✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शनिवारवाडा कट्टा - २७ जानेवारी दुपारी ४ वाजता

श
श्रीरंग_जोशी यांनी
Tue, 01/23/2018 - 11:45  ·  लेख
लेख
यापूर्वी २२ जून २०१४ रोजी मी प्रथमच मिपा कट्ट्याला उपस्थित राहिलो. त्या कट्ट्याच्या गोड आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्या कट्ट्याचा धागा अन वृत्तांत. पुन्हा एकदा तसाच धमाल कट्टा अनुभवण्यासाठी नव्या कट्ट्याचा बेत आखला आहे. भेटीचे स्थळ: शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारासमोरचे प्रांगण तारीख व वेळ: शनिवार २७ जानेवारी, दुपारी ४ वाजता अधिकाधिक मिपाकरांनी, मिपावाचकांनी या कट्ट्याला आवर्जून यावे ही विनंती. गेल्या कट्ट्याच्या वेळी काढलेला हा फोटो. २७ जानेवारीच्या कट्टयाबद्दल काही प्रश्न असल्यास प्रतिक्रियेद्वारे विचारावे ही विनंती.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
24038 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

शुभेच्छा

गॅरी ट्रुमन
Tue, 01/23/2018 - 11:55 नवीन
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा. नेहमीप्रमाणे कट्ट्याला येऊ शकणार नाही. वृत्तांत आणि फोटोची वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments

यायची खूप इच्छा आहे पण लॉन्ग

बिटाकाका
Tue, 01/23/2018 - 11:56 नवीन
यायची खूप इच्छा आहे पण लॉन्ग वीकेंडला पुण्याबाहेर असल्यामुळे कट्टा चुकणार :(.
  • Log in or register to post comments

कट्याला शुभेच्छा...

मुक्त विहारि
Tue, 01/23/2018 - 11:57 नवीन
कट्याला शुभेच्छा...
  • Log in or register to post comments

लॉंग वीकेंडमधला बरोबर मधला

गवि
Tue, 01/23/2018 - 12:26 नवीन
लॉंग वीकेंडमधला बरोबर मधला दिवस धरल्यास अशा कट्टयाला कितपत उपस्थिती लाभेल याबद्दल शंका येते. भारतीय जनताही वीकेंड लाइफबाबत जागृत होतेय श्रीरंगअण्णा. ;-)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

कपिलमुनी
Tue, 01/23/2018 - 12:31 नवीन
कट्टयाला शुभेच्छा
  • Log in or register to post comments

कट्ट्याला आणि श्रीरंगपंतांना

अभ्या..
Tue, 01/23/2018 - 12:43 नवीन
कट्ट्याला आणि श्रीरंगपंतांना लै लै शुभेच्छा. व्रुत्तांताच्या फोटोत चि. उमा दिसावी हि अपेक्षा. ;)
  • Log in or register to post comments

शनिवारी ऑफिसला सुट्टी

प्रचेतस
Tue, 01/23/2018 - 12:52 नवीन
शनिवारी ऑफिसला सुट्टी नसल्याने संध्याकाळी ६ नंतरच जमू शकेल.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक :D

टवाळ कार्टा
Tue, 01/23/2018 - 15:57 नवीन
शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक :D
  • Log in or register to post comments

आम्ही इथे मुंबैत पाट्या टाकणे

पिंगू
Tue, 01/23/2018 - 17:12 नवीन
आम्ही इथे मुंबैत पाट्या टाकणे सुरु केल्याने पुण्यनगरीतल्या कट्ट्याला येणे शक्य होणार नाहीये.. तस्मात आय माय स्वारी बरं का..
  • Log in or register to post comments

शनिवारवाड्यातील शनिवारच्या

सस्नेह
Tue, 01/23/2018 - 17:18 नवीन
शनिवारवाड्यातील शनिवारच्या कट्ट्याला मॉप शुभेच्छा ! लैच्च महत्वाच्या कामात असल्याने येऊ शकणार नाही, इच्छा असूनही !
  • Log in or register to post comments

श्रीरंगजी,

ज्योति अळवणी
Tue, 01/23/2018 - 18:24 नवीन
श्रीरंगजी, कट्टा पुढील शनिवारी करता येईल का? अनेक मिपाकर येऊ शकत नाहीयेत 27 तारखेला. मी मुंबईमध्ये असते. या शनिवारी नाही जमणार. पण पुढील शनिवारी ठरवलत तर नक्की प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

सहमत...

टर्मीनेटर
Wed, 01/24/2018 - 12:57 नवीन
सहमत...३१ तारखे पर्यंत केरळ दौरा असल्यामुळे मनापासून यायची इच्छा असूनही २७ तारखेला उपस्थित राहणे शक्य नाही...तारीख पुढची असेल तर नक्की येणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

भरघोस शुभेच्छा

नाखु
Wed, 01/24/2018 - 07:25 नवीन
शनिवार न कर्त्याचा वार असल्याने येणे लै अवघड आहे पंताना भेटायची प्रबळ इच्छा असलेला नाखु
  • Log in or register to post comments

शनिवार न कर्त्याचा वार .....

चौथा कोनाडा
गुरुवार, 01/25/2018 - 10:23 नवीन
शनिवार न कर्त्याचा वार ..... लै भारी कारण ! :-)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मी यायचा प्रयत्न करणार अहे या

आनन्दा
Wed, 01/24/2018 - 12:39 नवीन
मी यायचा प्रयत्न करणार अहे या वेळेस.. कृपया फोन नं व्यनि करावा ही विनंती.
  • Log in or register to post comments

अरे वा!

समीरसूर
Wed, 01/24/2018 - 13:33 नवीन
श्रीरंग साहेब, २७ जानेवारीला मी पूर्ण दिवस एका समारंभात ढेपेवाडा येथे असणार आहे; त्यामुळे या कट्ट्यास इच्छा असूनही येता येणार नाही. कट्ट्याला अनेक शुभेच्छा! वेळ मिळाल्यास घरी या; बर्‍याच वर्षांत भेट नाही. कट्टा पुढे ढकलला गेल्यास येण्याचा अवश्य प्रयत्न करीन. समीर
  • Log in or register to post comments

पुण्यातले सकाळी ९-३ कट्टे

कंजूस
Wed, 01/24/2018 - 13:35 नवीन
पुण्यातले सकाळी ९-३ कट्टे रेल्वेमुळे जमु शकतात. संध्याकाळी आल्यास रात्री पावणे बाराची यात्रा स्पेशल पंढरपुर गाडीतून परत यावे लागते.
  • Log in or register to post comments

मी नक्की येणार. कृपया दिनांक

हेमंतकुमार
Wed, 01/24/2018 - 13:51 नवीन
मी नक्की येणार. कृपया दिनांक बदलू नये ही विनंती ☺
  • Log in or register to post comments

वहिवटीप्रमाणे या पुणे

पगला गजोधर
Wed, 01/24/2018 - 14:07 नवीन
वहिवटीप्रमाणे या पुणे कट्ट्याचा, धागा क्र २ व क्र ३, कधी काढणार आहात ?
  • Log in or register to post comments

अरे वाह, मस्तच. शुभेच्छा आणि

पद्मावति
Wed, 01/24/2018 - 14:15 नवीन
अरे वाह, मस्तच. शुभेच्छा आणि सचित्र वृत्तांताच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

संध्याकाळी सहा नंतर प्रयत्न

सूड
Wed, 01/24/2018 - 17:43 नवीन
संध्याकाळी सहा नंतर प्रयत्न करु शकेन तोवर असाल तर तसं सांगून ठेवा.
  • Log in or register to post comments

श्रीरंग आणि जुइ पुण्यात

अजया
Wed, 01/24/2018 - 19:52 नवीन
श्रीरंग आणि जुइ पुण्यात स्वागत. कट्ट्याची तारीख नक्की आहे का तिसरा धागा निघालाय? !!
  • Log in or register to post comments

तिसरा धागा निघालाय?

मुक्त विहारि
गुरुवार, 01/25/2018 - 04:40 नवीन
अद्याप तरी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

चि. उमाला विसरलात???

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/25/2018 - 14:07 नवीन
चि. उमाला विसरलात???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

येणार!

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/24/2018 - 20:07 नवीन
येणार!
  • Log in or register to post comments

मोठा सप्ताहांत असल्याने शक्य

सतिश गावडे
Wed, 01/24/2018 - 21:57 नवीन
मोठा सप्ताहांत असल्याने शक्य होणार नाही. :)
  • Log in or register to post comments

मी यायचा प्रयत्न करणार अहे या

शित्रेउमेश
गुरुवार, 01/25/2018 - 09:21 नवीन
मी यायचा प्रयत्न करणार अहे या वेळेस..
  • Log in or register to post comments

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Fri, 01/26/2018 - 23:34 नवीन
प्रतिक्रियांसाठी अन शुभेच्छांसाठी सर्वांचा अत्यंत आभारी आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू करण्याच्या २ दिवस आधी हा धागा टाकला. त्यामुळे प्रतिक्रियांवर उत्तरं देता आली नाहीत. आजच पहाटे मुंबईत पोचलो अन सकाळी पुण्यात पोचलो आहे. नेहमीप्रमाणेच अत्यंत मर्यादित रजा आहेत तसेच फार थोड्या दिवसांत बरेच काही साध्य करायचे आहे. याच कारणाने कट्ट्याची तारीख अधिक मंडळींच्या सोयीची निवडणे शक्य होत नाहीये. यासाठी आपला क्षमाप्रार्थी आहे. उद्या दुपारी ४ वाजता मी व जुइ चि. उमासह शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारासमोरील प्रांगणात पोहोचू. साडेसहापर्यंत थांबण्याची योजना आहे. कन्येने कंटाळा न केल्यास थोडे अधिक थांबू शकू. साडेतीन वर्षांपूर्वीच्या कट्ट्याला भेटलेल्या मिपास्नेह्यांच्या पुनर्भेटीसाठी अन अनेक इतर मिपास्नेह्यांच्या प्रथम भेटीसाठी उत्सुक आहोत. गेल्या खेपेप्रमाणे काही मिपावाचकही कट्ट्याला उपस्थित राहून दुधात साखर घालतील अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

श्रीरंग, किती वाजता पोचत आहात

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 01/27/2018 - 16:14 नवीन
श्रीरंग, किती वाजता पोचत आहात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद, नक्क्की भेटूयात

हेमंतकुमार
Sat, 01/27/2018 - 08:57 नवीन
धन्यवाद, नक्क्की भेटूयात
  • Log in or register to post comments

कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा.

शेखरमोघे
Sat, 01/27/2018 - 09:49 नवीन
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा. पुण्याबाहेर असल्याने कट्ट्याला येऊ शकणार नाही. सविस्तर वृत्तान्त कळेलच.
  • Log in or register to post comments

या कट्ट्यात आमची संघटना .......

चौथा कोनाडा
Sat, 01/27/2018 - 10:09 नवीन
या कट्ट्यात आमची संघटना सहभागी होऊ शकत नाही, वेळे अभावी. तथापी कट्ट्यास आमच्या संघटने तर्फे भरभरून शुभेच्छा ! - मिपा उर्वरित कट्टा करणी सेना
  • Log in or register to post comments

आज २७ तारीख आणि दूपारचे ४ वाजून गेले...

मुक्त विहारि
Sat, 01/27/2018 - 16:22 नवीन
झाला का कट्टा सुरु?
  • Log in or register to post comments

येणार.

प्रदीप@१२३
Sat, 01/27/2018 - 17:40 नवीन
येणार.....यायचा प्रयत्न.
  • Log in or register to post comments

लाईव्ह अपडेट ?

कपिलमुनी
Sat, 01/27/2018 - 18:09 नवीन
??
  • Log in or register to post comments

प्रकाश आंबेडकरांनाही बोलवा. ;

कानडाऊ योगेशु
Sat, 01/27/2018 - 19:05 नवीन
प्रकाश आंबेडकरांनाही बोलवा. ;) कट्ट्यासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

प्रकाश आंबेडकरांनाही बोलवा. ;

कानडाऊ योगेशु
Sat, 01/27/2018 - 19:05 नवीन
प्रकाश आंबेडकरांनाही बोलवा. ;) कट्ट्यासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

कट्टा संपन्न

श्रीरंग_जोशी
Sat, 01/27/2018 - 19:57 नवीन
सर्वप्रथम मी कट्ट्याला उपस्थित असणार्‍यांची मी स्वतः खूप उशिरा पोचल्याबद्दल माफी मागतो. बहुधा मी ४:५० वाजता पोचलो. डॉ. सुहास म्हात्रे, कुमार१ व अभिजीत अवलिया यांना कट्ट्यात सामील झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. थोडक्यात क्षणचित्रे - मी चि. उमा व माझ्या आईबरोबर कट्ट्याच्या स्थळी पोचलो तेव्हा डॉ. म्हात्रे व कुमार१ तिथे बर्‍याच वेळापासून उपस्थित होते असे दिसले. मी भेटताच उशिर झाल्याबदल त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. पुढच्या मिनिटालाच जुइ तिच्या वडिलांबरोबर कट्टास्थळी पोचली. त्यानंतर आम्ही थोडा वेळ ओळख करणे व जुजबी गप्पा करण्यात घालवला अन अभिजीत अवलिया यांचे आगमन झाले. क्रमशः ....
  • Log in or register to post comments

माझा हा पहिलाच मिपा कट्टा.

हेमंतकुमार
Sat, 01/27/2018 - 20:16 नवीन
माझा हा पहिलाच मिपा कट्टा. त्यामुळे आभासी जगातील काहीजणांना तरी प्रत्यक्षात पाहण्याची जाम उत्सुकता होती. ४.१० ला पोचलो. नजर सैरभैर. अद्याप कोणालाच पाहिलेले नाही, मग ओळखायचे तरी कसे? वाड्याच्या दाराशी एकजण उभे होते. त्यांच्याकडे पाहून कसेनुसे हसलो आणि भीतभित विचारले,"तुम्ही जोशी का?" पण निराशाच पदरी कारण त्यांनी फक्त नकारदर्शक मान हलवली. मग थोडी उंचावरील जागी उभे असलेल्यांवरून नजर फिरवू लागलो. मग एक 'सभ्य गृहस्थ' नजरेत भरले. का कोण जाणे पण एकदम आतून वाटले की हा 'आपला माणूस' आहे. मग हळूच जवळ गेलो अन त्यांचेकडे बोट दाखवत 'मिसळ पाव?' असे विचारले. आता मात्र नेम बसलेला होता! मंडळी, हे गृहस्थ म्हणचेच आपले आदरणीय आणि मित्रवत डॉ. सुहास म्हात्रे ! तर अशा या आनंददायी भेटीने शनिवारचा शनिवारवाडा कट्टा चालू झाला होता..…. (क्रमशः)
  • Log in or register to post comments

छान !

चौथा कोनाडा
Sat, 01/27/2018 - 20:30 नवीन
छान ! पुभाप्र. कट्ट्याआडून आपलं मानूस ची झाइरात केली, कौतुक वाटलं ! :-)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

कट्टा समालोचन.....

हेमंतकुमार
Sat, 01/27/2018 - 21:34 नवीन
पुढे चालू... आता मात्र एकदम जिवात जीव आला. आता दोन ऐवजी चार डोळे अन्य मिपाकरांची वाट पाहू लागले. दरम्यान आमचा ओळख कार्यक्रम सुरू झाला. आता हे ‘डॉ’ गृहस्थ म्हणजे माझ्यासारखेच वैद्यकीय डॉ. की पीएचडी धारक हे अद्याप कळायचे होते. मग जेव्हा कळले की आम्ही दोघेही पुण्याच्याच बी.जे. मेडिकल चे माजी विद्यार्थी आहोत तेव्हा झालेला आनंद काय सांगू ! मग ती ‘तुमची बॅच, आमची बॅच, कोणते हॉस्पिटल-युनिट, अजून कोणकोण वर्गातले...... असे मस्त स्मरणरंजन झाले. दरम्यान एकीकडे वाड्यावरील लोकांची झुंबड वाढत चाललेली. अहो, जोडून सुट्या आल्यावर होणारच ना. त्यात सेल्फीवाल्यांचा धुमाकूळ. मी जरी पुणेकर असलो तरी आज जवळजवळ वीस वर्षांनी वाड्यात शिरणार होतो. तसे एकदा शालेय जीवनात तिथल्या एक-दोन सहली झाल्यावर पुढे तिथे मुद्दामहून आत कशाला कोण जाईल? ...आणि मग आम्हा दोघांच्या गप्पा रंगात येत असतानाच श्रीरंगचे ‘सकुसप’ आगमन जाहले...... (आता फुडचे एक दोन प्रतिसाद अन्य कट्टेकरींचे येउद्यात की राव....)
  • Log in or register to post comments

श्रीरंग जोशी आणि कुमार१ यांनी

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 01/27/2018 - 22:03 नवीन
श्रीरंग जोशी आणि कुमार१ यांनी कट्टावर्णन दिले आहेच, त्यात मी काही प्रकाशचित्रांची भर टाकतो...

Image removed. बघा, बघा, मिपाकट्टा होतोय म्हटल्यावर शनिवारवाड्यावर किती अफाट जनसागर उसळलेला होता ते ;)



Image removed.

Image removed. मिपाकर आणि श्रीरंग जोशी यांच्याबरोबर आलेले ज्येष्ठ कट्टेकरी



Image removed. लाईट अँड साऊंड शोसाठी बनवलेल्या प्रेक्षकसज्जातल्या खुर्च्यांत बसून गप्पा मारताना शनिवारवाड्याच्या परिसराचे घेतलेले एक चित्र



  • Log in or register to post comments

कारने गोल फेरी मारली

गवि
Sat, 01/27/2018 - 22:32 नवीन
कारने गोल फेरी मारली शनिवारवाड्याला. फारच कंजेस्टेड ठिकाण. फक्त एक जलद भेट घेऊन निघायची इच्छा होती पण पार्किंग सोडाच, थांबवणंही शक्य झालं नाही. मैलोगणती दूर पार्किंग करुन फॅमिलीला तंगदतोड़ करत आणणं कठीण होऊन बसलं. त्यामुळे नाइलाजाने शनिवारवाड्याला दुरूनच रामराम करावा लागला. उत्स्फूर्त कट्टयांच्या जागा केवळ "मध्यवर्ती" न ठेवता किंचित पार्किंग फ्रेंडली ठेवाव्यात अशी विनंती. पुढील कट्टयांना शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

उत्स्फूर्त कट्टयांच्या जागा केवळ "मध्यवर्ती" न ठेवता.....

मुक्त विहारि
Sun, 01/28/2018 - 00:02 नवीन
.....किंचित पार्किंग फ्रेंडली ठेवाव्यात अशी विनंती. ------ आमच्या डोंबोलीला कधी येताय? बस सिर्फ लोकल काही हय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बस सिर्फ लोकल काही हय....

गवि
Sun, 01/28/2018 - 08:31 नवीन
बस सिर्फ लोकल काही हय....
का ब्वॉ? स्वतःचं सोईचं वाहन घेऊन येणाऱ्या बाह्य मनुष्यांना डोम्बोलीत प्रवेश बंद? ;-) अहो दोनतीनदा येऊन गेलोय तिथे स्ववाहनाने. जिथे वाहनतळ आहे आणि बसणं, खानपान, गप्पा अशा सोयी एकत्र मिळतील अशा जागा उपलब्ध असल्याचं आठवतं पण नावं आठवत नाहीत. अर्थात लोकलनेच येणें ही पूर्वअट असेल डोम्बोलीची तर मग अन्यत्र भेटूच. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

स्वतःचं सोईचं वाहन घेऊन येणाऱ्या बाह्य मनुष्यांना...

मुक्त विहारि
Sun, 01/28/2018 - 09:54 नवीन
... डोम्बोलीत प्रवेश बंद?" असे नाही. पण केवळ गाडी ठेवायला जागा मिळाली नाही, म्हणून काम होवू शकले नाही, ही अडचण डोंबिवलीला तरी येवू शकत नाही. कारण लोकलचा पर्याय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ओह, तशा अर्थाने.. ओक्के.

गवि
Sun, 01/28/2018 - 10:42 नवीन
ओह, तशा अर्थाने.. ओक्के. मग ठरवा आता.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ओके...

मुक्त विहारि
Sun, 01/28/2018 - 12:16 नवीन
ठरवू लवकरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

लोणावळा एमटिडिसी ( ते खरंतर

कंजूस
Mon, 01/29/2018 - 07:01 नवीन
लोणावळा एमटिडिसी ( ते खरंतर मळवलीला आहे) इथे दहापैकी नऊ गोष्टी आहेत. - पुणे ,मुंबईस मध्यवर्ती. - पार्कींग भरपूर - रिझॅाट एन्ट्री फी नाही - हॅाटेलात जागा भरपूर -मोठा ग्रुप असल्यास बाजुचा डाइनिंग हॅाल - फिरत फिरत गप्पा मारता येतात दोनचार गटांना - स्त्रिया ,मुले आल्यास त्यांनाही चालेल - रेल्वेनेही येता येते *( विमानतळ दूर आहे) *(कँटिनचा कान्ट्रॅक्टर बदलला की थोडा फरक पडतो मेन्यवर इतकंच)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

साधारण खर्च किती?

मुक्त विहारि
Mon, 01/29/2018 - 11:43 नवीन
आणि बाहेरून खाद्य पदार्थ आणले तर चालतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा