✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दोन शशक- नीट

र
राजेंद्र मेहेंदळे यांनी
Wed, 03/29/2023 - 12:16  ·  लेख
लेख
"अहो, तुम्ही नका ना त्याला सारखे सारखे टोचून बोलू. आपण दोघे डॉक्टर आहोत म्हणजे त्याने सुद्धा डॉक्टरच व्हायला पाहिजे का? एकुलता एक मुलगा आपला.नसेल त्याची इच्छा तर त्याला जे करायचे ते करू दे ना?" म्हणजे काय? एव्हढी मेहनत करून आपण हे हॉस्पिटल उभारलंय. ते कोण सांभाळणार पुढे? त्यात रशिया युक्रेनचाही पर्याय बंद झालाय. चायनाबद्दल तर बोलायलाच नको. त्यापेक्षा माझ्या डोक्यात एक कल्पना आलेय. रामसिंग आठवतो तुला?आपल्या हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय होता तो? आजकाल टेचात मर्सिडीजमधून हिंडत असतो. परवाच भेटला होता मला. म्हणाला "डॉक्टरसाब चिंता मत करो. आप बस जेब ढिली रखो, और कितने मार्क्स चाहिये बोलो. बाबू को डॉक्टर बनाने की जिम्मेदारी मेरी" ============================== खरेतर मला सायन्सला ऍडमिशन घ्यायचीच नव्हती. पण आई बाबांची भुणभुण. त्यात आता हे नीटचे भूत मानगुटीवर बसलेय. मान मोडेतोवर अभ्यास केला पण बायोलॉजि मुळातच आवडत नाही तर काय? बाबांना सांगितले , तर म्हणतात "तू काळजी करू नको, मी बघतो." अरे पण नीट द्यायला मला कॉन्फिडन्स पाहिजे ना?तिकडे तुम्ही थोडीच येणार मदत करायला? काल रामसिंग आला होता. मला म्हणाला "बाबू, तुम चिंता मत करो.बस मैं बोलता हू वो मोबाईल,सिम और ब्लु टूथ खरीदलो. बाकी मैं संभालुंगा" आज नीटची परीक्षा आहे. रामसिंगने निळा शर्ट घालून यायला सांगितलेय. छातीत धडधड होतेय. निळा शर्टवाले बरेच दिसताहेत.बुटात मोबाईल टोचतोय, आणि कानात ब्लूटूथ. कानात सूचना ऐकायला येताहेत. आता पुढे?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
3034 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

वा, मस्त !

हेमंतकुमार
Wed, 03/29/2023 - 13:22 नवीन
आवडल्याच .. वास्तव दर्शन...
  • Log in or register to post comments

छान

सरिता बांदेकर
Wed, 03/29/2023 - 13:52 नवीन
आजू बाजूला दिसणारं वास्तव नेटक्या शब्दात मांडलंय. आवडली शशक.
  • Log in or register to post comments

ज्यांना स्वत:वर विश्वास नसतो

विवेकपटाईत
Wed, 03/29/2023 - 16:28 नवीन
ज्यांना स्वत:वर विश्वास नसतो ते जाळ्यात अटकतात. पूर्वी दिल्लीत ही असे दलाल भरपूर होते. पद्धत सौपी लोकांकडून पैशे घ्यायचे. त्यातला एखादा आपसूक पास होणार आणि त्याला नौकरी लागणार. क्रेडिट दलाल घेणार. इमानदार दलाल बाकीच्या लोकांचे 70 ते 80 टक्के घेतलेला पैसा परत करायचे.
  • Log in or register to post comments

नाही हो!!

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 03/29/2023 - 19:31 नवीन
ही मास कॉपी करायची आधुनिक टेक्निक आहे. दलाल पैसे घेतो, उमेदवार कानात ब्लु टूथ लावुन परीक्षेला बसतो. मोबाईल कुठेतरी दडवलेला असतो. पेपर सुरु झाला, की फोनवर सगळी उत्तरे सांगितली जातात. उमेदवार ऐकुन ऐकुन लिहितो.पास होण्याची हमखास गॅरेंटी. आता बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

हे रोखण्यासाठी परीक्षा हॉल

सुजित जाधव
Sat, 04/01/2023 - 07:47 नवीन
हे रोखण्यासाठी परीक्षा हॉल मध्ये जामर बसवले तर..??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

चांगली कल्पना आहे

राजेंद्र मेहेंदळे
Sat, 04/01/2023 - 19:48 नवीन
किवा सध्या जे ई ई मेन्स किवा बँक प्रवेश परीक्षा टि सी एस च्या टेस्ट सेंटरमध्ये होतात, एकदम कडेकोट बंदोबस्त असतो. अर्थात ती परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आणि संगणकावर असते. तसे काहीतरी केले पाहीजे हे गैर प्रकार रोखायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजित जाधव

इथेच थांबायला हवे होते.

कर्नलतपस्वी
Wed, 03/29/2023 - 20:49 नवीन
त्यापेक्षा माझ्या डोक्यात एक कल्पना आलेय. रामसिंग आठवतो तुला?आपल्या हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय होता तो? आजकाल टेचात मर्सिडीजमधून हिंडत असतो. परवाच भेटला होता मला. Let reader be on tenterhook. काही वर्षापुर्वी आमचे नाम धारी माणसाने वैद्यकीय महाविद्यालय भरती प्रक्रियेत असेच काहीसे कांड केले. बातमी प्रसारित झाली. मला पण काही फोन आले पण मी साफ म्हणालो तो मी नव्हेच.
  • Log in or register to post comments

इथेच थांबायला हवे होते.

कर्नलतपस्वी
Wed, 03/29/2023 - 20:49 नवीन
त्यापेक्षा माझ्या डोक्यात एक कल्पना आलेय. रामसिंग आठवतो तुला?आपल्या हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय होता तो? आजकाल टेचात मर्सिडीजमधून हिंडत असतो. परवाच भेटला होता मला. Let reader be on tenterhook. काही वर्षापुर्वी आमचे नाम धारी माणसाने वैद्यकीय महाविद्यालय भरती प्रक्रियेत असेच काहीसे कांड केले. बातमी प्रसारित झाली. मला पण काही फोन आले पण मी साफ म्हणालो तो मी नव्हेच.
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/29/2023 - 21:34 नवीन
आवडल्या कथा. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

भारी आहेत दोन्ही, पुढचे भाग

सौंदाळा
Fri, 03/31/2023 - 15:40 नवीन
भारी आहेत दोन्ही, पुढचे भाग पण लिहा. शशक किंवा लेखमाला कोणत्याही स्वरुपात.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा