✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
Sun, 08/25/2019 - 15:34  ·  लेख
लेख


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींतर्फे (युएई) त्या देशाचा, "ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च मुलकी बहुमान, २४ ऑगस्ट २०१९ रोजी, प्रदान करण्यात आला.





मोदींना त्यांच्या कामगिरीबद्दल अनेक आंतरराष्ट्रिय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातील काही महत्वाचे असे आहेत : १. Order of Zayed, २०१९ : संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार. २, Order of St Andrew the Apostle, २०१९ : रशियाचा सर्वोच्च व १६९८ सालापासून आस्तित्वात असलेला सर्वात जुना सन्मान. ३. Seoul Peace Prize, २०१८ : दक्षिण कोरिया. ४. UN Champions of the Earth Award, २०१८ : संयुक्त राष्ट्रसंघ (युएन). ५. Grand Collar of the State of Palestine, २०१८ : पॅलेस्टाईन. ६. Amir Amanullah Khan Award : अफगाणिस्तान. ७. King Abdullaziz Sash Award, २०१६ : सौदी अरेबियाचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार. ८. TIME Person of the Year, २०१६. इत्यादी. महत्वाचे म्हणजे वरच्या यादीतील ८ पुरस्कारांपैकी ४ मुस्लीम राष्ट्रांचे आहेत. इतकेच नव्हे तर त्यातील सौदी अरेबिया आणि युएई हे दोन देश इस्लामी देशांचे धुरीण आहेत ! १९६९ साली स्थापन झालेल्या Organisation of Islamic Cooperation या ५७ इस्लामी देशांच्या संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांची काही महिन्यांपूर्वी अबू धाबीत परिषद झाली होती. मुस्लिम लोकसंखेने दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या भारताला त्या संघटनेत स्थान मिळू नये यासाठी, त्या संघटनेचा संस्थापक सभासद पाकिस्तान, सुरुवातीपासूनच सक्रिय होता आणि त्यात तो २०१८ पर्यंत यशस्वीही झाला होता. मात्र, फेब्रुवारी २०१९ मध्ये त्या संघटनेने पाकिस्तानचा कडवा विरोध मोडून, किंबहुना, संस्थापक सदस्य असलेल्या पाकिस्तानच्या सभेवर बहिष्कार टाकण्याची टाकण्याच्या धमकीची पर्वा न करता, तत्कालीन भारतिय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना, केवळ आमंत्रितच केले असे नाही तर, मुख्य भाषण (की नोट अ‍ॅड्रेस) देणार्‍या अतिथीचा सन्मान देऊन आमंत्रित केले होते, हे आठवत असेलच. या वेळीही, काश्मिरसंबंधिची ३७० आणि ३५अ कलमे रद्दबातल केल्यामुळे पाकिस्तान जगभर, युएनमध्ये आणि विशेषतः इस्लामी जगात विषारी आणि विखारी भाषेत आकांडतांडव करत आहे. मात्र, पाकिस्तानच्या या रडगाण्याला ICO आणी चीनसकट कोणत्याही देशाने फारशी भीक घातलेली नाही. मात्र, याच वेळेस, युएईने मोदींना हे पारितोषिक देऊन, पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावलेली आहे, हे नक्की. एकीकडे मोदींच्या राज्यकारभाराची आणि आंतरराष्ट्रिय मुत्सेद्दीगिरीची (पाकिस्तान आणि चीन सोडून) जगभर प्रशंसा चाललेली असताना, भारतातले विरोधी पक्ष; विशेषतः कॉन्ग्रेस, कम्युनिस्ट आणि कडवे मुस्लिम नेत्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना; त्यांच्यामध्ये एकही गुण दिसत नाही आणि हिटलर, जातियवादी, मुस्लीमविरोधी, इत्यादी अर्थांची नवनवीन विशेषणे शोधून काढण्याचा त्यांचा व्यवसाय जोरात चाललेला आहे ! आणि भारतात वाढत असलेल्या असहिष्णूतेमुळे अनेक "तथाकथित विचारवंत, कलाकार, इत्यादींना देशात राहणे मुश्किल होत आहे !! "पिकते तिथे विकत नाही" ही म्हण सर्वार्थाने सिद्ध करणारा भारत हा सर्व जगात एकमेव विशेष देश असावा !!! :( सुदैवाने, हे फक्त मोदी विरोधकांच्या बाबतीत खरे आहे, जनतेला मोदींबद्दल काय वाटते आहे ते तिने निवडणूकांत दाखवून दिले आहेच. :) या अतिरेकी मोदी विरोधाला कंटाळून, काही वरिष्ठ कॉन्ग्रेसी नेते हल्ली जरासा सकारात्मक सूर लावू राहिले आहेत, हा त्यातल्या त्यात एक आशेचा विवेकी (sane) किरण म्हणावा काय ?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी

प्रतिक्रिया द्या
56519 वाचन

💬 प्रतिसाद (108)

प्रतिक्रिया

+1

जालिम लोशन
Sun, 08/25/2019 - 16:11 नवीन
+१
  • Log in or register to post comments

"ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च

प्रसाद_१९८२
Sun, 08/25/2019 - 16:16 नवीन
"ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च मुलकी बहुमान देण्यामागे नक्की criteria काय आहे ? कारण हा बहुमान पाकिस्तानचा माजी राष्ट्रपती परवेज मुशरर्फला देखील देण्यात आला होता असे वाचले होते.
  • Log in or register to post comments

ऑर्डर ऑफ झायेद हा नोबेलपेक्षा सरस पुरस्कार आहे.

मारवा
Sun, 08/25/2019 - 17:53 नवीन
"ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च मुलकी बहुमान देण्यामागे नक्की criteria काय आहे ? कारण हा बहुमान पाकिस्तानचा माजी राष्ट्रपती परवेज मुशरर्फला देखील देण्यात आला होता असे वाचले होते. criteria चा आग्रह अनावश्यक अप्रस्तुत व द्वेषमुलक राष्ट्रद्रोही प्रेरणेतुनआलेला आहे . परवेज मुशर्र्फ यांनी जागतिक शांततेसाठी जे योगदान दिलेले होते त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. आजही ते इंग्लंडमध्ये राहुन जागतिक शांततेसाठी कार्यरत आहेत. ते लोकशाहीचे सत्याग्रहाचे कडवे समर्थक होते. त्यांना पुरस्कार दिला २००७ मध्ये त्यांना जेव्हा पुरस्कार मिळाला होता तेव्हा ज्या अहिंसक रीतीने मुशर्रफ यांनी पाकिस्तानात निवडणुक जिंकलेली होती त्याचा ही प्रभाव पुरस्कार देतांना पडलेला होता. चायनाचे पंतप्रधान यांनी चायनीज जनतेला जे व्यक्तीस्वातंत्र्य उपभोगण्याची मुभा दिली त्यासाठी त्यांना जुलै २०१८ या एकाच महीन्यात जे तीन ऑर्डर ऑफ झायेद दिले होते त्यापैकी एक दिला होता. त्यातुनच प्रेरणा घेऊन आज ते हाँगकाँग च्या नागरीकांना चायनाहुन अधिक स्वातंत्र्य देण्याचा मनापासुन प्रयत्न करत आहेत. मोदी यांनी देखील जागतिक शांततेसाठी केलेली कामगिरी विचारात घेण्यात आली असावी. मागच्या वर्षी एकाच महीन्यात ३ दिले होते यावर्षी या महीन्यात बघु अजुन कोणाचा झायेद साठी नंबर लागतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

काय हे मारवासाहेब,

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 08/25/2019 - 18:40 नवीन
काय हे मारवासायेब, या पुरस्काराचे आंतरराष्ट्रिय राजकारणातले महत्व, मोदींना मिळालेल्या पुरस्कारांच्या यादीखालच्या तीन परिच्छेदांत बर्‍यापैकी विस्ताराने लिहिले आहे. ते वाचायचे विसरलात की ते सोयीचे नाही असे ठरवून दुर्लक्ष केलेत ?! तुमच्यासारख्या राजकारणात मुरलेल्या भिडूकडून ही अपेक्षा नव्हती (कोण म्हणतोय रे तो, की हीच अपेक्षा होती म्हणून, आँ ?!) . पण असो. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

आणि हो... त्या तीन

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 08/25/2019 - 22:00 नवीन
आणि हो... त्या तीन परिच्छेदांनंतरच्या चवथ्या परिच्छेदात लिहिलेल्या दुर्दैवी वास्तवाचे कटू सत्य लगेच सिद्ध करून दाखविल्याबद्दल, सखेद धन्यवाद ! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

काय चुकीचे लिहिले त्यांनी?

रविकिरण फडके
Mon, 08/26/2019 - 10:15 नवीन
"criteria चा आग्रह अनावश्यक अप्रस्तुत व द्वेषमुलक राष्ट्रद्रोही प्रेरणेतुनआलेला आहे" श्रीमान मारवाजी, इतकी टोकाची भूमिका, आणि तीही केवळ प्रसाद १९८२ ह्यांनी 'कारण हा बहुमान पाकिस्तानचा माजी राष्ट्रपती परवेज मुशरर्फला देखील देण्यात आला होता असे वाचले होते' असे लिहिले म्हणून? काय चुकीचे लिहिले त्यांनी? भारत व पाकिस्तान ह्यांच्यात सुरु असलेल्या बोलण्यांत कोलदांडा घालावा ह्या हेतूने कारगिल युद्ध सुरु करणारे ते हेच मुशरर्फ ना? ह्यांना शांततेचा पुरस्कार? आणि त्याच पंक्तीत मोदी? बाकी, हा सगळा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग म्हणून तितपतच गाम्भीर्याने घ्यावा हे उचित पण criterion विचारणाऱ्याचा मुद्दा गैरलागू नाही, राष्ट्रद्रोही वगैरे विशेषणे लावावीत इतका चुकीचा तर नाहीच. (उद्या शंकर महादेवन आणि रविकिरण फडके ह्या दोघांनाही गायनाचे बक्षीस एकाच व्यासपीठावर मिळाले तर शंकर महादेवनचा बहुमान होईल की अपमान, हे तुम्हीच ठरवा. ही फक्त उपमा आहे हे लक्षात घावे.) असो. जे मिपावर समोर आले त्यावर माझी ही प्रतिक्रिया. बाकी आपली जी काही equations बाहेर असतील ती असोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

छान वाटले.

जॉनविक्क
Sun, 08/25/2019 - 16:42 नवीन
यथोचित असो वा नसो वैयक्तिक लाभ नसता सारखे सारखे कौतूक करणे मनाला झेपत नाही म्हणून थोड़े दुर्लक्ष करूया आता मोदींकड़े. पुढील कौतुक अर्थव्यवस्था रुळावर आल्यावर अथवा 370 प्रमाणे एखादा उत्तुंग शटकार ठोकल्यावर मनापासून करूच. तोपर्यंत आवश्यक असलेल्या पण एकेरी दुहेरी धावा साठी उठून उभे राहणे आता तब्येतीला झेपणार नाही असं वाटते.
  • Log in or register to post comments

१०० वेळा सहमत, अर्थात जे

उपेक्षित
Mon, 08/26/2019 - 12:53 नवीन
१०० वेळा सहमत, अर्थात जे चांगले काम केले आहे ते आहेच आणि त्या बाबत वाद नाहीच पण अजेंडा असल्यासारखे सारखे सारखे त्याच झाडावर याचा कंटाळा येतो आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

Pakistan Senate chief cancels

डँबिस००७
Sun, 08/25/2019 - 17:18 नवीन
Pakistan Senate chief cancels UAE visit to protest Modi award Chairman Senate Sadiq Sanjrani has cancelled his scheduled visit to the United Arab Emirates a day after the country gave Indian Prime Minister Narendra Modi highest civilian award. Sanjrani was to depart on a four-day visit to the UAE with a parliamentary delegation yesterday but it was called off to express solidarity with people of Kashmir and protest the Gulf state's decision to give Modi highest civilian award. According to a press release issued, the Chairman Senate said that Pakistan fully supported the freedom movement of Kashmiris. He said the Modi government has carried out unprecedented atrocities against Kashmiris and imposed a curfew in the occupied territory. पाकिस्तानची चांगलीच जळलेली आहे !!
  • Log in or register to post comments

