॥ एस.टी., एक आठवण..॥
'माजलगाव पुरुषोत्तमपुरी,
'माजलगाव पुरुषोत्तमपुरी,गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक ६वर लागली आहे.माजलगाव पुरुषोत्तमपुरी,गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक ६वर लागली आहे.माजलगाव पुरुषोत्तमपुरी.'
बसस्टॅन्डच्या मधोमध असलेल्या जाळीच्या खोकेवजा खोलीतल्या स्पिकरवरून,खाकी कपड्यातल्या
कंट्रोलर नामे इसमाने केलेली घोषणा,ऐकली की तिथल्या सिमेंटच्या बाकांपैकी काही बाकांवर बसून कंटाळलेल्या,आणि इकडे तिकडे हिंडणा-या बाया,बाप्ये,तरणे,म्हातारे,अंगात चैतन्य आल्यासारखे,एकदम उठून आपापल्या पिशव्या,बॅगा,बोचकी घेवून,त्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने धावायला लागत.त्यात कुणाचा तरी नवरा,पोरगा,भाऊ,बाप,कुठेतरी रसवंतीत ,ह