मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अननसाचा शिरा

मृगतृष्णा · · पाककृती
माझी पहिलीच पाककृती लिहीत असल्याने गोडाने सुरुवात करावी म्हणलं .. आणि आमच्यासारखे गोड घाशे मंडळी असतीलच इथेही . तर आमच्या लहानपणी लग्न सोहळ्यामध्ये 2-3 दिवसाच्या समारंभात एकदा तरी अननसाचा शिरा हा उत्तम आणि बनविताना त्याच्या घमघमाटाने कधी एकदा ताव मारतो आहे अशी इच्छा निर्माण करणारा गोडाचा पदार्थ असायचा . अननसाचा शिरा तर त्याची माझ्या करण्याच्या पध्दतीने कृती अशी - पाककृती- वेळ - 20- 25 मिनिटे कच्चा माल - -तूप ( घरचे साजूक तूप असल्यास उत्तम) -जाड रवा - साखर - पाणी -अननस ( छोटे छोटे तुकडे) - ड्रायफ्रूट- आपल्या आवडीनुसार ( बदाम, काजू, बेदाणे) - पिवळा खाण्याचा रंग - पाईनआयपल एस्सेन्स - मीठ कृती - - एका कढईत 2 मोठे चमचे तूप घ्यावे - तूप थोडे गरम झाल्यानंतर त्यात 1 1/2 वाटी जाड रवा घालून बारीक गॅसवर एकसारखा भाजून घ्यावा - तोपर्यंत दुसऱ्या गॅस वर 4 वाट्या पाणी गरम करत ठेवावे - भाजलेल्या रव्याचा छान वास येऊ लागला आणि पाण्याला उकळी आल्यानंतर ते पाणी रवा भाजलेल्या कढईमध्ये सावकाश ओतावे - यानंतर लागलीच त्यात चिमूटभर खाण्याचा पिवळा रंग , 2 थेंब पाइनआयपाल एस्सेन्स , चिमूटभर मीठ , ड्रायफ्रूटस चे तुकडे आणि साधारण 1 वाटी अननसाचे छोटे तुकडे हे सर्व जिन्नस मिसळून घ्यावे - यानंतर 1 1/४ ( सव्वा वाटी - आवडीनुसार प्रमाण बदलू शकता) वाटी साखर मिसळून छान परतून घ्यावे आणि झाकण ठेवून 5 मिनिटे छान शिजवुन घ्यावे. - वरून 2 चमचे तूप सोडावे. - सुंदर पिवळा रंग, तुपाची चमक आणि चव , छान अननसाचा गंध असलेला असा अननसाचा शिरा खाण्यासाठी तयार आहे . टिप- ही पाककृती प्रत्यक्ष अननस उपलब्ध नसेल परंतु एस्सेन्स असेल तरी करून पाहू शकतो. नक्की ही पाककृती तयार करून पाहा . आवडल्यास किंवा न आवडल्यास नक्की कळवा.

वाचन 16871 प्रतिक्रिया 0