✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लव्ह जिहाद, एक उच्चवर्णीय फँटसी !

उ
उनाड यांनी
Fri, 05/12/2023 - 06:12  ·  लेख
लेख
गेली अनेक वर्षे या संकल्पनेने धुमाकूळ घातला आहे. वास्तविक पहाता असले काहीही अस्तित्वात नाही, पण तरीही शिकले सवरलेले लोक तावातावाने हा विषय मांडतात त्याचा थोडासा मागोवा. या विषयी एक दरपत्रक व्हायरल झाले होते. ते खोटे दरपत्रकही ज्याने लिहिले त्याचा जात्याभिमान त्याला लपवता आला नाही. चातुर्वर्ण्याप्रमाणे त्याने विविध वर्णाचे दर ठरवले, जास्त दर कोणाचा हे सांगणे नलगे. महाराष्ट्रात एका शहरात असा आंतरधर्मीय विवाह दोन्ही कुटूंबांच्या सहमतीने झाला होता. तेव्हाही रिकामटेकड्या मध्यमवयीन उच्चवर्णीय व्हॅट्स अ‍ॅप अंकल्स नी ती पत्रिका व्हायरल केली व दोन्ही कुटुंबांना मनस्ताप झाला. नुकतेच उत्तरेत एका अक्षरशः भीक मागून जगणार्‍या महिलेने एका मुस्लिमाशी प्रेम विवाह केला व धर्म बदलला. तिच्या डोक्यावर छप्पर आले, दोन घास मिळू लागले ही खरे तर चांगली गोष्ट, पण विहिंप वाल्याने तक्रार केली व आता एफ आय आर वगैरे सुरू आहे. लव्ह जिहाद च्या संशयावरून आत टाकलेल्या एका मुलीचे तर मिस कॅरेज झाले. स्वरा भास्कर ( कट्टर हिंदुत्ववादी दिवसभर तिला ट्रोल करतात ) ने एका मुस्लिमाशी लग्न केले. करो बापडी, पण स्वतःला साध्वी म्हनून घेणार्‍या एका भाजप नेत्रीने ट्विटर वर इतकी गरळ ओकली की तिला साध्वी तरी का म्हणावे असा प्रश्न पडला. या लव्ह जिहाद कल्पने मध्ये आमच्या मुलींना अक्कल नसते, हे गृहितक अध्याहृत आहे. केरला स्टोरी च्या निमित्तने या विषयावर पुन्हा एकदा सोमी वर थयथयाट सुरू झाला यात आश्चर्य ते काय ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36117 वाचन

💬 प्रतिसाद (188)

प्रतिक्रिया

आता या माणसाचा मुखवटा पूर्ण

श्रीगुरुजी
Sat, 05/13/2023 - 14:37 नवीन
आता या माणसाचा मुखवटा पूर्ण उतरून खरा चेहरा उघडा पडलाय. लव्ह जिहाद हा धाग्याचा विषय केवळ ढोंग होते. खरा विषय ब्राह्मणद्वेष आहे. आव्हाड, मिटकरी, कोकाटे वगैरे जातीद्वेष्टे ट्विटरवर सातत्याने याच स्वरूपाचे ब्राह्मणद्वेषी लिहीत असतात. हीच गरळ ओकण्यासाठी याने हा धागा काढला आणि शेवटी ब्राह्मणद्वेषाची गरळ ओकलीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

+१

Trump
Mon, 05/15/2023 - 12:32 नवीन
आता या माणसाचा मुखवटा पूर्ण उतरून खरा चेहरा उघडा पडलाय. लव्ह जिहाद हा धाग्याचा विषय केवळ ढोंग होते. खरा विषय ब्राह्मणद्वेष आहे. आव्हाड, मिटकरी, कोकाटे वगैरे जातीद्वेष्टे ट्विटरवर सातत्याने याच स्वरूपाचे ब्राह्मणद्वेषी लिहीत असतात. हीच गरळ ओकण्यासाठी याने हा धागा काढला आणि शेवटी ब्राह्मणद्वेषाची गरळ ओकलीच.
+१ त्या माणसाने सगळ्या सुशिक्षित आणि हिंदु लोकांवर गरळ ओकली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मिसळपाववर सुरुवातीला ज्यावेळी

भीमराव
Sat, 05/13/2023 - 22:10 नवीन
मिसळपाववर सुरुवातीला ज्यावेळी मी सदस्य झालो त्यावेळी मी सेक्युलर विचारसरणीचा होतो‌. अंगात किडा म्हणून म्हणा किंवा सेक्युलर पणाची हद्द म्हणा पण मी कुराण वाचलं. त्यानंतर मला दहशतवाद (याला खरंतर कुराणवाद म्हणायला हवं - तुम्ही नुसते देवाला मानणारे असला तरी माझ्या पुस्तकातल्या देवाला का मानत नाही म्हणून जीव घ्यायचा अधिकार देणाराला दुसरं काय म्हणणार), लव जिहाद, सक्तीची धर्मांतरे, काश्मीर किंवा इतर ठिकाणी होणाऱ्या धार्मिक हकालपट्टीची मुळे कुराणातच आढळून आली. त्यानंतर मी इस्लाम पुरता माझा पुरोगामी विचार सोडून दिला. हिंदू धर्मात लाख त्रुटी असतील पण एक गोष्ट चांगली आहे, हिंदू धर्म प्रवाही आहे. इथं नवा विचार मान्य आहे, धर्म सुधारणा मान्य आहे, धर्मावर, देवावर प्रश्नचिन्ह मान्य आहे. तुमचं नास्तिक असनं मान्य आहे, एकेश्वरवाद अनेकेश्वरवाद, सगळं मान्य आहे. तुम्हाला हिंदू व्हायला वेगळा विधी नाही, तुम्ही ज्या दिवशी स्वतःला हिंदू समजायला सुरू करावं, हिंदू पद्धतीने (कोणत्याही- शैव वैष्णव, वारकरी, दत्त, शाक्त, मराठी, उत्तर भारतीय, अगदी कोणत्याही) त्या दिवसापासून तुम्ही हिंदू (कर्नाटक राज्यात हिंदू सिद्दी आहेत). उद्या तुम्ही स्वतः एखाद्या पंथाची स्थापना करु शकता. तुम्ही मुसलमान झाला तर त्या धर्मात राहुन दुसरा पंथ काढला तर मान कापुन टाकतील. लव जिहाद चं असं आहे, मुसलमानांची कुराण आणि हदिस आदेशानुसार पद्धत आहे की तुम्ही ज्या देशात राहता तो देश मुसलमान करने हि तुमची नैतीक जबाबदारी समजावी, तुम्ही अल्पसंख्याक असाल तर लोकसंख्या वाढवावी (शक्य त्या प्रत्येक पद्धतीने) आणि बहुसंख्य व्हावे. बहुसंख्य झाला की देश कब्जा करावा आणि इस्लाम ची व्याप्ती वाढवावी. त्यासाठी मग लव जिहाद करा, किंवा कापाकापी करा.
  • Log in or register to post comments

भीमराव, बर झालं हे लिहिलं

रात्रीचे चांदणे
Sun, 05/14/2023 - 08:46 नवीन
भीमराव, बर झालं हे लिहिलं तुम्ही. एक वेळ मिस्लिम लोक कुराण मध्ये हे असल काही आहे हे मान्य करतील परंतु ज्या हिंदूचा कुराणाचा अभ्यास आहे असे लोक कधीही मान्य करणार नाहीत. जे लोक धर्मासाठी आपल्या आणि अन्य धर्मीयांचा जीव घेऊ शकतात त्यांच्यासाठी लव जिहाद म्हणजे फारच किरकोळ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

असे एका तबलिगी जमातमधील अनुयायाने सांगितले होते.

Trump
Mon, 05/15/2023 - 12:36 नवीन
भीमराव, बर झालं हे लिहिलं तुम्ही. एक वेळ मिस्लिम लोक कुराण मध्ये हे असल काही आहे हे मान्य करतील परंतु ज्या हिंदूचा कुराणाचा अभ्यास आहे असे लोक कधीही मान्य करणार नाहीत.
सहमत. मुस्लीम हा एकाच वेळी सेक्युलर / सर्वधर्मप्रेमी / सर्वधर्मसमानता वाला असुच शकत नाही - असे एका तबलिगी जमातमधील अनुयायाने सांगितले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

सहमत भीमराव

वडगावकर
Sun, 05/14/2023 - 15:54 नवीन
अगदी सहमत भीमराव... अनेक विचारी व्यक्ती इस्लाम सोडत आहेत (एक्स-मुस्लिम) त्यातला एक एक्स मुस्लिम साहिल अनेक लिब्रान्डु आणी स्युडो शेखूलर लोकांच्या अध्ययना साठी खाली लिंक देतोय ) https://www.youtube.com/channel/UCjk7V7Rw2jJSflLXYxBOY0g (आता माझा स्वतः चा अनुभव , २००७ साली मी सौदी अरेबियात , अल-जुबेल सिटी , एक केरळी , एक कोकणी आणी एक पेशावरी अश्या तीन लोकांनी ईस्लाम मध्ये ओढण्याचा दोन मार्गानी प्रयत्न केला होता- अतिशय मिठास वाणी आणी हिंदू धर्मा बद्दल बुद्दिभेद , त्यातल्या कोकणी इसमाने मला कुराणाची मराठी प्रत दिली होती , समग्र वाचन केलं, सुराः अत-तौबा श्लोक -५ अनेक वेळा वाचून काढला )[मग जेव्हा निषिद्ध महिने लोटतील तेव्हा त्या अनेकेश्वरवादींना ठार करा, जेथे सापडतील तेथे त्यांची नाकेबंदी करा व प्रत्येक पातळीवर त्यांचा समाचार घेण्यासाठी सज्ज रहा. मग जर त्यांनी पश्चात्ताप केला व नमाज कायम केली आणि जकात दिली तर त्यांना सोडून द्या. अल्लाह क्षमाशील आणि दया दाखविणारा आहे.]   
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

मतदारांनी मजाक माजाक मे खरंच

आंद्रे वडापाव
Sat, 05/13/2023 - 23:16 नवीन
मतदारांनी मजाक माजाक मे खरंच बजरंग बली चे नावं घेवून बटण दाबले की काय... भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही... त्याचबोबरीने लव्ह जिहाद ही पळवून लावली....
  • Log in or register to post comments

मतदारांनी मजाक माजाक मे खरंच

आंद्रे वडापाव
Mon, 05/15/2023 - 16:28 नवीन
मतदारांनी मजाक माजाक मे खरंच बजरंग बली चे नावं घेवून बटण दाबले की काय... भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही... त्याचबोबरीने लव्ह जिहाद ही पळवून लावली.... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

ह्यात २ राज्ये

कपिलमुनी
Mon, 05/15/2023 - 22:24 नवीन
महाराष्ट्र आणि मध्या प्रदेश रडीचा डाव खेळून सत्ता मिळवली आहे. ते काढल्यास हाती कटोरा राहतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

"बहुसंख्य व्हावे. बहुसंख्य

चौकस२१२
Sun, 05/14/2023 - 14:58 नवीन
"बहुसंख्य व्हावे. बहुसंख्य झाला की देश कब्जा करावा " जी लोक स्वतःला पुरोगामी म्हणत सतत " हे आणि ते बामणांचे कारस्थान असा कंठशोष करीत असतात " त्यांना हे समाजत नाही कि जिहादी हातात तलवार घेऊन आले तर ते हे बघणार कि समोरचा जोशी आहे पाटील आहे कि काम्बळे ? त्यांच्या दृष्टीने हे सर्व काफीरच कि
  • Log in or register to post comments

अखिला प्रकरणात हेच झाले.

श्रीगुरुजी
Sun, 05/14/2023 - 18:37 नवीन
अखिला प्रकरणात हेच झाले. आईवडील पुरोगामी साम्यवादी विचारांचे. त्यामुळे मुलीला धर्म, देव, अध्यात्म यापासून कटाक्षाने दूर ठेवले. मेंदूत कदाचित अध्यात्मासाठी एखादा कोपरा ठेवलेला असावा जो या मुलीच्या मेंदूत रिकामाच राहिला. शिक्षणासाठी वसतिगृहात गेल्यानंतर बरोबर कट्टर धार्मिक मुस्लिम मुलगी होती. तिचा भाऊ वारंवार भेटायला यायचा. बहीणभावाने योजनापूर्वक मेंदूच्या रिकाम्या जागेत मुस्लिम तत्वज्ञान भरले. मुलीने धर्मांतर करून बरोबर राहणाऱ्या मुस्लिम मुलीच्या भावाशी लग्न केले आणि पुरोगामी नास्तिक साम्यवादी आईवडीलांचे डोळे खाडकन उघडले. मग लग्नाविरूद्ध न्यायालयात गेले. पण उपयोग झाला नाही. काय मिळविले यापुरोगामी आईवडीलांनी नास्तिक तत्वज्ञान मुलीच्या मेंदूत भरून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

हो !

उनाड
Sun, 05/14/2023 - 19:46 नवीन
हा विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता. एकाद्या व्यक्तीने सर्व विचार करून स्वखुषीने धर्म सोडायचा निर्णय घेतला तर प्रोब्लेम काय आहे ? जे बरे वाईट परिणाम असतील ते ती भोगेल ना ? या न्यायाने आंबेडकरांनी केलेले धर्मांतरही चूक होते का?
  • Log in or register to post comments

लव्ह जिहाद हे उच्चवर्णीयांचा

श्रीगुरुजी
Sun, 05/14/2023 - 19:52 नवीन
लव्ह जिहाद हे उच्चवर्णीयांचा कल्पनाविलास आहे या दाव्याचे पुरावे व विदा कोठे आहे? नसेल देता येत तर दावा मागे घेऊन माफी मागा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

आंबेडकरांचा विषय

चौकस२१२
Mon, 05/15/2023 - 04:53 नवीन
या न्यायाने आंबेडकरांनी केलेले धर्मांतरही चूक होते का? उनाड महोदय , आंबेडकरांचा विषयच काढला आहेत तर हे घ्या १) आंबेडकरणसारख्या विचारवंताने स्वतः काही सामाजिक बदल घडावा म्हणून केलेले धर्मांतर आणि वेगवेगळ्या आमिषाने केले गेलेलं धर्मांतर यांची कशी बरोबरी करता? २) आंबेडकरांना पाहिजे असते तर त्यांनीं ख्रिस्ती किंवा इस्लाम चा स्वीकार सहज केला असता .. त्यांनी तसे केले नाही! का ? कधी विचार केलाय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

त्याबरोबरच श्री आंबेडकर यांचे ईसाई आणि मुस्लीम रिलीजनबद्दलचे विच

Trump
Mon, 05/15/2023 - 12:39 नवीन
+१ त्याबरोबरच धागाकर्त्याने श्री आंबेडकर यांचे ईसाई आणि मुस्लीम रिलीजनबद्दलचे विचार वाचले तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

या न्यायाने आंबेडकरांनी

Marathi_Mulgi
Mon, 05/15/2023 - 18:24 नवीन
या न्यायाने आंबेडकरांनी केलेले धर्मांतरही चूक होते का? >>> फॉर लार्ज पार्ट ऑफ हिज लाईफ आंबेडकर हिंदू होते. त्यांनी हिंदूंमध्ये सुधारणा व्हावी, दलितांना माणुसकीची वागणूक मिळावी म्हणून अफाट प्रयत्न केले. त्यानंतरही जेव्हा मंदिर प्रवेशासारख्या गोष्टींसाठी दलित बांधवांची अडवणूक होताना दिसली तेव्हा त्यांनी धर्म बदलणार असे जाहीर केले. त्यासाठी त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला. त्यात त्यांना जो करुणामयी धर्म वाटला तो त्यांनी जाहीररित्या स्वीकारला. त्यासाठी त्यांनी काही नियम बनवले. या दरम्यान कित्येक व्यक्ती व संस्थांनी पुर्नविचार करण्यासाठी त्यांची भेट घेतली. त्यांना ते भेटले व त्यांचे विचार त्यांनी ऐकून घेतले. आंबेडकरांसारख्या सुविद्य, काही तपे समाजकारण केलेल्या व्यक्तीने स्वेच्छेने केलेले धर्मांतर व अब्राहमीक धर्मात नॉन-अब्राहमीक जोडीदार मान्य नाही म्हणून सक्तीने करावे लागलेले धर्मांतर यातला फरक समजत नसेल तर कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

"लव्ह जिहाद" या शब्दांची

आंद्रे वडापाव
Sun, 05/14/2023 - 20:06 नवीन
"लव्ह जिहाद" या शब्दांची व्युत्पत्ती कोणी केली, हे तपासून पाहिलं तर केरळ मधील क्रिश्चन धर्मगुरूंनी केली ( क्रिश्चन मुली आणि मुस्लिम मुलगा) संदर्भाने.... पण चाणाक्ष वाचकांना माहिती असेलच, सर्वोच्च नेते आणि त्यांचे भक्त चाहते यांनी नेहमीपरमाणेच , दुसऱ्याचे ढापून चोरण्याचे पिढ्यानपिढ्या ची परंपरागत जन्मजात सवय दाखवून दिली...
  • Log in or register to post comments

वर तर उनाड म्हणत आहेत की हा

सुखी
Sun, 05/14/2023 - 20:15 नवीन
वर तर उनाड म्हणत आहेत की हा शब्द उच्चवर्णीय लोकांचा कांगावा आहे म्हणून... अर्थात पुरावे काही देत नाहीयेत यामुळे ते धादांत खोटे असायची शक्यता जास्त. पण तुम्ही ही व्युत्पत्ती सांगितली, त्यावरून हे लक्षात येतं की भारतातले क्रिश्चन जागे झाले पण अजून हिंदू(?) जागे झाले नाहीत तर उच्च नीच वर्णीय कांगावे हेच खेळण्यात मग्न आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

उच्चवर्णीय, ख्रिश्चन धर्मगुरु

श्रीगुरुजी
Sun, 05/14/2023 - 20:33 नवीन
उच्चवर्णीय, ख्रिश्चन धर्मगुरु, मोदींचे समर्थक यापैकी नक्की कोणाचा हा कल्पनाविलास आहे हे समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखी

बकरे

उनाड
Sun, 05/14/2023 - 21:33 नवीन
कोणत्याही धर्माच्या धर्मगुरूंना आपले बकरे इतर धर्मात जाऊ नये असे वाटत असतेच. हा कल्पना विलास ख्रिस्ती धर्मगुरूंनी सुरू केला व मग (काही) हिंदुनी उचलला असे म्हणता येइल. लव्ह जिहाद विरोधी मोर्चे कोणत्या संघटना काधत आहेत हे पाहिले तरी पुरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

लव्ह जिहाद हे उच्चवर्णीयांचा

श्रीगुरुजी
Sun, 05/14/2023 - 22:27 नवीन
लव्ह जिहाद हे उच्चवर्णीयांचा कल्पनाविलास आहे या दाव्याचे पुरावे व विदा कोठे आहे? नसेल देता येत तर दावा मागे घेऊन माफी मागा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

वर तर उनाड म्हणत आहेत की हा

श्रीगुरुजी
Sun, 05/14/2023 - 22:36 नवीन
वर तर उनाड म्हणत आहेत की हा शब्द उच्चवर्णीय लोकांचा कांगावा आहे म्हणून... अर्थात पुरावे काही देत नाहीयेत यामुळे ते धादांत खोटे असायची शक्यता जास्त. धादांत खोटंच आहे ते. उच्चवर्णीय (म्हणजे ब्राह्मण) द्वेष हे यामागील प्रमुख कारण आहे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखी

व्युत्पत्ती कोणी केली

चौकस२१२
Mon, 05/15/2023 - 04:18 नवीन
आंद्रे ...चला हे तर मान्य केलंत कि ख्रिस्ती लोकांना सुद्धा इस्लामी धर्मांतरबद्दल नाराजी होती .. मग ती हिंदूंना असली तर काय चुकलं? आणि हिंदूंना म्हणजे सर्व हिंदूंना जातीचा संबंध नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

आमच्या घरी एक मावशी होत्या

शलभ
Sun, 05/14/2023 - 20:39 नवीन
आमच्या घरी एक मावशी होत्या कामाला. लग्नाआधी हिन्दू नंतर मुस्लीम. त्यांची सून आलेली एक-दोन वेळा. तीची पण सेम केस. लग्नाआधी हिन्दू नंतर मुस्लीम. दोघीही घरकाम करायच्या. लव जिहाद चा सिन होता का ते माहीत नाही.
  • Log in or register to post comments

बकरे? मुळात हिंदूंना धर्मगुरू

भीमराव
Sun, 05/14/2023 - 23:17 नवीन
बकरे? मुळात हिंदूंना धर्मगुरू आहे का? शंकराचार्य म्हणाल तर त्यांना कोणी धर्मप्रमुख मानत नाही. पंथप्रमुख किंवा संप्रदाय प्रमुख खुप आहेत. इथं आहेत त्यांच्या कडे निट लक्ष नाही त्यामुळे आपले बकरे कमी होतात म्हणून धर्मगुरू नि कांगावा सुरू केला हा युक्तिवाद काही पटत नाही बुवा. धर्मावर नंतर येऊ आधी मुस्लिम पर्सनल लॉ काय आहे ते समजून घेतलं तरी तुम्हाला पडलेल्या निम्म्या कोड्याचं उत्तर तिथंच सापडतंय बघा.
  • Log in or register to post comments

याच माणसाने खालील तारे तोडले

श्रीगुरुजी
Sun, 05/14/2023 - 23:40 नवीन
याच माणसाने खालील तारे तोडले आहेत. - धर्मांतराला व्होकल विरोध करणारे बहुसंख्य लोक ब्राह्मण (किंवा स्यूडो ब्राह्मण) असतात. त्यांचा विरोध मुख्यत्वे दोन कारणाने असतो, एकतर धर्मांतर झाले तर देवळात येणारी संख्या कमी होईल व आपले तूप कमी होईल , दुसरे म्हणजे आपली पायरी ओळखून असलेले दलित दुसर्‍या धर्मात गेले की बरोबरीला येऊन बसतात. - आफले बकरे कमी होतील म्हणून धर्मगुरूंनी कांगावा सुरू केला, धर्मांतर झाले तर आपले तूप कमी होईल म्हणून ब्राह्मणांनी विरोध व कल्पनाविलास सुरू केला असले तारे तोडलेत. बरं, याविषयीचे पुरावे व विदा शून्य. अनेकदा मागूनही पुरावे व विदा देत नाही कारण मुळातच सर्व खोटारडेपणा आहे. हा खोटारडा व ब्राह्मणद्वेषी आहे हे अनेकदा चघड होऊनही काही जण याची हिरिरीने पाठराखण करताहेत. धन्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

सुरा : अल-निसा , आयत :२५

वडगावकर
Sun, 05/14/2023 - 23:49 नवीन
सुरा : अल-निसा , आयत :२५ आणि तुमच्यापैकी जर एखाद्याची इतकी ऐपत नसेल की त्यांचा सद्वर्तनी मुसलमान स्त्रियांशी विवाह होईल तर त्याने तुमच्या त्या दासींपैकी एखादीशी विवाह करावा ज्या युद्धामध्ये तुमच्या ताब्यात आल्या असतील व त्या श्रद्धावंत असतील. परंतु जर तुम्ही संयम पाळाल तर हे तुमच्यासाठी उत्तम आहे, आणि अल्लाह क्षमा करणारा व परम कृपाळू आहे.
  • Log in or register to post comments

धर्मातरबंदीचा आग्रह आपला ‘कळप’ टिकवण्यासाठी..

उनाड
Mon, 05/15/2023 - 04:57 नवीन
धर्मातरबंदीचा आग्रह आपला ‘कळप’ टिकवण्यासाठी.. https://www.loksatta.com/sampadkiya/features/apostasy-hindu-religion-preservation-of-hindu-culture-religion-outgoing-in-hindu-religious-system-amy-95-3414284/
  • Log in or register to post comments

उनाड,

श्रीगुरुजी
Mon, 05/15/2023 - 08:48 नवीन
उनाड, लव्ह जिहाद हे उच्चवर्णीयांचा कल्पनाविलास आहे या दाव्याचे पुरावे व विदा कोठे आहे? नसेल देता येत तर दावा मागे घेऊन माफी मागा. याविषयी अनेकदा विचारले आहे, परंतु कोणतेही पुरावे आणि विदा न देता ब्राह्मणमत्सरी पिचकाऱ्या का सुरू आहेत? वारंवार ब्राह्मणद्वेषाची गुळणी थुंकण्याऐवजी पुरावे आणि विदा दिला पाहिजे.
  • Log in or register to post comments

अरे खड्ड्यात गेले ते विदा , कायदे आणि पुरावे

नगरी
Mon, 05/15/2023 - 12:04 नवीन
अरे खड्ड्यात गेले ते विदा , कायदे आणि पुरावे. ज्याची जळती त्याला कळती . माझ्या शेजारी, माझा घनीष्ट मित्र, कनिष्ट मध्यम वर्गीय , त्याची बायको मुसलमानाबरोबर पळून गेली. दिल्ली गेट ला जिथे मी पहाटे रोज चहा पितो त्याची बायकोही पळाली. हे खूप systematic चालले आहे.
  • Log in or register to post comments

परपुरुष मुस्लिम असल्याने दु:खं ?

तर्कवादी
Fri, 05/19/2023 - 19:01 नवीन
१)
माझ्या शेजारी, माझा घनीष्ट मित्र, कनिष्ट मध्यम वर्गीय , त्याची बायको मुसलमानाबरोबर पळून गेली.
एखाद्या पुरुषाची बायको परपुरुषासोबत पळून गेली दी दु:खाची बाब आहे. पण तो परपुरुष मुस्लिम असल्याने दु:खं होतंय का ? तो हिंदू असता तर आनंद झाला असता का तुमच्या मित्राला ? २)
हे खूप systematic चालले आहे.
हं... केरळ स्टोरी चित्रपट आधी आला असता तर या बायका पळून गेल्या नसत्या. नाही का ? पण "लव्ह जिहाद" या संकल्पनेबद्दल तर गेले किमान २-३ वर्षांपासून लिहिलं / चर्चिलं जात आहे विविध ठिकाणी , या बायकांच्या वाचनात आलं नसेल का ? की या घटना जास्त जुन्या आहेत ? जास्त जुन्या असतील तर पुढे या बायकांचं आपापल्या प्रियकरासोबत सहजीवन (लग्न करुन वा न करता.. जे काही असेल ते) कसं होतं/आहे ? आतापर्यंत तलाक झालेत की फ्रीजमध्ये गेल्यात या बायका ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरी

नवऱ्यांनो बायका सांभाळा.

आग्या१९९०
Mon, 05/15/2023 - 12:26 नवीन
नवऱ्यांनो बायका सांभाळा.
  • Log in or register to post comments

बायका सांभाळायला त्या काय

आंद्रे वडापाव
Mon, 05/15/2023 - 12:31 नवीन
बायका सांभाळायला त्या काय मेंढरं आहेत का ? :) बाकी काही प्रतिसाद वाचून असं वाटलं की "आपल्याला कोणी फसवतोय भुलवतोय याची बायकांना काही म्हणजे काssही आयडिया नसते ... जी काय अक्कल असते ना भलं बुर ओळखायची .. ती या प्रतिसादकर्त्या पुरुषांनाच असते"...
  • Log in or register to post comments

वहाबी पणा

चौकस२१२
Mon, 05/15/2023 - 12:41 नवीन
लव जिहाद सुधा जाऊद्या .. जे मुसलमान साधारण पणे फार धार्मिकते कडे झुकणार नाहीत त्यांना आणि त्यातील तरुणांना "धार्मिकशिक्षणात जास्त गुंतवणूक करून जास्त कडवे बनवण्याचा पण कार्यक्रम असतो मी स्वतः बघितले आहे निम शहरी आणि छोट्या गावातून पूर्वी तरी तसा एकोपा असायचा , म्हणजे दिवाळीत गावातील अब्दुल चाचा हि पण उद्योग म्हणून फटाके विकण्याचे काम करणार, पशिचम महाराष्ट्रात जसे खाटीक कुरेशी तसेच मुसलमान बागवान .. मग ते हिंदू संस्थंना पण भाजी पुरवणार , हिंदू संस्था पण डोळे झाकून त्याच्या कडून घेणार इत्यादी .. असच एका निमशहरी वातवरणात एक चाचा यांची ३ तरुण मुले गाड्या भाड्याने देण्याचा वयवसाय करायाचे, अर्थातच त्यांचे बहुतेक गिर्हाईक हिंदू, शिवाय ३-४ दिवसांची सहल असली कि हिंदू कुटुंबांबरोबर राहावे ला गे .. लहानपणी चाचांचा एक मुलगा नेहमी आमच्या सहलीत ड्राइवर म्हणून असायचा.. तो अगदी टापटीप ऱ्हायचा , त्याचे टोपण नाव राजकुमार, धर्म कोणता हे कळणार पण नाही त्याचं पेहरावावरून ... बरेच वर्षांनी गावी गेलो आणि दुपारी त्याला फोन करून बोलवले म्हणले उद्या आपल्याला फिरायला दोन दिवस जायचे आहे,, दुसर्या दिवशी मी वेळेवर बाहेर अंगनात वाट बघत होतो .... बराच वेळ झाला राजकुमार काही दिसला नाही ... बाबानं विचारला तर ते म्हनाले कि असेल आलेला , टपरी वर गेला असेल .. म्हणून मी फिरत टपरी वर गेलो...; तर एक पूर्ण पठाणी वेष धारण केलेला , लांब दाढी वैगरे "राजकुमार" समोर.... मला आश्चर्य वाटलं.. .. दोन दिवसाच्या सहलीत त्याने बरेच काही भोळे पणा ने सांगून टाकले .. म्हणाला आमच्या समाजातील काही लोक आले त्यांनी मला मलेशियात धार्मिक शिक्षणासाठी पाठवले ३ महिने राहिलो ... माझ्या बरोबरीच्या काहींनी तिकडे लग्न पण जुळवली ... इत्यादी .. नंतर जवळचं दोन तीन गावामधून त्याने काही समाजाची नवीन झालेली वसतिगृहे / मशिदी दाखवल्या. एवढे पैसे आले कुठून? हा भाग काह केरळ किंवा गोवा नाही कि जेथून बरेच लोक गल्फ ला जाऊन गावी पॆसे पाठवतात ... मुद्दा काय कि हा वहाबी पणा नेण्याचा एक व्यस्थित कार्यक्रम आहे .. या आधी पूर्व आशिया तील देश कसे अरबी पद्धती स्वीकारू लागले आहेत ते लिहिले आहेच.. एकूण काय पण स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेणाऱ्या हिंदू "ब्लीडींग हार्ट " वाल्यांना हे काही मुद्डमून लक्षात घ्यायचं नाहीये ....
  • Log in or register to post comments

हा धागा वाचनमात्र करण्यात यावा हि मिपा प्रशासनाला नम्र विनंती

Trump
Mon, 05/15/2023 - 13:20 नवीन
सदर धागा हा हिंदुना दुखवण्यासाठी आणि आगपाखड करण्यासाठी तयार केला आहे. धागाकर्त्याचे बरेचसे प्रतिसाद विनाकारण वादविवाद सुरु करणे आणि मुळ मुद्याला उत्तर न देणे, अशा प्रकारचे आहेत. त्यामुळे ह्या धाग्यातुन काहीही भरीव साध्य होणार नाही. -- सबब हा धागा वाचनमात्र करण्यात यावा हि मिपा प्रशासनाला नम्र विनंती. (हा धागा हटवल्यास धागाकर्त्याला उत्तरांसाठ्याची प्रतिसादांना इतर अभ्यासु लोक मुकतील, त्यामुळे हा धागा तसाच ठेवावा)
  • Log in or register to post comments

जी काय अक्कल असते ना भलं बुर

आग्या१९९०
Mon, 05/15/2023 - 14:55 नवीन
जी काय अक्कल असते ना भलं बुर ओळखायची .. ती या प्रतिसादकर्त्या पुरुषांनाच असते"... शंकाच नाही. साम्यवादी संस्कार केलेल्या आपल्या मुलीच्या मेंदूतील अध्यात्माचा कोपरा रिकामा राहिल्याने इस्लामिक तत्वज्ञान घुसवायला सोपे जाते. त्यामुळे लव्ह जिहाद, धर्म परिवर्तन,आयसिस प्रवास सुरळीत होतो. मुलाच्या मेंदूच्या धार्मिकतेचा कोपरा रिकामा रहात नसावा,त्यामुळे त्याचे इस्लामीकरण करता येत नाही. सहज ओळखीतील लोकांना, लव्ह जिहाद ह्या थापा आहेत असे म्हटले तर काहीजण खवळून उठले. खवळलेले १००% उच्चवर्णीय होते. विदा मागू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

विदा मागू नये.

श्रीगुरुजी
Mon, 05/15/2023 - 15:06 नवीन
विदा मागू नये. कारण आम्ही बिनबुडाच्या थापा मारतो. विदा असलाच तर आम्ही देणार ना? ना आमच्याकडे विदा ना पुरावे, पण थापा मात्र भरपूर आहेत बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

पण थापा मात्र भरपूर आहेत बुवा

आग्या१९९०
Mon, 05/15/2023 - 15:45 नवीन
पण थापा मात्र भरपूर आहेत बुवा. ते विश्वगुरूंचे अधिकारक्षेत्र आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कोण विश्वगुरू? आपलेच टोपणनाव

श्रीगुरुजी
Mon, 05/15/2023 - 16:46 नवीन
कोण विश्वगुरू? आपलेच टोपणनाव आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

चित्रपटातील हिरोईन देवोलिना

आंद्रे वडापाव
Mon, 05/15/2023 - 17:19 नवीन
चित्रपटातील हिरोईन देवोलिना भट्टाचार्जी ने गेल्या वर्षी तिचा बॉयफ्रेंड शाहनवाज शेखशी लग्न केलं. दोघांचाही संसार आनंदी चाललेला दिसतोय. Image removed.
  • Log in or register to post comments

असंबद्ध प्रतिसाद !

चौथा कोनाडा
Mon, 05/15/2023 - 17:46 नवीन
असंबद्ध प्रतिसाद ! उगाच टीआरपी मिळवण्यासाठी खपाऊ फोटो. या आधी कित्येक नटनट्या - हाय प्रोफाइल लोकांचे आंतरजातीय विवाह हे या जगाने पाहिलेत. केरळ कहाणीत दाखवलेला लव्ह जिहाद हा वेगळा प्रकार आहे. धर्मांतर करण्यासाठीचे आणखी एक साधन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

बरोबर. लग्न नुकतंच झालंय.

श्रीगुरुजी
Mon, 05/15/2023 - 18:02 नवीन
बरोबर. लग्न नुकतंच झालंय. लग्नानंतर पहिल्या वर्षात सर्वच जण नंदनवनात विहार करीत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

अरेरे, काय तो मत्सर. षड्रिपू मधला एक आहे तो !

उनाड
Mon, 05/15/2023 - 18:09 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हा विवाह लव्ह-जिहाद कशावरून

आंद्रे वडापाव
Mon, 05/15/2023 - 18:09 नवीन
हा विवाह लव्ह-जिहाद कशावरून नाही म्हणे ?
या आधी कित्येक नटनट्या - हाय प्रोफाइल लोकांचे आंतरजातीय विवाह हे या जगाने पाहिलेत.
य आणि ते विवाह लव्ह-जिहाद कशावरून नाही म्हणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

हा विवाह लव्ह-जिहाद कशावरून

आंद्रे वडापाव
Mon, 05/15/2023 - 18:09 नवीन
हा विवाह लव्ह-जिहाद कशावरून नाही म्हणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

नसणार, कारण लव्ह जिहाद

श्रीगुरुजी
Mon, 05/15/2023 - 18:31 नवीन
नसणार, कारण लव्ह जिहाद उच्चवर्णीयांचा कल्पनाविलास आहे ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

तुम्हाला मान्य आहे तर मग ! की

आंद्रे वडापाव
Mon, 05/15/2023 - 19:19 नवीन
तुम्हाला मान्य आहे तर मग ! की हा उच्चवर्णीयांचा कल्पनाविलास आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हा विवाह लव्ह जिहाद आहे हे

श्रीगुरुजी
Mon, 05/15/2023 - 19:30 नवीन
हा विवाह लव्ह जिहाद आहे हे तुम्हाला मान्य आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

सदस्यत्व घेऊन 14 वर्षे होऊन गेली आणि

मुक्त विहारि
Mon, 05/15/2023 - 19:45 नवीन
हा एकच लेख...
  • Log in or register to post comments

खर तर

सुखीमाणूस
Mon, 05/15/2023 - 19:50 नवीन
लव्ह जिहाद ही उच्चवर्णीयांची fantasy असा फक्त विचार न करता ह्या प्रश्नाच्या सामाजिक बाजू पण विचारात घेतल्या पाहिजेत. हिंदू धर्मात मुलगा हवा या हट्टाने मुलीच्या जन्माला आडकाठी केली जाते. त्यामुळे हिंदू मुलांच्या लग्नासाठी वधू मिळणे अवघड होते. त्यातून मुस्लिम मुलं जर हिंदू मुली लग्नासाठी गळाला लावायला लागले तर हिंदू अस्वस्थ होणारच. आजकालच्या शिकलेल्या मुली स्वतःचा स्वार्थ समजणाऱ्या असतात. त्यांचे विचार पक्के असतात. अश्या मुली लव जिहादला बळी पडणे शक्य नाही. उलट अश्या मुलीनी जर मुसलमानांशी लग्न केले तर मुलीचं वठणीवर येतील. किंवा मुसलमान मुलाला त्राही भगवान करून सोडतील. एक स्त्री म्हणून मला तरी मुसलमान पुरुष जोडीदार म्हणून निवडताना बरेच धोके दिसतात. बुरख्याची सक्ती होणे. सवत येऊ शकणे. कधीही तलाक ला सामोरे जावे लागणे. धार्मिक कट्टरतेला सामोरे जावे लागणे. इत्यादी. हिंदू धर्मियाशी विवाह केला तरी काही धोके असतीलच पण कायद्याने मी जास्त सुरक्षित असेन. एक आरक्षण असलेल्या जातींमधली हिंदू मुलगी जर लग्न करून मुस्लिम झाली तर तिच्या मुलांना आरक्षणाचे फायदे मिळणार नाहीत. आरक्षित जातींमधील मुलींना हिंदू राहणे व आरक्षित जातींमधील नवरा शोधणे जास्त फायद्याचे आहे. ज्या दिशेने भारताचे राजकारण चालले आहे त्यात भारतात मुसलमानांना आरक्षण किंवा धर्म बदलून मुसलमान झालेल्या आरक्षित जातीतील हिंदूंना त्यांचे जातीनिहाय आरक्षण मिळेल अशी व्यवस्था होणे शक्य आहे. पण मग अश्या वेळी मुसलमान धर्म सेक्युलर कसा ठरेल? लव्ह जिहाद ही fantasy नसून समाज जागृती आहे. जसे स्त्रीमुक्ती चळवळीमुळे हिंदू स्त्रियांचे आयुष्य सुधारले तसे लव्ह जिहाद विरुद्ध जागृती करण्याचा चळवळीमुळे होत आहे. खूप घरातून पालक व मुलं यांमध्ये सुसंवाद नसतो. मुलंमुली चुकीच्या गोष्टींकडे ओढली जातात. सैराट पिक्चर ने नाही का समाजातील काही प्रकारच्या समस्यांवर प्रकाश टाकला. तसेच काम kerala files हा movie करतो आहे. ख्रिस्ती व मुस्लिम लोक धर्मांतर करण्यासाठी हिंदू धर्मियांना विविध प्रकारे भुलवतात त्यामुळे हिंदू धर्म (अथवा जीवनपद्धती) हा शोषीत धर्म आहे. त्याच्या अनुयायांनी स्वतःच्या धर्माचे रक्षण करणे व त्यासाठी जागृती करणे अत्यावश्यक आहे. अल्पसंख्य म्हणून मुस्लिम v ख्रिस्ती धर्माच्या लोकांना विशिष्ट सवलती मिळतात. हे धर्म खूप देशात पसरलेले आहेत व त्यांना भरपूर आर्थिक पाठबळ आहे. कुठलाही धर्म परिपूर्ण नाही. सगळ्या स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली आहे. हिंदू धर्म जीवनपद्धती भारतात उगम पावली आणि फक्त इथेच आहे. बाहेर उगम पावलेले आणि प्रसारासाठी आलेले धर्म टिकवण्यासाठी इथले लोक इतका आटापिटा का करतात हेच समजत नाही?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा