कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही |३|

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
26 Apr 2017 - 9:10 pm

इतकी प्रदीर्घ शेरोशायरी आजपावेतो कोणत्याही गज़ल पूर्वी झालेली नाही. पण हीच फैझची ख़ासियत आहे. त्याच्या सृजनात्मकतेचा ठाव घेता येत नाही. प्रत्येक ओळीगणिक तो आणखी जादूमय होत जातो आणि नशेची खुमारी वाढत जाते.

कल जो पी थी अजी, ये तो उसका नशा है,
तुम्हारी क़सम आज पी ही नही |

प्रियकर प्रेयसीला समजावतोयं, मला जी नशा आहे ती कालच्या दारुची आहे. आज, तुझी शपथ, मी प्यालेलो नाही !
________________

आज कुछ तो नशा, आपकी बात का है,
और थोडा नशा, धिमी बरसात का है,
हमें आप यूं ही, शराबी न कही ये,
ये दिलपे असर, तो मुलाक़ात का,
... है मुलाक़ात का |

हिचकींया आ रही है,
ये क्या हो गया है ?
तुम्हारी क़सम आज पी ही नही |

कल जो पी थी अजी.... |१|

खरं तर आजची नशा आहे ती तुझ्या शब्दांची आहे. आणि त्यात हा हलकासा पाऊस त्या नशेची जादू वाढवतोयं. मला तू पियक्कड समजू नकोस. ही नशा माझ्या हृदयावर अंमल करुन जातेयं, (बुद्धिवर नाही). आणि तो सगळा तुझ्या भेटीचा महौल आहे.

मग प्रियकर स्वतःलाच विचारतो, `मला उचकी लागतेयं, ती कशानं ?' पण मग पुन्हा स्वतःला सावरतो आणि तिला समजावतो : आज, तुझी शपथ, मी प्यालेलो नाही ! मला जी नशा आहे ती कालच्या दारुची आहे.

________________________________

लोग कहेते है पीए बैठा हूं,
ख़ुदको मदहोश किये बैठा हूं,
ज़ान बाकी है, वो भी ले लिजे,
दिलको पहेलेही, दिए बैठा हूं |

हम तो मदहोश है, आप जबसे मिले,
आज पी हो तो ज़ालीम, जवानी जले,
यूं ही घबरा गए, डग़मगाने तो दिजे,
देखीये ये तो है, प्यारके सिलसिले,
प्यारके सिलसिले.....
थाम लिजे हमें बस यही इल्तीज़ा है,
तुम्हारी क़सम आज पी ही नही | २|

कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है,
तुम्हारी क़सम आज पी ही नही |

लोकांना वाटतंय की मी पिऊन बसलोयं आणि माझं देहभान हरपलंय. आता तुला काय सांगू ? हृदय तर तुला दिलेलंच आहे, आता हे प्राण पण तुला अर्पण करतो ! मी तर तुला भेटल्यापासूनच असा बेभान आहे. मला माझ्या तारुण्याची शपथ, मी आज तरी प्यालेलो नाही. पुढे फैझ कहर करतो ! तो म्हणतो तुझ्या या अचानक येण्यानं माझ्या पायाखालची जमीन सरकलीये, आता मला थोडं डगमगून घेऊ दे. हा सारा आपल्या इश्काचा खेळ आहे. आता तू फक्त एक कर.... मला सावर ! कारण तुझी शपथ, आज मी प्यालेलो नाही ! ही जी नशा आहे ती कालच्या दारुची आहे.
____________________________

मी खरंच प्यालेलो नाही. मी प्यालेलोच नाही. अजिबात प्यायलो नाही. जी काय नशा आहे ती कालच्या दारुची आहे.

हां सच है पी ही नही,
के मैंने पी ही नही .....
कल जो पी थी अजी....

आता ही संपूर्ण गज़ल पुन्हा एकदा ऐका !

कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है |१|

कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है |२|

संगीतप्रकटन

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

27 Apr 2017 - 7:57 am | यशोधरा

वा!