डी फॉर डान्सबार (१)

वरुण मोहिते's picture
वरुण मोहिते in जनातलं, मनातलं
8 Nov 2016 - 4:28 pm

तर ती मला भेटली. असं कधी झालं नव्हतं.म्हणजे विचार करणारे माझे कित्येक मित्र घाटावरून उतरून यायचे खाली पनवेलला. पण मी नुसता टाईमपास करायचो. पार सोलापूर मोडनिंब पासून ते लातूरच्या पुढे. बारीच्या कहाण्या अजून वेगळ्या, सांगेन ती गम्मत.

बाकी असं कसं होऊ शकत असं नेहमी वाटायचं. कारण (तिथे) गेलो तरी माझं माझ्या बायकोवर होणाऱ्या जीवापाड प्रेम.. मी बोलू पण शकणार नाही तिला सोडून कुठल्या मुलीशी, अशी परिस्थिती. पण झालं. थोडे पैसे उडवल्यावर ती मला मॉल मध्ये भेटली. नुसती चॉकलेटचं माझ्या भावाला आवडतात म्हणून २-३ हजारांची घेतलेली. बाकी खरेदी तर विचारू नका. पण मला तेव्हापण चाललं. घे हवा ते. एव्हाना ४ लाखांवरून आकडा ९ लाखांपर्यंत गेला होता. आता खूप बोलण्यातून तिला पण वाटत होतं की बोलावं. पण मी माझी बायको सोडून मरेपर्यंत कोणाचा विचार करू शकणार नाही. जेव्हा ती बोलली की अजून काही मदत कर घराला आणि ऑल, तेव्हाही मी केली. पण झालं असं की तिच्या सोबत काही वेळा फिरणं इतकच माझं उद्दिष्ट होतं. चूक आहे माहित होतं कारण ती मला फसवत पण नव्हती. एकदा पैसे देणार की नाही यावरून त्यांचं ठरत आणि माणूस कसा आहे त्यावरून म्हणजे मुलींचं त्या. सो प्रॉब्लेम मलाच होता.(त्यांची बाजू पुढे येईलच). आता पण मी बायको सोडून कोणाचा विचारही करू शकत नव्हतो. काय करू ह्या पेचात होतो. तोवर १ वर्ष झालेलं.

मला समजत नव्हतं की निश्चित काय झालय. कारण परदेशापासून सगळीकडे जात आलो (पण) असं कधी माझ्याबाबतीत झालं नव्हतं. पण खरं सांगतो होऊ शकतं असं. एकेक मुंबईतले बार पहिले तर लक्षात येईल. नुसता आमच्या मुलुंड ठाण्यालाच २-२ लॉक लावलेले बार आहेत. सिलेक्टड एन्ट्री ओन्ली अश्या टाईपचे. अंधेरी, मीरारोड काही प्रमाणात गिरगाव इथे खूप एलिट क्लासचे बार आहेत. काय करावं मला कळत नव्हतं. तिच्यावर प्रेम नव्हतो करत, पण सवय झालेली. रेग्युलर बारला जाणे आणि स्टाईल मध्ये बसणे.

क्रमशः

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

8 Nov 2016 - 4:35 pm | तुषार काळभोर

असलेले काही नातेवाईक आहेत. जेजुरीला जाणारे काही आहेत.
असो..
लेखन थोडं विस्कळित वाटलं. रोचक अनुभवही मग वाचायचा कंटाळा येतो. तेवढी किंचीत काळजी घ्या.
पुढील भाग आवर्जून वाचायचेत.

हे लिखाण सुरेख, परिणामकारक आहे, पण थोडे शुद्धलेखनाचे नियम पाळून लिहिलेत तर अधिक परिणामकारक होईल.
हवे असल्यास माझी मुशो करायची तयारी आहे.
आणि अजून थोडे लिहा, इतके त्रोटक, लहान भाग रसभंग करतात जरा.

वरुण मोहिते's picture

8 Nov 2016 - 5:15 pm | वरुण मोहिते

कारण एकच असतं लिहायला कंटाळा येतो .

किसन शिंदे's picture

8 Nov 2016 - 5:41 pm | किसन शिंदे

.एव्हाना 4 लाखांवरून आकडा 9 लाखांपर्यंत गेला होता

आम्हा सामान्यांच्या तर विचारापलीकडील गोष्ट !!

तुषार काळभोर's picture

8 Nov 2016 - 5:45 pm | तुषार काळभोर

घरात बसून २०-५० लाखांचं वार्षिक उत्पन्न केवळ व्याजावर (किंवा सेट झालेला फॅमिली बिजनेस-ज्यात स्वतःचं काही अ‍ॅक्टीव सहभाग नाही) असणार्‍यांना पैशांचा पाऊस पाडताना बघितलंय.
इस्टेट एजंट्स एका एका व्यवहारात १०-२० लाख कमवतात. एकदम १० लाखाची रोकड हातात आली की त्यातले लाखभर रुपये पनवेलला जायला वेळ नाही लागत.

किसन शिंदे's picture

8 Nov 2016 - 5:58 pm | किसन शिंदे

बेफाम खर्च करतात म्हणून नाही तर सगळ कसं हाताशी आयतं मिळालेलं असतं याबद्दल.

या सोफिस्टीकेटेड वेश्याच असतात असं माझं मत आहे

अप्पा जोगळेकर's picture

8 Nov 2016 - 6:23 pm | अप्पा जोगळेकर

असोत बापड्या. ज्याचा त्याचा कामधंदा आहे शेवटी.

वरुण मोहिते's picture

8 Nov 2016 - 6:40 pm | वरुण मोहिते

एकतर मी ट्रिपल ग्रॅजुएट आहे मी माझ्या जीवावर पैसे उडवले. घरून पैसे घेणं मला कधीच पसंद नाही पण अश्या काही आमच्या गुंठामंत्र्यांच्या स्टोर्या पण सांगणारे .

किसन शिंदे's picture

8 Nov 2016 - 8:07 pm | किसन शिंदे

हे वरील संभाषण तुम्हाला उद्देशून नाहीये. पैलवान यांनी त्यांच्या प्रतिसादात ज्या लोकांबद्दल बोलतायत त्यांच्याबद्दल आहे.

उगा तुमचाच गैरसमज नको.

वरुण मोहिते's picture

8 Nov 2016 - 9:08 pm | वरुण मोहिते

चुकलो मी समजण्यात

तुषार काळभोर's picture

9 Nov 2016 - 11:57 am | तुषार काळभोर

शिकलेले अ‍ॅण्ड्/ऑर स्वतः कमावणारे अपवादात्मकच असतात डान्सबारमध्ये. माझा रोख डान्सबारमध्ये जाणार्‍या ९०+% लोकांकडे आहे.
तुम्हाला 'जाणीव' होण्याचे कारण 'तुम्ही शिक्षित असणे + स्वतः पैसे कमवणे' हे असणार, याची खात्री आहे!

वाचतोय. फार थोडे असं लिहायला धजावतात. लिहीत राहा. शुद्धलेखनासाठी काही मदत लागल्यास बेलाशक व्यनि करा.

पूर्णविरामांचा प्रॉब्लम आहे. भले तुम्ही स्वत: कमविले पण असे खर्च करणे योग्य नाही.

वाचतेय.विस्कळीत वाटला हा भाग.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Nov 2016 - 7:06 pm | अत्रुप्त आत्मा

तुटक, तुटक , तुटक!

पिलीयन रायडर's picture

8 Nov 2016 - 7:07 pm | पिलीयन रायडर

मलाही व्याकरणाचे नियम अगदी १००% माहिती नाहीत. पण वाचायला सोप्पं पडेल असं मुशो २-५ मिनिटात केलंय. सासंनी अपडेट केला धागा तर सगळ्यांनाच सोयीचं होईल.

विचार करा, मिपाकर एवढे कष्ट घेऊन सुद्धा वाचायला तयार आहेत. तेव्हा अजुन मनापासुन मोठे भाग लिहा. आणि टंकाळा बाजुला ठेवा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तर ती मला भेटली. असं कधी झालं नव्हतं.म्हणजे विचार करणारे माझे कित्येक मित्र घाटावरून उतरून यायचे खाली पनवेलला. पण मी नुसता टाईमपास करायचो. पार सोलापूर मोडनिंब पासून ते लातूरच्या पुढे. बारीच्या कहाण्या अजून वेगळ्या, सांगेन ती गम्मत.

बाकी असं कसं होऊ शकत असं नेहमी वाटायचं. कारण (तिथे) गेलो तरी माझं माझ्या बायकोवर होणाऱ्या जीवापाड प्रेम.. मी बोलू पण शकणार नाही तिला सोडून कुठल्या मुलीशी, अशी परिस्थिती. पण झालं. थोडे पैसे उडवल्यावर ती मला मॉल मध्ये भेटली. नुसती चॉकलेटचं माझ्या भावाला आवडतात म्हणून 2-3 हजारांची घेतलेली. बाकी खरेदी तर विचारू नका. पण मला तेव्हापण चाललं. घे हवा ते. एव्हाना 4 लाखांवरून आकडा 9 लाखांपर्यंत गेला होता. आता खूप बोलण्यातून तिला पण वाटत होतं की बोलावं. पण मी माझी बायको सोडून मरेपर्यंत कोणाचा विचार करू शकणार नाही. जेव्हा ती बोलली की अजून काही मदत कर घराला आणि ऑल, तेव्हाही मी केली. पण झालं असं की तिच्या सोबत काही वेळा फिरणं इतकच माझं उद्दिष्ट होतं. चूक आहे माहित होतं कारण ती मला फसवत पण नव्हती. एकदा पैसे देणार की नाही यावरून त्यांचं ठरत आणि माणूस कसा आहे त्यावरून म्हणजे मुलींचं त्या. सो प्रॉब्लेम मलाच होता.(त्यांची बाजू पुढे येईलच). आता पण मी बायको सोडून कोणाचा विचारही करू शकत नव्हतो. काय करू ह्या पेचात होतो. तोवर 1 वर्ष झालेलं.

मला समजत नव्हतं की निश्चित काय झालय. कारण परदेशापासून सगळीकडे जात आलो (पण) असं कधी माझ्याबाबतीत झालं नव्हतं. पण खरं सांगतो होऊ शकतं असं. एकेक मुंबईतले बार पहिले तर लक्षात येईल. नुसता आमच्या मुलुंड ठाण्यालाच 2 -2 लॉक लावलेले बार आहेत. सिलेक्टड एन्ट्री ओन्ली अश्या टाईपचे. अंधेरी, मीरारोड काही प्रमाणात गिरगाव इथे खूप एलिट क्लासचे बार आहेत. काय करावं मला कळत नव्हतं. तिच्यावर प्रेम नव्हतो करत, पण सवय झालेली. रेग्युलर बारला जाणे आणि स्टाईल मध्ये बसणे.

किसन शिंदे's picture

8 Nov 2016 - 8:13 pm | किसन शिंदे

मुशो अपडेटेड

मराठी कथालेखक's picture

8 Nov 2016 - 7:18 pm | मराठी कथालेखक

किती पैसे गेलेत हे महत्वाचं नाही.. एक मस्त आयटम तुम्ही फिरवलीत ह्याचा हेवा वाटतो.
त्याकरिता कदाचित ९० लाख कुणाला खूप जास्त वाटतील पण लेखकासाठी ते कदाचित ९० हजार वा ९ हजारासारखे असू शकतील.
कल्पना करा जर ९ हजार रुपये खर्च करुन मस्त आयटमबरोबर टाईमपास करता येणार असतील कित्येक लोक सहज तयार होतील. इथे लेखकाने ९ लाख खर्च केलेत म्हणून 'योग्य नाही' असा सूर लावला जातोय.

वरुण साहेब लिहित रहा.. थोडं तिच्या मादक सौंदर्याचं वर्णन पण येवू देत.. सोबत फिरतानाचा रोमान्स पण लिहा

सुबोध खरे's picture

8 Nov 2016 - 8:12 pm | सुबोध खरे

. एक मस्त आयटम तुम्ही फिरवलीत ह्याचा हेवा वाटतो.
हे काय पटलं नाही बुवा.
म्हणजे चार पैसेही न घालवता एखादी मुलगी (जी तुमच्यावर भाळली आहे) (एखादा "आयटम" तुमच्याच भाषेत) फिरवता आली तर अजून चांगलं का?

मराठी कथालेखक's picture

9 Nov 2016 - 11:22 am | मराठी कथालेखक

म्हणजे चार पैसेही न घालवता एखादी मुलगी (जी तुमच्यावर भाळली आहे) (एखादा "आयटम" तुमच्याच भाषेत) फिरवता आली तर अजून चांगलं का?

हो.. का नाही ? पैसे न घालवता मिळाली अजूनच उत्तम ...
इच्छा अनेकांना (सगळ्यांना म्हणत नाहीये) असतेच. पण जमत नाही इतकंच.

माम्लेदारचा पन्खा's picture

9 Nov 2016 - 8:07 pm | माम्लेदारचा पन्खा

आयटम वगैरेची गरज असते तरी कशाला ?

खटपट्या's picture

9 Nov 2016 - 8:24 pm | खटपट्या

कीती तो निरागस प्रतिसाद...

मराठी कथालेखक's picture

10 Nov 2016 - 3:42 pm | मराठी कथालेखक

आधी बायकोच्या इच्छा तरी पूर्ण कराव्यात...

..
बरोबर आहे, बायकोच्या शॉपिंग, आउटिंगमधून पैसे उरलेत तरच आयटम फिरवता येईल :)

चलत मुसाफिर's picture

8 Nov 2016 - 11:56 pm | चलत मुसाफिर

प्रामाणिकपणे लिहिलेले वेगळे अनुभव कधीही वाचनीय असतात. दुसरे म्हणजे विशिष्ट शब्द हे विशिष्ट संदर्भात योग्यच असतात. जर त्या मुलीचे स्वातंत्र्य आणि कायदेशीर हक्क हे अबाधित रहात असतील आणि अन्य कुणावर अन्याय होत नसेल, तर ग्राहक- विक्रेती असा संबंध प्रस्थापित होणे किंवा तसा तो साहित्यात दर्शविला जाणे याला हरकत नसावी.

ज्योति अळवणी's picture

9 Nov 2016 - 7:17 pm | ज्योति अळवणी

त्रोटक लिखाण वाटलं. पुढच्या भागात अजून लिंक लागेल असे वाटते.

वरुणभाउ लीहा. धाडस लागतं असं लीहायला. पु. भा. प्र.
थोडं रंगवून लीहायचं असेल तर बाकीचे लोक मदत करायला आहेतच...

पहिल्या वेलांटीसाठी i वापरा.

माम्लेदारचा पन्खा's picture

9 Nov 2016 - 8:43 pm | माम्लेदारचा पन्खा

काही लोक घाला असं म्हणतात हो.....;-)

मोदक's picture

9 Nov 2016 - 9:36 pm | मोदक

:))

खटपट्या's picture

9 Nov 2016 - 8:49 pm | खटपट्या

मला पहीली वेलांटी कुठे द्यायची आणि दुसरी कुठे द्यायची हेच माहीत नाही.

स्वाती दिनेश's picture

10 Nov 2016 - 4:58 pm | स्वाती दिनेश

इतर सर्वांनी सांगितले आहेच, जरा शु ले कडे लक्ष द्या, विस्कळित विचार आधी रफ स्वतःच्या व्य नि त किवा जीमेल ला साठवून ठेवा, मग परत एकदा वाचा आणि नीट एकत्र करून प्रकाशित करा. ह्याबाबत काही मदत लागल्यास मि पा कर आहेतच.
तुम्ही एक अत्यंत वेगळा अनुभव मनापासून लिहित आहात म्हणून ही सुचवण.
पु भा प्र.
स्वाती

जव्हेरगंज's picture

11 Nov 2016 - 12:19 am | जव्हेरगंज

आंदो!!!

वाचतोय.

पाटीलभाऊ's picture

11 Nov 2016 - 2:27 pm | पाटीलभाऊ

पुढचा भाग थोडा मोठा येऊ द्या.

सच६४८६'s picture

11 Nov 2016 - 3:13 pm | सच६४८६

मी असतो तर पहिले गृह कर्ज ९ लाखाने कमी करून टाकले असते ...

प्यार अपनी जगह...और गृह कर्ज अपनी जगह ...

कमवू's picture

11 Nov 2016 - 3:25 pm | कमवू

पकाव