एक प्रवास.
प्रेरणा श्री. मेहेंदळेंचा हा धागा
http://misalpav.com/node/51490
काही वेळा आपल्याला प्रवास करायचा असतो पण त्यात काही असे अनुभव येतात की ते आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात. पुढील आयुष्यात आपण या चुका टाळतो. असाच एक प्रवास मी अनुभवला होता. वर्ष नीट लक्षात नाही २०१७ किंवा १८ असावे. त्या काळी मी मध्य प्रदेशात शाजापूर ह्या ठिकाणी नोकरीला होतो. शाजापूर हे इंदोर च्या उत्तरेला १०० किमी वर आहे. मला शाजापूर ते धुळे हा ३५० किमी चा प्रवास करायचा होता. मी ५ वाजेची ड्यूटी संपवून संध्याकाळी बस पकडायला शाजापूर बसस्थानकावर गेलो. नियोजना प्रमाणे आठ ते साडेआठ पर्यंत मी इंदोर पोहोचून मस्त स्लिपर कोच पकडली असती नी झोपून गेलो असतो बस पहाटे पाच ते सहा दरम्यान धुळ्यात असती. झोपेची झोप नी प्रवासाचा प्रवास झाला असता. बस मध्ये बसल्यावर माझ्या लक्षात आले की हेडफोन्स रूमवर राहीलेत, हेडफोन विना प्रवास? अशक्य!
मी बसमधून ऊतरून पून्हा रूम वर आलो हेडफोन्स शोधले नी पुन्हा बस पकडायला बसस्टॅंडला आलो. पण वातावरन पुर्ण बदललेले होते. बस स्टॅंडवर ऐरवी १० तरी गाड्या ऊभ्या असायच्या तिथे एकही गाडी नव्हती. सगळीकडे पोलिस बंदोबस्त दिसत होता. पोलिस नागरीकांना लाठ्याकाठ्या मारून पिटाळत होते. “क्या हूआ?” म्हणून एका पोलीसाला विचारले, त्याच्या कडून कळाले की कांद्याच्या भावावरून आंदोलन पेटलंय नी हायवे ला दोन चार ट्रक, नी एक दन पोलिस गाड्या लोकांनी जाळल्यात, बस हायवेला अडकल्या आहेत नी स्टॅंडला ऊभ्या होत्या त्या पोलिसांनी काढायला लावल्या, लवकरच कर्फ्यू लागेल, तू पण कलटी मार. :(
एका हेडफोन मूळे माझी बस चूकली होती नी पूढील प्रवासाची काहीही शाश्वती नव्हती. खरं तर ह्या प्रसंगी मी पून्हा रूमवर निघून जायला हवे होते, पण तसे होणे नव्हते नाहीतर मी पूढील महान प्रवासाला मूकनार होतो. मी बसस्टॅंड सोडून मेनरोडवर आलो नी काही मिळतंय का पाहू लागलो. माझ्या सारखे अनेक होते नी आम्हा चार पाच जणांना एकाच दिशेस जायचे होते. थोड्या वेळाने एक टेंपो आला तो इंदोर कडे “एमटी” म्हणजे रिकामा जात होता. त्याने ओफर दिली की मक्षी (तिथून २५ किमी) पर्यंत मागे बसून चला पूढे तूम्हाला काहीतरी मिळेलच. टेंपोत मागे बसून? छे! पण काही पर्याय नव्हता इतर चारजण टेंपो वाल्याचीच ताडपत्री अंथरून माझ्यासाठी प्रशस्त जागा ठेवून बसले नी मला “आव” म्हणून आमंत्रण देऊ लागले, मीही त्यांचा आग्रहाला ओ देऊन टेंपोत मागे बसलो. म्हटलं २५ किमी तर जायचंय. टेंपो निघाला, शिस्तीत, हळूहळू, धक्क्यावर धक्के देत त्याने आम्हाला मक्षी पर्यंत सोडले, पण मक्षीलाही काही वेगळी परिस्थीती नव्हती मग टेंपोतच पूढे देवास पर्यंतचा प्रवास करायचे ठरले. देवास येईपर्यंत रात्रीचे ९ः३० झाले होते. खरंतर ह्या वेळेपर्यंत मी इंदोर पोहोचून धूळ्यासाठी स्लिपर कोच पकडायला हवी होती. देवास हून मला इंदोर जायला बस मिळाली, देवासला कांदा प्रश्न नव्हता त्यामूळे रहदारी चालू होती. देवास ते इंदोर अंतर तासाभरात गाठले. इंदोरच्या विजयनगर चौराहावरून सर्व बस धूळ्याकडे पळतात, मी तिथे १०ः३० वाजता पोहोचलो. जवळच एका छोट्या होटेलात मी जेवण केले. पण सर्व बस निघून गेल्या होत्या मला धुळे जायला बस मिळत नव्हती. शेवटी मी सरवटे नावाच्या बस स्टॅंड ला जायचा निर्णय घेतला. बस स्टॅंडलाही बस नाही मिळाली तर मग मला कूठल्यातरी होटेलात रहावं लागनार होतं, त्यासाठी १००० ते १५०० जानार हा विचार करून मी स्वत वरच चरफडलो. तसं बस स्टॅंडवर न्यूज पेपर अंथरून झोपायचीही मला लाज वाटली नसती कारण नागपूरला एकदा एम पी एस सी चा परिक्षा द्यायला मी गेलो होतो तेव्हा असाच रेल्वे स्टेशनवर झोपलो होतो. इतर एम पी एस सी कॅंडीडेट झोपले होते मग मी ही झोपलो. ऊद्या अधिकारी झालो असतो तर भाषणात सांगायल बरं पडलं असतं ना की मी रेल्वे स्टेशनवर झोपून परिक्षा दिली नी अधीकारी झालो :)
तिथे नागपूरच्या भर मे महीन्यात रेल्वेने प्रवाशांसाठी स्प्रिंकलर्स लावले होते मस्त थंडगार पाणी कूलर सारखं पडत असल्याने मस्त झोप झाली होती. इंदोरला अशी परिस्थीती नव्हती, प्रचंड घाणेरडे बसस्टॅंड, गोंगाट, नी चोर, लूच्चे, लफंगे ह्यांचा सूळसूळाट होता. ह्यामूळे ते शक्य नव्हते. कूठल्यातरी जूगनू नावाच्या ओला सारख्या ऐप वरून मी रिक्षा बूक केली नी तेवढ्यात देवासारखी एक बस माझ्या समोर प्रकट झाली. पण हाय रे दैवा! ती बडवानी जानारी होती, म्हणजे मला फक्त खलघाट पर्यंतच जायला मिळनार होते, तीथून फाटा फूटून गाडी बडवानी जानार होती. पण इंदोरात होटेलचा तरी पर्याय होता खलघाट ला पूढे गाडी नाही मिळाली तर? तिथे होटेल नाहीत हायवेला.
मी निर्णय कॅंसल केला नी पून्हा रिक्षात जायला लागलो तर बस च्या कंडक्टर ने मला आश्वस्त केलं की तो मला खलघाट टोल नाक्यावर त्यांच्या मागून येनार्या नी धूळ्याकडे जाणार्या गाडीत स्वतः जातीने बसवून देईल. त्याने असे आश्वासन दिल्यावर लाॅजचे हजारेक रूपये वाचल्याचा मला आनंदं झाला. त्या कंडक्टरचं ऐकून मी बसमध्ये चढू लागले पण रिक्षावाला छातीवर ऊभा होता, दिडशे रूपये मागू लागला. शेवटी त्याची २० रूपयात बोळवन करून मी बस मध्ये चढलो, चांगली जागा पाहून बसलो.बस खलघाटकडे निघाली, कंडक्टर ने मला मागून येनार्या बसच्या कंडक्टरचा मोबाईल क्रमांक दिला नी त्याच्याशी बोलू घ्या सांगीतलं. बस थोडी पूढे गेल्यावर अर्ध्याएक तासाने मी कंडक्टरला फोन केला. राॅंग नंबर म्हणून तिकडून कळाले. कदाचीत राॅंग कनेक्शन झाले असावे असे मला वाटले. पुन्हा अर्ध्या तासाने मी त्याला फोन केला, पुन्हा तोच व्यक्ती राॅंग नंबर बोलला. मला शंका आली मी कंडक्टर कडे जाऊन नंबर चेक केला तर त्याच्या मोबाईल मध्ये सेव असलेला नी मी डायल केलेला नंबर सेम होता. पून्हा तिसर्यांदा ट्राय मारला तर समोरच्या व्यक्तिने मला त्याचे नाव गाव सर्व सांगीतले नी रात्रीचे दीड वाजलेत पून्हा फोन लावू नकोस म्हणून धमकावले. कंडक्टरने मला फसवले होते, त्याने एका दगडात दोन पक्षी मारले, खोटं बोलून एक गिर्हाईक वाढवले नी त्याच्या एका शत्रूलाही त्रास दिला. मला प्रचंड संताप आला. जाऊन कंडक्टरला शिव्या द्याव्या गरज पडली तर हानामारी करावी असा विचार केला पण तिथे सर्रास लोक चालत्या गाडीतून फेकतात हे माहीत होते. मी सहा फूटांचा असलो तरी ६५ किलो वजनाचाच होतो. त्यामूळे हातघाईची लढाई न करता दुरून तोफगोळे डागावे असा मी विचार केला. बस थांबली की खाली ऊतरून एक दगड ऊचलायचा नी ह्याची पूढची काच फोडायची नाहीच जमली तर मागची तरी फोडायचीच असा मी निश्चय केला. खलघाट यायची वाट पाहू लागलो. खलघाट आले मी ऊतरलो नी रस्त्याच्या कडेला जाऊन दगड शोधू लागलो. दगड सापडेपर्यंत बस ने वाट पाहीली नाही नी झरदीशी निघून गेली. मनातल्या मनात शिव्या देत मी ऊचललेला दगड खाली ठेवला. रात्रीचे दोन वाजले होते. मी त्या चौकात काही मिळतं का पहात होतो. रात्रीचे दोन वाजलेले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३, नर्मदा किनार नी मोकळा रस्ता गाड्या सूसाट धावत होत्या. स्पीड ब्रेकर दिसत नसल्याने त्यावर गडगडाटा सारख्या आवाज करत ऊधळत होत्या, बडवानी कडे टर्न घेनार्या तेवढ्या स्लो व्हायच्या. चौकात मला एक दूकानापूढे पोलिस खूर्ची बसून नी समोरच्या बाकड्यावर पाय पसरून झोपा ठोकताना दिसला. मी त्याला हलवून ऊठवले नी माझी समस्या सांगीतली, झोपमोड केली म्हणून त्याने माझ्याकडे तिरपा कटाक्ष टाकला नी “चल, चाय पीते” म्हणून टपरीवर नेले आम्ही एकेक चहा हानला, चहाचे पैसे त्यानेच दिले. मला आश्चर्य वाटले, आम्ही गाड्या थांबवायच्या मोहीमेवर लागलो. आम्ही दोघे सूमारे तासभर गाड्यांना हात देत होतो पण एकही गाडी थांबेना. थोड्या वेळाने मला अक्कल आली, पोलिसाला पाहून कुणीही गाडी थांबवत नाहीये हे माझ्या लक्षात आले. मी त्याला “हॅ हॅ, आप क्यो मेरे लिये परेशान हो रहे हो? आप आराम करो मै रोकता हूॅं.” म्हणून सांगीतले. त्यालाही बरे वाटले नी तो झोप ठोकायला सेटपवर गेला. खूर्ची नी समोराल बाकड्यावर पाय पसरून आडवा झाला. पाचच मिनीटात मला पाहून एक गाडी थांबली, ती टेंपो होती, न्यूज पेपरची गाडी. इंदोरहून “दैनिक भास्कर” घेऊन सेंधव्याला निघाली होती. त्याने मला पूढे केबीन मध्ये बसवले तिथे आधीच ड्रायवर धरून तीन लोक होते. तरी एकाला पूढे एकाला मागे करून त्याने मला जागा करून दिली. भागम भाग सिनेमात जर्मनीला जाताना अक्षयकूमार भरलेल्या गाडीत स्वतला कोंबून दरवाजा बंदं करतो तसा मी स्वतला कोंबून झटकन दरवाजा लावून घेतला. गाडी निघाली, ड्रायवरने गिअर टाकायचा म्हटला तर एकाला आपला पाय दोन्ही हाताने ऊचलावा लागायचा. प्रचंड थंडी वाजत होती, गाडीची काच थोडी ऊघडी होती तारण ड्रायवर ला बाहेर पिचकारी मारावी लागायची. आत गार हवा घूसत होती. कुणी काही बोलत नव्हते म्हणून मीही बोललो नाही ऊगाच द्यायचा ऊतरवून. दोनेक तासाने सेंधवा आलं, सेंधवा टोल नाक्यावर टोल रांगेत एक ट्रॅवल्स स्लिपर कोच ऊभी होती मी पटकन जाऊन त्याच्याशी बोलनी केली, धुळ्याकडेच जात होती. पाच साडेपाच वाजले होते. पेपर गाडीचे पैसे चुकते करून मी तिच्यात शीरलो. स्लिपर फूल होती आत झोपायला जागा नव्हती. मला केबीन मध्ये बसावे लागले, प्रचंड झोप लागत होती. कॅबीन मध्ये फक्त बसन्या पूरती जागा होती. दोन जण आणखी होते. ते जवळच ऊतरले. आता ड्रायवरच्या मागची सीट पूर्ण रिकामी झाली. मी पुर्ण पसरलो. पण ड्रायवरला ते माझे सूख पहावले नाही. तो माझ्याशा भांडू लागला, कॅबीन मध्ये झोपलं कुणी की ड्रायवरला ही झोप येते वगैरे. त्याच्या सीटच्यामागेच वर बदली ड्रायवरला झोपायची जागा होती. नी मी त्याच्या मागे झोपत असल्याने मी त्याला तसाही दिसनार नव्हतो. त्याच्या भांडनात काहीही पोईंट नव्हता. दूसरा त्याचा सोबती आत जाऊन आडवा पडला होता. आता मात्र माझा संयम सूटला मी त्या ड्रायवरला “ भोस*के, वगैरे शिव्या दिल्या, मी धुळ्यात राहतो नी मला झोपू दिलं नाहीस तर धुळ्यात गेल्यावर तूझ्यासह तूझी बस जाळून टाकेन” वगैरे दम भरला. “लगावू फोन? लगावू?” असं त्याला धमकावलं. त्याने एकदा माझ्या कडे खालून वर पाहीलं नी चुपचाप बस चालवू लागला. मी झोपलो. बस शहरातून जानार होती पण त्याने शहराबाहेरून जानार्या बायपास ने का घातली ते कळाले नाही. पून्हा रिक्षाला पन्नास मोजावे लागले हायवेवर ऊतरून घरी यायला. सकाळी ८ वाजता घराजवळ पोहोचलो. सकाळी दूध आणायला जानारे वडील भेटले. “काय रे? केव्हा निघाला? कळवले नाही? जा घरी मी आलो.” बोलले नी निघून गेले. मी घरी येऊन बॅग फेकली नी झोपलो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
प्रवास वर्णन आवडले... ;-)
तूमचेही अनूभव सांगा.
नक्कीच.... :-)
हो गमतीशीरच आहे खरंतर.
बाब्बो!!
हो बरोबर. धमकीलाच घाबरला
खूप दिवसांनी खरं प्रवास वर्णन
सहमत. सध्या ब्ला ब्ला कार
असंख्य आठवणी आहेत अशा , गुजर
बस ड्रायवर काही वेळा आठ आठ
एकदम भारी, लैच प्रवास करावा
हो ना. हेडफोन विसरलो नसतो तर
भारीच अनुभव.
धन्यवाद.
तुफान लिवलंय भौ. गजब.
इदोर आलो की नेहमी तूमची भेट
नोकरी मुळे भरपूर प्रवास....
बापरे, कश्मीरात स्थानीकांचे
मुक्कामाच्या यष्टीत
हाहा. मस्त अनूभव होते.
मस्त मागे उघडा टेम्पो चा ट्रे = हौदा
हौद्यात बसलो
मस्त मागे उघडा टेम्पो चा ट्रे = हौदा
एकदा बेंगळुरूहून पुण्याला
ऐनवेळी विमानाची तिकिटे उपलब्ध
असे प्रवास करावेत अधून-मधून :)
हा हा..भारीच अबा!
हा हा..भारीच अबा!
धन्यवाद. :)
पूर्वी दोनतीनदा बंगलोर पुणे
सहमत नाही. बसून झोप होत नाही.
भन्नाट
ख. त. र. ना. क __
हा .... हा .... हा .... !
धन्यवाद. :)
छान अनुभव
"दिल्लि चे ठग"
[मी पण येडाच खरंच आय त्या
महिरावण , माफ करा ? आपण