नुकत्याच होऊन गेलेल्या
वर्षावाला, निथळून टाकणारी
हिरव्याकंच कांतीची गर्द वनराई.
सकाळचे कोवळे ऊन पिऊन
तजेलदार झालेली नवी पालवी.
स्वच्छ धुऊन निघालेले,
लाल मातीच्या चिखलावर,
रेखीव छान वळणदार रांगोळीची
जणू निळीशार रेघच असलेले रस्ते.
त्यावरून वळणे घेत घेत मी
निवांतपणे,
आजूबाजूचा निसर्ग न्याहाळीत,
मजेत आवडीचे गाणे गुणगुणत,
घाटमाथ्यावर चढून जातो
आणि,
पुढे तसाच खाली उतरून जातो.
दिवसभर राबायला,
सिमेंटमध्ये वाळू, खडी मिसळायला.
परत येताना पुन्हा तेच सारं.
- संदीप चांदणे (मंगळवार, १३/०९/२०२२)
मस्त
सुरेख एकदम
मस्त! चित्रदर्शी|मर्मदायी|
दिवसभर राबायला, सिमेंटमध्ये वाळू, खडी मिसळायला. परत येताना पुन्
सुरेख एकदम !!
कामगार एकजूटीचा विजय असो.
सुंदर कविता...
वाह!
व्वा, सुंदर शब्दचित्र.
सुरेख कविता!!!
सुंदर, चित्रदर्शी रचना.
या कवितेत 'एका दिवसातले येणेजाणे' याऐवजी