मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आतल्या आत

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
संदर्भचौकटी मोडून पडल्या तेव्हा मी अधांतराचा धरला अलगद हात मग रिक्तपणाने भरलो काठोकाठ अन् ओसंडून सांडलो आतल्या आत धगधगून निखारे विझून गेले तेव्हा मी हिमपातावर कसून केली मात मग पलित्यातळिच्या अंधारात बुडालो अन् लखलख तेजाळलो आतल्या आत भ्रमनिरास बनले जगणे सगळे तेव्हा मी सुखस्वप्नांचा सहज सोडला हात जरी भोवतालच्या कोलाहली विस्कटलो उलगडलो अवघा पुन्हा आतल्या आत

वाचने 4277 वाचनखूण प्रतिक्रिया 5

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

खेडूत Mon, 02/22/2021 - 10:07
उलगडली ही कविता म्हणताहात, मग विचार कसला.. उचला अपुला टाक विडंबनाचे यात्री आपण आहात पाडून टाका एक इथे त्यातल्या त्यात! (मूळ कविता आवडली आहेच हो कविराज)

Bhakti Mon, 02/22/2021 - 09:57
सुरेख रचना! प्रत्येक कडव्यातील शेवटच्या ओळीत स्वतंत्र कविता आहे.