्या.” असा मॅसेज एकाने व्हॉट्सअप समूहात टाकला. त्याला “तुला दहावीत किती टक्के होते??” विचारले. त्याने मला फोन करुन शिव्या घातल्या. मी काय चुकीचे केले?? भालाफेकीत भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. “निरज चोप्रा हा भारतातील दुसरा सर्वात लांब फेकणारा खेळाडू आहे.” मॅसेज मी व्हॉट्सअप समूहात टाकला. समूहसंचालकाने मला रिमूव केले. मी काय चुकीचे केले?? एकाने लग्न झाल्यानंतर प्रिव्हेडिंग चे फोटो फेसबुक वर टाकले. मी “बारश्याला बोलव रे” अशी कमेंट केली. त्याचे आठ दहा फ़ोन आले पण मी उचलला नाही. मी काय चुकीचे केले?? activa वर फेरफटका मारनाऱ्या काकांच्या गाडीचा एक स्क्रू ढिल्ला होता. “काका तुमचा स्क्रु ढिल्लाय” अस मी त्याना सांगितल. पण स्क्रू कडे न पाहता त्यांनी माझ्याकडे रागाने पाहण्यास सुरुवात केली. मी काय चुकीचे केले?? संभाषणात मी मराठी नी तो हिंदी वापरत होता. “इतने दुर बीवी बच्चे किसके भरोसे छोडके आये??” विचारल्यावर “मी मराठीच आहे” अचानक मराठी बोलून तो संताप करू लागला. मी काय चुकीचे केले?? सोसायटीत इतर “कम्युनिटी” असतील तर प्रॉब्लेम काय?? ह्यावर “तुम्ही कुठल्या सोसायटीत राहता?” मी विचारले. “या तुम्ही” सांगून त्यानी मला निरोप दिला. मी काय चुकीचे केले?? “मी पुण्यात राहतो.” “पण तुमचा गाडी नंबर तर एमएच१४ आहे.” “जास्त शहाणपणा करतोस का??” ते भडकले. मी काय चुकीचे केले?? “मुंबईत अमुक नी मुंबईत तमुक” “पण तुम्ही तर सानपाड्यात राहतात.” ह्याला ह्या समूहात कोणी आणले ह्याला काढा नाहीतर मी जातो.” त्यांनी धमकी दिली. मी काय चुकीचे केले?? पीएमटीत ज्येष्ठ नागरिक, अपंग, नी गर्भार महिला साठीच्या राखीव जागेवर मी बसलो. “उठा, महिला राखीव आहे.” ती येऊन बोलली. “तुमच्या पोटाकडे पाहून वाटत नाही तुम्ही प्रेग्नेंट आहात.” मी बोललो. आजूबाजूचे हसले. ती काहीतरी पुटपुटत निघून गेली. मी काय चुकीचे केले?? :( सांगा सांगा मी काय चुकीचे केले??:(
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
चारोळ्या
आईस्क्रीम
ओली चटणी
थंड पेय
पंजाबी
मेक्सिकन
औषधोपचार
वन डिश मील
सरबत
फलज्योतिष

प्रतिक्रिया द्या
33405 वाचन

💬 प्रतिसाद (133)

प्रतिक्रिया

नाही,नाही कांली....

कर्नलतपस्वी
Tue, 04/16/2024 - 18:29 नवीन
नावाप्रमाणेच बाहूबली आहे. आपल्याला भल्लालदेव आणी कटप्पा शोधायला लागेल. मलाही त्यांची मते पटत नाहीत पण मिपा बाहेर आवडतात. बाकी प्रत्येक सदस्य आपले मत व्यक्त करू शकतो. पण त्याने विचलित होऊ नये. जरी तुकोबाराय म्हणत असतील की, घासावा शब्द तासावा शब्द .... पण मग वाद सवांद पुढे चालणार कसा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कांदा लिंबू

भाजप्यांची लै जळते

कपिलमुनी
Tue, 04/16/2024 - 17:40 नवीन
जरा विरोधि सूर दिसला की भाजपच्या लोकांची जी जळते ते बघून मजा येते
  • Log in or register to post comments

+१

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/16/2024 - 17:46 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आम्ही कोणत्याही प्रकारे भाजप,

अहिरावण
Tue, 04/16/2024 - 18:53 नवीन
आम्ही कोणत्याही प्रकारे भाजप, मोदी, संघ यांच्याशी संबंधीत नाही, नव्हतो आणि नसू. भाजपला मत देणे किंवा भाजप सध्या इतर कोणापेक्षाही "बरा" पर्याय आहे असे म्हणणे म्हणजे त्यांच्याशी "संबंध" असणे असे नव्हे. बाकी आम्ही कट्टर हिंदू आहोत, होतो. असू. शेंडा ना बुडूख, बिनडोक प्रतिसाद देणा-यांना विरोध करुच यात शंका नाही. बाकी तुमचे चालू द्या !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

१००%

चौकस२१२
Wed, 04/17/2024 - 04:18 नवीन
१००%
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

=))

बाबुराव
Wed, 04/17/2024 - 15:44 नवीन
आम्ही कोणत्याही प्रकारे भाजप, मोदी, संघ यांच्याशी संबंधीत नाही, नव्हतो आणि नसू.
फक्त प्रचारक असू. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

+१

बाबुराव
Wed, 04/17/2024 - 15:43 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बघून मजा येते!

वेडा बेडूक
Fri, 04/19/2024 - 12:26 नवीन
पैसे मिळतात म्हणून स्वतः ला शेतकरी म्हणवणारे भिकारडे दलाल लोक भाजप च्या विरोधात लिहितात ते बघून मजा येते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

पैसे मिळतात म्हणून...

बाबुराव
Fri, 04/19/2024 - 13:32 नवीन
भाजपने युवकांचा दहा वर्षात रोजगार घालवला पगारी कार्यकर्ते भाजपा पक्षात दिसत आहे, वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेडा बेडूक

अमरेंद्र जर एकांगी, एकसुरी,

Vichar Manus
Tue, 04/16/2024 - 18:52 नवीन
अमरेंद्र जर एकांगी, एकसुरी, द्वेषमूलक , नकारात्मक लिहीत असतील तर एक भक्तविहारी नावाचे id पण तसेच किंबहुना जास्त एकांगी लिहतात, त्याबद्दल कोणीच काही म्हणत नाही
  • Log in or register to post comments

त्यांचे वय झाले आहे

अहिरावण
Tue, 04/16/2024 - 18:55 नवीन
त्यांचे वय झाले आहे सुधरण्याची शक्यता संपली. हे तरुण आहेत म्हणून वाटते. आता त्यांची इच्छा नसेल तर राहिले. फक्त १०-१२ वर्षापूर्वीची "यकु" नावाच्या आयडीची दुर्देवी कथा आठवली, म्हणून तळमळ. जाऊ द्या ! ज्याचे त्याचे नशीब आणि कर्मफळ म्हणावे आणि सोडून द्यावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vichar Manus

तुम्ही आता जाहीरच करा कोण तुम्हीक ते

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/16/2024 - 18:57 नवीन
जेम्स वांड ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

तो मी नव्हेच

अहिरावण
Tue, 04/16/2024 - 18:59 नवीन
अजिबात नाही. तुमचा तर्क पूर्णपणे चुकला आहे. मी पूर्णपणे मीच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

:)

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/16/2024 - 19:07 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

ते हे नव्हे

Bhakti
Wed, 04/17/2024 - 18:27 नवीन
वाटत नाही रे..वांडोबा 'मी कट्टर आहे ,असू..'असं कधी नाही म्हणायचा आणि म्हणेल असं वाटतं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

@ अबा: द्वेषभावनेपेक्षा भक्तिभावना तब्ब्येतीस बरी, तस्मात...

चित्रगुप्त
Wed, 04/17/2024 - 02:33 नवीन
@ अबा: द्वेषभावनेपेक्षा भक्तिभावना तब्ब्येतीस बरी, तस्मात आता यापुढले काही आठवडे सध्याच्या द्वेषपूर्ण प्रतिसादांऐवजी तुमच्या मनात ज्यांचेविषयी भक्तिभाव वसत असेल त्या व्यक्ती, पक्ष, संघटना, संस्था, विचारसरण्या वगैरेंविषयी काही सकारात्मक लिहून बघा. त्यामुळे तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल, आणि तुमच्या मनात धगधगणारी त्वेषाची, द्वेषाची आग जरा शमून शांती, समाधान लाभेल. वाचनमात्र असणार्‍या वाचकांनाही उबाठा, रागा, जाणता राजा किंव्हा जी कुणी तुमची X YZ आदरस्थाने असतील, त्यांचेविषयी काही चांगले वाचायला मिळेल. प्रयत्न करून बघा. सुरुवात म्हणून "मला बुवा अमूक .. अमूक ... अमूक .. यांचेविषयी भक्ती, प्रेम, आदर वगैरे वाटतो, एवढेतरी स्पष्ट करण्याचे साहस दाखवावे, ही विनंती. -- आपला एक हितचिंतक.
  • Log in or register to post comments

सहमत आहे. प्रयत्न करा. नक्की

अहिरावण
Wed, 04/17/2024 - 09:42 नवीन
सहमत आहे. प्रयत्न करा. नक्की जमेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अंधभक्तांना..

बाबुराव
Wed, 04/17/2024 - 16:20 नवीन
तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल, चित्रगुप्तकाका भक्तांना कोणतीची बाजू समजू शकत नाही. एकच बाजू कळते ती म्हणजे मन लावून भक्ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

असं आहे का?

चंद्रसूर्यकुमार
Wed, 04/17/2024 - 19:10 नवीन
असं आहे का संक्षी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव

अरेच्या ! हे आहेत होय ते !!

अहिरावण
Wed, 04/17/2024 - 19:16 नवीन
अरेच्या ! हे आहेत होय ते !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

मी मिपावर गेली कित्येक वर्षे

चावटमेला
Wed, 04/17/2024 - 15:31 नवीन
मी मिपावर गेली कित्येक वर्षे वाचनमात्रच आहे. सहसा राजकीय धाग्यांवर/वादग्रस्त विषयांवर प्रतिसाद देण्याचे टाळतो. पण सदर धागालेखकाच्या लिखाणातला, प्रतिसादांमधला विखार, एखादी जात, समाज, धर्म, विचारसरणी ह्याबद्दलचा पराकोटीचा द्वेष खरोखरच चिन्ताजनक आहे. हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे. विशेषतः सावरकरांच्या धाग्यावर जी गरळ ओकली ती तर घृणास्पद होती. समाजविघातक नरसंहारांची सुरूवात असल्याच द्वेषमूलक विचारांतून होते.
  • Log in or register to post comments

सर्वसाधारणपणे

कांदा लिंबू
Wed, 04/17/2024 - 16:10 नवीन
हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे.
सर्वसाधारणपणे, एखादी व्यक्ती जशी खऱ्या आयुष्यात वागते, जालावरही तशीच वागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

व्यक्तिगत आयुष्यात

बाबुराव
Wed, 04/17/2024 - 16:17 नवीन
लोक व्यक्तिगत आयुष्यात जसे आहेत तसे जालावर हे चांगलेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कांदा लिंबू

अहो मेला चावट, सावरकर किंवा

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/17/2024 - 17:58 नवीन
अहो मेला चावट, सावरकर किंवा कुठल्याही जातीवर मी टीका केलेली नाही. केली असेल तर तस सिद्ध करा नाहीतर पळ काढून पुन्हा वाचनमात्र व्हा, नी पुन्हा अशी गरळ ओकायला येऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

तशीही शेणात दगड टाकायची हौस

चावटमेला
Wed, 04/17/2024 - 20:46 नवीन
तशीही शेणात दगड टाकायची हौस नाही, पण आता टाकलाच आहे, तर, का? काय दादागिरी आहे का हुकूम सोडायला? का तुमची वैयक्तिक मालमत्ता आहे मिपा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तुम्ही इथे काय गरळ ओकायची ती

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/17/2024 - 21:04 नवीन
तुम्ही इथे काय गरळ ओकायची ती ओका, तुम्हाला कोण अडवणार?? पंक कुणावर आरोप लावन्या आधी पुरावेक गोळा करा. ते नसेल होत तर मग गप बसा नी पुन्हा असा पांचटपणा करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

अलेच्चा, तुमच्याशी तुमच्या

चावटमेला
गुरुवार, 04/18/2024 - 13:12 नवीन
अलेच्चा, तुमच्याशी तुमच्या पातळीवरच येवून बोलावं लागणार ना पांचट शिरोमणी, त्यात काय चुकीचे केले आता? भलतेच विनोदी बुवा तुम्ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

दोन्ही बाजूंनी

बाबुराव
Wed, 04/17/2024 - 15:50 नवीन
काका ते दोन्ही बाजूंनी असतं अशी एकाची बाजू घेऊन मत मांडू नका. आपलंही काही तरी आतला गंड दुखावलं असेल म्हणून पराकोटीचा द्वेष वाटत असेल. :)
  • Log in or register to post comments

उग्रसेन अहो जी व्यक्ती साध्या

चौकस२१२
Wed, 04/17/2024 - 17:42 नवीन
उग्रसेन अहो जी व्यक्ती साध्या प्रवास वर्णनात सुद्धा गांधी / गोडसे करते त्यांच्या हेतू बद्दल काय बोलायचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव

कुठे त्या भुजबळांच्या नादाला

सुबोध खरे
Wed, 04/17/2024 - 18:39 नवीन
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/17/2024 - 19:40 नवीन
भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन केला तर तो देशद्रोह. पण भाजप मध्ये राहून केला तर राष्ट्रहित. कुटुंबातील सदस्याना इतर पक्षानी उमेदवारी दिली तर ती घराणेशाही पण भाजपात तस असेल तर ती घराणेशाही नाही. (उदा. फडणवीसांबद्दल डॉ. साहेबांच मत) त्याच प्रमाणे भाजप समर्थक असेल तर तो खांद्याच्या वर बळकट पण भाजप विरोधक् असेल तर तो खांद्याच्या खाली बळकट. - भाजप प्रेमी डॉ. खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मूर्ख --काहीतरी बोलायलाच

सुबोध खरे
Wed, 04/17/2024 - 20:22 नवीन
मूर्ख --काहीतरी बोलायलाच पाहिजे म्हणून बोलणारा सुशिक्षित --काहीतरी बोलण्यासारखे आहे म्हणून बोलणारा ज्ञानी -- काहीच बोलत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ह्यात मनमोहनसिंग, मोदी आणी

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/17/2024 - 20:26 नवीन
ह्यात मनमोहनसिंग, मोदी आणी नेहरु बसवायचे म्हटले तर कसे बसतील? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मनमोहन - The Raj was

अहिरावण
Wed, 04/17/2024 - 20:30 नवीन
मनमोहन - The Raj was beneficial: Manmohan https://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/the-raj-was-beneficial-manmohan/articleshow/1165516.cms नेहरु - डिसकवरी ऑफ इंडीञ (काही मुद्दे भरकटलेले) मोदी - मौत का सौदागर म्हटले तरी शांत मिळाले उत्तर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

वाटलच होतं तुम्ही मध्ये

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/17/2024 - 20:43 नवीन
वाटलच होतं तुम्ही मध्ये लुडबुड करनार ते. मोदी शब्द आला म्हणजे धावत पळत जाऊन आरती ओवाळायची अस गरजेचं नाही. भक्ति (काहीकाळ तरी) दाबून धरावी. ज्यांना प्रश्न विचारलाय त्यांना उत्तर देऊ द्या. एवढीच उत्तर द्यायचिक हौस असेल तर खऱ्या आयडीने या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

अरेरे आम्ही सहज टंकन केले आणि

अहिरावण
गुरुवार, 04/18/2024 - 10:01 नवीन
अरेरे आम्ही सहज टंकन केले आणि तुमच्या मुस्काटीत खाडकन बसली याबद्दल खेद आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

@अहिरावण

सुबोध खरे
गुरुवार, 04/18/2024 - 09:56 नवीन
@अहिरावण कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

ह्यात मनमोहनसिंग, मोदी आणी

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/18/2024 - 10:05 नवीन
ह्यात मनमोहनसिंग, मोदी आणी नेहरु बसवायचे म्हटले तर कसे बसतील? :) हया प्रश्नाला तुम्ही बगल दिलीत. उत्तर मिळालय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

माझ्या मते हा धागा वाचनमात्र

अहिरावण
Wed, 04/17/2024 - 19:12 नवीन
माझ्या मते हा धागा वाचनमात्र व्हायला हवा. बराच खल झाला आहे बहुबलींचे "काय चुकले" यावर !!
  • Log in or register to post comments

हॅ त्यांचं कधी काही चुकतं का?

सुबोध खरे
Wed, 04/17/2024 - 19:29 नवीन
हॅ त्यांचं कधी काही चुकतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

त्यांना नाही वाटत. पण

अहिरावण
Wed, 04/17/2024 - 19:33 नवीन
त्यांना नाही वाटत. पण मिपावरील बहुतांश लोकांना त्यांचे चुकते असेच वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अहो, सकाळी उठल्यावर सर्वात आधी हाच धागा उघडला जातोय

चित्रगुप्त
Wed, 04/17/2024 - 19:36 नवीन
अहो, सकाळी उठल्यावर सर्वात आधी हाच धागा उघडला जातोय सध्या, तो वाचनमात्र करून कसे चालेल बरें ? कुणीतरी म्हटलेच आहे (म्हणे) - दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

अगागागागा !! बाजार उठवला !! =

अहिरावण
Wed, 04/17/2024 - 19:45 नवीन
अगागागागा !! बाजार उठवला !! =)) =)) तसेही हे सगळ्याच गोष्टींची निंदा करत असतात आणि कुणीतरी म्हटले अहे निंदकाचे घर असावे शेजारी आमची मागणी मागे घेतो. चालू द्या लवकरच १००० प्रतिसाद होतीलच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

+1

कर्नलतपस्वी
Wed, 04/17/2024 - 20:03 नवीन
+1×1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

आहो टिव्ही,कायप्पावर....

कर्नलतपस्वी
Wed, 04/17/2024 - 19:48 नवीन
वर्तमानपत्र, नुक्कड मिटींगा एव्ढचं काय मंदिरात कीर्तनात सुद्धा हेच चालू आहे. आजच दोन तरुण तुर्काचीं पत्रकार परिषद बघीतली. राम मंदिरात सुंठवडा कमी वाटला गेला असेल त्या पेक्षा जास्त खिरापत वाटली गेली. वर्तमानपत्र म. टा. मधे खरमरीत टिका,घणाघात, गुजरात मधे भाजप संपणार, काय वाटेल ते छापून येतयं. मला एक गोष्ट समजत नाही किती आत्मविश्वास टपकतोयं..... चित्रगुप्त यांनी एक हिन्दीत चारोळी टाकून राय (मत) विचारले. जो प्रथम विचार डोक्यात आला तसाच कायप्पावर पुढे ढकलला. सर्वांची क्षमा (भाषा हिन्दी आहे म्हणून) मागून खाली डकवतोय. गोड मानून घ्या..... जनता.... नेता पर ही भरोसा क्यों किया जाए???, जनता पर भी भरोसा करें... सरकार आएगी, तो सभी महिलाओं के खाते में एक लाख दिए जाएंगे मैं कहता हूं चुनाव के पहले ही डाल दो, आपकी सरकार नहीं आई, तो वापस कर दिए जाएंगे भरोसा भी कोई चीज है, हर बार जनता ही नेता पर भरोसा क्यों करें। आप सभी का क्या राय है??? नेताजी..... वादों का दौर है वादें ही किये जायेंगे जब देने का दौर आयेगा बहाने दिए जायेंगे जनता का भरोसा नेतापर *नेता का भरोसा जनता पर हिंग लगे ना फिटकरी....* यहाँ वादों के व्यंजन ही परोसे जायेंगे....... नेताजी आलवेज राॅक्स या भाऊ गर्दीत अबा एकटेच नाहीत. तेव्हां चार जुन पर्यंत चर्हाट वळणं चालू द्यात .
  • Log in or register to post comments

अखिलेशजी म्हणतात बीजेपी १५०

अहिरावण
Wed, 04/17/2024 - 19:50 नवीन
अखिलेशजी म्हणतात बीजेपी १५० पर्यंत जाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

तुम्ही मिपाचे संजय राऊत आहात.

Trump
Wed, 04/17/2024 - 20:49 नवीन
श्री अमरेंद्र बाहुबली, तुम्हाला तुम्ही काय चुकीचे करता ते आता चांगले समजेल. :) अशी मिळालेले संधी बाकीचे लोक का सोडतील ? कितीही म्हटले तरी तुम्ही मिपाचे संजय राऊत आहात.
  • Log in or register to post comments

सर संजय राऊत साहेबानी १०५

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/17/2024 - 21:11 नवीन
सर संजय राऊत साहेबानी १०५ गुजरात वाद्याना घरी बसवुन महाराष्ट्र वाचवला अश्या महाराष्ट्र प्रेमी, कट्टर शिवसैनिक, निष्ठेचे दुसरे नाव संजय राऊत साहेबांची तुलना माझ्याशी?? इतका मोठा नाही हो मी सर _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

तुम्ही 'मिपाचे संजय राऊत' अशी पदवी म्हणुन वापरायला लागा.

Trump
Wed, 04/17/2024 - 21:18 नवीन
काही हरकत नाही. तुम्ही 'मिपाचे संजय राऊत' अशी पदवी म्हणुन वापरायला लागा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

नको सर हव तर मला मी फेल्युअर

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/17/2024 - 21:22 नवीन
नको सर हव तर मला मी फेल्युअर आहे. हवं तर मला मीपाचा फडणवीस म्हणा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा