मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

माझ्या देशात राहणाऱ्या बाबास ..!!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
किती वर्षे झाली मी इथे परदेशात येऊन बसलो आहे बाबा देश सोडून येण इतकं सोपं असतं का बाबा ?-- आपल्या मातीचा वास आपल्या घराचा सहवास गणपतीची आरास हनुमानजयंतीला भल्या पाहटे उठून केलेली आरती नि ते गुळखोबरे …..

मरण्यात अर्थ नाही

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
काव्यरस
मरण्यात अर्थ नाही . संवेदनेत आता, जगण्यात अर्थ नाही जाळून या मनाला, सजण्यात अर्थ नाही आहे दिले तुला मी, आयुष्य दान माझे आता वळून मागे, बघण्यात अर्थ नाही ते भाग्यवंत थोडे, शिखरास गाठती जे आता पुढेच जावे, हटण्यात अर्थ नाही ही खिंड राखताना, मृत्यूसवे लढावे जखमांस घाबरोनी, पळण्यात अर्थ नाही हो अभय एकदाचा, निश्चिंत निश्चयाने ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात अर्थ नाही गंगाधर मुटे .....................................................

मौनाचं वादळ

जयवी ·
लेखनविषय:
काव्यरस
काहीतरी खुपतंय, सलतंय आत कुठंतरी खोलवर दुखतंय आज उगाच गहिवर, आवंढा घशात कोंडलेला श्वास, सैरभैर मनात मन कसं पिसं झालंय आज कुठतरी खोलवर दुखतंय आज पापण्यांची होते झालर ओली रडवेली होते देहाची बोली कबुली कशाची द्यावी आज कुठतरी खोलवर दुखतंय आज सयींचं व्याकुळ, आठव मोहळ उरात कल्लोळ, मौनाचं वादळ कोरडा श्रावण, भिजवे आज कुठतरी खोलवर दुखतंय आज जयश्री अंबासकर

कत्तलखाना !!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
!जनावरांचे कळप चालत असतात कत्तलखान्याकडे हाडांचे जणू सापळे सरकत असतात ह्या कत्तलखान्याकडे लवथवते विक्राळपण ह्यांच्या डोळ्यातून पाझरत असते तरी सरकत असतात गुरांचे कळप मुकाटपणे नजरेत नसते कसली ओढ घरादाराची तरी ओढली जातात अनामिक ओढीने ह्या जनावरांचे कळप डोळे कोठे लागलेले असतात शून्यात कोठेतरी त्याना येत असतो पाठीवर बसलेल्या काठीचा आवाज नि बेचैन होऊन सरकत असतात झुंडीने अनामिक दिशेला एखादे जनावर मुतते फदाफदा नि हगते जीव घाबरा झाल्यासारखा एखादा कावळा बसतो त्यांच्या शिंगावर शहाजोगपणे मजेने स्वताची हाउस घेत असतो पुरवून जनावरांना नाही वाटत सुख, नाही फुलत रोमांच त्यांच्या कातडीवर कसे हो

नवा दे घाव वेदनांना...........

मयुरेश साने ·
लेखनविषय:
काव्यरस
किनारे लोटुनी सारे प्रावाही शांत वाहताना किती गर्दी तुझी आहे? इथे एकांत असताना मुका होईन मी जेव्हा तुझ्या दे त्रास ओठांना चुका मोजू नको माझ्या सजा दे खास ओठांना किती ओशाळले सारे पुरावे न्याय होताना तुझा आभास वावरवा अशी दे स्मृति आठवांना शब्द माझे मागती ती तुझी दे चाल गीतान्ना चन्द्र तू चांदणे मी लाजवू या चांदण्याना झोप माझी वाट पाही अशी दे जाग स्वप्नांना जाणीवा गोठल्या माझ्या नवा दे घाव वेदनांना माझी कविता ..मयुरेश साने..24-July-10

आई...मिटलेला श्वास - ११

गणेशा ·
लेखनविषय:
काव्यरस
आई...मिटलेला श्वास -१० अंधारयुगी हरविलेले अंधुक संकेतचिन्हे घंटेच्या निनादात विखुरलेले शब्दथवे भग्न शिवालय अंधार्‍या कपारी सांध्यसंध्या उभी एकटीच दूरवरी मनभृंग पोखरे विचारांच्या भिंती छ्प्पर हरविलेले घरटे विराण रडती अंतरीचे दाटता धुके भासांची स्मरणे मागे दग्ध भाव निर्मिते मायेचे सोवळे धागे -------- शब्दमेघ

बाबा !!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
खूप पावसाळे डोक्यावरून गेले मोजू नये ईतकी वर्ष उलटली परंतु तुम्ही माझ्या आठवणीत सतत असता बाबा !! हे शपत कुणाला सांगायला हवे का ?? तुम्ही अचानक निघून गेलात असे कुठे तुमचे वय झाले होते बाबा !! आह्मी तर लहान होतो नि आईचे तर किती छान दिवस होते हौस-मजेचे आणि तुम्ही एकदम निघून गेलात अचानक !! किती पोरके पोरके नि उध्वस्त होऊन गेलो आम्ही सर्व दुखाचा पहाड कोसळला आई नको त्या वयात म्हातारी झाली पण बाबा !! काळ कुणासाठी थांबतो ?? माझी बायको मुले फक्त तुमचा शोकेसमध्ये ठेवलेला फोटो बघतात !! त्यांना काय वाटते ?

किनारा

शैलेन्द्र ·
लेखनविषय:
काव्यरस
रात्रीत चांदण्यांचा विरघळता पिसारा, तृप्तल्या गात्रांत गेला तृप्तसा इषारा मन भोगते पुन्हा तो आवेग मंथनाचा. अन सांडतो भरुनी शृंगार अंतरीचा. वनवास या सुखाचा मी विरहात साहीला, स्वप्नात शोधीला पण शारीर राहीला, माझ्या प्रियेस ठावा आक्रोश या मनीचा, दवबिंदुनी विझावा वणवा कसा तनीचा. होता आवेश वेडा, अन वेडीच रात्र होती, लवलवती पेटुन काया, गंधीत मात्र होती, नग्न वासनेचा तो, शुद्ध मंत्रखेळ होता, ह्रदयातल्या प्रीतीचा त्या अजोड मेळ होता. होतीस तुच साक्षी रक्तातल्या खुणेची, गेली जिरुन जेंव्हा तगमग या मनीची, आली प्रचंड भरती मग उधान सागराला, गेला भिजुन अवघा तृषार्त तो किनारा.