✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शीर्षक सुचले नाही

च — चांदणे संदीप, Tue, 12/21/2021 - 12:18
झोप येईनाच आज झोप हवी असताना जांभयाच्या येती लाटा वर तारे मोजताना काय आणून वहावे निद्रादेवीच्या चरणी झोप येऊन निवांत उद्या उजाडेल झणी किती थकून भागून देह दिला पसरून डोळ्यात बाहुल्यांना काय दिसते अजून? दिसे कालचा प्रकाश अन्, तम भेसूर उद्याचे त्यांच्या मध्ये भांबावले पाऊल हळव्या झोपेचे एक मायेचा, माथ्याला हवा सांगणारा हात सोड उद्यावर, नीज खूप झाली आहे रात - संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, २१/१२/२१)

प्रतिक्रिया द्या
9850 वाचन

💬 प्रतिसाद (26)

बैलाचे शेण हे शीर्षक शोभून

प्रसाद गोडबोले
Wed, 12/22/2021 - 11:04 नवीन
बैलाचे शेण हे शीर्षक शोभून दिसेल =))))
  • Log in or register to post comments

"मोबाईल बंद नसतांना" हे

पाषाणभेद
Wed, 12/22/2021 - 12:05 नवीन
"मोबाईल बंद नसतांना" हे शिर्षक ठेवा.
  • Log in or register to post comments

"आई""माय" हे शीर्षक शोभेल

राघव
Wed, 12/22/2021 - 12:12 नवीन
"आई""माय" हे शीर्षक शोभेल बहुदा. भापो. होतं असं कधी कधी!
  • Log in or register to post comments

रतीबाच्या कविता

नि३सोलपुरकर
Wed, 12/22/2021 - 13:56 नवीन
रतीबाच्या कविता ?????
  • Log in or register to post comments

हा...हा...

चांदणे संदीप
गुरुवार, 12/23/2021 - 18:13 नवीन
विशेष काय प्रेरणा नव्हती म्हणून आणि लिटरली झोप येत नव्हती म्हणून खरडली कविता...म्हणून रतीबाची म्हटलं. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३सोलपुरकर

फिकर नॉट ... हे दिवसही जातील

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 12/22/2021 - 14:28 नवीन
"फिकर नॉट ... हे दिवसही जातील" असे शिर्षक द्या
दिसे कालचा प्रकाश अन्, तम भेसूर उद्याचे त्यांच्या मध्ये भांबावले पाऊल हळव्या झोपेचे
अचूक शब्दात भावना मांडल्या आहेत पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

आवडली

कर्नलतपस्वी
Wed, 12/22/2021 - 15:04 नवीन
म्हणून म्हणतो....... जीव आहे तोवर जगून घ्या डोळे आहेत तोवर बघून घ्या काय माहिती....... तेलात तळत्याल का अप्सरा भेटत्याल म्हणून म्हणतो चिंता खंती खुट्टीवर टांगून द्यायाच हाय राती अर्ध्या राती जागं रहायच नाय
  • Log in or register to post comments

परतिसाद आवाल्डा

चांदणे संदीप
गुरुवार, 12/23/2021 - 18:14 नवीन
तेलात तळत्याल का अप्सरा भेटत्याल.... हे भारीच! सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

आवडली

अनन्त्_यात्री
Wed, 12/22/2021 - 15:42 नवीन
कविता. अशी अवस्था अनुभवताना जवळपास असेच विचार येतात.
  • Log in or register to post comments

दिसे कालचा प्रकाश

श्रीगणेशा
Wed, 12/22/2021 - 17:21 नवीन
दिसे कालचा प्रकाश अन्, तम भेसूर उद्याचे त्यांच्या मध्ये भांबावले पाऊल हळव्या झोपेचे
कविता आवडली. विशेषतः वरील कडवे!
  • Log in or register to post comments

छान आवडली रचना. आधी अस्वस्थता

चौथा कोनाडा
Wed, 12/22/2021 - 17:46 नवीन
छान आवडली रचना. आधी अस्वस्थता आणि आर्त अपेक्षा !
+१
"हवा सांगणारा हात" हे शिर्षक कसे वाटते ?
  • Log in or register to post comments

एकदम सुरेख रचना.

प्रचेतस
Wed, 12/22/2021 - 17:58 नवीन
एकदम सुरेख रचना.
  • Log in or register to post comments

एक मायेचा माथ्याला, मायेचा

Bhakti
Wed, 12/22/2021 - 18:14 नवीन
एक मायेचा माथ्याला, मायेचा हात माहिती होता,हे नवीन छान वाटले. सगळं नीट होईल, शीर्षक :)
  • Log in or register to post comments

एक मायेचा माथ्याला, मायेचा

चांदणे संदीप
गुरुवार, 12/23/2021 - 18:16 नवीन
एक मायेचा माथ्याला, मायेचा हात माहिती होता
एक मायेचा, माथ्याला असं पाहिजे होतं ते. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

आवडली.... छान लिहिलीत

बाजीगर
Wed, 12/22/2021 - 19:27 नवीन
कवितेच्या प्रसव वेदना कशी येईल झोप सदना | पोस्ट ली कविता मिसळपाव चला आता येईल झोपेचा गाव | आता स्वप्नांचा डाव मांडणे.. मालवा हो (सं )दीप चांदणे ||
  • Log in or register to post comments

हा हा ... भारीच बाजीगर सर.

चामुंडराय
Wed, 12/22/2021 - 21:55 नवीन
हा हा ... भारीच बाजीगर सर. मूळ कवितेबरोबर हे देखील आवडलं. मालवा हो (सं )दीप चांदणे - हे खासंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर

धन्यवाद चामुंडाराय जी

बाजीगर
गुरुवार, 12/23/2021 - 12:18 नवीन
धन्यवाद चामुंडाराय जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय

आधीच सं - दीप आहे

चांदणे संदीप
गुरुवार, 12/23/2021 - 18:16 नवीन
मालवून कसं चालेल! सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय

मस्त हो मस्त !

चौथा कोनाडा
गुरुवार, 12/23/2021 - 14:37 नवीन
बाजीगर साहेब, मस्त हो मस्त !

🤝

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर

शीसु नसून शीसुना आहे.

चित्रगुप्त
Wed, 12/22/2021 - 21:45 नवीन
'शीर्षक सुचवा' असे शीर्षक नसून 'शीर्षक सुचले नाही' असे आहे. बाकी कविता आवडली.
  • Log in or register to post comments

'शीर्षक सुचवा' असे शीर्षक नसून

तुषार काळभोर
गुरुवार, 12/23/2021 - 13:01 नवीन
सही पकडें हैं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

बरोबर , पण ........

चौथा कोनाडा
गुरुवार, 12/23/2021 - 14:38 नवीन
ते ठिकाय हो चित्रगुप्त साहेब, पण सल्ला द्यायला आसूसलेल्या आम्हां मिपाकरांच्या हे नाय लक्षात आलं तर ठीक समजा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

आजकाल रात्री झोपताना मोबल्या नेटाने नीट नंद ... स्वारी ... बंद

चामुंडराय
Wed, 12/22/2021 - 21:59 नवीन
छान आजकाल रात्री झोपताना मोबल्या नेटाने नीट नंद ... स्वारी ... बंद करावा लागतो झोप येण्यासाठी !!
  • Log in or register to post comments

कविता आ‍वडली

मित्रहो
Wed, 12/22/2021 - 23:24 नवीन
कविता आ‍वडली बाकी नावांत काय आहे
  • Log in or register to post comments

हेही ठीकच!

चांदणे संदीप
गुरुवार, 12/23/2021 - 18:18 नवीन
शेक्सपियर का कोणतरी हेच्च सेम म्हटलाय बहुतेक. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो

वाह!

प्राची अश्विनी
Tue, 12/28/2021 - 08:25 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा