रोजच्याप्रमाणे आजहि सकाळी भुईकोट किल्ला परिसरात आमच्या मातोश्री फिरायला गेल्या व येताना "आघाडा" या रान वनस्पतीला घेऊन आल्या.
हाडाची शिक्षिका असल्याने आधी सर्वांना त्या भाजीचे महत्व समजावून सांगितले व नंतर हळुवारपणे भाजी निवडून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून काढली .... नंतर जिरे, मोहरी, मीठ,मिरची, थोडासा दाण्याचा कुट व लसूण एव्हढ्या अल्प सामग्री च्या बळावर अफलातून अशा चवीची हि पालेभाजी खाऊ घातली.
आईकडून समजलेली माहिती हि अशी : पावसाळा सुरु झाला कि बहुतांश ठिकाणी रानभाज्यांना बहर येतो. आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा या औषधी वनस्पती कुठलीही विशेष अशी मेहनत न घेता निसर्ग आपोआप आपल्याला देत असतो आपण फक्त थोडेसे ज्ञान घेऊन डोळे उघडे ठेऊन वावरले कि आपल्याला या भाज्यांची पर्वणी साधता येते.
या रानभाज्या चविष्ट व पौष्टिक असतात. ठराविक ऋतूतच येत असल्या कारणाने त्यांचे महत्वही आपण जाणून घ्यायला हवे तरच त्याचे फायदे आपण मिळवू शकतो.

आघाडा रोपवर्गीय रानभाजी आहे. ‘अ’ जीवनसत्वाने भरपूर अशी ही भाजी आहे. हाडे बळकट करण्यासाठी आघाडा खावा. आघाडा रक्तवर्धक आहे, पाचक आहे. मुतखडा, मुळव्याध व पोटदुखीवर गुणकारी आहे.पावसाळ्यात रानातील या भाज्या मुळातच चवदार असतात. अगदी थोडेसे पाकसंस्कार त्यावर करून त्या शिजवल्या कि झालेच कि, नैसर्गिक व पौष्टिक असल्याने या हंगामी भाज्या आवर्जून सर्वांनी खायलाच हव्यात. मी तर बुवा आज सकाळीच आस्वाद घेतलाय आणि मिपाकरांसाठी काही फोटो. फार काही अवघड नसल्याकारणाने अगदी डिट्टेल अशी पाकृ देत बसत नाही. (तसेही मला त्यात विशेष ज्ञान नाहीच) येथील तज्ञ् जाणकारांनी आणखी काही रानभाज्या व त्यांचे महत्व विशद करावे जेणेकरून येणाऱ्या पिढीलाही त्याचे ज्ञान होईल.
वाचने
20373
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेच्चा!
चला या निमित्ताने....
In reply to अरेच्चा! by चांदणे संदीप
आघाडा खातात हे माहिती नव्हते.
मलाही
In reply to आघाडा खातात हे माहिती नव्हते. by टर्मीनेटर
हा आघाडा बहुतकरून शाळांच्या
In reply to आघाडा खातात हे माहिती नव्हते. by टर्मीनेटर
अंदाज ...
In reply to हा आघाडा बहुतकरून शाळांच्या by प्रचेतस
टर्मीनेटर.... नक्की ट्राय करा....
In reply to आघाडा खातात हे माहिती नव्हते. by टर्मीनेटर
पिझ्झा बर्गर च्या जमान्यात...
लाल् / हिरवा माठ, चवळी आणि शेपू
In reply to पिझ्झा बर्गर च्या जमान्यात... by कर्नलतपस्वी
आफ्रिकेत
In reply to लाल् / हिरवा माठ, चवळी आणि शेपू by टर्मीनेटर
इंटरेस्टींग माहिती!
In reply to आफ्रिकेत by हणमंतअण्णा शंक…
हणमंतअण्णा शंकर...
In reply to आफ्रिकेत by हणमंतअण्णा शंक…
लाल् / हिरवा माठ, चवळी आणि
In reply to लाल् / हिरवा माठ, चवळी आणि शेपू by टर्मीनेटर
शेवगा आणि आघाडा सोडून बाकी
In reply to पिझ्झा बर्गर च्या जमान्यात... by कर्नलतपस्वी
सौंदाळा ...
In reply to शेवगा आणि आघाडा सोडून बाकी by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सोमवारी शक्यतो पालेभाजी फिक्स असते.पालेभाजी खातो ...पण दर आठवड्याला नित्यनेमाने खातोच असे नाही ... तुमची पण कमालच आहे बुवा ! लसूण पात पराठे वाह वा..!कर्नल सर
In reply to पिझ्झा बर्गर च्या जमान्यात... by कर्नलतपस्वी
लुप्त होणे कि कगारपर नक्कीच आहे.मस्त
मिपावर (कदाचित जागु यांची) रानभाज्यांची
In reply to मस्त by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हेच नोंदवायला आलो होतो.
In reply to मिपावर (कदाचित जागु यांची) रानभाज्यांची by टर्मीनेटर
तो स्वाद हाच त्या भाजीचा आवडता भाग होता.
In reply to हेच नोंदवायला आलो होतो. by गवि
हीच.. वाह वाह.. अनेक धन्यवाद.
In reply to तो स्वाद हाच त्या भाजीचा आवडता भाग होता. by टर्मीनेटर
पाने याहून अधिक गोल आकाराची
In reply to हीच.. वाह वाह.. अनेक धन्यवाद. by गवि
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या
In reply to पाने याहून अधिक गोल आकाराची by गवि
स्मरणशक्तीला सलाम .... गवि
In reply to हेच नोंदवायला आलो होतो. by गवि
"प्रसंगोचित"
In reply to मिपावर (कदाचित जागु यांची) रानभाज्यांची by टर्मीनेटर
छान रानभाजी.
आनंदाचं शेत!
In reply to छान रानभाजी. by Bhakti
भक्ती ताई
In reply to छान रानभाजी. by Bhakti
छान लेख , मलाही थंडीत
आताचा छान मोठा प्रतिसाद
आता नाही ते दिवस वय व.
लिहिण्यात खूप व. शब्द
एक उपाय सांगु का?
In reply to लिहिण्यात खूप व. शब्द by nutanm
आपण ....
In reply to लिहिण्यात खूप व. शब्द by nutanm
चवदार धागा
आघाडा ?
In reply to चवदार धागा by वामन देशमुख
चौकस २१२ राव
In reply to आघाडा ? by चौकस२१२
देशमुख साहेब ....
रानभाजी महोत्सव
चामुंडराय
In reply to रानभाजी महोत्सव by चामुंडराय
कधी केली नाही हि भाजी.. पण करायला आवडेल.
छान माहिती
वर्षभरापूर्वीची आठवण .....
धागा वाचून कोणी ट्राय केली का घरी हि आघाडा भाजी ?साधारण याच सुमारास उगवते हि आणि ती कोवळी असतानाच पाने खुडून ती ताजी असतानाच तव्यावर परतून घ्यावी लागते .पाऊस सुरु झालाय पण अजून मंडईत जायला वेळ झाला नाही.