असाच फिर॑तोय आज स्वतःचा शोध घेत.
कुठे निघालो होतो आणि कुठे पोहोचलोय याचा अंदाज घेतोय
जुने नकाशे किती वेळा बदलले ,
त्यातल्या बदलेल्या खजिन्यांच्या जागा,
यांचा हिषेब लावतोय.
कैफात उधळलेले क्षण मोजतोय
त्यापायी गमावलेले आणि मिळवलेले
यांची बेरीज वजाबाकी करतोय
हिशोब कुठेतरी चुकतोय.
वजाबाकी बरोबर येतेय.
पण जमेची बाजू जास्त का येतेय.
अर्र आत्ता आठवले....
मी तुझ्या आठवणींसोबत घालवलेले क्षण विचारतच घेतले नाहीत.
..............विजुभाऊ