वाऱ्यावर जसे पान
नीज भरते दिशांत
माझे रिते नीजपात्र
उतरूनि ये अंगणी
जरी हळुवार रात्र
रात्र रात्र जागते
गोड स्वप्नातूनि
धुंद गात राहते
अबोल मौनातूनि
येती कानी दुरून
सूर सारंगीचे छान
मन खाई हेलकावे
वाऱ्यावर जसे पान
पान पान जागते
पाचूच्या बनातूनि
शुभ्र सोनसकाळी
झळाळते दवातूनि
- संदीप चांदणे
छान
झकास एकदम.
छान.
वा !
नादमय कविता
शब्दांच्या बुळबुळीत घसरपट्टीवरून नुस्ते घसरत जाण्याची गंमत ?
.
म्हणजे 'दिन ढल जाये हाये, रात ना जाय' ... असा मामला आहे तर.
एक्झ्याटली पर्फेक्ट!
मस्त. आवडली कविता!