मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेख

कोकणातले `केरळ'...

दिनेश५७ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मुंबईहून गोव्याकडे जाताना, संगमेश्वर ओलांडले, की एक मोठ्ठे वळण पार केल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला `ओझरखोल' नावाचे गाव दिसते. टेकडीएवढ्या हिरव्यागार डोंगरावर, शाळेची एक बैठी इमारत आणि झाडांमध्ये लपलेली कौलारू, केंबळी घरे, उजवीकडे एक रोडावलेली खाडी आणि लहानसा डांबरी रस्ता... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कै. माधवराव मुळ्ये यांचं हे गाव. इथल्या प्राथमिक शाळेला, माधवरावांचं नाव दिल्यामुळे अनेकांना हे माहीत झालंय. संगमेश्वरच्या अलीकडे गोळवलकर गुरुजींचं गोळवली, आणि पलीकडे माधवराव मुळ्यांचं ओझरखोल...

राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - तंत्राचा जाहीर निषेध

शशिकांत ओक ·
राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - यज्ञ तंत्राचा जाहीर निषेध मिठाच्या आहूतींनी वरुण देवरायाला आळवण्याच्या हास्यास्पद प्रकाराला प्रतिबंध करावा.
आज (दि ११ मे २०१०) राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त दै. सकाळ पेपरमधे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी वरुण यंत्राचा वापर हा लेख पान १ व११ वाचून...
मित्र हो, ही आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची क्रूर चेष्टा तर नाहीना असे विचारावेसे वाटू लागले. बिरबल-अकबराच्या गोष्टीतील 'खिचडी पकाने के लिए' अती दूर ठेवलेली चूल काही कामाची नाही.

निसर्गाचा हिशोब

अरुंधती ·
लेखनप्रकार
आज वाळ्याच्या पडद्यांना पाणी घालताना सहज खिडकीतून बाहेर पाहिले. शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झाले होते. खिडकीच्या खाली, वळचणीच्या जागी पारव्याच्या मादीने दोन अंडी घातली होती. म्हणूनच आज सकाळपासून त्यांची खिडकीपाशी लगबग चालली होती तर! एवढे दिवस त्यांना रोज खिडकीपासून हुसकावून लावता लावता मीच जिकिरीला आले होते. त्यांचे ते खर्जातले घुमणे, पंखांची फडफड आणि खिडकीत केलेली घाण ह्यांपेक्षाही मला त्यांना तिथे आपला संसार थाटू द्यायचा नव्हता.

चेतन भगतला अनावृत्त पत्र

विनायक पाचलग ·
लेखनप्रकार
नमस्कार, आज ६ महिन्यानी पुन्हा मिसळपाव वर येत आहे , ऑक्टोबरमध्ये अभ्यास आणि इतर कारणांसाठी मिपाचा रामराम घेत असताना परिक्षा झाल्यावर परतायचे हे ठरले होतेच.त्यानुसार आज परत येत आहे. मधल्या काळात अनेक घटना घडल्या. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या ,अनुभव घेता आले. या सार्‍यानी समृद्ध होऊन आज पुन्हा आलेलो आहे. आपले माझ्यावर प्रेम आहेच ,ते तसेच रहावे ही मनापासुन विनंती... याच काळात साप्ताहिक साधना मध्ये मी एक लेख लिहिला होता, त्यावर तुमचे मत जाणुन घ्यायला मी उत्सुक आहे , म्हणुन हाच लेख आज इथे देत आहे..

"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"

डावखुरा ·
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल." कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे.

आईपणाचा उदोउदो

डॉ.श्रीराम दिवटे ·
लेखनविषय:
मे मासाचा दुसरा रविवार आला की आम्हां लेकरांच्या पोटात मायेचा गोळा उठून आम्ही आई आई करीत टाहो फोडतो. जगभर मदर्स डे साजरा होत असतो अन् आम्ही भारतीय कार्टे आईचा उदो उदो करून घेतो... मातेविना सृष्टी नाही, ममतेबिगर दृष्टी नाही हे खरे असले तरी अपत्यप्रेमाची वृष्टी कशी करायची तिचे तीच जाणे. आमच्या बापाला ते जमलं तर नाहीच, आम्ही बाप झाल्यावर आम्हालाही जमत नाही. रडणारं पोट्टं आम्ही डोईवर घेऊन गावभर फिरवलं तरी शांत होत नाही. परंतु 'ओ रे बाळा' अशी मंजुळ वात्सल्यमयी मातृसाद कानी पडली की बाळोबा तिच्याकडे झेप घेऊन खिदळणार हे जन्मापासून ठरलेले.

हबल- २० वर्षांची यशोगाथा!

Nile ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बरोबर चारशे वर्षांपुर्वी, म्हणजे १६१० मध्ये 'गॅलीलीओ गॅलीलीने' प्रथम त्या निळ्या आकाशात काय आहे हे बघण्याकरता दुर्बिण आकाशाकडे रोखली. तेव्हा आकाश म्हणजे स्वर्ग अशी मानवाची कल्पना होती. इंग्रजीतील 'हेवन' हा शब्दाचा उगम,अर्थच आकाशाशी(sky) संबंधीत आहे. कदाचित या 'स्वर्गाच्या ओढीनेच' मानवाला आकाशात डोकावायची इच्छा झाली असेल का? काही का असेना, या 'दुर्बिण परंपरेमुळे' जितके अवकाश मानवाला आजवर दिसले आहे त्यावरुन अवकाशाला 'स्वर्गीय' हे विषेशण मात्र अगदी चपखल बसावे!

दंतविहीनांचे दाताळ अनुभव

अरुंधती ·
लेखनविषय:
(खालील लेख मी बर्‍याच महिन्यांपूर्वी माझ्या ब्लॉगवर प्रकाशित केला होता. आज मिपाकरांसाठी इथे देत आहे. प्रस्तुत लेखात कोणाची खिल्ली, थट्टा उडवण्याचा मानस नसून आयुष्यातील एका अटळ सत्याकडे विनोदी चष्म्यातून बघण्याचा प्रयत्न केला आहे! :D ) आयुष्यात मला आजवर तोंडाचे बोळके असणाऱ्या माणसांविषयी कौतुक वाटत आले आहे. किती छान दिसतात ते! परंतु मला त्यांच्याकडे बघून गालातल्या गालात हसताना पाहून कोणालाही ही गोष्ट खरी वाटत नाही त्याला काय करावे?

पुस्तकविश्व.कॉम -वापराकरिता खुले.

नीलकांत ·
लेखनप्रकार
नमस्कार, सर्वप्रथम महाराष्ट्रादिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व मराठी रसिकांना कळविण्यास आनंद होतो की, मराठी नववर्षारंभाच्या मुहुर्तावर पुस्तकविश्व ह्या प्रकल्पाची (www.pustakvishwa.com) जी घोषणा करण्यात आली होती तो प्रकल्प आज १ मे २०१० रोजी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधुन पुर्णत्वास आला आहे. आजपासुन पुस्तकविश्व.कॉम (www.pustakvishwa.com) हे संकेतस्थळ वापरकर्त्यांसाठी खुले करण्यात येत आहे. पुस्तकविश्व.कॉम येथे आपण वाचलेल्या, आवडी-नावडीच्या पुस्तकांबद्दल परिचय, परीक्षण लिहु शकता. मराठी माणसाला चर्चा करणे फार आवडीचे!