डी फॉर डान्सबार ( २)

वरुण मोहिते's picture
वरुण मोहिते in जनातलं, मनातलं
10 Nov 2016 - 12:39 am

डी फॉर डान्सबार (१)

भेटली ती आमचं सगळं चालू झालं. वास्तविक 10-15 लाख उडवावे एकाच मुलीवर असा नव्हतं.पण काय माहित काय झालं ह्या वेळी . खरं सांगतो 100 ठिकाणी गेलेलो देशात आणि परदेशात .पण काही गोष्टी होतात . मी आईचा एकटा मुलगा वडील नाहीत आई बायको शिक्षण क्षेत्रात . वडील मी समजत नसतानाच गेले . नगरसेवक होते .मोठं कुटुंब एकत्र व्यवसाय काही झालं कि पाठीशी असणारं. पण मला ना आई आणि बायको ह्यांचा खूप प्रभाव मी बाहेर कितीपण दादागिरी करेन पण ह्या दोघी बोल्या चूप की गप्प बसेन असं होतं..कोणातरी बोललं आयटम असं मला नाही जमत असं मुलींना बोलायला . पार बारामती पासून ते चर्चगेट पर्यंत सगळीकडे शिकलो पण हे मला नाही जमलं . आई आणि बायको चा प्रभाव म्हणा हवंतर .असो मला आजही जमत हा विचार नाही पण आजही जावं लागत बाहेरून लोकं आली कीं.तर सांगण्याचा मुद्दा हा कीं ती भेटली हॉटेलिंग आणि बाकी सगळं चालू होतं . बायकोला समजू नये म्हणून मेसेज डिलिट करणं पण चढवणारे मित्र आणि बाकी लोक .पण होतं असं .एकतर मी खूप कमी लोकांशी बोलतो .आजपण माझा ग्रुप खूप छोटा आहे पण बाहेरची लोकं चढवतात सावध राहा अश्या लोकांपासून .आता आमचं छान जमलं होतं तिचं आणि माझं. दिवसभर गप्पा संध्याकाळी जाऊन पैसे उडवायचे .आ राहा ना वरून मैने आज वो साडी डाली है . मी काम सोडूनही जायचो . पण तिचं काम होतं ते. ती माझ्याशी प्रामाणिक होती . इतके पैसे दिले कीं प्रामाणिक असो अथवा असो अपना क्या जाता. एलिट बार होता शिकलेल्या मुली होत्या बँकिंग वैग्रे सगळं समजायचं . अश्याच एकदा गप्पा चालू होत्या मी बोलो कीं मुलगा हवा कीं मुलगी ती बोली वरून आम्ही ज्या परिस्थितीत राहतो ना आणि जे काही आम्ही पाहिलंय तर कोण बोलेल मुलगी हवी .तिच्यासमोर काही दाखवलं नाही पण रडायला आलं नंतर थोडं आणि विचार पाहून .खूप पाहत होतो माझ्या कर्जत पनवेल पासून ते परदेशात कशी वागू शकतात हि लोकं अशी वाटायचं . किळस वाटतो मोठी मोठी लोकं अशी वागताना .
(क्रमशः )

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

रुस्तम's picture

10 Nov 2016 - 11:29 am | रुस्तम

सं म कृपया भागांना

डी फॉर डान्सबार - 1
डी फॉर डान्सबार - 2
डी फॉर डान्सबार - 3

असे नंबर द्या ना

धोणी's picture

10 Nov 2016 - 11:38 am | धोणी

बोर होतंय जाम
एकतर तिन्ही भागात तेच तेच लिहिलंय , छोटे आहेत तिन्ही भाग

तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतलंय का?

मराठी कथालेखक's picture

11 Nov 2016 - 2:21 pm | मराठी कथालेखक

वरूण भाऊ
दहा-पंधरा लाख वगैरे ठीक आहे. पण त्याच्या मोबदल्यात काय काय मिळालं हे जरा विस्तारानं येवू द्या की,

कमवू's picture

11 Nov 2016 - 3:26 pm | कमवू

पकाव

वाचतेय.जरा सुसंगत लिहा ना भाऊ.तुम्हाला बरंच काही लिहायचंय पण लिहिलं नाही असं वाटतंय.

साहना's picture

12 Nov 2016 - 12:03 am | साहना

ह्या विषयावर मला अभ्यास करण्याची संधी २००९ साली भेटली होती. पण मी लीड नसल्याने माझे काही प्रश्न अनुत्तरीतच राहिले तुम्हाला उत्तर द्यायची इच्छा असेल तर मी इथे विचारू का ?

फुल भंकस लावलीये यार, सांगता येत नसंल तर बळजबरी नाही.

टवाळ कार्टा's picture

13 Nov 2016 - 4:04 pm | टवाळ कार्टा

लिहीत रहा, जमेल हळूहळू

माझीही शॅम्पेन's picture

14 Nov 2016 - 8:45 pm | माझीही शॅम्पेन

वरूण भाऊ ...
विषय अतिशय शेलकी आहे पण काही सूचना (तुम्ही चांगलं लिहू शकता असं वाटत म्हणून धाडस करतोय)

१) भाग थोडे मोठे टाका जेणेकरून फारच छोटा तुकडा वाचतो आहे असं वाटणार नाही
२) कथेत थोडी सुसूत्रता येऊद्या , आपल्याला प्रत्येक भागातून काय सांगायचं आहे हे चेकवा किंवा थोडं वाचणाऱ्याच्या भूमिकेत जाऊन हाताला काय लागत आहे हे पाहायचा प्रयत्न करा
३) जमल्यास कोणा कडून तरी थोडस प्रूफ रिडींग करून घ्या

पु ले शु

एमी's picture

16 Nov 2016 - 10:07 am | एमी

दोन शक्यता आहेत.

1. भूतकाळातील आपल्या वागण्याचं मनावर ओझं/दडपण आलंय ते कुठेतरी सांगून मोकळं व्हावंस वाटतय. -> यासाठी प्रोफेशनल काऊंसलरकडे जा असे सुचवते.

2. भूतकाळ मागे टाकून तुम्ही पुढे गेलेला आहात; पण त्या अनुभवांबद्दल लिहल्यास इतर कोणालातरी फायदा होऊ शकेल (मग त्या मार्गात दहाजणांकडून टाँट मिळाले तरी ठीक! I am over with it आणि आता लोक काय बोलतील याने मला फरक पडत नाही!) असे वाटल्याने लिहीत आहात -> यासाठी एक वॉलंटरी लेखनीक शोधा असे सुचवते. तुम्ही रँडमली जसे मनात येइल तसे त्याच्याशी बोला. नीटपणे मांडणे हे त्या लेखकाचे काम. त्याच्या लेखावरती एक डिस्क्लेमर लावायला सांगा फक्त की "सगळे अनुभव खरे नाहीत. लेखकाने सिनेमेटीक लिबर्टी घेतली आहे."

===
या लेखमालेचे काय व्हायचंय ते होऊदेत पण तुम्हालामात्र पुढील वैयक्तीत, व्यवसायीक वाटचालीसाठी शुभेच्छा!

मराठी कथालेखक's picture

16 Nov 2016 - 12:44 pm | मराठी कथालेखक

आणि लेखकाला दहा लाखाचे दहा टक्के तरी द्या :)

हा हा :-D खरंतर मी तुमचंच नाव सुचवणार होते 'लेखनीक' म्हणून. या विषयाला तुम्ही नीट मांडाल असे वाटते. आता ते वॉलंटीअर म्हणून करायचं की मोबदला घेऊन ते तुम्ही दोघं ठरवा.

वरुणकडे सांगण्यासारखं बरंचकाही आहे पण तो 'लेखक' नाही. आणि नक्की किती सांगावे, किती लपवावे हेदेखील ठरवता येत नाहीय असे वाटले. म्हणूनच सिनेम्याटीक लिबर्टीचा डिस्क्लेमरदेखील आधीच सुचवला ;-)

मराठी कथालेखक's picture

16 Nov 2016 - 1:27 pm | मराठी कथालेखक

मोबदला म्हणून माझ्या सगळ्या धाग्यांवर प्रत्येकी दहा (स्वतः + मित्र + डुआयडी) अशा प्रतिक्रिया द्यायच्यात :)

टवाळ कार्टा's picture

16 Nov 2016 - 12:55 pm | टवाळ कार्टा

थोडे आणखी मूडमध्ये लिहायचे असेल तर एक टंचनिका ठेवा =))

आदिजोशी's picture

18 Nov 2016 - 12:06 pm | आदिजोशी

तात्यांचं जुनं लिखाण शोधून वाचा

वरुण मोहिते's picture

18 Nov 2016 - 1:14 pm | वरुण मोहिते

त्यात काही नवीन नाही.. मी मला वाटलं ते लिहिलं . बाकी तात्या आमच्या बसणाऱ्यांमधला मेंबर आहे सो वाचायची गरज नाही.