✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पासवर्ड

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Tue, 07/09/2019 - 15:52  ·  लेख
लेख
हर्षद हताशपणे आपल्या केबीन बसला होता... त्याचा कोंपिटीटर चिन्मय जोशी अत्यंत बुद्धिमान होता... चिन्मय ने त्याची साईट हॅक करुन पासवर्ड क्र्याक केला होता अन महत्वाची माहिति पळवली होति.. हर्षद चिन्मय चा पासवर्ड काढण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला जमत नव्हते.. * चिन्मय च्या बुद्धिमत्तेस तोडीस तोड असलेली एकच व्यक्ति ऑफिस मधे होति... मानसी पटवर्धन....मागे पण चिन्मय ने असा प्रकार केला असता मानसी ने तो हाणुन पाडला होता... * अचानक त्याच्या गळ्यात नाजुक बाहुंचा विळखा पडला.. ए.सी च्या थंड वातावरणात ही तो शहारला.. त्याच्या गालाचे नाजुक पणे चुंबन घेत मानसी म्हणाली... "का काळजी करतोस? मी आहे ना?" तु अडचणीत असताताना मी कशी शांत असेल??/ * मानसी ने बाजुची चेअर ओढली.व संगणकावर काम करु लागली..काहि मिनिटाच्या आत तिने हर्षद ला पासवर्ड काढुन दिला.. हर्षद ने पासवर्ड टाकुन फाईल्स उघडल्या..तो चकित झाला होता पासवर्ड बरोबर होता... * मानसी शी बोलायला तो चेअर कडे वळाला... मानसी नव्हती... हर्षद च्या डोळ्याला अश्रुंची धार लागली.. मानसिचा मृत्यु १० महिन्या पुर्वीच झालेला होता.. * तुमच्या वर निस्सिम प्रेम करणारी माणसे तुम्हाला अडचणीच्या वेळे कधीच एकटे पडु देत नाहित...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नाट्य
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
18809 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

==)) ==)) ==))

खिलजि
Tue, 07/09/2019 - 15:55 नवीन
गुरुदेव मीपण तुम्हाला कधीच एकटे पडू देणार नाही .. कामधंदे सोडून सदैव प्रतिसाद देण्यासाठी या मिसळपाववर येताच राहणार .. जय गुरुदेव
  • Log in or register to post comments

भोगा फळ

Rajesh188
Tue, 07/09/2019 - 16:02 नवीन
दुसरी कथा आली सुद्धा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

गुरुदेव एक रिक्वेस्ट हाय ..

खिलजि
Tue, 07/09/2019 - 16:00 नवीन
गुरुदेव एक रिक्वेस्ट हाय .. बघा जमतेय तर .. पुढच्या वागताला मसाला जरा दुपटीनं वाढून , मी तर म्हणतो चारपाच कथा एकत्र जुळवून पार आय माय , कोणाची कोण इथली जोडी तिथ/, तिथली इथं असं काहीतरी ऍंगल वेगळं करून टाका .. म्हणजे काय वाचकराजा त्यामधून सहजासहजी बाहेरच पडू शकला नाही पाहिजे .. माला वाटत हे तुम्ही आरामात कार्य शकाल पण टंकायचं सोडू नका .. आमहाला पाहिजे राव तुम्ही .. आम्ही मनापासून पिरेम करतो तुमच्यावर ..
  • Log in or register to post comments

गुरुदेव हे आम्हाला फळ भोगायला

खिलजि
Tue, 07/09/2019 - 16:08 नवीन
गुरुदेव हे आम्हाला फळ भोगायला लावतायत .. त्यांना अजून चारपाच फळे व्यनि करून टाका हि नम्र विनंती .. त्यांनी तुमच्या परमशिष्याना नाराज केलेले आहे .. गुरुदेव अजून दहाबारा बाराच्या भावात टंकूनच टाका .. मी म्हणतो होऊन जाऊन देत एकदाच महायुद्ध .. तिकडे पाऊस आणि इकडे आमच्या गुरुदेवांच्या कथा .. येऊन जाऊन देत पूर ,, वाहून देत सर्व वाचक मंडळी ..भरडून जाऊन देत त्यांच्या माझ्या सर्वांच्याच भांवना .. अश्रुंचे नाले , ओढे , वाहिले तरी चालतील पण हा अश्रुपात झाल्याशिवाय आता हे शमणार नाही .. गुरुदेव ,, उचला ती लेखणी पुन्हा एकदा ,, तोपर्यंन्त मी आई भवानीला , बारा नारळाचं तोरण बांधून येतो .. ते तोरण बांधून येईपर्यँत इथे किमान बारा कथा तरी पडल्याचं पाहिजेत .. जाई भवानी .. जाई शिवाजी
  • Log in or register to post comments

तुमच्यामुळे मिपाचे दुरावलेले

तेजस आठवले
Tue, 07/09/2019 - 16:14 नवीन
तुमच्यामुळे मिपाचे दुरावलेले वाचक मिपावर परत यायला लागलेत. हे तुमचं यश आहे. बाकी तुमच्या कथेत एखाद्याचा मुडदा जरी पडलेला असला तरी तो काहीतरी चावटपणा केल्याशिवाय राहत नाही असं दिसतंय. भुतं जिवंत माणसांच्या बाहूंना विळखा घालून चुंबनं घेतात हे माहित नव्हतं. एवढा अचानक तुमच्या प्रतिभेला कस्काय बहर आला म्हणतो मी. ऑ ?
  • Log in or register to post comments

:)

माहितगार
Wed, 07/10/2019 - 08:12 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले

भुतांनी मानेला विळखा घालायचा

विजुभाऊ
Wed, 07/10/2019 - 10:22 नवीन
भुतांनी मानेला विळखा घालायचा नाही तर मग कुणी. आणि दुसरे म्हणजे भुतांना ही भावना असतात की एक शंका "भूत; ओठ नसताना नुसत्या कवटीने आणि दातांच्या कवळीने चुंबन कसे घेतील ?" ईमेजीन करून पहातोय , पण काही जमत नाहिय्ये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले

एक शंका "भूत; ओठ नसताना

प्रसाद_१९८२
Fri, 07/12/2019 - 18:13 नवीन
एक शंका "भूत; ओठ नसताना नुसत्या कवटीने आणि दातांच्या कवळीने चुंबन कसे घेतील ?" -- 'डरना मना है' या चित्रपटात विवेक ऑबेरॉय, नाना पाटेकरला "भुत गायब होते है" याचे प्रात्यक्षिक दाखवतो, तसेच प्रात्यक्षिक धागा लेखकाने तुम्हाला दाखवावे, अशी तुमची इच्छा आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

उद्या चुंबनाचा वर्षाव असा

हस्तर
Fri, 07/12/2019 - 18:36 नवीन
उद्या चुंबनाचा वर्षाव असा शब्द दिसला tar.....तयाचे पण प्रात्यक्षिक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

सूड दुर्गे सूड ,, आबा जेवायला

खिलजि
Tue, 07/09/2019 - 16:17 नवीन
सूड दुर्गे सूड ,, आबा जेवायला जेवायला ,, असं काहीतरी आता कानावर पडू लागलंय .. हळूहळू मलापण कुणीतरी दूर दिसू लागलंय ..
  • Log in or register to post comments

@ तेजस आठवले ,, मी पूर्णतः

खिलजि
Tue, 07/09/2019 - 16:21 नवीन
@ तेजस आठवले ,, मी पूर्णतः सहमत आहे .. अक्कुकाकांचा मी तर पंखा आहेच पण त्यांच्या या प्रतिसाद ना देण्याच्या भूमिकेचं विशेष कौतुक वाटतं. फार छान वाटतं , इतकं कि कुठेही बाहेर जाऊन फ्रेश व्हायची गरजच नाही .. तुम्हाला माहित आहे , तुम्ही एखाद्याला भरपूर ट्रॉल करताय आणि तरीही तो तुम्हाला काहीच उलटून बोलत नाही , तेव्हा हळूच कुठेतरी तो तुम्हाला जवळच वाटू लागतो .. गुरुदेवांच्या बाबतीत मला हेच वाटते .. ते आता आपले एकदम खास आहेत ..
  • Log in or register to post comments

अग्रीड.

तेजस आठवले
Tue, 07/09/2019 - 16:28 नवीन
अग्रीड.
  • Log in or register to post comments

और आनेदो....

गड्डा झब्बू
Tue, 07/09/2019 - 16:28 नवीन
और आनेदो....
  • Log in or register to post comments

च्यायला....

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 07/09/2019 - 16:38 नवीन
साला आज सकाळी उठल्यावर कोणाचे थोबाड पाहिले होते? आठवलं की त्या माणसाचे थोबाड फोडणार.... घरी गेल्यावर. काळतोंड्या परत सकाळी सकाळी समोर आला नाही पाहिजे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

==)) ==)) ==))

खिलजि
Tue, 07/09/2019 - 16:43 नवीन
ह्हि ह्हि ह्हि
  • Log in or register to post comments

मुतपीठ वरील दर्जेदार लिखाणाची

प्रलयनाथ गेंडा…
Tue, 07/09/2019 - 16:45 नवीन
मुतपीठ वरील दर्जेदार लिखाणाची आठवण करून देणारी लेखनमालिका, अकु नी सुरु केल्याबद्दल ... त्यांना "मुतपीठाचार्य" हा खिताब देण्यात यावा ... सन्मानार्थ एक लुना , एक मांजराचे पिल्लु , व एक पातळ शाल ... आणि हाम्रिका वारीचे एक तिकीट देण्यात यावे ....
  • Log in or register to post comments

छया फक्त एक हलकं चुंबन ?

जॉनविक्क
Tue, 07/09/2019 - 18:06 नवीन
वर्षाव करायला पाहिजे होता वर्षाव. अकुसेठ आता तुमच्यावर दर्जा राखायची फाट मोती जबाबदारी आहे, असे आपल्या चाहत्यांना निराश करू नका. पुढचा लोकात हि उणीव भरून कांदा.
  • Log in or register to post comments

मला वाटतं , गुरुदेवांची

खिलजि
Tue, 07/09/2019 - 18:49 नवीन
मला वाटतं , गुरुदेवांची कार्यशाळा हे नवीन सदर दाखल करायला काहीच हरकत नसावी ..
  • Log in or register to post comments

प्रत्येक जण त्याची

रिम झिम
Tue, 07/09/2019 - 18:58 नवीन
प्रत्येक जण त्याची महत्वाची माहिती साईट वर ठेवतो हे माहित नव्हते. तुमची साईट सांगा ना, मी पण हॅक करून तुमच्या कथा पळवतो. कशी वाटली आयडिया ?
  • Log in or register to post comments

मस्त कथा.

प्रसाद_१९८२
Tue, 07/09/2019 - 19:45 नवीन
छान आहे कथा. लांबी-रुंदीला थोडी कमी आहे, विस्तार करता आला तर पाहा कथेचा. --- 'पासवर्ड २' च्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

मिपा ज्ञानपिठ पुरस्कार चालू

प्रमोद पानसे
Tue, 07/09/2019 - 19:53 नवीन
मिपा ज्ञानपिठ पुरस्कार चालू करा .
  • Log in or register to post comments

अरे, यांचा पासवर्ड हॅक करा रे

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/09/2019 - 20:40 नवीन
अरे, यांचा पासवर्ड हॅक करा रे कोणीतरी ! =)) =)) =))
  • Log in or register to post comments

कथेतूनच उपाय मिळवा ना

अभ्या..
Tue, 07/09/2019 - 20:46 नवीन
त्यापेक्षा तुम्हीच तुमच्यावर निस्सिम प्रेम करणारं कुणीतरी हुडका. ;) जरा खुर्चीवर चिंताग्रस्त वगैरे टाईपमध्ये बसा. एका बाहुपाशाच्या विळख्यासोबत मिळेल पासवर्ड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

शकयतो भिन्न लिंगी शोधा

हस्तर
Wed, 07/10/2019 - 13:34 नवीन
शकयतो भिन्न लिंगी शोधा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

जबरदस्त विनोदी लेखक आहेत

ट्रम्प
Tue, 07/09/2019 - 21:30 नवीन
जबरदस्त विनोदी लेखक आहेत अक्कू आणि तेव्हडेच निगरगट्ट . धागाकर्ता कुलकर्णी नाव वापरतोय !!! सगळ्या कथा मध्ये जोशी , सोमण , तेंडुलकर , प्रभुणे फक्त हिच नावे वापरली जात आहेत आणि मध्येच एक आंतरजातीय विवाह !!!! हे सगळे योगायोग समजायचे ? का कुठली तरी नस दुखवल्या मुळे !!!!!!! आणि एका ही प्रतिसादाला उत्तर न देण्याची हातोटी वाखाणण्या जोगी :) :)
  • Log in or register to post comments

कहर आहे.

इरामयी
Tue, 07/09/2019 - 22:03 नवीन
कहर आहे.
  • Log in or register to post comments

क्रमशः..

प्रियाभि..
Wed, 07/10/2019 - 01:25 नवीन
  • Log in or register to post comments

अकुकाका

प्रियाभि..
Wed, 07/10/2019 - 01:52 नवीन
चोरी झालेली माहिती हर्षदने चिन्मयची साईट हॅक करून त्याच्या कॉम्प्युटरमधून पुन्हा चोरली व आपल्या कॉम्प्युटरमध्ये आणून ठेवली असच ना आकुकाका? प्रकाश टाकावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाभि..

क्रमशः..

प्रियाभि..
Wed, 07/10/2019 - 01:26 नवीन
  • Log in or register to post comments

क्रमशः..

प्रियाभि..
Wed, 07/10/2019 - 01:27 नवीन
  • Log in or register to post comments

क्रमश

प्रियाभि..
Wed, 07/10/2019 - 01:28 नवीन
  • Log in or register to post comments

सुवर्णसंधी वाया दवडल्याचा निषेध

गामा पैलवान
Wed, 07/10/2019 - 01:39 नवीन
अकुकाका, अहो काय हे! शोभतं का तुम्हांस! एव्हढी सुवर्णसंधी चक्क फुकट घालवलीत. मानसीचा मृत्यू दहा महिन्यांपूर्वी झाला होता ना. मग ती आल्यावर लगेच वर्षश्राद्ध उरकून घ्यायचं होतं की. जेवायला वेगळे ब्राह्मण बोलवायला नकोत. डायरेक्ट मयतालाच जेवायला घालायची नामी संधी आली होती. वाया दवडलीत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

काण्टराष्ट मस्त जमला असता ....

गामा पैलवान
Wed, 07/10/2019 - 12:40 नवीन
नाय म्हंजे त्याचं असंय की, पहिल्या वेळेस मानसीने ह्याकिंगचा प्रयत्न हाणून पाडल्यावर हर्षदने तिला पौर्णिमेच्या चांदण्या राती क्यांडल्लायटीच्या डिनरास नेलं असेल ना? मग या खेपेस थेट भूतबंगल्यात तिच्याच श्राद्धाच्या भोजनास नेल्याचं दाखवता आलं असतं. फुल्टू मस्तपैकी काण्टराष्ट जमून आला असता. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

थोड्यावेळाने चिन्मय ला आठवले

हस्तर
Wed, 07/10/2019 - 13:32 नवीन
थोड्यावेळाने चिन्मय ला आठवले कि तो पण जिवंत नाही ,हर्षद चा खून केल्या प्रकरणी फाशी दिली होती
  • Log in or register to post comments

नंतर आठवले कि ते मुन्सिपालटी

हस्तर
Wed, 07/10/2019 - 13:33 नवीन
नंतर आठवले कि ते मुन्सिपालटी मध्ये काम करतात ,तिकडे कॉम्प्टर पण नाही
  • Log in or register to post comments

शेवटी लक्षात आले कि अकु काका

हस्तर
Wed, 07/10/2019 - 13:33 नवीन
शेवटी लक्षात आले कि अकु काका ना मिसळपाव वरून बॅन करून १० वर्षे झाली
  • Log in or register to post comments

एक शंका

सर्वसाक्षी
Wed, 07/10/2019 - 14:15 नवीन
<<तुमच्या वर निस्सिम प्रेम करणारी माणसे तुम्हाला अडचणीच्या वेळे कधीच एकटे पडु देत नाहित>> मग जाताना मानसी हर्षदला बरोबर घेऊन का नाही गेली?
  • Log in or register to post comments

चुंबन करून पॉट भरले

हस्तर
Wed, 07/10/2019 - 14:28 नवीन
चुंबन करून पॉट भरले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

१४ बाकी

सर्वसाक्षी
Wed, 07/10/2019 - 14:16 नवीन
कालच्या लेखनास ५० प्रतिसाद होते, आता हा धरून ३६ झाले.
  • Log in or register to post comments

काका..

चिगो
Fri, 07/12/2019 - 14:43 नवीन
काका, अहो तुमच्या 'चिन्मय'प्रेमापोटी मला नाव बदलायची वेळ येईल आता.. ह्या चिन्मयवर दया करा थोडी..
  • Log in or register to post comments

नाव बदलून हर्षद करा

हस्तर
Fri, 07/12/2019 - 17:49 नवीन
नाव बदलून हर्षद करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा