Skip to main content

राहती जागा

घरांचे ढिगारे...

लेखक सुहास झेले यांनी गुरुवार, 06/08/2015 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
एक अभूतपूर्व स्वप्ननगरी म्हणजे आपली मुंबई. दररोज आपल्या कामासाठी ह्या स्वप्ननगरीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लाखो मुंबईकर घड्याळाच्या काट्यासोबत धावत असतात. भले मग तो कुठल्या मोठ्या हायफाय एमएनसीमध्ये काम करणारा असो, किंवा साधे वेठबिगारी करून पोट भरणारा असो कोणी थांबत नाही. सगळे सतत धावत असतात.. कधी एकत्र ...कधी एकटे, तुम्ही थांबलात की संपलात.. बस्स !! प्रत्येकाची गरज वेगळी, आकांक्षा वेगळ्या, पण त्यात एक समान धागा म्हणजे "मुंबईत स्वतःचे हक्काचे घर"
मुंबईत तुम्ही कधीही उपाशी राहणार नाही, पण तुम्हाला हक्काचे छप्पर सहजासहजी मिळेल याची हमी कोणीही देऊ शकणार नाही...

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखक एस यांनी मंगळवार, 04/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

खाडीतली खारफुटी दुनिया १

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 23/07/2015 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
खाडीतल्या खारफुटीच्या जंगलात गेलो होतो. एवढी वर्षं ती खाडी दोन लांबलचक पायवाटा घेऊन माझी वाट पाहात बसली होती. त्यातल्या एका वाटेवरून लहान असताना मित्रांसोबत एकदोनदा जाऊन आलो होतो. तिथे लोक सायकली घेऊन जाताना मला दिसायचे. मलाही घेऊन जायची होती. एकदा गेलो घेऊन, एकटाच. पण माझं रस्त्यांचं ज्ञान अगाध असल्यानं मी ती वाटच शोधू शकलो नाही. कुठेतरी खडी साठवलेली दिसली. एका ठिकाणी अमूक एका भूखंडाची जागा खाजगी मालमत्ता असल्याचं सांगणारा बोर्ड दिसला. असं वाटलं, की कदाचित गेली ती जागा कोणत्यातरी बिल्डराच्या घशात. मग फिरकलोच नाही इतक्या वर्षांत. आणि आता गेलो. इतक्या वर्षांनी. दुस-या वाटेने.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

ठाणे पोपट कट्टा - न पाहिलेले पक्षी

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 26/05/2015 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ नी पुढाकार घेतला आणि मिपाकरांचे पाय रविवारी घराला लागले. सुरुवातीला बाणाने आणि डॉ नी कॅमेरे सरसावले व थोडे फोटो काढले, पण मग नकळ गप्पांचा फड रंगला आणि सगळे आसनस्थ झाली, आखाड्यात आले. खरेतर आधी घरातून दिसणारे पक्षी पाहायचे, मग खाली उतरुन मागच्या पिंपळावरचे, पलिकडच्या झाडीतले व बागेतल्या दाट झाडांमधले पक्षी पाहायचे असा बेत होता. पण मैफल अशी जमली की लोकांची निघायची वेळ झाली. पुढचा कट्टा कधी जमतोय ते पाहु. तोपर्यंत मी घरुन टिपलेली पक्षांची ही काही चित्रे बी ईटर - मराठी नाव शोधले पण प्रचलित मराठी नाव समजले नाही, माहितगारांनी सांगावे.

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 03/05/2015 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

अ‍ॅलीना रोमरः मराठी विषयाची विद्यार्थिनी

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 27/04/2015 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्ते, माझे नाव अ‍ॅलीना रोमर आहे. मी नॉर्वेची नागरीक आहे. मी पुन्यात शिकते. मी पुने युनिवर्ससिटी मदे मराठी सब्जेक्टमदे बीए करते आहे. मला मराठी खुप खुप आवडते. मी रोज युनिवर्ससिटी मदे जाते. मला माझे कॉलेज खुप आवडते. मी माझ्या घरमालकांकडे पेईंगगेस्ट आहे. मी कोथरूडला राहते. मी दररोज पायी चालत कॉलेजला जाते. चालत जातांना मला नागरीक दिसतात. दुकानदार दिसतात. रिक्षा दिसतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते. यामुळे मला दररोज नविन गोष्टी समजतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते. यावेळी मला भारतातले नागरीक दिसतात.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

पुण्यनगरी !

लेखक चिनार यांनी गुरुवार, 12/03/2015 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात नवीन होतो तेंव्हाची गोष्ट. मित्रासोबत कोथरूड डेपोपासून चांदणी चौकात जायचे होते. एका गृहस्थाला रस्ता विचारला. ते चांदणी चौकाकडे बोट दाखवून म्हणाले," तुम्ही इथून खाली जा." समोरचा रस्ता बघून मित्राने अतिशय निरागसपणे विचारले, "मामा, रस्ता तर वर चाललाय हो ! खाली कसं जायचं?" ते गृहस्थ चिडून म्हणाले," मला मामा बनवू नको. जायचं असेल तर जा मुकाट्याने" आम्हा दोघांनाही कळत नव्हतं की नेमकं काय चुकलं. प्रश्न की नातं ? काही दिवसांनी आमच्या रूमवर स्वयंपाक करायला येणाऱ्या 'मावशी' जरा उशीरा आल्या.

आजोळच्या गोष्टी – ३

लेखक गुळाचा गणपती यांनी मंगळवार, 06/01/2015 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
आजोळच्या गोष्टी – ३ औदुंबरला दत्त मंदिराशेजारूनच संथ वाहते कृष्णामाई. नदीच्या पलीकडे भुवनेश्वरी देवीचे सुंदर मंदिर आहे. काठाला नारळाची जांभळाची झाडे एका रांगेत होती. एकदा आईने माझ्या मामाला मला पोहायला शिकवायची जबाबदारी दिली आणि माझा पोहणे शिकण्याचा उपक्रम पुढे अनेक वर्षे चालला. माझा एक मामा अगदी पट्टीचा पोहणारा. पुरात उडी टाकून भोवरा हाताने फोडणे वगेरे धाडसी प्रकार सहज करी. मी त्याला घाबरून असायचो अगदी. मी २-३ वर्षाचा असताना माझे बुडता बुडता वाचण्याचे सोपस्कार झाले होते. मामाने अगदी मजेत सांगून टाकले आईला कि "छाया, काळजी नको. आता हे काम माझ्याकडे लागले".