Skip to main content

श्रीखंड

लेखक Bhakti यांनी बुधवार, 10/04/2024 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
A श्रीखंड श्रीखंड .. गोठ्यातून ओह माफ करा डेअरीतून आणा दूध एक लीटर उकळी द्या येऊ एकदम बेटर ऊन ऊन दूध हो द्या कोमट विरजणाने जेव्हा होईल दही घट्ट सूती कापडात दह्याला बांधा निथळया पाणी पुरचुंडी टांगा टांगलेल्या जीवा होता तास पूर्ण चौदा चक्का..दिसता घट्ट ,पुरा झाला सौदा फेटा फेटा.. पुरणयंत्री,कोण्या चाळणी वा हैण्ड मिक्सी एकास एक सम चक्का-पिठी करा एक भुरभुरा इलाईची-सुकामेवा आवडीचा निगुतीने करा हा श्रीखंड बेत आहे सवडीचा -भक्ती

वाचने 10923
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

In reply to by चौकस२१२

मला बदाम, चारोळ्या नाही आवडत फ्रेन्च आवडते.वेलची म्हणजे इलायची ना?ती रगडून टाकलीय ,ती आवडते.

In reply to by बाबुराव

मटन-पुरी करा एक दिवस.
धागालेखिका शाकाहारी असाव्यात असे त्यांच्या एकंदर पाककृतींवरुन दिसते.

In reply to by प्रचेतस

+१ नाहीतर काय मुक्या प्राण्यांना प्रोटीनसाठी मध्ये घेण्यापेक्षा, डायरेक्ट ते जे घासपुस प्रोटीन घेतात ते खाऊन आम्ही प्रोटीन मिळवते.बाकी ज्यांना जे आवडतं ते त्यांनी खावं...नो इश्यू..

In reply to by बाबुराव

बाबुराव मटनाबरोबर भाकरी ब्येस लागते.. पुरी नगं

In reply to by बाबुराव

अहो,आमची धाव केवळ लिंबाच्या मटणापुरती... बनवाबनवीची कृपा ;) बाकी तुमचा न आणि ण मध्ये घोळ सर्वत्र दिसतोय हो... मी पहिल्यांदा मटर पुरी वाचली .ती बनवते एकदा.