Skip to main content

चाललोय....

मंगळवार, 09/05/2023 या दिवशी प्रकाशित केले.
काळेसावळे ढग, दरीतल्या सावल्या पावसाचा साज, बुजलेली पाऊलवाट, वाऱ्याचे बहाणे, सोनकीचे डोलणे मुरवत चाललोय.... हिरवीगारं कुरणं, दगडी शेवाळ विहीरीतला खोपा, कुत्र्याच्या छत्र्या चंद्रमौळी विसावा, खापरी कौलं निरखत चाललोय.... देवळाची पायरी, चाफ्याचा दरवळ सोनसळी पावलं, पैंजणांचा गुंजारव नजरेतला नखरा, माळलेला गजरा आठवत चाललोय.... क्षण तुझ्या दरवळत्या अस्तित्वाचे कण तुझ्या विरघळत्या भासांचे दशकं सरली, चालण्याचा मोह सुटेना जगणं कसलं ??? फरफट नुसती..... तरीही....जगत चाललोय....... आयुष्य उधळत चाललोय.......
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3239
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

+१ व्वा, सुंदर .... आवडली रचना ! किती चित्रदर्शी आहे !
देवळाची पायरी, चाफ्याचा दरवळ सोनसळी पावलं, पैंजणांचा गुंजारव नजरेतला नखरा, माळलेला गजरा आठवत चाललोय...
वाह, क्या बात !

💖


दशकं सरली, चालण्याचा मोह सुटेना जगणं कसलं ??? फरफट नुसती..... तरीही....जगत चाललोय....... ओझं वेळच्या वेळी झटकले की फरपट होत नाही. कवीता आवडली.

आवडली कविता. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

एकदा वाचून पोट नाही भरलय दोनदा वाचली, तिसऱ्या खेपला मंचावर आलोय तऱ्ही वाचत चाललोय, वाचत चाललोय कविता कसली, थेट काळजात घुसली तरी वाचत चाललोय वाचत चाललोय