तू म्हणालास, संस्कारी असणंच असतं एकदम best.
नाहीतर आयुष्यं बनतं न सुटणारं total mess.
यावर मी बिचारी उलटं काय बोलणार?
"तसं नसतं रे" म्हणून झाकली मूठ खोलणार??
( माहीत आहे मराठीत "खोलणार" म्हणत नाहीत
आणि संस्कारी लोक याला लेखनच गणन नाहीत.)
पण ते असूदेच.
थोडं यमक जुळू देच.
हां तर, तुझं म्हणणं मला फारसं नाही पटलं,
पण तुझ्या वागण्याचं कोडं मात्र सुटलं.
आता कळलं दोघांमधलं दोन हात अंतर..
आधी सीमारेषा बाकी सगळं नंतर.
साडेपाच सेकंद handshake, stopwatch लावून
छान खुलतो रंग तुझ्यावर.. तारीफ नजर लववून.
रेस्तराँ मध्ये गेलोच तर समोरासमोर बसायचं,
एक आईस्क्रीम मागवलं तरी दोन बोलमधून खायचं.
शेजारी लगटून बसणं?? छे छे अब्रम्हण्यम्
प्रेमाने जवळ घेणं तर दूरदूरवर असम्भवम्..
अरे वेड्या, स्पर्श म्हणजे संस्कारशून्य नसतं रे..
खळखळणा-या झ-यातलं पाणी शुद्धच असतं रे..
नजरेतून स्पर्शातून खूप काही सांगता येतं..
शब्दांना जे जमणार नाही तेदेखील मांडता येतं.
संस्कारांची स्पर्शासंगं उगा मोट जुळवू नये.
वाहू द्यावं मोकळेपणी, पाणी उगा वळवू नये..
पाण्यालाही अगदी पक्का ठाऊक असतो ऐलतीर
अवघडलेलं नातं नाहीतर कसा गाठेल पैलतीर?
पण ते असोच.
तसे तुझे "संस्कारीपण" तुला बरीक शोभते.
आणि त्याच्या धाकाने मी शहाण्यासारखी वागते.
(बाजीगर यांच्या एका प्रतिसादावरून लिहिलेली कविता. धन्यवाद, विषय दिल्याबद्दल:))
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9257
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
कविता आवडली.
वाह !
अरे वा. छान लिहिलंय.
गॉडजिला, bhakti, श्रीगुरुजी,
अरे?
In reply to गॉडजिला, bhakti, श्रीगुरुजी, by प्राची अश्विनी
अरे बाप रे
In reply to अरे? by ज्ञानोबाचे पैजार
मस्त आवडली कविता
क्या बात!
In reply to मस्त आवडली कविता by ज्ञानोबाचे पैजार
हे आवडले
In reply to मस्त आवडली कविता by ज्ञानोबाचे पैजार
संस्कारी असणंच असतं एकदम best
:)
In reply to संस्कारी असणंच असतं एकदम best by प्रसाद गोडबोले
:):)
In reply to संस्कारी असणंच असतं एकदम best by प्रसाद गोडबोले
वाह वाह ...
:) धन्यवाद.
In reply to वाह वाह ... by बाजीगर
नजरेतून स्पर्शातून खूप काही
धन्यवाद श्रीगणेशा!
In reply to नजरेतून स्पर्शातून खूप काही by श्रीगणेशा
शहाणी मुलगी १
शहाणी मुलगी
In reply to शहाणी मुलगी १ by शेर भाई