पाकिस्तानला पुरते कळून चुकले

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 08/25/2019 - 17:56 नवीन
पाकिस्तानला पुरते कळून चुकले आहे की, युएई आपल्याला मुस्लिम बंधुराष्ट्र म्हणून फारतर बिरयानी खिलवेल, पण भिकेच्या कटोरीत छदामही टाकणार नाही. तेव्हा, मोदींना दिलेला पुरस्कार, हे तिथे न जायला एक छान कारण मिळाले, इतकेच ! तसेही, रिकाम्या हाताने परतल्यावर, डेलिगेशनला पाकिस्तानी जनतेच्या चपला खायला लागणार होतेच... ते टळले म्हणून त्यांनी आतापर्यंत एखादी गुप्त पार्टी सुद्धा केली असेल. :) सौदी युवराज महंमदने, फेब्रुवारीच्या पाकिस्तान भेटीत देवू केलेले २० बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीचे आश्वासन, अजूनही (अपेक्षेप्रमाणेच) हवेतच आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

मोदींना बाहेर पुरस्कार मिळतात

प्रकाश घाटपांडे
Sun, 08/25/2019 - 19:30 नवीन
मोदींना बाहेर पुरस्कार मिळतात पण देशात तिरस्कार मिळतात.पुरस्कार मॅनेज करतात हा!
  • Log in or register to post comments

=)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 08/25/2019 - 19:52 नवीन
=)) =)) =)) म्हणजे भारतातले काही लोक अगदीच अन-मॅनेजिएबल झाले आहेत, हे सिद्ध झाले तर ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

लक्षात ठेवा

नाखु
Mon, 08/26/2019 - 10:48 नवीन
मोदींना मिळालेले पुरस्कार, पंतप्रधान पद, मुख्यमंत्री पद सगळेच विकत घेतलेले आहेत यावर आमचा ठाम विश्वास आहे. अखिल मिपा मोदी द्वेष संघाच्या " काळा चष्मा न काढता शुभ्र कसे दिसत नाही" या नियतकालिकातून साभार टपाली दूरस्थ नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/26/2019 - 11:29 नवीन
=)) =)) =)) नाखुसाहेब, केस, "काळा चष्मा न काढता शुभ्र कसे दिसत नाही" या स्टेजच्या फार पुढे गेली आहे आणि आता ती, "आम्ही इतका गडद काळा चष्मा घालून बघतो तरी, (जगाला) शुभ्र कसे दिसते?" या स्टेजला पोहोचली आहे. ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

वाह वाह वाह वाह वाह वाह वाह

अभ्या..
Mon, 08/26/2019 - 13:02 नवीन
धागालेखात असलेला बाल वॉशिंग्टनी उत्साह भावला. लगे रहो.
  • Log in or register to post comments

अभ्या,,

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/26/2019 - 18:20 नवीन
अभ्या,, इथे हा प्रतिसाद एक वेळ ठीक आहे. कारण, काहीजण राजकारणाचा चष्मा झोपतानाही काढून शकत नाही, त्याला नाईलाज आहे. तेव्हा जळजळ समजू शकतो. पण, हाच प्रतिसाद पी व्ही सिंधूच्या जागतिक विजेतेपदाच्या विक्रमी कामगिरीच्या धाग्यावरही कॉपी पेस्ट केला आहेस (जिथे भारतिय मनात केवळ अभिमान सोडून इतर कोणतिही भावना अपेक्षित नव्हती), यावरून केस हाताबाहेर जाऊ लागली आहे. प्रकृतीची काळजी घे. ;) :) शुभेच्छांसह ! ****** अवांतर : इतर कोणत्याही भारतिय नेत्याबद्दल जर असे काही अभिमानस्पद घडले असते तर, एक भारतिय म्हणून तेवढ्याच उत्साहाने धागा टाकला असता. आता, एखाद्या नेत्याचे कर्तृत्व जग मान देण्याइतके समजत नाही, याला आम्ही काय करणार ? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

एक्का जी,

उपेक्षित
Tue, 08/27/2019 - 18:49 नवीन
एक्का जी, वरती मी सुद्धा थोडा (माझ्या दृष्टीने थोडा :) ) निगेटिव प्रतिसाद टाकला आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे थोडे काही झाली कि मोदींची बाजू घेऊन कौतुकाचा धागा टाकला जातो असे का ? आता राजकीय ताज्या घडामोडींसाठी खास धागा आहे न ? हे प्रश्न मला पडले म्हणून मी वरचा प्रतिसाद टाकला.(बाकी मला सल्ला द्यायचा काही अधिकार नाही हे मी जाणून आहे) इतके दिवस मुद्दाम बोललो नाही पण जेव्हापासून मला समजत आहेत तेव्हापासून बघतोय घरचे आणि जवळचे नातेवाईक BJP शिवाय कुणालाही मत देत नाहीत RSS चे बाळकडू तर लहानपणापासून मिळत होते कारण कर्वेनगर येथे सम्राट अशोकच्या मैदानात तेव्हा शाखा भरायची, शाखेच्या निवासी शिबिरांना सुद्धा जायचो अगदी पानशेत वगैरे तेव्हाच्या थोड्या दुर्गम भागी जाऊन श्रमदान वगैरे करून आलोय. पण, नंतर नंतर बर्याच गोष्टी मला वयक्तिक खटकू लागल्या कधीतरी कट्ट्यात सांगीन त्या. सो हे सर्व सांगायचा उद्देश एक आणि एकाच आहे कि आपण आपल्या जवळच्या मित्राला सुद्धा चुकला तर ओरडतो किंवा खूप कौतुक टाळतो. मग इथे का नाही ? बस्स. आणि तिकडे पी व्ही सिंधूच्या धाग्यावर अभ्याची पोस्ट बघून मला पण धक्का बसला तुमच्या इतकाच (पोस्ट समयोचित नव्हतीच त्याची ) असो ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न. खाजगीत सांगितले तेच इथे पण सांगतो आपला काहीही वयक्तिक वाद आणि आकस नाहीये फ़क़्त मतभेद आहेत ते हि वैचारिक सो आपण राग मानू नये. आपल्याबद्दल नितांत आदर आणि अभिमानच आहे मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आणि तिकडे पी व्ही सिंधूच्या

जॉनविक्क
Tue, 08/27/2019 - 20:20 नवीन
आणि तिकडे पी व्ही सिंधूच्या धाग्यावर अभ्याची पोस्ट बघून मला पण धक्का बसला तुमच्या इतकाच (पोस्ट समयोचित नव्हतीच त्याची ) असो ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न.
नसेलही समयोचित पण धक्का बसणे तरीही चूकच. एकदा ही कायम समयोचितच असण्याची सवय लागली की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित

थोडे काही झाली कि मोदींची

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/28/2019 - 00:38 नवीन
@ उपेक्षित : थोडे काही झाली कि मोदींची बाजू घेऊन कौतुकाचा धागा टाकला जातो असे का ? हे कोणत्या पुराव्यावर लिहिले आहे ???!!! "आपल्याला न आवडणारा माणूस/नेता असला की त्याचे कधिही काही दिसले की ते सगळेच 'थोडे' असते" ही फॅशन हल्ली काही लोकांची आवडती आहे. तुमच्या वरच्या म्हणण्याला काही आधार देवू शकला नाहीत तर, नाही नाही म्हणत, तुम्ही त्यांच्या कळपात सामील झाला आहात असेच होईल. भारताच्या बाबतीत काही चांगले झाले तर त्याचे कौतूक करताना मला अजिबात वाईट वाटत नाही... केवळ अभिमानच वाटतो. जात, धर्म, पक्ष, आवडती/नावडती व्यक्ती, इत्यादी चौकशी करून मगच, ते कौतूक करावे की करू नये, हे मी ठरवत नाही. याशिवाय, तुमचे भाजप किंवा आरएसएसबद्दल काय मत आहे हे इथे अत्यंत गैरलागू आहे... किंबहुना, माझ्याबाबतीत ते मत पूर्वग्रहदृष्टीने आलेले आहे. कारण, माझा भाजप अथवा आरएसएस यांच्याशी दुरान्वयानेही पूर्वी कधीही संबंध नव्हता आणि आताही नाही... माझी बांधिलकी माझ्या देशाशी आणि देशाच्या तिरंग्याशी आहे. अर्थातच, माझ्या मतांवर भाजप अथवा आरएसएस यांच्या विचारसरणीचा तडक काहीच प्रभाव नाही, तरीही तुमचे त्यांच्यासंबंधीचे काही बरे-वाईट अनुभव सामान्यज्ञान म्हणून ऐकायला माझी ना नाही. तसेच अनुभव इतर कोणी, इतर कोणत्या पक्षा/संस्थेबद्दल सांगितले तरीही मी ते ऐकू शकतो. कारण, माहिती/ज्ञानाचा विस्तार केव्हाही स्विकार्य असतो. माझी विचारसरणी फार साधी आणि सोपी आहे... भारतासंबंधी कोणतीही सकारात्मक कृती झाली तर मला त्याचा अभिमान वाटतो आणि तो व्यक्त करायला मला शरम वाटत नाही. "कोण्या एका नेत्याचा/पक्षाचा झेंडा सतत डोळे मिटून खांद्यावर घेण्याइतका, माझ्या बुद्धीचा अपमान, मी कधीही करणार नाही". त्यामुळे, चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणताना ते कोणत्या राजकिय नेत्याशी/पक्षाशी निगडित आहे, याची खात्री करण्याची मला गरज अजिबात वाटत नाही. इतरांना आंधळेपणाने कोणा नेत्या-पक्षाची पाठराखण करायची असली तर, आणि ते त्यांच्या सदसदविवेकबुद्धीला पचत असेल तर त्यांच्यासाठी माझ्या शुभेच्छा असतील. भारतातील सद्य वस्तूस्थिती अशी आहे... १. देशाबद्दल किंवा मोदींबद्दल जरा काही चांगले म्हटले की हल्ली काही लोकांना अत्यंत जळजळ होते आणि लगेच "मोदीभक्त किंवा भाजप/आरएसएस समर्थक" अशी लेबले लावून टीका सुरू होते. तुमचा प्रतिसाद हेच सिद्ध करत आहे की, त्या ट्रॅपमध्ये तुम्हीही अडकला आहात (हे विचारत नाही, सांगत आहे). अन्यथा, भाजप किंवा आरएसएसच्या बद्दल मी आतापर्यंत कधीच काहीच लिहिले नाही, हे तुमच्या ध्यानात आले असते... निदान वरचा प्रतिसाद लिहिण्याअगोदर, मी तसे काही लिहिले आहे का, हे समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न तरी केला असतात. २. अंध विरोधामुळे, लेबले लावणार्‍या लोकांच्या हे सुद्धा ध्यानात येत नाही कि, भारताच्या, त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या पाठीराख्यांच्या दुर्दैवाने, विरोधक नेते त्यांना नावाजावे असे स्वतः काही करण्याचा प्रयत्नही सद्या करत नाहीत... त्यांची सर्व शक्ती फक्त नकारात्मक बोलणे व नकारात्मक कृतीने सरकारची/मोदींची नालस्ती करण्यातच खर्च होते आहे... आणि तसे करताना त्यांचा इतका तोल जात आहे की, बर्‍याचदा आपण आपल्या देशाच्या हितसंबंधांना धोका पोचवत आहे, हे सुद्धा त्यांच्या ध्यानात येत नाही... किंबहुना, ध्यानात येते आहे पण त्यांना त्याची पर्वा कराविशी वाटत नाही. अश्या नेत्यांबद्दल त्यांच्या पाठिराख्यांनाही काही लिहिणे कठीण होत आहे तर इतरांनी कौतुकाने लिहायला आपली बुद्धी गहाण टाकावी लागेल, नाही का? ३. दुसर्‍याची मोठी रेषा खोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, स्वतःची कमीत कमी एखादी लहान रेषा तरी आखण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता तर, त्यांच्या त्या सकारात्मक कामाबद्दल अभिमानाने लिहायला मला आवडले असते. हल्लीची अशी एक-दोन सकारात्मक उदाहरणे सांगा, मी स्वतः त्यांच्याबद्दल कौतुकाचा लेख लिहेन. अन्यथा, वर सांगितलेल्या ट्रॅपमध्ये अडकायला तुम्ही मोकळे आहातच, दुर्दैवाने ! :( खाजगीत सांगितले तेच इथे पण सांगतो आपला काहीही वयक्तिक वाद आणि आकस नाहीये फ़क़्त मतभेद आहेत ते हि वैचारिक सो आपण राग मानू नये. हे खरेच खरे असले तर, विनाकारण/गैरसमजाने लेबले लावण्याअगोदर माझ्या लेखनातला मजकूर जसा आहे तसाच वाचून त्याचा अर्थ समजावून घ्या... त्यात नसलेले भलतेसलते काल्पनिक अनर्थ काढू नका. कारण, काही न लपवता स्पष्ट लेखन करण्याचा माझी शैली आहे, हे माझ्या इथल्या आणि खाजगीत लिहिलेल्या मजकूरावरून तुमच्या ध्यानात आले असते आणि मग तुम्हाला वरचा प्रतिसाद लिहिवासा वाटला नसता, हे सांगताना खरेच खेद होत आहे. :( आपल्याबद्दल नितांत आदर आणि अभिमानच आहे मला. हे खरे आहे असे गृहित धरूनच वरचा जरासा दीर्घ प्रतिसाद लिहिला आहे. कारण, माझ्याबद्दल ममत्व असणार्‍याने, कोणत्याही बाबतीत, कोणाही व्यक्तीबद्दल, (अ) काल्पनिक अर्थ शोधून गैरसमज करून घेणे आणि (आ) त्या गैरसमजावर आधारित लेबले लावणे, अश्या प्रकारच्या मानसिक ट्रॅप्समध्ये अडकू नये, असे मला प्रकर्षाने वाटते. याबाबत, मी नेहमी लिहीत नाही, याचा अर्थ असा नाही की लेबले मला मान्य आहेत. तर, त्याची कारणे अशी आहेत... (अ) जगातिल प्रत्येकाला सुधारण्यासाठी माझा जन्म झाला नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे आणि (आ) विशेषतः, झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करण्यात, व्यर्थ वेळ आणि श्रम खर्च करणे, माझ्या तत्वात बसत नाही. :) इतके लिहिल्यावरही तुमचे समाधान झाले नाही तर, माझ्या दृष्टीने तुम्ही वरच्यापैकी एक किंवा दोन्ही कारणात बसाल. बाकी, तुम्ही काय करावे किंवा करू नये, हा निर्णय सर्वस्वी तुमचाच आहे, याबाबत संशय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित

Modi 'praise': 'Respect my

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/28/2019 - 02:05 नवीन
Modi 'praise': 'Respect my approach,' says Shashi Tharoor as Kerala Congress seeks explanation वरिष्ठ कॉन्ग्रेस नेते जयराम रमेश यांनी काही दिवसापूर्वी, "मोदींच्या सर्वच गोष्टींवर नकारात्मक टीका करू नये, त्यांच्या चांगल्या गोष्टींची स्तुतीही करावी", अश्या अर्थाचे विधान केले होते. त्याला शशी थरूर आणि अभिषेक मनु सिंघवी या आणखी दोन वरिष्ठ कॉन्गेस नेत्यांनी पाठिंबा देणारी वक्तव्ये केली होती. आता त्या नेत्यांवर कॉन्ग्रेसमधून सडकून टीका होत आहे. शशी थरूर यांना तर केरळ कॉन्ग्रेसने कारणे द्या नोटीस बजावली आहे ! तेव्हा अंधविरोध, ही उच्च स्तरावरून सुरू होऊन खालपर्यंत झिरपलेली सवय आहे, हे परत एकदा सिद्ध झाले आहे. :) मग मिपावर तोच व्यवहार पाहून दोष तरी कोणाला देणार ?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

(आ) विशेषतः, झोललेल्याला जागे करण्यात, व्यर्थ वेळ आणि श्रम खर्च

mayu4u
Wed, 08/28/2019 - 11:54 नवीन
(आ) विशेषतः, झोललेल्याला जागे करण्यात, व्यर्थ वेळ आणि श्रम खर्च करणे, माझ्या तत्वात बसत नाही. :)
झोललेल्याला म्हणजे झोल करणार्‍याला का? :प ह घ्या हे वे सां न ल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हायला, आजकाल सर्वांनाच

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/28/2019 - 14:03 नवीन
झोपेचे सोंग घेतलेला काय किंवा झोललेला काय, सेम डिफरन्स. ;) स्वगत : हायला, आजकाल सर्वांनाच काकदृष्टी प्राप्त झालेली दिसतेय ! वातावरणात काकदृष्टीचा इतका प्रादुर्भाव झाला आहे, त्याला लोक तरी काय करणार, म्हणा ! =)) =)) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u

अहो लोकांना इतकंच वाटतं की

जॉनविक्क
Wed, 08/28/2019 - 14:17 नवीन
ऑस्कर मिळाले म्हणून रेहमानचे प्रत्येक गाणे सुपरहिट अवीट मानणे योग्य नाही, काही गाणी सुमार, काही कामचलाउ, काही छान आणि काही अफलातून असणे अनपेक्षित नाही. आणि भलेही प्रत्येकाची आवड निवड वेगळी असेलही याचा अर्थही रेहमान फक्त सुपरहिट गाणे देतो असा ही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

काहीही हा जॉनविक्क ! तुम्ही

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/28/2019 - 14:54 नवीन
काहीही हा जॉनविक्क ! तुम्ही (हल्ली पडलेल्या एका प्रथेला धरून) भावनेच्या भरात फारच वाहत जाऊन, वरचा प्रतिसाद लिहून, आमचे मनोरंजन करण्याचा फारच जोराचा प्रयत्न चालू ठेवला आहात. :) एखाद्या व्यक्तीबद्दल कधितरी एखाद्या खरेच चांगल्या असलेल्या गोष्टीवर एखादा लेख लिहिण्याने, "त्या व्यक्तीच्या सर्व कृतींची स्तुती केली असे होत नाही", इतके जाणण्याइतके तुम्ही हुश्शार आहात असा आमचा समज आहे. पण, आमचा तो समज खोटा आहे, असे सिद्ध करण्याचा तुमचा हा प्रयत्न असेल, तर त्यात तुम्ही यशस्वी होत आहात, हे नक्की. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

डॉक,

जॉनविक्क
Wed, 08/28/2019 - 15:01 नवीन
मी चुका करत नाही अथवा करायच्या नाहीत असे काही व्रत घेतलेले नाही, माझ्याकडून चूक होउ शकते, तुम्ही म्हणता ते ही इथे घडले असावे. तेंव्हा आहो जाओ सोडून बाकी काहीही बोललात तर खटकणार नक्कीच नाही. "_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हे कोणत्या पुराव्यावर लिहिले

उपेक्षित
Wed, 08/28/2019 - 19:26 नवीन
हे कोणत्या पुराव्यावर लिहिले आहे ???!!! >>>> पुरावा ? अहो जे जाणवले ते लिहिले आहे मी लगीच आपले कोर्टांत उभ करून साक्षी पुरावे कसले मागताय ? आपल्याबद्दल नितांत आदर आणि अभिमानच आहे मला. हे खरे आहे असे गृहित धरूनच वरचा जरासा दीर्घ प्रतिसाद लिहिला आहे. >>>>>>>> जे आहे तेच लिहिले आहे आणि याचा काहीही पुरावा नाहीये माझ्याकडे सो तुम्हाला कसे बघायचे माझ्या विधानाकडे हा तुमचा लुक आउट. असो माझ्याकडून इथेच पूर्णविराम बाकी खरडीवर धुमाकूळ घालू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अनेकांना आपल्या देशाच्या

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/26/2019 - 18:31 नवीन
अनेकांना आपल्या देशाच्या पंतप्रधानांना दुसर्‍या देशाने पुरस्कार दिला याने आनंद झाला, तर काहींना, त्यामुळे भारताची जागतिक स्तरावर पत वाढली म्हणून आनंद झाला... तर, इतर काहींना त्याबद्दल उदासिनता किंवा जळजळ वाटली. व्यक्ती तितक्या प्रकृती ! सर्वांसाठी धन्यवाद ! असो. त्यानंतर लगेच अजून एक घटना घडली आहे...

PM Modi conferred with top Bahraini award

युएईनंतर पंतप्रधान मोदींनी बहारेन या अजून एका खाडी देशाला भेट दिली. तेथिल राजे हामाद अल खलिफा यांनी मोदींना, भारत-बहारेन मैत्रीसाठी भरीव कामगिरी केल्याबद्दल, त्यांच्या देशाचा "King Hamad Order of the Renaissance" हा सर्वोच्च बहुमान प्रदान केला.



अर्थातच, वरच्या सर्वांनाच आपापली भावना अधिक प्रबळ करण्याची अजून एक संधी मिळाली आहे. :)
  • Log in or register to post comments

ज्या देशांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार

सर टोबी
Wed, 08/28/2019 - 08:30 नवीन
मोदींना मिळत आहेत त्या देशातील जनतेचे जीवन स्तर उंचावण्यामध्ये मोदींची भूमिका शून्य. ज्या देशामध्ये त्यांच्या कार्याचा प्रभाव पडतो त्या देशात त्यांच्या योजना, त्यांची प्राथमिकता, अंमलबजावणी या बद्दल विवाद आहेत. अशा परिस्थितीत का म्हणून लोकांनी या पुरस्कारांमुळे हुरळून जावे आणि जे जात नाहीत त्यांना तुम्ही हिणवावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

या बाबतीत मिपाप्रथेप्रमाणे,

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/28/2019 - 09:49 नवीन
या बाबतीत मिपाप्रथेप्रमाणे, "अभ्यास वाढवा" इतकेच सांगू इच्छितो. थोडी तसदी घेवून जालावर पाहणी केली तर बरीच विश्वासू माहिती मिळेल. सरसकट विधाने काय कोणीही करू शकतो. :) परदेशातल्या भारतिय नागरिकांना भारत व मोदींबद्दल हल्ली काय वाटते आहे, हे पहायला मोदींच्या त्या देशातल्या सभांच्या चित्रफिती जालावर पोत्याने आहेत. भारतातून वैध/अवैध मार्गाने परदेशात धन नेण्यार्‍या नागरिकांच्या कथा तर अनेक दशके "भारतिय लिजंड्स" झालेल्या आहेत, हे सांगायला नकोच. पण, परदेशस्थ सधन नागरिकांना भारतात धन गुंतवण्याबद्दल हल्ली काय वाटू लागले आहे हे पण स्वतःच जालावर जरूर पहा. केवळ उदाहरणादाखल, ही काही दिवसांपूर्वीची चित्रफीत पहा... बाकी, मुक्त संस्थळावर, आभासी आयडीच्या मागे लपून, विनापुरावा सरसकट विधाने काय कोणीही करू शकतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

परकिय सरकारांना भारताबद्दल

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/28/2019 - 09:55 नवीन
परकिय सरकारांना भारताबद्दल काय वाटते याची दोन ताजी उदाहरणे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

ज्या देशांचे सर्वोच्च नागरी

सुबोध खरे
Wed, 08/28/2019 - 10:24 नवीन
ज्या देशांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार मोदींना मिळत आहेत त्या देशातील जनतेचे जीवन स्तर उंचावण्यामध्ये मोदींची भूमिका शून्य. कायम मोदी द्वेषच दिसत असतो तुमच्या प्रतिसादात नेल्सन मंडेलाना भारतरत्न पुरस्कार दिल्यामुळे भारतीय किंवा दक्षिण आफ्रिकी जनतेच्या आयुष्यात काय फरक पडणार होता? मोंगलाना जसे जिथे तिथे संताजी धनाजी दिसत तसं झालंय तुमचं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

एखादे सत्य जितके चिरकाल

सर टोबी
Wed, 08/28/2019 - 10:47 नवीन
तितके त्याचा प्रत्यय येण्याचा लढा कठीण. येणार काळच ठरवेल कुणाचे प्रेम किंवा कुणाचा द्वेष दुराग्रही होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कोणत्याही देशाने दुसऱ्या

सुबोध खरे
Mon, 08/26/2019 - 19:37 नवीन
कोणत्याही देशाने दुसऱ्या देशाच्या नेत्याला सर्वोच्च पुरस्कार दिल्याने त्या नेत्याला फारसा फरक पडत नसतो. पण हा देश असा सर्वोच्च पुरस्कार देतो आहे म्हणजे वारा कोणत्या दिशेने वाहत आहे याचा हा वातकुक्कुट आहे असेच गुप्तनिती चे तज्ञ समजतात. बहारीन, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया यांनी असे पुरस्कार श्री मोदी याना दिले याचा अर्थ हे देश भारताच्या परराष्ट्र नीती शी एकसंघ (ALIGN) आहेत असे तात्पुरते तरी मानता येईल. सध्या कश्मीर चा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना याचे महत्त्व अनन्य साधारण आहे कारण पाकिस्तान तुमच्याशी युद्ध करू शकत नाही, आंतरराष्ट्रीय राजकारणात हे तेलाने श्रीमंत झालेले इस्लामिक देश त्यांना भीक घालत नाहीत तर इतर कुणी तसे करण्याची शक्यता सुतराम नाही. तेंव्हा पाकिस्तानची कोंडी करून आपला कार्यभाग साधण्यात मोदी सरकार सध्या तरी यशस्वी झालेले आहे असेच म्हणावे लागेल. उद्या हे देश तुम्हाला हवे तसे वागतील अशी अपेक्षा चूक आहे. शेवटी राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. उद्या पाकिस्तानने जर येमेन मध्ये आपले सैन्य सौदी अरेबिया च्या बाजूने ( हौदी बंडखोरांशी लढायला) पाठवले तर त्यांची वाऱ्याची दिशा बदलेल हे सत्य आहे. किंवा कतार आणि इराण विरुद्ध सौदी अरेबिया आणि बहारीन, संयुक्त अरब अमिराती या दोन गटांमध्ये पाकिस्तान जिथे वजन टाकेल( वजन शिल्लक असले तर) ते देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहू शकतील. त्यामुळे जोवर ऊन पडलंय तोवर आपले पीक वाळवून घ्या हीच वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments

अलिप्त राहणे हे इतके भयंकर आहे का?

रविकिरण फडके
Mon, 08/26/2019 - 20:13 नवीन
म्हात्रेसाहेब, तुम्ही लिहिता, "अनेकांना आपल्या देशाच्या पंतप्रधानांना दुसर्‍या देशाने पुरस्कार दिला याने आनंद झाला, तर काहींना, त्यामुळे भारताची जागतिक स्तरावर पत वाढली म्हणू न आनंद झाला... तर, इतर काहींना त्याबद्दल उदासिनता किंवा जळजळ वाटली." तर, ह्याव्यतिरिक्त अन्य काही genuine पर्याय असू शकत नाहीत का? जसे, कुतूहल (की नेमका कशासाठी हा पुरस्कार दिला गेला), त्याचे निकष काय आहेत, आणखी कुणाकुणाला हा पूर्वी दिला गेला, इ. डॉक्टर खरेंचा प्रतिसाद समर्पक आहे. तात्पुरत्या गोष्टींचा हर्ष-खेद किती मानायचा ह्यावर चर्चा करण्याजोगे काही नाही.
  • Log in or register to post comments

माझ्या अल्पमतीप्रमाणे काही

सुबोध खरे
Mon, 08/26/2019 - 21:05 नवीन
माझ्या अल्पमतीप्रमाणे काही लोक केवळ मोदीद्वेषातून आपले प्रतिसाद लिहीत असतात त्याला उद्देशून डॉक्टरांनी प्रतिसाद लिहिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके

आपली अल्पमती कितीही योग्य बोलत असली तरी...

जॉनविक्क
Mon, 08/26/2019 - 21:17 नवीन
मोदी द्वेष नसणारेही प्रतिसादात वाचून गोंधळू शकतात की त्याचे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तर, ह्याव्यतिरिक्त अन्य काही

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/26/2019 - 21:30 नवीन
तर, ह्याव्यतिरिक्त अन्य काही genuine पर्याय असू शकत नाहीत का? जसे, कुतूहल (की नेमका कशासाठी हा पुरस्कार दिला गेला), त्याचे निकष काय आहेत, आणखी कुणाकुणाला हा पूर्वी दिला गेला, इ. कुतुहल नक्कीच असू शकते. मात्र, ते शमवण्यासाठी त्याबद्दल जालावर पोत्याने माहिती आहे आणि मिपावर राजकारणावर टीप्पणी करणार्‍या कोणालाही ती सहजपणे उपलब्ध आहे. किंबहुना, उपरोधीक/तिरके प्रश्न करणार्‍यांना तर ती नीट माहित असतेही. किंबहुना, त्या पुरस्काराचे आंतरराष्ट्रिय महत्व मी लेखातच लिहिलेले आहे. पण, ती माहिती सोईस्कर नसल्यास, तिच्याकडे डोळेझाक करून, सहाजिकपणे, तिरके आणि/अथवा उपरोधी प्रश्न विचारले जातात. मानवस्वभाव ! असो. :) अजून थोडे... वर एका प्रतिसादात तुम्ही, criteria चा आग्रह अनावश्यक अप्रस्तुत व द्वेषमुलक राष्ट्रद्रोही प्रेरणेतुनआलेला आहे, ही मारवा यांची टीप्पणी खरीखरी व सरळ आहे असे मानून प्रतिसाद लिहिला आहे, हा तुमचा चांगूलपणा आहे. पण, त्या टीप्पणीच्या खालचा मजकूर आणि मारवा या आयडीच्या आतापर्यंतच्या लिखाणाचा कल पाहता, ते उपहासात्मक वाक्य होते, हे सहज ध्यानात येईल. ती टीप्पणी लिहून, मारवांनी सुरू केलेला वितंडवाद वाढविण्यात मला रस नव्हता, म्हणून तेथे काही लिहायचे हेतुपुर्रसर टाळले होते. आता, केवळ तुम्ही नावानिशी विचारणा केली आहे म्हणून इथे काही लिहिणे भाग पडले आहे, इतकेच... तिथला वितंडवाद इथे आणण्यासाठी हे लिहिलेले नाही. तुमच्या सर्वच प्रतिसांदांतील निरागस प्रश्नांबद्दल काहीच असहमती/आक्षेप नाही, हे वेगळे सांगायला नकोच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके

बाप रे!

रविकिरण फडके
Mon, 08/26/2019 - 21:44 नवीन
हे सगळं इतकं complex/ complicated आहे माहीत नव्हतं. निदर्शनाला आणून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, म्हात्रेसाहेब. मी फारच भोट आहे असं वाटतं मला! ह्यापुढे प्रतिसाद देताना जपून देईन. शक्यतो देणारच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मग, (विशेषतः काही) मिपाकरांना

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/26/2019 - 23:32 नवीन
मग, (विशेषतः काही) मिपाकरांना इतके 'हे' समजलात की काय ?! ;) =)) ह्यापुढे प्रतिसाद देताना जपून देईन. हे ठिक आहे, पण... शक्यतो देणारच नाही. असे मात्र अजिबात करू नका, मिपा आपलाच आसा, बेधडक लिवा ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके

रवीश कुमार ला मॅगसेसे

हरवलेला
Mon, 08/26/2019 - 23:45 नवीन
रवीश कुमार ला मॅगसेसे पुरस्कार मिळाल्यावर तुम्ही धागा काढला नाही पण मोदींना झाएद बहुमान मिळाल्यावर लगेच धागा काढलात. म्हणून तुमचं घर उन्हात बांधण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

खरं बोलणार्‍याचं घर, दोन्ही

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/28/2019 - 18:54 नवीन
खरं बोलणार्‍याचं घर, दोन्ही बाजूची माणसं, नेहमी उन्हातच बांधतात... त्यामुळे, समजायला लागल्यापासून आम्ही उन्हातल्या घरातच कायमची वस्ती करून आहोत... त्यामुळे, पर्वा इल्ले. =)) =)) किंबहुना, (उन्हातल्या आभासी घराची का होईना, पण) अजून एक रियल इस्टेट आमच्या नावावर झाल्याबद्दल आनंदच आहे. ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरवलेला

खो खो खो खो खो! जाम आवडला!

प्रकाश घाटपांडे
Wed, 08/28/2019 - 20:40 नवीन
खो खो खो खो खो! जाम आवडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

:)

हरवलेला
Wed, 08/28/2019 - 22:07 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मुस्लिम देशांना चांगल्या कार्याची पारख आहे

Rajesh188
Mon, 08/26/2019 - 21:21 नवीन
थोडे विचित्र वाटत आहे ना की मुस्लिम राष्ट्रांना चांगल्या कार्याची पारख . म्हणजे वाईट कार्य आणि चांगले कार्य ह्यातील फरक त्यांना समजत आहे . पण इतिहास काही वेगळेच सांगतो
  • Log in or register to post comments

आंतरराष्ट्रिय राजकारणात मित्र

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/26/2019 - 22:11 नवीन
यात विचित्र असे फारसे काही नाही. आंतरराष्ट्रिय राजकारणात मित्र बदलत राहतात, कायम राहतात ते आपल्या देशाचे हितसंबंध... आणि चांगल्या नेत्याने स्वतःच्या देशाचे (स्वतःचे किंवा स्वतःच्या पक्षाचे नव्हे) हितसंबंध सर्वतोपरी ठेवून वागणे अपेक्षित असते. जो नेता स्वार्थ सोडून असा खंबीरपणे वागतो, त्याची आणि त्याच्या देशाची पत आंतररष्ट्रिय स्तरावर वाढते. मोदींशी आणि भारताशी उघडपणे दोस्ती करण्यात हल्ली अनेक देश रस दाखवत आहेत, त्याचे हे कारण आहे. आजच्या बातम्या पाहिल्यात तर, मोदींनी ट्रंपबरोबरच्या पत्रकार परिषदेत, "भारत आणि पाकिस्तानामधील सर्व वाद द्विराष्ट्रिय वाद आहेत. त्यासाठी आम्ही इतर कोणा राष्ट्राला कष्ट देवू इच्छित नाही" असे सुनावले... या मुत्सद्दी भाषेचा साध्या सोप्या मराठीत अर्थ, "भारत-पाकिस्तान वादांत तुम्ही नाक खुपसू नका", असा होतो. ट्रंपने गेले काही आठवडे भारत-पाकिस्तान वादात, अगदी लोचटपणे, मध्यस्थाची भूमिका करण्याची इच्छा अनेकदा बोलून दाखवली होती. त्या पार्श्वभूमीवर हे वाक्य मोदींची "नो नॉनसेन्स निति" अधिकच ठळकपणे दाखवून देते. अशी हिम्मत पूर्वी भारत तर सोडाच पण इतर कोणत्या देशाच्या नेत्याने (यदाकदाचित् दाखवली असेल तर) अतीविरळपणेच दाखवली असेल. ही वस्तूस्थिती दुर्दैवाने अनेक भारतिय नेत्यांना आणि त्याच्या पाठिराख्यांना समजून घ्यावी असे वाटत नसले तरी, इतर राष्ट्रांच्या नेत्यांना बरोबर कळते आणि वळतेही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

हितसंबंध हा शब्द महत्वाचं आहे

Rajesh188
Mon, 08/26/2019 - 22:38 नवीन
हितसंबंध हा शब्द महत्वाचं आहे . आणि हित जपण्यासाठी खंबीर नेता लागतो तो डगमगत नाही विरोधी मताना . आणि असा खंबीर पना मोदी मध्ये आहे हे सर्व जाणतात त्या मुळे आपली पत जगात वाढली आहे हेच मला सुचवायचे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

पुरस्कार घेणाऱ्याचा फायद्याचा असतो की देणाऱ्यांच्या

Rajesh188
Mon, 08/26/2019 - 21:28 नवीन
राजकारणातील किड्यांनी मार्गदर्शन करावे
  • Log in or register to post comments

यावर मला काही व्यक्त करायची इच्छा होती

जॉनविक्क
Mon, 08/26/2019 - 22:09 नवीन
पण तुम्हाला किड्यांची अपेक्षा असल्याने आपला पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

किडे म्हणजे जाणकार

Rajesh188
Mon, 08/26/2019 - 22:19 नवीन
किडे म्हणजे जाणकार असा अर्थ आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

मोदींजीवर तोंडसुख घेणार्यांना

डँबिस००७
Mon, 08/26/2019 - 22:10 नवीन
मोदींजीवर तोंडसुख घेणार्यांना अजुन एक संधी !! फ्रांस मध्ये मोदीजींच स्वागत फ्रांसचे चांसलर मॅक्राॅंन यांनी घट्ट मिठी मारुन केल ते पहाण्या जोग होत ! त्यानंतर ट्रंप बरोबर झालेली मिटींग व त्यानंतरची प्रेस काॅंफेरेंस मध्ये मोदीजींचे ट्रंप बरोबरचे संबंध कसे आहेत हे सर्वांना दिसले !!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा