Skip to main content

[शशक' १९] - आठवणीतली ती

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 20/02/2019 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
तिचं कुणाशीच जास्त पटायचं नाही, पण पहिल्याच नजरेत आमच्या दोघांची गट्टी जमली. मी लिहीत असताना ती मला खिडकीतून पाहायची. मी काय लिहितोय याची तिला खूप उत्सुकता असायची. मला उशीर झाला की तिचे डोळे दरवाजाकडे लागलेले असायचे. कॉलेजला गेल्यावर मात्र आमचं भेटणं आणि लहानपणीचा खेळकरपणा कमी होत गेला. पण नात्यातली ओढ मात्र अगदी निरागस, पहिल्या भेटीसारखी. पावसाळ्याचे दिवस. अंधारून आलेलं. सहज खिडकीबाहेर लक्ष गेलं, नजरानजर झाली. पण का कुणास ठाऊक, ती निघून गेली, परत कधीही न दिसण्यासाठी. आजही खिडकीतून बाहेर पाहताना ती शेवटची नजरभेट डोळ्यासमोरून तरळून जाते. आणि चिखलात उमटलेली तिची इवलीशी पावलं आणि म्याऊ म्याऊ प्रतिसाद मनातल्या पावसात विरघळून जातात.

वाचने 6699
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

:)

वा! +१

छान,वयाबरोबर निरगसता संपते हेच खरे

खूप म्हणजे खूप आवडली

+1

+१

आवडली

+१

+१

+१ -दिलीप बिरुटे

+१

हा हा

+१