मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिव सेने काही अनुत्तरित प्रश्न आणि पुढची क्रिया

हस्तर · · राजकारण
शिव सेने काही अनुत्तरित प्रश्न आणि पुढची क्रिया मुख्यमंत्री जर आपलाच करायचा होता तर प्रचार का तसा केला नाही व निकाल लागल्यावरच डरकाळी फुटली ? मते युतीला ला होती आता युती फुटली तर निवडणूक परत घेणे रास्त जर ठरले होते तर अमित शाह यांना एकदा पण जाब का नाही विचारला ? दर वेळी शहा आणि मोदी मातोश्रीवर येतात मग आता दिल्ली जनपथ येथे जाऊन पाठिंबा मागण्यात स्वाभिमान आहे ? पुढे काय अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला अर्थात भाजप पाठिंबा देणार नाही काँग्रेस राष्ट्रवादी पाठिंबा देतील पण अटी घालून ( मराठी माणूस युद्धात जिंकता पण तहात हरतो ) मुख्यमंत्री आपला वरून एवढे रणकंदन झाले त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल पण सरकार डळमळीत असणारच विखे आधी पण विरोधी पक्ष नेते होते बहुतेक आता पण तेच असणार ९० मध्ये सत्तेवर आल्यावर शिव सेने ने दररोज घोषणा करायचा सपाट लावला तसे काही करायचा मूर्खपणा करणार नाही हि आशा व दररोज सकाळी उठून मोदी वर तोंड सुख घेणार नाही हि अपेक्षा केंद्रात सरकार आता यांचा केजरीवाल करणार हे नक्की ओला दुष्काळ व बाकी ह्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत ,चूक कोणाचीही असो नाव शिव सेनेचेच दिसतेय त्यामुळे त्यानं मत कमी पडणार ह्यापुढे आमदार फुटणे अशक्य नसले तरी खूप अवघड असणार ,राष्ट्रवादी वाले जसा उदयनराजे ह्यांचे फोटो दाखवत आहेत तसे हे राणे ह्यांचा दाखवतील शिव सेनेच्या त्रागाची करणे माझ्या मते १) राणे :- तसा पण युती असूनही ह्यांच्या पुढे उमेदवार उभा केला होता २) सापक्ष वागणूक ३) बारामती :- ५ वर्ष आधी यांनी भाजप ला पाठिंबा देऊन काडी टाकली , आत्ता त्यांनाच फडणवीस यांनी अंगावर घेतले म्हणून हा गेम ४) मुख्यमंत्री बनायचे वय निघून चाललेय

वाचन 45823 प्रतिक्रिया 0