एलावेनिल व्हॅलॅरियन : भारताची नेमबाज सुवर्णकन्या
Elavenil Valarivan joins elite list with maiden senior Shooting World Cup gold in Rio
एलावेनिल व्हॅलॅरियन या भारताच्या नेमबाज कन्येने रिओ दि जनेरिओ (अर्जेंटिना) येथे नेमबाजीच्या जागतिक चषक स्पर्धेत (ISSF World Cup), २८ ऑगस्टला, १०मिटर एअर रायफल खुल्या गटात, सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रिय खेळ दिवसाला (#NationalSportsDay) हे पदक जिंकून तिने त्या दिवसाचा आनंद व्दिगुणित केला. या अगोदर एलावेनिलने जागतिक स्तरावरच्या नेमबाजीच्या कनिष्ठ (junior) गटांत अनेक पदके मिळवलेली आहेत. खुल्या गटातील तिचे हे सुवर्णपदार्पण सर्व भारतियांना आनंदाचे आणि अभिमानाचेच वाटेल !
तीन जिगरबाज कन्यांनी गेल्या आठवड्यात भारतावर "हॅट ट्रिक सुवर्णवर्षाव" केला आहे !
या सर्व जिगरबाज भारतकन्यांचे जगज्जेत्या कामगिरीसाठी मनःपूर्वक अभिनंदन !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त बातमी एक्का काका...ठ्यांकू
वा! छानच! अभिनंदन!
तिन्ही चॅम्पिअन्सचे अभिनंदन ...
यो. तिघींचे मन:पूर्वक अभिनंदन
वा !
आजच पेपर मध्ये पाहिले भारत
वरच्या तीन सुवर्णकन्यांमध्ये
या स्पर्धेत भारतिय नेमबाजांनी अजून दोन पदके पटकावली आहेत... १. अभिषेक वर्मा : १० मीटर एअर पिस्तल : सुवर्णपदक. २. सौरभ चौधरी : १० मीटर एअर पिस्तल : कास्यपदक.