मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

भूत

दिनेश५७ ·
लेखनविषय:
डोईवर माझ्या नाही टोपी तरी जगण्याची रीत सोपी नाही ... खांद्यावर माझ्या नाही जरी झेंडा कधीमधी दांडा तिरडीचा... हातामधी माझ्या नाही तलवार कसे झेलू वार देव जाणे... पायामधी माझ्या उरले ना त्राण आवरतो प्राण कंठाशी खिळले... मला नाही ठावे काय माझी जात तरी नाही जात भूत ते भयाचे...

एकांत

चांदणे संदीप ·
लेखनविषय:
काव्यरस
काय लिहावं? काय वाचावं? काय आठवावं? काय गुणगुणावं ? चंद्र, तारे, फुलं नि पक्ष्यांना बळेच एकत्र मांडावं नेमकं त्याच कडव्यावर का मनानं सांडावं? आजच्या बंडखोर लेखकानं कालच्याला भांडावं! दोघांचही चुकत नसतं कुणाला समोर ठेवावं? तिन्हीसांजेची वेळ समोर अन एकांतानं घेरावं कितीही नको म्हटलं तरी का आठवणींनी आठवावं? शीळ येते मुक्कामी शब्दांनी का रुसावं? सुस्कारे नि हुंकार याला गुणगुणनं कसं म्हणावं काय लिहावं? काय वाचावं? काय आठवावं? काय गुणगुणावं ? - संदीप चांदणे

सोपं नसतं मायबाप होणं.........!!!!

फिझा ·
लेखनविषय:
सोपं नसतं मायबाप होणं .......!!!!! इवल्याशा जीवाला घास भरवताना  अडखळणाऱ्या पायांना आधार देताना  बोबड्या बोलांमध्ये स्वतःला शोधणं,  सोपं नसतं, हातांच्या कुशीत लेकरांना सांभाळत  रात्र रात्र जागणं , सोपं नसतं मायबाप होणं !! काडी काडी वेचून आपलं घरटं बांधणं,   उन्हं अंगावर झेलून लेकरांना सावली देणं,  कधी जमीन बनून तर कधी आभाळ बनून  घरट्यातला प्रेमाचा ओलावा कायम ठेवणं  सोपं नसतं, भिजत असताना लेकरांचे 'इंद्रधनू' पाहणं,  सोपं नसतं मायबाप होणं !!!!! पंख फुटलेले पिल्लू उडू लागते,  घरटे सोडून दूर जाऊ लागते, सोसाट्याचा व

मनाचा एकांत - स्मरणाचा काटा

शिव कन्या ·
आत्ता इथे इतके वाजलेत, म्हणजे आपल्या घरी आता तितके वाजले असतील..... तिथे आता हे हे असे असे घडत असेल आणि इथे हे हे असे असे ..............! स्मरणाचा एक तास काटा तिथे तर एक इथे! बाकी मन, सेकंद काटा होऊन सांधणाऱ्या प्रिय समुद्रासारखे टिकटिकत राहते दोन किनाऱ्यांमध्ये अष्टौप्रहर.............. . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! -शिवकन्या

निसर्गाचं गाणं

राजेंद्र देवी ·
लेखनविषय:
निसर्गाचं गाणं ओला घाट, नागमोडी वाट केवड्याचे रान, घनदाट केवड्याचे रान, सळसळते नागीण वारा वाजवी सुमधुर बीन ओले रान, ओले पान ओंजळ छोटीसी, निसर्गाचे दान कडेकपारीतून वाहती निर्झरांचे पाट रानातून हुंदडे वारा पिसाट विसरुनी भान, तुडवितो रान ओठावरती फक्त निसर्गाचं गाणं राजेंद्र देवी

मन

दिनेश५७ ·
लेखनविषय:
मन विचाराचे घर मन कृतीचे आगर मन अथांग सागर मन मधुर साखर मन आभाळीचा रंग मन आत्मरंगी दंग मन देहाचा आरसा मन स्नेहाचा वारसा मन मायेचे माहेर मन देवाचा आहेर मन चंचल चंचल मन कधी अविचल मन मोकाट मोकाट मन कधीचे मुकाट मन धावे सैरावैरा मन माळावरला वारा मन गरीब पामर मन कधी अनावर मन वेडेही भासते मन मनात हासते...

माझे स्वप्न...

राजेंद्र देवी ·
लेखनविषय:
माझे स्वप्न... तुझी नाजुकता फुलात आहे फुलाचा गंध तुझ्यात आहे तुझी अवखळता पाण्यात आहे पाण्याची झुळझुळता तुझ्यात आहे तुझ्या रागाची धग आगीत आहे आगीची तेजस्विता तुझ्यात आहे तुझा अबोला वाऱ्यात आहे वाऱ्याची दिशा तुझ्यात आहे तुझे अस्तित्व स्वप्न आहे माझे स्वप्न तुझ्यात आहे राजेंद्र देवी

मैत्रिणीचा ..... प्रतिसाद ("मैत्रीण " ला ).....

फिझा ·
लेखनविषय:
मित्र मैत्रिणींनो , धन्यवाद !!!! 'मैत्रीण 'हि कविता तुम्हाला आवडली. माझ्या ज्या मैत्रिणीसाठी हि कविता उमटली, त्या मैत्रिणीने त्या कवितेला दिलेला प्रतिसाद इथे पोस्ट करत आहे .... ...... ...... ......

अंधारलेल्या निशा...

राजेंद्र देवी ·
लेखनविषय:
अंधारलेल्या निशा... पाहून स्वप्ने उद्याची सोकावली आहे निराशा आता कोठे जागू लागल्यात आठवणी जराश्या का करीशी वणवण या रखरखलेल्या वाळवंटात आता कोठे विसावल्यात उन्हात सावल्या जराश्या आजूबाजूला कोलाहल किती कोण ऐकेल माझे वाचाळ झाली आता कोठे माझी मौनाची भाषा ना भिजते मन माझे या कोसळत्या पावसात राहतं नाही माझ्या आठवणी पारोश्या भरकटत जात आहे मी दिशाहीन झाल्या या दिशा दाविती उजेड मज या अंधारलेल्या निशा राजेंद्र देवी

देगा देवा....

कवि मानव ·
लेखनविषय:
काव्यरस
देगा देवा एकच दान मना लागे समाधान होऊ नये उंच एवढा इतर वाटती लहान !!१!! देगा देवा एवढे बळ, सोसण्या आयुष्यातली झळ, जगणे कर एवढे सुंदर, मरण तर आहे अटळ !!२!! देगा देवा दया- माया, व्हावे मी एखाद्याची छाया, झालो आधार न कोणाचा, तर व्यर्थची गेली ही काया !!३!! देगा देवा एवढे ज्ञान, असे भल्या-बुऱ्याची जाण, अहंकार न अंगी यावे, असावे मज सदैव भान !!४!! देगा देवा सदाचार, उजळत जावे माझे विचार, अंतरीतला राम विजयी व्हावा रावणाचे करून संहार !!५!