Skip to main content

त्या पोराने

लेखक मनोज यांनी रविवार, 12/07/2020 या दिवशी प्रकाशित केले.
येता गिर्‍हाईक दारावर त्याने तिला बाई म्हणावे? वेश्येच्या त्या पोराने कधी आईला आई म्हणावे ? चुरगळलेल्या पाकळ्यांना जरी मोहक तो सुगंध येतो हाती घेत अश्या फुलाला कधी कुणी मग जाई म्हणावे? नाही केली फसवा फसवी सरळ जमला व्यवहार आहे आरोप करत का लोकांनी केली दांडगाई म्हणावे? भाऊबीजेचा सण आल्यावर उगी तिला वाटत होते सरळ नजरेन पाहत कुणी आज मलाही ताई म्हणावे जगणे बत्तर असे नशीबी बाप नाही माहीत ज्याला या जगात त्या पोराने कुणा होऊ उतराई म्हणावे?
लेखनविषय:

वाचने 5201
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

खूप छान लिहिलिये.

टोचणारी जुनी सल. माझ्याच एका कवितेतील काही ओळी सांगाव्याशा वाटल्या या रचनेवरून - विसंगती जीवनाला पाचवीला पूजलेली.. कुस्करल्या यौवनाचा शाप सदा तिच्याच उरी..