✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जागतिक इडली दिन । ३० मार्च २०२४ । वाफाळता खाद्योत्सव!

क
कांदा लिंबू यांनी
Sat, 03/30/2024 - 17:50  ·  लेख
लेख
नमस्कार खाद्यप्रेमी मिपाकर्स! तुम्हाला जर चुकून माहित नसलं तर सांगतो, आज जागतिक इडली दिन आहे हं. दरवर्षी ३० मार्च रोजी जागतिक इडली दिन साजरा केला जातो. २०१५ साली चेन्नईमधील एनियावन नावाच्या एका बल्लवाचार्याने १३२८ प्रकारच्या इडल्या बनवल्या आणि त्याचबरोबर ४३ किलोची एकाच इडली बनवली. तेंव्हापासून इडली दिनाची सुरुवात झाली आणि मग पांढरी, वाफाळती, हलकी, फुसफुशीत अशी असलेल्या इडलीला हा दिवस समर्पित झाला. तांदूळ आणि उडीदडाळ यांची इडली पचायला हलकी असते. इडलीसोबत शेंगदाणे, दाळवं यांची चटणी ही तेलंगणात लोकप्रिय आहे. आंध्रातही तेच. तामिळनाडूत मात्र इडलीसोबत खोबऱ्याची चटणी हवी. अर्थात सर्वच ठिकाणी इडली-सांबर, इडली-चटणी-सांबर, इडली चटणी-पूडचटणी, इडली रसम... असेही प्रकार पाहायला मिळतात. पांढरीशुभ्र इडली म्हणजे कोरा कॅनवास आहे असं समजा, त्यावर हवे ते रंग भरता येतात! इडली हा बहुतेक भारतातील सर्वात लोकप्रिय न्याहारीच्या प्रकार असावा. मला स्वतःलाही इडली हा पदार्थ खूप आवडतो! अर्थात इडली हा केवळ सकाळीच खाण्याचा पदार्थ आहे असे नाही. आम्ही अनेकदा रात्री इडली खातो. खरंतर आम्ही कोणत्याही वेळी काहीही खातो म्हणून रात्री इडली, डोसा, पोहे, उपमा, शेवया, सुशीला (उग्गानी बज्जी) असे नाना प्रकार आमच्या घरी रात्रीच्या खाण्यासाठीही बनतात. चला तर मग मिपाकर सुगरणींनो आणि बल्लवाचार्यांनो, उद्या रविवार आहे. आता लगेच सहा वाजेपर्यंत तीनास एक प्रमाणात तांदूळ आणि उडीदडाळ भिजू घाला. झोपण्याच्या आधी, म्हणजे दहा वाजेपर्यंत मिक्सरमधून सरसरीत फिरवून घ्या आणि त्या पिठावर एक हिरवी मिरची ठेवून झाकून ठेवा. सध्या उन्हाळा आहे, पीठ मस्त आंबेल! सकाळी उठल्यावर सांबर-चटणीची तयारी करा. आठ-नऊ वाजेपर्यंत, मस्त शेंगदाणे-दाळवांची चटणी, भरपूर फोडी-भाज्या घातलेलं, उकळतं सांबर, पांढरीशुभ्र वाफाळती इडली यांच्या आस्वाद... घेण्याआधी इथे फोटो टाका आणि मगच खायला सुरु करा! माझ्या घरचे इडलीचे काही फोटु - इडलीत ताजे मटारदाणे - इडली फोटू १ इडली सांबर चटणी व अद्रकचटणी - इडली फोटू २ इडली खाण्याची माझी आवडती प्लेट - इडली फोटू ३ इडली चटणी व शेवग्याच्या शेंगांचे सांबर - इडली फोटू ४ इडलीप्रेमींनो, आपलं इडलीवरचं प्रेम इथे प्रतिसादरूपात व्यक्त करायला विसरू नका! #WorldIdliDay2024
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8867 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

छान आहेत फोटो.

कंजूस
Sat, 03/30/2024 - 18:16 नवीन
छान आहेत फोटो. इडली प्रेमी. १) दुकानात इडली रवा मिळतो त्यात भिजवून वाटलेली उडीद डाळ घातली की इडल्या हलक्या होतात. २) मुळगापोडी सुकी चटणी घेऊन त्यावर तिळाचं तेल घातलं की छान चटणी होते.
  • Log in or register to post comments

छान फोटोज

यश राज
Sat, 03/30/2024 - 18:40 नवीन
अजुन एक इडली प्रेमी अर्थात मी :)
  • Log in or register to post comments

थोडी शिळी झालेली इडली तुकडे

चौकस२१२
Sat, 03/30/2024 - 19:02 नवीन
थोडी शिळी झालेली इडली तुकडे करून त्याला ढोकळ्यावर देतो तशी फोडणी द्यायची / मसाला इडली
  • Log in or register to post comments

छान

माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 03/30/2024 - 19:53 नवीन
दुसर्या महायुद्धाच्या वेळेस बनवली गेलेली रवा ईडली पण चविष्ट. Image removed.
  • Log in or register to post comments

म्हणजे कांचिपुरम इडली.

कंजूस
Fri, 08/02/2024 - 04:59 नवीन
म्हणजे कांचिपुरम इडली. यांना गव्हाच्या रव्याचे कौतूक म्हणून रवा इडली. कर्नाटकात या रव्याला ' बॉम्बे रवा' म्हणतात. थोडक्यात सांगायचे तर इडलीच्या रूपातला उपमा. बागलकोटकडचे उप्पीट पातळ चिकट असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

मी पण इडलीप्रेमी...

मुक्त विहारि
Sat, 03/30/2024 - 20:11 नवीन
इडली, कधीही खातो..
  • Log in or register to post comments

आठव्या शतकातील तामिळ शिलालेखाचा शोध

निनाद
Sun, 03/31/2024 - 09:00 नवीन
इडलीप्रेमी मी पण आहे - आणि ईडल्या केल्याच! :)
२०१५ साली चेन्नईमधील एनियावन नावाच्या एका बल्लवाचार्याने १३२८ प्रकारच्या इडल्या बनवल्या आणि त्याचबरोबर ४३ किलोची एकाच इडली बनवली. तेंव्हापासून इडली दिनाची सुरुवात झाली आणि मग पांढरी, वाफाळती, हलकी, फुसफुशीत अशी असलेल्या इडलीला हा दिवस समर्पित झाला.
क्षमस्व! पण माझी माहिती अशी आहे की, २०१५ मध्ये, आठव्या शतकातील तामिळ शिलालेखाचा शोध लागला. या शिलालेखांमध्ये "इडली" आणि "अप्पम" सारख्या पदार्थांचा उल्लेख आहे, ज्यामुळे हे सिद्ध होते की इडली हा आठव्या शतकापासून अस्तित्वात आहे. या शोधाने इडलीच्या इतिहासाबद्दल नवीन माहिती उघड केली आणि "जागतिक इडली दिन" साजरा करण्याची प्रेरणा दिली. इडलीच्या प्राचिनत्वा विषयी अजून काही ऐकीव माहिती - दावा नाही!
  1. मनुस्मृती मध्ये इड्डलिका नावाच्या पदार्थाचा उल्लेख आहे, जो इडलीसारखाच असावा.
  2. शिलप्पदिकारम नावाच्या तमिळ महाकाव्यात इडली नावाच्या पदार्थाचा उल्लेख आहे. हे महाकाव्य दुसर्‍या शतकात लिहिले गेले होते आणि ते तमिळ साहित्यातील पाच महाकाव्यांपैकी एक आहे. "शिलप्पदिकारम" मध्ये, "इडली" ला एका स्वादिष्ट पदार्थाचे वर्णन आहे. "शिलप्पदिकारम" मधील "इडली" चा उल्लेख हा प्राचीन भारतातील खाद्य संस्कृतीचा एक मौल्यवान पुरावा आहे.
  3. वराहमिहिर यांनी लिहिलेल्या बृहत्संहिता नावाच्या ग्रंथात इड्डलिका नावाच्या पदार्थाचा संदर्भ आहे. बृहत्संहितेत इड्डलिका बनवण्याची कृती देखील दिली आहे. ही कृती आजच्या इडली बनवण्याच्या पद्धतीसारखीच आहे आणि त्यात तांदूळ आणि उडीद डाळ भिजवणे, त्यांचे पीठ बनवणे आणि ते वाफवून तयार करणे समाविष्ट आहे.
थोडक्यात इड्डलिका हा पदार्थ इडलीच आहे. इड्डलिका हे भिजवलेले तांदूळ आणि उडीद डाळीपासून बनवलेले आणि वाफवून तयार केले जात असत. अर्थातच इडली हा प्राचीन भारतीय पदार्थ आहे यात संशय नाही. कुणी हे ग्रंथ वाचले असल्यास आणि त्यांतले संदर्भ दिल्यास आभारी असेन. या शिवाय अजून ऐतिहासिक काही उल्लेख असल्यास मला कल्पना नाही. पण असले पाहिजेत. इडली हा शब्द कन्नड भाषेतील "इडलीगे" या शब्दापासून आला असावा असा एक कयास आहे. "इडलीगे" या शब्दाचा अर्थ "इडली बनवणे" असा असावा.
  • Log in or register to post comments

इडली-वडा हे प्राणप्रिय सोबती

सौन्दर्य
Sun, 03/31/2024 - 10:02 नवीन
मला इडली फारच आवडते. मुंबईत कोणत्याही उडिपी रेस्टॉरंटमध्ये कधीही जा, गरमागरम इडली व सांभार मिळणार नाही असे कधीच होणार नाही. आमचे एक मंगलोरीयन शेजारी होते ते एका मोठ्या रगडयावर पीठ वाटायचे व मोठमोठ्या वाट्यात इडल्या बनवायचे व त्यात आंबूसपणा आणण्यासाठी ताडी घालायचे. फारच मस्त लागायच्या त्या इडल्या. आरोग्याच्या दृष्टीने इडल्या अगदी वरच्या श्रेणीत येऊ शकतात कारण त्यात आरोग्याला अपायकारक कोणताही पदार्थ नसतो. कॉलेजमध्ये असताना उडिपी रेस्टॉरंटमध्ये मारामारी नावाने इडली-वडा सांभार मिळायचा त्याची चव अजून जिभेवर रेंगाळते आहे. विलेपार्लेच्या रामकृष्ण रेस्टॉरंटमधील इडली म्हणजे अगदी स्वर्गसुख. अश्या ह्या इडलीची आठवण करून दिल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

आजची इडली -

कांदा लिंबू
Sun, 03/31/2024 - 10:13 नवीन
आज सातमजली पडद्यावर Godzilla x Kong: The New Empire बघायला जात आहोत; फारसा वेळ नव्हता म्हणून सांबर करण्याच्या भानगडीत काही आम्ही पडलो नाहीत. कालची उरलेली शेवयाची खीर सोबत खायला घेतली. Image removed.
  • Log in or register to post comments

अरे वाह !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/31/2024 - 10:55 नवीन
क्या बात है मस्त. इडली आवडते. सर्वांना 'इडली डे'च्या शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

इडली आवडता प्रकार मात्र

प्रचेतस
Sun, 03/31/2024 - 11:50 नवीन
इडली आवडता प्रकार मात्र सांबार वाटी सेपरेट घ्यायला आवडत नाही. एका खोलगट बाऊलमध्ये इडल्या घेऊन त्या पूर्ण बुडतील असं वाफाळतं सांबार त्यावर ओतून मगच खायला आवडतं.
  • Log in or register to post comments

इडली, बेंगलोर आणि मी

हणमंतअण्णा शंक…
Sun, 03/31/2024 - 13:25 नवीन
एका खोलगट बाऊलमध्ये इडल्या घेऊन त्या पूर्ण बुडतील असं वाफाळतं सांबार त्यावर ओतून मगच खायला आवडतं.
बेंगलोर मध्ये हा फरक खूपच मजेशीर केला जातो. तुम्ही इडली सांबार अशी ऑर्डर दिली की इडल्या आणि सांबार वेगळे मिळतात. तुम्ही सांबार इडली अशी ऑर्डर दिली की बॉऊल मध्ये इडल्या बुडतील असे सांबार इडल्यांवर ओतून मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

भारीय हे, इथं पुण्यात डिप

प्रचेतस
Sun, 03/31/2024 - 13:27 नवीन
भारीय हे, इथं पुण्यात डिप सांगावं लागतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर

अगदी...

तुर्रमखान
Sun, 03/31/2024 - 13:50 नवीन
एटूबी किंवा तत्सम टिकिट रेस्त्राँमध्ये गेल्यावर याची किंमत एकच असते. त्यामुळे तुम्ही ती रिसिट भटारखान्याच्या काउंटरवर दिली तर तो, 'सांबारा?' आसं विचारतो. 'हो' असं म्हणलं तर बॉउल मध्ये सांबारात इडल्या टाकून देतो. यासाठी बर्‍याच हॉटेलात वेगळ्या छोट्या इडल्या असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर

इडली वडे साबार उडपी लोक

कंजूस
Sun, 03/31/2024 - 13:54 नवीन
इडली वडे साबार उडपी लोक चांगले बनवत नाहीत. यांची हॉटेल्स मात्र मोक्याच्या जागी टकाटक असतात. .वेटर धावपळ करून पटापट वाढतात. पण पण.. .. .. तमिळ लोकांचे हे पदार्थ फारच चांगले असतात. खाल्ल्याशिवाय फरक कळणार नाही.
  • Log in or register to post comments

वारलो !

अहिरावण
Sun, 03/31/2024 - 19:06 नवीन
वारलो !
  • Log in or register to post comments

तोंपासू!

Bhakti
Wed, 07/31/2024 - 11:08 नवीन
तोंपासू!
  • Log in or register to post comments

तुमच्याकडे मिनी इडली पात्र

Bhakti
Wed, 07/31/2024 - 11:15 नवीन
तुमच्याकडे मिनी इडली पात्र आहे का?त्यात इडली करून त्यांना फ्राय करून फोडणी द्यायची.पोडीबरोबर छान लागते. तसेच तट्टे इडली पात्रही मिळते.
  • Log in or register to post comments

ह्या इडल्या छान लागतात

मुक्त विहारि
Wed, 07/31/2024 - 19:40 नवीन
ह्या इडल्या छान लागतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

इडलीचे सगळे प्रकार एनीटैम

सस्नेह
गुरुवार, 08/01/2024 - 22:37 नवीन
इडलीचे सगळे प्रकार एनीटैम फेवरिट्ट !! मस्त धाघा आणि तोंपासु फोटो..
  • Log in or register to post comments

इडली नेमकी कशी बनवली तर सर्वात जास्त आरोग्यदायी होते ?

मारवा
Sun, 08/04/2024 - 09:40 नवीन
इडली चा आरोग्यदायी लाभ घेण्यासाठी म्हणजे गोड बॅक्टरिया व इतर साठी रेसिपी काय आहे ? तसेच त्यात नेमके काय टाळावे ज्याने सर्वोत्तम लाभ आरोग्यास होतो ? कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा ?
  • Log in or register to post comments

चव कमी चांगली लागली तरी चालेल

मारवा
Sun, 08/04/2024 - 09:43 नवीन
चव समजा दुय्यम घटक मानला तर काय केले तर इडली उत्तम आरोग्यदायी होईल ? बाहेर मिळणारी इडली व तिचे कुटके सांगाती वाईट आहेत ?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा