येता गिर्हाईक दारावर त्याने तिला बाई म्हणावे?
वेश्येच्या त्या पोराने कधी आईला आई म्हणावे ?
चुरगळलेल्या पाकळ्यांना जरी मोहक तो सुगंध येतो
हाती घेत अश्या फुलाला कधी कुणी मग जाई म्हणावे?
नाही केली फसवा फसवी सरळ जमला व्यवहार आहे
आरोप करत का लोकांनी केली दांडगाई म्हणावे?
भाऊबीजेचा सण आल्यावर उगी तिला वाटत होते
सरळ नजरेन पाहत कुणी आज मलाही ताई म्हणावे
जगणे बत्तर असे नशीबी बाप नाही माहीत ज्याला
या जगात त्या पोराने कुणा होऊ उतराई म्हणावे?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5247
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
अफाट लिहिले आहेस मित्रा!
अफाट लिहिले आहेस मित्रा!
काही कडवी तर एकदम अंगावर आली.
+१
In reply to अफाट लिहिले आहेस मित्रा! by कानडाऊ योगेशु
:( :(
:((
खूप छान लिहिलिये.
सुरेख !
सुरेख !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh
अनेक अशा ताया आणि पोरे
अनेक अशा ताया आणि पोरे डोळ्यांसमोरून तरळून गेले. अप्रतिम गझल.
टोचणारी जुनी सल.
टोचणारी जुनी सल.
माझ्याच एका कवितेतील काही ओळी सांगाव्याशा वाटल्या या रचनेवरून -
विसंगती जीवनाला पाचवीला पूजलेली..
कुस्करल्या यौवनाचा शाप सदा तिच्याच उरी..
शाप सदा तिच्याच उरी
In reply to टोचणारी जुनी सल. by राघव
धन्यवाद....."शाप सदा तिच्याच उरी" अप्रतिम......
मनाला भिडणारी गझल.. :-(
मनाला भिडणारी गझल.. :-(
धन्यवाद !!!
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !