मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शृंगार

लग्नगीतः पतीची ग वाट पाही, मंडपी सजली नवरी

पाषाणभेद ·
काव्यरस
लग्नगीतः पतीची ग वाट पाही, मंडपी सजली नवरी
पतीची ग वाट पाही, मंडपी सजली नवरी येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||धृ|| हिरवा शालू तूला सासू आणील ग शालूत तू खुलून दिसशील ग शालूसंगे आणायला सांग पैठणी भरजरी कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||१|| पाटल्या बांगड्या तूला सासरा आणील ग गळा कोल्हापुरी साज तुला करील ग वाकेसरी आणायला सांग साजा बरोबरी कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||२|| अनवट

कशी दिसते दिसते लाडाची लाडी तुमची

पाषाणभेद ·
काव्यरस
कशी दिसते दिसते लाडाची लाडी तुमची
मी नेसली नेसली, साडी अंजीरी ग रंगाची कशी दिसते दिसते, लाडाची लाडी तुमची ||धृ|| गजरा माळला माळला, शेवंती फुलांचा डोई घेतला घेतला, पदर लाल बुट्टीचा भांगी भरलं भरलं, कुंकू सवाष्णीचं आहे मौलीक मौलीक, माझं कपाळीचं लेणं नको नजर लागो या वैभवाला कुणाची कशी दिसते सांगा लाडाची लाडी तुमची ||१|| गळा घातला घातला, चंद्रहार सोन्याचा मंगळसुत्र मिरवीते मिरवीते, ऐवज धन्याचा कानात घातले घातले, कर्णफुले झोकाची

तुझं माझं घर...

जयवी ·
लेखनविषय:
काव्यरस
तुझं माझं घर...एक झोका कधी निळ्याशा ढगांत, कधी पाचूच्या बनात. तुझं माझं घर.... एक फुलबाग कधी प्राजक्ती सडा कधी धुंद केवडा. तुझं माझं घर ... एक चांदणं कधी टिपूर टिपूर कधी गंधाळ आतूर. तुझं माझं घर... एक पाऊस कधी झिम्माड झिम्माड कधी कोसळ द्वाड. तुझं माझं घर.... एक मैफिल कधी तुझिया सुरात कधी माझिया तालात. तुझं माझं घर ... एक देव्हारा शांत समई प्रकाश पराकोटीचा विश्वास जयश्री अंबासकर

युगलगीतः मी सिता अन तुमी माझं राम

पाषाणभेद ·
काव्यरस
युगलगीतः मी सिता अन तुमी माझं राम
हिरो: तुझ्या डोईचे केस हाय लांब लांब लांब तुझ्या डोईचे केस हाय लांब तू कोनाची प्वार हाय सांग सांग सांग तू कोनाची प्वार हाय सांग ||१|| हिरोईन: तू वांड पोरगा या गावचा, जा रे तू लांब लांब लांब वांड पोरगा गावचा, जा रे तू लांब माझ्या बापाच्या नावाशी काय तुझं काम काम काम माझ्या बापाच्या नावाशी काय काम ||२|| हिरो: तरणी ताठी पोर चालली, ठुमकत तू रस्त्यानं पाहून जीव झाला खुळा, तुझ्या अशा चा

नाट्यगीतः सोडा हातातल्या हाता नाथा आता

पाषाणभेद ·
काव्यरस
नाट्यगीतः सोडा हातातल्या हाता नाथा आता
सोडा हातातल्या हाता नाथा आता हातातल्या हाता अहो सोडा हातातल्या हाता नाथा हातातल्या हाता ||धृ|| मनाचीये गुंत्यामधे होssओssहोssओ मनाचीये गुंत्यामधे नका अडकू आता नाथा सोडा हातातल्या हाता ||१|| आले जरी दुरवरूनी आssआssआssआss आले जरी मोहीम करूनी का बळेची ओढता नाथा आता सोडा हातातल्या हाता ||२|| सासू सासरे दिर जावा हंssअंssअंssअंss सासू सासरे दिर जावा बोल बोलतील असे एकांती पाहता नाथा आता नका....नका सोडा हातातल्या ह

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

इंटरनेटस्नेही ·
नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ.

तू येतोस ...

ढब्बू पैसा ·
लेखनविषय:
काव्यरस
नमस्कार मंडळी, मिपावर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न! गेलं एक वर्ष खूप वाचलंय इथे. लिहिण्याचं धाडस मात्र आज पहिल्यांदाच करतेय. थोडी धाकधुक आहेच. जे लिहिलंय त्याला कविता किंवा मुक्तक काय म्हणायचं हे मलाही ठरवता येत नाही. ह्या कवितेला मला सुचली होती ती "इश्किया" चित्रपटानंतर.

होईल कधी गे भेट ?

स्वानंद मारुलकर ·
काव्यरस
होईल कधी गे भेट ? कासावीस हा प्राण कधीचा कंठाशी ये थेट ओझरते मी तुला पाहिले थार्‍यावरचे चित्त उडाले मनोरथांचे चढले इमले क्षणात स्वप्ने किती पाहिली कितीक रचले बेत ओठांवरती शब्द न येती मनात पण पाझरते प्रीति परतून जेव्हा पडेल गाठी नकोस लाजू दे डोळ्यांनी एकतरी संकेत एकच आशा येशील गे तू जुळतील धागे जुळतील हेतू केव्हा होईल भेट परंतू अधीर आतुर ह्रदय बिचारे तुझीच चाहूल घेत -स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com/

आभाळ लागले मिळू

स्वानंद मारुलकर ·
लेखनविषय:
काव्यरस
आता कुठे उजाडले आभाळ लागले मिळू सविता प्रकाश लागला या चांदण्यात विरघळू वेडेपणा सुखावला मी पाहिले जधी तुला तव चोरटा कटाक्ष गे मग लागला जिवा छळू येशील भेटण्यास तू जेव्हा पुन्हा मला प्रिये प्राणात माळ केवडा दोघे मिठीत दरवळू ना सांगता कधी तुला ना बोलता कधी मला माझे तुला तुझे मला मनमीत लागले कळू नाही कुठे उणेपणा संसारवेल मोहरे एकेक स्वप्न साजिरे साकारते हळूहळू -स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com/