लेख छान आहे हो! कृपया अजूनही असेच चांगले लेख येऊ द्यात..
मिसळपावचे एक सभासद सर्वसाक्षी हेदेखील आता अर्धेअधिक चिनी बनलेले आहेत!
काय रे साक्षीदेवा, खरं की नाही? :)
तात्या.
धन्यवाद. मॅस्कॉटचे नोमेंक्लेचर, त्यामागील चिनी भाषेतील अर्थ, संस्कृतीला अनुसरून त्यामागील अर्थ, मुद्देसूद, अति त्रोटक नाही तसेच पाल्हाळहि नाही. नीटनेटके आणि जेथल्या तेथे. अप्रतिम.
चांगली माहिती.
गेली अनेक वर्षे पैचिंग शहरात सर्वत्र कलगणक यंत्रे 'ओमेगा' घड्याळ कंपनिच्या सौजन्याने उभारलेली आहेत. ऑलिंपिक सुरू होण्यास आपण ते यंत्र पाहता त्या क्षणापासून किती दिवस, किती तास, किती मिनिटे व किती सेकंद बाकी आहेत ते या यंत्रात सातत्याने दिसते.
गेली दोन वर्षे पैचिंग परिसरातील सर्व प्रेक्षणिय स्थळे व प्राचिन वास्तूंची डागडूजी व रंगरंगोटी वगैरे चालले आहे. सध्या सार्या चीनला ऑलिंपिक ज्वराने ग्रासले आहे. पैचिंगने तर जोरदार तयारी चालविली आहे. अर्थात या निमित्ताने उपलब्ध झालेल्या व्यापारी संधीचा पुरेपूर लाभ हा देश उठविणार यात शंकाच नाही.
नुकत्याच झालेल्या दौर्यात हंगज्झौच्या कॅथीने मला अतिशय सुंदर असे सुवर्ण विलेपित काशाचे ६ सेंटिमिटर व्यासाचे ऑलिंपिक बोधचिन्हाचे स्मृतिपदक भेट दिले. या पदकाच्या फक्त ६०,००० प्रति बनविण्यात आल्या असून माझ्याकडे ४६०५९ वी प्रत आली आहे. धन्यवाद कॅथी! दहा पाकळ्या असलेल्या फुलाच्या आकाराच्या या पदकाच्या एका मुद्रेवर मीनल ने लिहिलेली पाच प्रतिके आहेत तर दुसर्या मुद्रेवर बोधचिन्ह व महाभिंत तसेच स्वर्गमंदिराच्या प्रतिकृती उमटविलेल्या आहेत.
माहितीपूर्ण लेख. प्रतीकांबद्दलची माहिती आणि संदर्भ आवडले. सर्वसाक्षींचे फोटोजही मस्त. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
छान..
अतिशय सुरेख.
पैचिंग ऑलिंपिक बोधचिन्ह स्मृतिपदक, कालगणक
उत्तम
झकास !!!!!
लेख छान आहे ,,, नविन भागांची / लेखांची ,आतुरतेने वाट पाह्त आहे.
मदनबाण
मस्तच लेख..
मिनल,
खूप नवी माहिती मिळाली.असेच आणखीही येऊ देत. साक्षींचे फोटोही छान आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
अतिशय उपयुक्त आणि रंजक माहितीबद्दल