आज्जी गेलीय सोडून
उशीराने आले ध्यानी
एकटे गर्दीत बसून
मला अनोळख्या देशी
आज्जी गेलीय सोडून
घरातून निघताना
का बोलली ती नाही?
तुला लेकरा घरात
जागा उरलीच नाही
आई बाबा गेल्यावर
आज्जी तूच उरलेली
कुणाकुणा पोसशील
तूही आता थकलेली
माझ्या इवल्या बहिणी
आणि भाऊ लहानगे
तुला आज्जी, म्हणतील
कुठे दादा आमुचा गे?
काय सांगशील त्यांना
मला सांगशील का ग?
आज्जी एवढ्याचसाठी
पुन्हा भेटशील का ग?
- संदीप चांदणे
आजी म्हणजे एक हळवा कोपरा.
सगळ्यात जवळचे
ओह !
का बॉ सोडले लैकराला एकट्यालाच
+१
आवडली.
मला
चुटपुट लावणारी कविता अतिशय आवडली.
हो की.. मान गये!!
वा !
वा!!
हळवे लिखान..