✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ऑनलाईन कट्टा - शनिवार २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ)

म
मनो यांनी
Tue, 05/18/2021 - 09:48  ·  लेख
लेख
मिसळपावकर श्रीरंग_जोशी यांनी सुचवल्याप्रमाणे ऑनलाईन कट्टा हा झूम ऍप द्वारे करण्याचा प्रयोग या विकांताला करणार आहोत. आत्तापर्यन्त प्रचेतस, भक्ती, श्रीरंग जोशी, चित्रगुप्त यांनी जमेल असे सांगितले आहे, श्री. अरविंद कोल्हटकर याना उद्या मी स्वतः विचारून पाहतो. एकंदरीत वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्वान मंडळींच्या भेटीची ही संधी जरूर साधावी. तांत्रिक बाबी - ०) शनिवार दिनांक २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ) अमेरिकेत २२ मे, सकाळी ९.०० (pst) आणि १२.०० (est) १) झूम अँप फोनवर किंवा लॅपटॉपवर असेल तर उत्तम. फक्त ब्राऊसरमधून देखील झूम वापरता येते, पण थोडे गैरसोयीचे आहे. २) मीटिंग लिंक - येथे क्लीक करा https://twilio.zoom.us/j/97023197139?pwd=QlVJUVpWZlIvUjVLZjFKRHVxUCtPdz09 कार्यक्रमाची साधारण रूपरेषा अशी असेल - १) सुरुवातीला परिचय - सर्व उपस्थितांना बोलण्याची संधी मिळेल. २) श्री. चित्रगुप्त आपली काही चित्रे दाखवतील, त्याविषयी थोडेफार सांगतील, आणि आपल्याला काहीं प्रश्न त्यांना विचारायची संधी मिळेल. ३) श्रीरंग_जोशी नुकत्याच प्रकाशित झालेल्या मनो यांच्या पुस्तकाबद्दल आणि त्याच्या निर्मिती-प्रक्रियेबद्दल आणि त्याविषयी आलेल्या भल्या-बुऱ्या अनुभवांबद्दल १० मिनिटे थोडक्यात मुलाखत घेतील. ४) श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति. ५) इतर कुणाला काही विषय मांडता येईल ६) उरलेला वेळ गप्पा-टप्पा आणि जे ऐन वेळी सुचेल त्या विषयांवर बोलण्यासाठी वापरता येईल. खूप जास्त उपस्थिती असल्यास ३-४ छोटे ग्रूप बनवून त्यात विभागून ही गोष्ट करता येईल. इतर सूचनांचे जरूर स्वागत आहे. ज्यांना येणे शक्य आहे, त्यांनी प्रतिक्रियांत जरुर कळवावे. *ज्यांना काही कारणास्तव हजार राहणं जमलं नाही त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग इथे आहे सुरुवातीला परिचय चित्रगुप्त काकांची चित्रे इथे सुरु होतात मनो - पानिपत पुस्तकाबद्दल श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति राहिलेल्यांचा परिचय, श्री. बिपीन सांगळे यांची कविता वाचन इतर गप्पा आणि समारोप
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
50088 वाचन

💬 प्रतिसाद (158)

प्रतिक्रिया

मी येणार

श्रीरंग_जोशी
Tue, 05/18/2021 - 09:53 नवीन
ऑनलाइन कट्ट्याच्या आयोजनासाठी मनःपूर्वक धन्यवाद. या कट्ट्याला मी नक्की येणार. या माध्मयातून मिपाकरांशी संवाद साधण्यास उत्सूक आहे.
  • Log in or register to post comments

+१

हेमंतकुमार
Tue, 05/18/2021 - 09:59 नवीन
मी पण येणार !
  • Log in or register to post comments

+1

उगा काहितरीच
गुरुवार, 05/20/2021 - 08:30 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

यायचा प्रयत्न नक्की करेन.

आनन्दा
Tue, 05/18/2021 - 10:13 नवीन
यायचा प्रयत्न नक्की करेन. किमान हजेरी तरी..
  • Log in or register to post comments

यायचा प्रयत्न नक्की करतो

Nitin Palkar
Tue, 05/18/2021 - 10:17 नवीन
यायचा प्रयत्न नक्की करतो
  • Log in or register to post comments

उत्तम कल्पना ... नक्की

अमर विश्वास
Tue, 05/18/2021 - 11:07 नवीन
उत्तम कल्पना ... नक्की प्रयत्न करतो
  • Log in or register to post comments

हो. जमेल यायला. चांगली कल्पना

प्रकाश घाटपांडे
Tue, 05/18/2021 - 11:18 नवीन
हो. जमेल यायला. चांगली कल्पना आहे. अशा पद्धतीने अनेक लोक भेटण्याचा योग नक्की येईल व स्नेह वृद्धींगत होईल.
  • Log in or register to post comments

वा

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 05/18/2021 - 11:27 नवीन
उत्तम उपक्रम. सर्वानी मिसळ पाव खात हा ऑन्लाईन कट्टा केला तर धमाल येईल.
  • Log in or register to post comments

आपण येणार का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/18/2021 - 12:08 नवीन
आपले प्रतिसाद नेहमीच आवडतात. आपण ऑनलाइन का होईना आल्यास गप्पा मारता येतील. मिसळपाव खात खात आणि सॉफ्ट ड्रिंक्स घेत घेत मजा येईल. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

सॉफ्टड्रिंक्सची आयडिया भारी

चौथा कोनाडा
Tue, 05/18/2021 - 12:53 नवीन
सॉफ्टड्रिंक्सची आयडिया भारी आहे, फक्त त्यावेळी वीजांचा कडकडट, धो धो पाऊस पायाजेल, त्यावेळी माईसाहेबांचा आवाज काय जबरदस्त वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहभागी होणार.

प्रचेतस
Tue, 05/18/2021 - 11:37 नवीन
सहभागी होणार.
  • Log in or register to post comments

हिला विचारून सांगतो =))

टवाळ कार्टा
Tue, 05/18/2021 - 11:44 नवीन
हिला विचारून सांगतो =))
  • Log in or register to post comments

यावं म्हणतोय.....

संजय पाटिल
Tue, 05/18/2021 - 11:53 नवीन
यावं म्हणतोय..... बघू कसं जमतय...
  • Log in or register to post comments

मी पण

समीर वैद्य
Tue, 05/18/2021 - 11:54 नवीन
नक्की येणार. ह्या उपक्रमासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments

उत्तम कल्पना

अनन्त अवधुत
Tue, 05/18/2021 - 12:03 नवीन
शनिवार सकाळ ऑलरेडि बूक्ड आहे त्यामुळे कट्ट्याला येणे अवघड आहे. माझ्याकडुन शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

मन:पूर्वक शुभेच्छा...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/18/2021 - 12:05 नवीन
मिसळपावच्या ऑनलाइन कट्यास ९८. १२ % उपस्थित राहण्याचा प्रयत्न करीन. ऑनलाइन कट्टा आयड्या आवडली. ट्राय टू बेष्ट फ्रॉम माय साइड. संयोजकांचे मन:पूर्वक आभार. उपक्रमास शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्रा.डॉ.

कपिलमुनी
Tue, 05/18/2021 - 23:16 नवीन
प्रा.डॉ. असलात तरी विद्वान असल्याचा पुरावा द्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहभागी होणार...

गणेशा
Tue, 05/18/2021 - 12:24 नवीन
सहभागी होणार... सर्व ऍक्टिव्ह सदश्यांनी सहभागी व्हावे...:-)
  • Log in or register to post comments

येणार !

कॉमी
Tue, 05/18/2021 - 12:25 नवीन
येणार ! कट्टाप्रेमी कायजू गोजिरा कुठेयत ?
  • Log in or register to post comments

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/18/2021 - 13:13 नवीन
उगाच आनंदावर विरजन घालू नका प्लीज. त्यांच्या चपला बाहेरच दिसल्या तर बाहेरच्या बाहेर कट मारावा लागेल. ;) उगाच आमचा उस भारी, द्रांक्षे भारी. ऐकावे लागेल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

मग तर हमखास उपस्थिती असणार

गॉडजिला
Wed, 05/19/2021 - 12:43 नवीन
....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

येणार नक्की...

बेकार तरुण
Tue, 05/18/2021 - 12:29 नवीन
येणार नक्की...
  • Log in or register to post comments

मागच्या पाताळेश्वर कट्ट्याला

कंजूस
Tue, 05/18/2021 - 13:36 नवीन
योगायोगाने पाचसहा ज्येष्ठ नागरिक आल्याने 'हा ज्येष्ठ नागरिक कट्टा' असा शिक्क बसला. त्यामुळे मी कट्ट्याला बाद. आणि झुम कट्ट्याला दोघेच बोललो श्रीरंग फ्यामली आणि मी. तरी या कट्ट्याला बरीच उपस्थिती करून solidarity का काय म्हणतात ती दाखवावी.
  • Log in or register to post comments

ऑनलाईन कट्टा

चंद्रसूर्यकुमार
Tue, 05/18/2021 - 13:39 नवीन
शनीवारी संध्याकाळी साडेसातला दुसरा झूम कॉल आहे. तो वेळेत संपेल ही अपेक्षा. उशीर झाल्यास तो कॉल संपल्यावर उशीरा का होईना जॉईन व्हायचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

छान कल्पना. 'त्व' वर 'चस्त' करता येते का ?

चित्रगुप्त
Tue, 05/18/2021 - 13:43 नवीन
मला जरा तांत्रिक बाबी माहीत करून घ्यायच्या आहेत. . मुख्य म्हणजे लप्तोप, मोबैल किंवा इपद वरून त्व वर चस्त करता येईल का ? म्हणजे जरा नीट दिसेल. इपद = ipad त्व= TV चस्त = cast लप्तोप = Laptop मोबैल = mobile. सावरकरांच्या काळात केय्बोअर्द (keyboard) नसल्याने त्यांना मराठी प्रतिशब्द हुडकायला बरेच कष्ट पडले असणार. आता कित्ती सोपे झालेले आहे बघा. इंग्रजी शब्द मिपावर जसाच्या तसा त्य्पे (type) केला की झाला मराठी शब्द तयार. (चोप्य्पस्ते आहेच पूर्वीपासून).
  • Log in or register to post comments

इथे काही उपाय दिलेले आहेत,

मनो
Tue, 05/18/2021 - 22:25 नवीन
इथे काही उपाय दिलेले आहेत, पहा जमतंय का https://www.pocket-lint.com/apps/news/151726-how-to-get-zoom-on-your-tv
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

नक्की येणार

सरनौबत
Tue, 05/18/2021 - 15:19 नवीन
नक्की येणार. ह्या उपक्रमासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments

नक्कीच

MipaPremiYogesh
Tue, 05/18/2021 - 15:31 नवीन
वाह नक्कीच स्तुत्य उपक्रम
  • Log in or register to post comments

मी पण हजेरी लावणार कट्टयाला

चांदणे संदीप
Tue, 05/18/2021 - 16:48 नवीन
मोजक्याच मिपाकरांशी प्रत्यक्षात भेट झालेली आहे. तेही एक-दोन वेळाच. किमान ऑनलाईन तरी बर्‍याच जणांना भेटणे होईल त्यामुळे या कट्ट्याला नक्की येणार. सं - दी - प
  • Log in or register to post comments

नक्की प्रयत्न करतो

असा मी असामी
Tue, 05/18/2021 - 17:02 नवीन
नक्की प्रयत्न करतो
  • Log in or register to post comments

मी येणार

वामन देशमुख
Tue, 05/18/2021 - 18:07 नवीन
मी येणार, नक्की येणार, म्हणजे यायलाच हवं, न येण्याचा प्रश्नच नाही, नाही येऊन कुणाला सांगणार, किंबहुना मी तर म्हणतो की मी म्हणजे शंभर टक्के येणारच... --- पुढाकार घेतल्याबद्धल धन्यवाद! - कट्टोक्सुक वामन
  • Log in or register to post comments

मिपा ऑलरेडी ऑनलाइन कट्टाच आहे

गॉडजिला
Tue, 05/18/2021 - 18:09 नवीन
मिपा ऑलरेडी ऑनलाइन कट्टाच आहे हा समज असल्याने आता ऑनलाइन कट्टा म्हणजे काय ते समजुन घ्यायला हवे म्हणून मी नक्किच हजेरी लावेन.
  • Log in or register to post comments

हीच कल्पना माझ्या मनात गेले

सुबोध खरे
Tue, 05/18/2021 - 19:27 नवीन
हीच कल्पना माझ्या मनात गेले काही दिवस घोळत होती. असा कट्टा आम्ही चुलत भावंडं गेले दीड वर्षे करत आलो आहोत परंतु आळशीपणा मुळे पुढे काहीच झालं नाही. असो. श्री मनो यांचे अभिनंदन. आणि कट्ट्याला नक्कीच येणार. सर्वाना एकच विनंती आहे. शक्य असल्यास करोना आणि त्यामुळे होणारा त्रास हा विषय टाळता आल्यास बरे होईल. जिकडे तिकडे हाच विषय आहे आणि त्यातून कट्ट्यावर पण हाच विषय आल्यास लोकांचा विरस होईल.
  • Log in or register to post comments

@सुबोध खरे: अगदी खरे. करोना नकोच झूमट्ट्यात.

चित्रगुप्त
Tue, 05/18/2021 - 20:11 नवीन
करोना नकोच हे अगदी आवश्यक. तसेच अमूक आला, तमूक दिसत नाहीये वगैरेत बराच वेळ जाण्याचा कौटुंबिक झूमट्ट्यात अनुभव आला होता तेही टाळणे बरे. सर्वांनी आपापली ओळख करून द्यावी. शिवाय विशेष नवीन काही उद्योग करत असल्यास त्याविषयी थोडक्यात सांगता येईल. या निमित्ताने सुचलेला नवीन शब्दः झूमट्टा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

छान

इरसाल
Tue, 05/18/2021 - 19:51 नवीन
सगळ्या मान्यवरांना भेटायची इच्छा आहे. शक्य झाल्यास नक्की जॉइन करणार.
  • Log in or register to post comments

+१

लई भारी
Tue, 05/18/2021 - 19:54 नवीन
उत्तम कल्पना! जरूर प्रयत्न करेन. उगाच शंका - ४० मिनिट आणि १०० लोक हि मर्यादा असेल का? या दोन्ही बाबतीत आपण पुढे जाऊ अशी आशा आहे मला :-)
  • Log in or register to post comments

लोक-मर्यादा ३०० आणि वेळेवर

मनो
Wed, 05/19/2021 - 01:22 नवीन
लोक-मर्यादा ३०० आणि वेळेवर काही बंधन नाही, आपण ठरवू तिथे थांबता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लई भारी

नक्की प्रयत्न करतो!

नावातकायआहे
Tue, 05/18/2021 - 20:09 नवीन
नक्की प्रयत्न करतो!
  • Log in or register to post comments

छान उपक्रम

यश राज
Tue, 05/18/2021 - 20:13 नवीन
कटट्याला येण्याचा नक्कि प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

मी पण येणार !

चौथा कोनाडा
Tue, 05/18/2021 - 20:20 नवीन

☝

आयल्ला, कट्टा हौसफुल्ल होणार दिसतंय ! म्हंजे आमी ऐनवेळी यायचं ठरवलं तर जागा मिळणार नाही की काय ?

❓

जास्तीतजास्त किती मिपाकर या ऑनलाईन कट्ट्याला उपस्थित राहू शकतात ?
  • Log in or register to post comments

१०० नक्कीच

श्रीरंग_जोशी
Tue, 05/18/2021 - 20:38 नवीन
चकटफू झूम कमाल १०० जणांना मिटिंगमधे प्रवेश करु देते. बिझनेस प्लॅन वाले सबस्क्रीप्शन असल्यास हीच मर्यादा ३०० वा अधिकही असू शकते. संदर्भः झूम प्रायसिंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

+१

हेमंतकुमार
Tue, 05/18/2021 - 20:33 नवीन
जास्तीतजास्त किती मिपाकर या ऑनलाईन कट्ट्याला उपस्थित राहू शकतात ?
संख्या बरीच असल्यास तंत्रज्ञांनी नियोजन सुचवावे ही वि.
  • Log in or register to post comments

३०० लोक एका वेळी येऊ शकतील

मनो
Tue, 05/18/2021 - 22:23 नवीन
३०० लोक एका वेळी येऊ शकतील अशी सोय आहे, त्यामुळं जागा हाऊसफुल होणार नाही, जरूर या. इतक्या सर्वांना एकदम बोलताना आयोजन कठीण होणार आहे, त्यावर काहीतरी मार्ग काढू.
  • Log in or register to post comments

व्हर्च्युअली जरूर डोकावण्यात येईल.

चामुंडराय
Tue, 05/18/2021 - 23:58 नवीन
.
  • Log in or register to post comments

> इतक्या सर्वांना एकदम

लंबूटांग
Wed, 05/19/2021 - 02:19 नवीन
> इतक्या सर्वांना एकदम बोलताना आयोजन कठीण होणार आहे, त्यावर काहीतरी मार्ग काढू. आमच्या ऑफिसमधे मोठ्या मीटिंग्समधे ५-६ जणांच्या Breakout rooms तयार करतात. झूममधे meeting organizer ला करता येतात तयार बहुतेक.
  • Log in or register to post comments

हो

श्रीरंग_जोशी
Wed, 05/19/2021 - 03:05 नवीन
झूम मिटिन्ग्जमधे ब्रेक आउट रुमद्वारे सहभागी झालेल्यांची दोन किंवा अधिक गटांत विभागणी झालेली पाहिली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

यात सूत्रधार महत्त्वाचा असतो.

कंजूस
Wed, 05/19/2021 - 05:44 नवीन
प्रत्येकाने गळ्यात आपल्या आइडी नावाची पाटी अडकवल्यास नाव जाणून घेण्यात वेळ जाणार नाही.
  • Log in or register to post comments

किंवा झूमचे पार्टिसिपंट नेम

श्रीरंग_जोशी
Wed, 05/19/2021 - 07:45 नवीन
किंवा झूमचे पार्टिसिपंट नेम प्रत्येकाने स्वतःचा मिपा आयडीचे ठेवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मी तेच केलंय.

कंजूस
Wed, 05/19/2021 - 08:20 नवीन
मी तेच केलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

भारतीय रात्र ९. म्हणजे फारच

चौकस२१२
Wed, 05/19/2021 - 06:22 नवीन
भारतीय रात्र ९. म्हणजे फारच रात्र इकडे त्यामुळे नाही जमणार याचे रेकार्डिंग असेल काय नंतर बघायला ?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा