अहाहाहाहा.
अप्रतिम आणि वास्तववादी व्यक्तिचित्र.
असे म्हणतात की एक चित्र हजार शब्दांचा आशय सांगून जातात पण हे चित्र कमीत कमी २२ करोड मनांची भावना व्यक्त करत आहे.
चित्र पाहताच मनी उसळते ते वैराग्य. चमकत्या आणि दैदिप्यमान भगव्या रंगातले वैराग्य. जो वैदिक भारतवर्षाचा मानबिंदू आहे. खालचा थोडासा हिरवा पट्टा कसा खुलवतो आहे पहा त्या एंशी टक्के भगव्याला. ह्या परस्परपूरक दोन रंगातून आपल्या पक्षध्वजाचे रंगसंगती नेमकी प्रमाणबध्द साधणार्या चित्रकाराच्या कुंचल्याला (की डिजिटल पेनाला) डिजिटल सलाम.
ह्या उज्ज्वल भवितव्याच्या मागचा जो थोडासा सावलीत्मक अंधार दिसतोय तो सत्तरवर्षाची अंधाररात्र सरुन त्याकडे पाठ फिरवून आता फक्त उज्ज्वलभविष्यकालाकडे नजर हे दर्शवतोय. ह्नुवटीखाली थोडासा अंधार दिसतोय पण आपल्या एखाद्या अवयवांची सावली आपल्यावरच पडते पण ती द्वीमीतीला त्रिमिती स्वरुप बहाल करते हे दर्शवण्याचा प्रयत्न अगदी वाखाणण्याजोगा. नाक कपाळ आणि गालावरील शुभ्र प्रकाशचमक एक दृष्यसंपन्नतेचा देखावा तयार करतेय.
डोळ्यातून अन चष्म्याच्या सावलीतून जरी स्पष्ट भाव दिसत नसले तरी काही नाजूक रेषांनी तो दाखवण्याचा प्रयत्न प्रचंड आवडल्या गेला आहे.
चित्र पाहताना अचानक जाणवले ते द्वीतीय सरसंघचालक आधुनि ऋषी माधवराव गोळवलकरांचे ते यज्ञात समिधा अर्पण करतानाचे सुप्रसिध्द चित्र. "इदं न मम, राष्ट्राय स्वाहा" तोच सेवाभाव्, तेच वैराग्य्य, तोच व्यासंग, तेच कट्टर राष्ट्रप्रेम कित्येक वर्षानंतर पुन्हा दिसले. सुंदर...अ.. ति... सुंदर. भारताला अशा शुभ्रकेशी तपस्व्यांची दीर्घ परंपरा आहे. योगी अरविंदापासून ते रविबाबू ठाकोरापर्यंत अन भीष्मकृपद्रोणापासून भगवान ओशोपर्यंत कित्येक शुभ्रकेशी योग्यांनी आपले जीवन संपन्न केले आहे. ह्या मांदीयाळीतीलच एका महान तपस्व्याच्या महान चित्राला मानाचा मुजरा.
खांद्यावर परिधान केलेल्या शालीच्या नक्षीकामातच स्वतःचे नाव गुंफून चित्रकाराने जणू एक अमोल भेटच अर्पण केली आहे. अशा नाव गुंफलेल्या भेटींची किंमत करोडोत कशी होणार. जगभर पसरलेल्या अब्जावधी चाहत्यांच्या मनात हे चित्र राष्ट्रप्रेमाचे, देशभक्तीचे तरंग उत्पन्न करत आहे ह्याची बिलकुल शंका नाही.
प्रतिक्रिया
मस्तच!
अरे भारी
सुरेख ..
व्वा..! काय तेज:पुंज
चित्र आवडले
सुरेख चित्र..
+१
शुभेच्छा
वॉव!
चित्र सुरेख आहे.
दिव्याखाली अंधार :)
मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
अहाहाहाहा. अप्रतिम आणि वास्तववादी व्यक्तिचित्र.
भावा, लाजवायचा प्रयत्न कितीही
चित्र नीट झूम केल्यावर
नमोंचे पोर्ट्रेट आणि शाब्दिक कलाविष्कार
सुंदर
💖
वागबोंद्रे जी !+१ : एक नंबर
लय भारी!!
खूप छान