माझी पहिलीच पाककृती लिहीत असल्याने गोडाने सुरुवात करावी म्हणलं .. आणि आमच्यासारखे गोड घाशे मंडळी असतीलच इथेही .
तर आमच्या लहानपणी लग्न सोहळ्यामध्ये 2-3 दिवसाच्या समारंभात एकदा तरी अननसाचा शिरा हा उत्तम आणि बनविताना त्याच्या घमघमाटाने कधी एकदा ताव मारतो आहे अशी इच्छा निर्माण करणारा गोडाचा पदार्थ असायचा .
तर त्याची माझ्या करण्याच्या पध्दतीने कृती अशी -
पाककृती-
वेळ - 20- 25 मिनिटे
कच्चा माल -
-तूप ( घरचे साजूक तूप असल्यास उत्तम)
-जाड रवा
- साखर
- पाणी
-अननस ( छोटे छोटे तुकडे)
- ड्रायफ्रूट- आपल्या आवडीनुसार ( बदाम, काजू, बेदाणे)
- पिवळा खाण्याचा रंग
- पाईनआयपल एस्सेन्स
- मीठ
कृती -
- एका कढईत 2 मोठे चमचे तूप घ्यावे
- तूप थोडे गरम झाल्यानंतर त्यात 1 1/2 वाटी जाड रवा घालून बारीक गॅसवर एकसारखा भाजून घ्यावा
- तोपर्यंत दुसऱ्या गॅस वर 4 वाट्या पाणी गरम करत ठेवावे
- भाजलेल्या रव्याचा छान वास येऊ लागला आणि पाण्याला उकळी आल्यानंतर ते पाणी रवा भाजलेल्या कढईमध्ये सावकाश ओतावे
- यानंतर लागलीच त्यात चिमूटभर खाण्याचा पिवळा रंग , 2 थेंब पाइनआयपाल एस्सेन्स , चिमूटभर मीठ , ड्रायफ्रूटस चे तुकडे आणि साधारण 1 वाटी अननसाचे छोटे तुकडे हे सर्व जिन्नस मिसळून घ्यावे
- यानंतर 1 1/४ ( सव्वा वाटी - आवडीनुसार प्रमाण बदलू शकता) वाटी साखर मिसळून छान परतून घ्यावे आणि झाकण ठेवून 5 मिनिटे छान शिजवुन घ्यावे.
- वरून 2 चमचे तूप सोडावे.
- सुंदर पिवळा रंग, तुपाची चमक आणि चव , छान अननसाचा गंध असलेला असा अननसाचा शिरा खाण्यासाठी तयार आहे .
टिप- ही पाककृती प्रत्यक्ष अननस उपलब्ध नसेल परंतु एस्सेन्स असेल तरी करून पाहू शकतो.
नक्की ही पाककृती तयार करून पाहा . आवडल्यास किंवा न आवडल्यास नक्की कळवा.
वाचने
16872
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त आहे पाककृती..
धन्यवाद !! शिरा जरूर करून
सुंदर!!
हा हा !! कोरोना काळात अगदी
अननस इसेन्स वापरण्याची कल्पना
आंब्याचा शिरा
In reply to अननस इसेन्स वापरण्याची कल्पना by Bhakti
आय डोन्ट सी
In reply to आंब्याचा शिरा by मृगतृष्णा
हा हा..आय अल्सो..कोणताच शिरा
In reply to आय डोन्ट सी by तुषार काळभोर
नाऊ आय सी !
In reply to हा हा..आय अल्सो..कोणताच शिरा by Bhakti
सुरेख., करून पहावाच लागेल.
पाईनआयपल एस्सेन्स !
आणखीन एक,
मी कायम, रस्सा आणि शिरा एकत्र
In reply to आणखीन एक, by गणेशा
छान
In reply to मी कायम, रस्सा आणि शिरा एकत्र by Bhakti
मला फ़ोटो नाई दिसते माझा
मला फोटो दिसत आहेत , तुम्हाला
त्यासाठी एक औघड व्रत करावं लागेल!
In reply to मला फोटो दिसत आहेत , तुम्हाला by मृगतृष्णा
पुन्हा प्रयत्न केला आहे ..
वाह .. मस्तच दिसतायत! दोन्ही
(No subject)
हा प्रतिसाद
In reply to (No subject) by सुमो
मस्त पाककृती
धन्यवाद , शिरा आणि लिंबाचे