मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

आताशा.. असे हे.. मला काय होते

संजय क्षीरसागर ·

चौकटराजा 05/02/2017 - 09:39
संजय क्षीरसागर म्हणजे वादविवादाचा बादशहा. बहुप्रसवा लेखणी असणारा आय डी. पण हल्ली ज्यात वादविवाद असणार नाहीत असे नाजुक धागे टाकण्यात ते मग्न आहेत...... आताशा असे काय .. झाले आहे ?

तिमा 05/02/2017 - 12:54
संजय क्षीरसागर म्हणजे वादविवादाचा बादशहा. बहुप्रसवा लेखणी असणारा आय डी. पण हल्ली ज्यात वादविवाद असणार नाहीत असे नाजुक धागे टाकण्यात ते मग्न आहेत...... आताशा असे काय .. झाले आहे ? कारण ते एक हाडाचे रसिक आहेत. उत्तम रसग्रहण.

In reply to by तिमा

अभ्या.. 05/02/2017 - 13:07
कारण ते एक हाडाचे रसिक आहेत. उत्तम रसग्रहण.
सहमत. संजयजी एकदम दिलदार अन रसिक व्यक्तिमत्व आहेत. जीवनातला आनंद उपभोगायचे रहस्य त्यांना कळलेले आहे.

In reply to by आनन्दा

आनन्दा 06/02/2017 - 10:39
बाकी रसग्रहण मस्तच.!. संदीपचे स्वतःचे या कवितेबद्दल काय मत आहे हे पण जाणून घ्यायला आवडेल. जाता जाता.. अत्यंत सोप्या शब्दात अत्यंत गहन आशय मांडणे हे हल्लीच्या काळात फक्त संदीपकडेच पाहिलेय.

In reply to by संजय क्षीरसागर

क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का? इथे तुफानी वाद झालायं. मेरी दुनिया मे तुम आई, क्या क्या अपने साथ लिए इथे गाण्याचा आनंद आहे. नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने इथे विडंबनाची मौज आहे. आणि सांप्रत रसग्रहाणात कवितेच्या छंदात रमण्याचा आनंद आहे.

तिरकीट 07/02/2017 - 22:04
सुंदर रसग्रहण संक्षी!! काही दिवसांपूर्वी संदीप खरे आणी वैभव जोशी यांचा 'ईर्शाद' ऐकला. तोही असाच सुंदर अनुभव होता....

संदीपची कविता रसग्रहणापलिकडे आहे कारण त्याला जे सांगायचंय ते सहज, सोपं आणि समोर आहे. प्रत्येक शब्द बोलका आणि प्रत्यकारी आहे. शब्द वाचताक्षणी आपण त्या अनुभवाशी एकरुप होतो, मग अजून रसग्रहण काय करणार ? तरीही त्याच्या या कवितेला एक दाद म्हणून हा रसास्वाद सादर केल्याशिवाय राहावत नाही. संदीप म्हणतो की त्याची कविता गाणं होऊनच प्रकटते. म्हणजे अनुभव व्यक्त होण्यापूर्वीच त्याचा मनात अनुरुप सांगितिक माहौल तयार झालेला असतो. ही गोष्ट केवळ दुर्लभ आहे. कारण त्याला शब्दांची जुळवाजुळव करायला लागत नाही. त्याचा संवेदनाशिल अनुभव प्रवाही होऊन प्रत्ययकारी शब्दांन्वये कविता होतो.

(वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने)

चतुरंग ·

खेडूत 03/02/2017 - 09:34
मस्तच ! 'फाटकांच्या अंतरी डोकावणे' यात श्लेषआहे असं उगीच वाटतंय. 'लष्करा'चा 'गांधि'मार्ग हल्लीच्या काळी कोथरुडात गेलाय.. त्यामुळे 'शहरा'च्या 'गर्व' मार्गी चालणे आता नव्याने असा बदल सुचवतो.

In reply to by खेडूत

चतुरंग 03/02/2017 - 16:51
'फाटकांच्या अंतरी डोकावणे' यात श्लेषआहे असं उगीच वाटतंय
तुमच्या मनात वेगळे 'फाटक' असले तर श्लेष आहे! ;)

पैसा 03/02/2017 - 09:44
=)) =)) पडिकणे शब्द लैच लाइकला आहे!

विशाल भौंची नेहेमीप्रमाणेच सुरेख गजल वाचली 'वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने' आणि आमच्या काही वंचनांचा बांध फुटला!

देवा तुला नक्की काय करायचं होतं ?

अभिषेक पांचाळ ·
भल्यामोठया तंट्यातून , तू जन्म मला दिला अगदी थोड्या क्षणात , तू पोरका याला केला आधार देतो म्हणून , तू थोडा पुढे आला पुढे येऊन माझा , आधारच घेऊन गेला तेव्हाच माझ्या मनी , एक कोडं उभं होतं देवा तुला नक्की काय करायचं होतं ? सुख म्हणून दिलस , ते झोळीत नाही पडलं किती सांगू तुला , नेमकं काय काय घडलं साठवण्या ते सुख , तू झोळी मला दिली माझंच नशीब खोटं , ती ही फाटकी निघाली सुख म्हणून नक्की , तुला काय द्यायचं होतं ? देवा तुला नक्की काय करायचं होतं ? वाटलं होतं चालतोय ती वाट आहे न्यारी अजून सुद्धा चालताना , ती काटेच फेकून मारी होईल पुढे काही , अशी आशाच गायब झालीय त्याच वाटेने माझी , हालत अशी केलीय

"पॅलेस ऑन व्हील्स "

पदकि ·
तीन कोटी टिऱ्या* / आभाळ देखती नाके ती टेकती/ धरतीला फाटलेली चड्डी/ शर्ट असे, नसे लढावे ते कसे/ हिवाळ्याशी हातातले त्यांच्या / गंजके खुरपे झपाझप कापे/ गवताला डोक्यावर त्यांच्या /नसे ते छप्पर फुटके खप्पर / आईबाप शाळेमाजी त्यांना/ नसे ते शिक्षण "रात्रीला भक्षण / काय करू?" वाढदिवसाचे / फुगलेले फुगे रंगीत नी झगे / कोठून ते तीन कोटी पोरे/शेतांत राबती भयाण सोबती/ दारिद्र्य ते दुख्खाचीच कढी /दुख्खाचाचि भात जेवोनिया तृप्त / कोणी नसे मधूनच जाई / नवी आगगाडी शहरची जाडी/ पोरेबाळे हाती त्या सर्वांच्या / थंड कोकाकोला ऑर्डरही केला / पिझ्झा मस्त दोन्ही बाजूंमध्ये / नसे तो संवाद आपुलाचि

रंगपंचमी

पराग देशमुख ·
रंग मनाचा,रंग क्षणाचा, क्षणाक्षणाला विरघळणारा. क्षणात हसरा,क्षणात हळवा, डाव्या गाली ओघळणारा. पुसता अश्रू आवेगाने, रंग काजळी विस्कटणारा. अंमळ उसासे स्फुंदत असता, रंग बोचरा गहिवरणारा. मित्रांची ती चौकट जमता, रंग खुशीचा खळखळणारा. कातरवेळी काहुरणारा, पिंग गुलाबी रंग बावरा. रंग कोणता शौर्येन्द्राचा, निधड्या छाती वार झेलता? रंग कांतीचा गौर वेगळा, चाहुलीसरशी थरथरणारा. अवखळ,चंचल,शुद्ध-कांचनी

अश्वत्थामा एक सुरेख कविता

शरद ·

शरद, धन्यवाद. तुमच्या लेखाने ही कविता लिहिण्यामागच्या माझ्या मनोवस्थेला / प्रेरणेला नेमक॑ शब्दरूप मिळाल॑. जवळच्या व्यक्तीकडून झालेल्या प्रतारणेत होरपळणाऱ्या माझ्या एका सुहृदाची रोजच्या वास्तवाला सामोर॑ जाताना होणारी तगमग मा॑डण्याचा प्रयत्न मी "अश्वत्थामा" मध्ये केलाय. अशा तगमगीची, तडजोडीची व्यापकता व सार्वकालिकता तुम्ही नेमकी टिपलीत. प्रचेतस, तुमच्या लिखाणाची प्रतिक्षा करतोय.

अश्वत्थामा एक सुरेख कविता अनन्त यात्री यांची एक सुरेख कविता वाचनात आली आणि महाभारतातील एका अभागी व्यक्तीमत्वाची चालू काळातील फरपट डोळ्यासमोर आली. कवितेकडे वळण्याआधी जरा अश्वत्थाम्याची ओळख करून घेऊ. अश्वत्थामा द्रोणांचा मुलगा. परशुरामाकडून मिळवलेली अस्त्रे द्रोणांनी अश्वत्थामाला शिकवली होती. द्रुपद व द्रोण गुरूबंधू. त्या वेळी द्रुपदाने मोठेपणी,राजा झाल्यावर, बरोबरीने वागविण्यचे वचन दिले पण जेव्हा द्रोण त्याच्या दरब्वारी आला तेव्हा त्याचा अपमान केला. रागावलेल्या द्रोणांनी त्याचा सूड घेण्याचे ठरविले.

भेट

चांदणशेला ·
आज अशी ती भेटली श्रावणी ओढ मुकी झाली ममं ह्रदयी वैफल्य जळे कुणा सौभाग्याची तू ना कळे ती जुनी वाट पुन्हा थरथरे पाहूनी दोन हळवे चेहरे व्याकूळ दिस तसाच ढळतो उदास रातीचा स्वर असाच सलतो काळजाच्या शिवारात भिजते एक लहर मुक्या पानांतूनी जागा ओला प्रहर मंद हुंदक्यातूनी हाक आली का अशी तू दूरस्थ गेली जा सौख्याने आल्या पाऊली युगायुगांची ही कथा अर्धीच राहीली.

पाचोळा

फिझा ·
पाचोळा तुझी एखादी आठवण, जशी अलगद वाऱ्याची झुळूक यावी पसरलेल्या जुन्या पाचोळ्यावर एखादं अलगद हिरवंगार पान पडावं अगदी तस्संच ..... हुरहूर लागलेल्या मनातला पाचोळा उडू लागतो काय अन सैरभैर आठवणींना पुन्हा उजाळा मिळतो काय ..... कुणाची चाहूल लागावी ना अगदी तस्संच ..... पाचोळ्यातली जुनाट दुःखं , नवीन पडलेल्या पानाला पाहून सुखावतात काय अन टचकन आलेल्या पावसाने, परत भिजतात काय ..... एखाद्याला डोळे भरून पाहावं ना अगदी तस्संच ....... आता पाचोळा काय कि हिरवं झाड काय पावसात सगळंच ओलं चिंब ......

कधीतरी.....

पराग देशमुख ·
उकलत मनाची पाकळी सांज हळवी होते; कधीतरी..... भिजवून पापणी ओली रात्र हळवी होते; कधीतरी..... चुकवून पाहारे सारे नजरा-नजर होते; कधीतरी..... मोडून मनाची दारे, तिची आठवण उच ...! येते; ऊ...च...!!ऊ...च...!!! (इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?) कधीतरी..... -मुकुंद

म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....

पराग देशमुख ·

पराग देशमुख 30/01/2017 - 19:11
संजय क्षीरसागर, अनन्त्_यात्री, पाटीलभाऊ... स्पष्ट प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार... मी नवकवी आहे सुधारणेला चिक्कार वाव आहे. परकाया प्रवेश करताना मनात येणारी प्रत्येक भावना शब्दात उतरवण्याचा मोह यापुढे नक्की आवरेन

अजून एक काव्यकथा घेऊन आलोय, अजून एक हृदयव्यथा घेऊन आलोय. वेदना जुनीच..., पावसामुळे पुन्हा फुललेली, कॉफीच्या वादळासह, पुन्हा मनात सललेली. अंगणभर पसरलेला पाऊस, कुंपणाशी गुंतलेला गारवा, उंच भिंतीच्या आडोशाला, गारठलेला पारवा | गारठलेला मी, अन् थिजलेल्या स्मृती, जुन्या जखमा पालवण्याच्या, पावसाच्या या जुन्याच रिती || म्हणून हा पाऊस मला आवडत नाही..... रेडिओवर लागलेला मल्हार, नि स्वयंपाकघरातील खमंग वास ऊबदार शालीत लपेटलेला मी, पण आठवणींच्या हुद्क्यांनी विखुरलेला श्वास | निरवलेले डोळे, अन् मनात पावसाच्या सरींचे मंथन भिजण्याच्या भीतीने धावणारी पावले, अन् हळूच किणकिणणारी पैंजण|| त्या दिवशी सार आभा