मराठी वृत्तबद्ध कवितेत एखादे अक्षर लघु आहे का गुरु यामध्ये संदिग्धता नसते, पण त्याचा कधीकधी जाचही होऊ शकतो. उर्दूमध्ये "हर्फ गिराना" या सवलतीमुळे त्यात लवचिकता, कधी कधी संदिग्धता आणि म्हणूनच रोचकता आली आहे.
.
या लघुलेखात आपण २ गोष्टी पाहणार आहोत
१. हर्फ गिराना काय प्रकार आहे
२. तो कधी कधी नीट न समजल्यामुळे चित्रपट संगीतात कसा घोटाळा होतो
.
या लेखाच्या व्याप्तीच्या बाहेर:
१. उर्दू शायरीचा गण परिचय (माफाइलुन, फाइलातुन, इत्यादी. त्याच्यावर पुढे लिहिण्याची इच्छा आहे)
२. गझलचा आकृतिबंध आणि पारिभाषिक माहिती. https://www.maayboli.com/node/21889 इथे बरीच माहिती मिळेल.
.
सोप्या शब्दांत "हर्फ गिराना" म्हणजे "गुरु अक्षर लघु करणे"
"है अपना दिल तो आवारा न जाने किस पे आएगा" या ओळीचे वृत्त बघूया. गाण्याची चाल डोक्यातून तात्पुरती काढून टाका.
खरंतर हे वृत्त असं आहे: लगागागा लगागागा लगागागा लगागागा, पण सहज वाचलं तर तसं भासत नाही कारण जितका वेळ सामान्यतः बोलताना आपण है, तो आणि पे ला लावतो त्याहून काहीसा कमी वेळ या वृत्तात बसवण्यासाठी आपण घेतो. ही अक्षरे थोडी झर्रकन उच्चारतो. त्यालाच हर्फ गिराना म्हणतात.
.
अशी:
१. है अप ना दिल (सामान्यतः दीर्घ/गुरु असणारा है गिराके लघु म्हणून लगागागा)
२. तो आ वा रा (सामान्यतः दीर्घ/गुरु असणारा तो गिराके लघु, म्हणून लगागागा)
३. न जा ने किस (लगागागा)
४. पे आ ए गा (सामान्यतः दीर्घ/गुरु असणारा पे गिराके लघु म्हणून लगागागा)
.
स्वाध्याय: या ओळींमधला कुठला "हर्फ गिराया" है तो ओळखायचा प्रयत्न करून बघा:
१. ये एक टूटा हुआ तारा न जाने किस पे आएगा
२. बहोत भोला है बेचारा न जाने किस पे आएगा
----
हे अरिष्ट उर्दूमध्ये नियमित कोसळतं. आता याचे काही ढोबळ नियमही आहेत. सगळे काही इथे देता येणार नाहीत, पण आपली सज्जता असावी इतपत उपयोगी होतील:
१)अंत्य वर्ण आ ई ऊ ए ओ असतील तर ते लघु केले जाऊ शकतात.
उदा:
सारे जहाँ से अच्छा हिन्दुस्ताँ हमारा(गागालगालगागा गागालगालगागा) या मध्ये से ला लघु गणलं गेलं आहे. तेरा आणि मेरा ला तिरा आणि मिरा असं लिहिण्यामागे हाच प्रकार आहे. उदा दिलावर फ़िगार यांचा शेर:
न मिरा मकाँ , ही बदल गया, न तिरा पता, कोई और है मिरी राह फिर, भी है मुख़्तलिफ़, तिरा रास्ता, कोई और है(ललगालगा ललगालगा ललगालगा ललगालगा) (तिरा आणि मिरा व्यतिरिक्त ही, को, री, भी, है अश्या दीर्घ/गुरु अक्षरांनाही लघु मानले आहे) . २) एखादा गुरु वर्ण “हर्फ गिराके” लघु बनून त्याआधीच्या लघु वर्णात लोप पावू शकतो. त्या दोघांना लघु + गुरु न मानता लघु + लघु मानायचा प्रघात आहे. सोदाहरण देतो:
उलटी हो गयीं सब तदबीरें कुछ न दवा ने काम किया देखा इस बीमारी-ए-दिल ने आखिर काम तमाम किया मीर तकी मीरहा गागागागा गागागागा असा आहे, पण यातली सूक्ष्मता थोडी फोड करून बघूया: उल टी हो गयीं सब तद बी रें, कुछ न-द वा ने का म-कि या (गागागागा गागागागा) दे खा इस बी मा री-ए दिल ने, आ खिर का म-त मा म-कि या (गागागागा गागागागा) दोन लघु अक्षरांना एक गुरु मानण्याची पद्धत आहेच. उदा: उल, सब, तद इत्यादी. न-द, म-कि आणि म-त सुद्धा याच प्रकारात मोडतात. पण गयीं आणि री-ए कडे विशेष लक्ष देऊया. गयीं: अन्यथा आपण ह्याला लघु-गुरु असं मानलं असतं, पण यीं ला लघु करून ह्याला लघु-लघु अथवा गुरु मानले आहे. त्याला जवळजवळ "गै" असं उच्चारलं जातं. री-ए: अन्यथा ह्याला आपण गुरु-लघु मानलं असतं (हिंदी उर्दू मध्ये ए लघु असतो), पण री ला लघु करून ह्याला लघु-लघु अथवा गुरु मानले आहे. ह्याचा उच्चार जवळजवळ "र्ये" असा होतो. ३) कधी कधी पुढचा स्वर किंवा महाप्राण आधीच्या व्यंजनात मिसळून टाकणं सोयीचं असेल तर तसंही करतात. वृत्तात बसवायला काहीही!
कल चौदहवी, की रात थी, शब् भर रहा, चर्चा तेरा कुछ ने कहा, ये चाँद है, कुछ ने कहा, चेहरा तेरा इब्ने इंशा(गागालागा गागालागा गागालागा गागालागा) यामध्ये चौदहवी चा उच्चार जवळजवळ चौधवी असा होतो. हापण हर्फ गिरण्याचाच भाग आहे. ---- आता थोडं बघूया याचा परिणाम गायनावर कसा होतो. अनेक वेळा आपल्याला आवडणाऱ्या गाण्यांच्या चाली छंदःशास्त्रानुसार सदोष असतात. ह्यात अनुचित काही नसलं तरी हे लक्षात येणं रोचक होऊ शकतं. १) उदा "उमराव जान" मधलं हे गाणं:
ये क्या जगह है दोस्तों ये कौनसा दयार है हदे निगाह तक यहाँ गुबार ही गुबार हैइथे लगालगालगालगा x२ असा वृत्त आहे. म्हणून पहिल्या ओळीतली ये, है ही दीर्घ/गुरु अक्षरं लघु केली गेली आहेत. पण https://www.youtube.com/watch?v=QdxyXKsWEMs जर ऐकलंत तर ही अक्षरं लांबवली जातात, म्हणून ही चाल छंदःशास्त्रानुसार सदोष आहे. २) "बाझी" मधलं दुसरं उदाहरण:
तदबीर से बिगड़ी हुई, तकदीर बना ले अपने पे भरोसा है तो एक दाँव लगा ले(गागालगा गागालगा गागालगा गागा) आता दुसऱ्या ओळीत गागालगा गागालगा गागालगा गागा मध्ये बसण्यासाठी पे चा हर्फ गिरवायला लागतो, म्हणजे तो लघु करायला लागतो. इतकंच नव्हे तर भरोसा मधल्या भ वर बल देऊन तो दीर्घ/गुरुही करायला लागतो. पण गाण्याच्या चालीमध्ये पे लघु नसून गुरु आहे. ---- यापुढे हिंदी चित्रपट संगीत ऐकताना आपले कान काहीसे आणखी तीक्ष्ण झाले असतील अशी आशा करत: धष्टपुष्ट
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11210
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगागागागागागागा ...अभ्यासपूर्ण, रसिक धागा. मानाचा मुजरा.
छान महितीपूर्ण लिखाण.
मला हे गाणं ठाऊक नाही परंतु,
In reply to छान महितीपूर्ण लिखाण. by शेखरमोघे
लगालगा बघाया आलो...
"...संगीतकाराने गीतों या
लेख अभ्यासपूर्ण आहे
मराठीमध्ये येत नाही
In reply to लेख अभ्यासपूर्ण आहे by तुषार काळभोर
मनाच्या श्लोकांत उदाहरण सापडते
In reply to मराठीमध्ये येत नाही by धष्टपुष्ट
उत्तम
In reply to मनाच्या श्लोकांत उदाहरण सापडते by सुशान्त
उत्तम विषय..
हे कुठल्या वृत्तात आहे हे
In reply to उत्तम विषय.. by गवि
वरून प्रश्न: "बसनेका बहाना
In reply to हे कुठल्या वृत्तात आहे हे by धष्टपुष्ट
ने ??
In reply to वरून प्रश्न: "बसनेका बहाना by धष्टपुष्ट
ना :)
In reply to ने ?? by गवि
हो की.
In reply to ना :) by धष्टपुष्ट
बाय द वे.. त्या गाण्यातच
In reply to हे कुठल्या वृत्तात आहे हे by धष्टपुष्ट
मस्तच!
इतके नसतील हो!
In reply to मस्तच! by पुष्कर
नामारे, मेरे दीवा, ने को (गालगागा, गालगागा, गालगागा, गागा). माझ्या भ्रमणध्वनीवर तू-नलिका न हे गाणं नंतर कधीतरी ऐकायला हवं.तुम्ही जे गाणं ऐकलं
In reply to इतके नसतील हो! by धष्टपुष्ट
लगावली
In reply to इतके नसतील हो! by धष्टपुष्ट
मी अजून त्याची चाल ऐकलीच नाहीये
In reply to लगावली by पुष्कर
मात्रामात्र ललगागा अशी वाटत नाहीये. हुस्न हाजिर, है मुहब्बत,की सजा पा,ने को गालगागा, गालगागा, गालगागा, गागा असं खणखणीत आहे की राव. बाकीच्या ओळी पण बघायला लागतील कधीतरी. तुमचं लगावलीचं विश्लेषण पण बघायला आवडेल.3 मात्रांचा गा?
In reply to लगावली by पुष्कर
लगावली
In reply to 3 मात्रांचा गा? by धष्टपुष्ट
प्रतिक्रिया विशेष आवडली.
In reply to लगावली by पुष्कर
अबब!
In reply to प्रतिक्रिया विशेष आवडली. by धष्टपुष्ट
सापडला!
In reply to मस्तच! by पुष्कर
खत्तर्र्नाक!
In reply to सापडला! by धष्टपुष्ट