स्वामी विवेकानंद- भाग-१ - दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन...
स्वामी विवेकानंद एक बहुआयामी व्यक्तीमत्व होते. त्यांच्या विषयी विचार करतांना त्यांना एका साच्यात बसविता येत नाही. खर म्हणजे अस कोणत्याच माणसा विषयी होत नाही व करु नये अस वाटत. त्यांच्याविषयी कधी सहानुभुती वाटते कधी चीड निर्माण होते कधी त्यांच्यातली रसिकता भुरळ पाडते कधी आदर वाटतो कधी कौतुक. कधी आश्चर्य म्हणजे मिक्स्ड इमोशन्स म्हणतो तस मला वाटत. त्यांच समग्र साहीत्य वाचतांना त्यांचा पत्रसंग्रह मला विशेष आवडतो. कारण त्यातुन जे स्वामी विवेकानंद आहेत त्यांच्यातील नरेंद्र नावाचा तरुण कधी कधी बाहेर येतो. तो नरेंद्र मला स्वामी पेक्षा जास्त जवळचा वाटतो आवडतो. मला जे काय त्यांच्या विषयी वेगवेगळ्या बाबतीत वाटल जाणवल ते मांडण्याचा प्रयत्न माझ्या कुवतीनुसार एक एक विषय घेउन करतो. हे माझ व्यक्तीगत आकलन माझा पॉइंट ऑफ़ व्ह्यु आहे. एक समजुन घेण्याचा प्रयत्न अर्थातच तोकडा मर्यादित. एखादा माणुस मला पुर्ण कळला अस म्हणण म्हणजे मला जोकच वाटतो. तर या सर्व वास्तवाची मर्यादांची पुर्ण जाणीव ठेउन एक एक तुकडा समजुन घेण्याचा प्रयत्न करतो.
त्यांच्या उपलब्ध असलेल्या विशाल पत्रसंग्रहात ख्रिस्तीन ग्रीनफ़ील्ड्स ला लिहीलेली पत्रे रोचक आहेत. ख्रिस्तीन माझ्या अल्प विकी माहीतीनुसार त्यांची अनुग्रहित शिष्या होती त्यांच्यापेक्षा वयाने फ़क्त तीन वर्ष लहान,मुळ जर्मन मात्र तीन वर्षांची असतांना कुटुंब अमेरीकेत डेट्रॉइट इथे येउन स्थिरावले. इ. इ. ती वडिलांच्या मृत्युनंतर कुटुंबाचा (ज्यात पाच लहान बहीणी होत्या) आर्थिक भार सांभाळणारी एकटीच,मुळ प्रॉटेस्टंट मात्र नंतर ख्रिश्चीयन सायन्स या पंथात गेली असे विकीपेडीया सांगतो. हा पंथ थोडा इंटरेस्टींग त्याच्यानुसार कुठलीही शारीरीक व्याधी एक भ्रम व तो केवळ प्रार्थनेने च बरा होउ शकतो इ. तर असो.
विवेकानंद जेव्हा जेव्हा ख्रिस्तीना ला पत्र लिहीतात त्यात ते अधिक मोकळेपणाने लिहीतात असे दिसुन येते. त्यांच्या पत्रांमधुन तरी ते एक मैत्री असलेल नात आहे अस जाणवत.(फ़ॉर्मल नातं गुरु-शिष्या अस आहे मात्र पत्रांत तरी ते तस जाणवत नाही ) जिवलग मैत्रिणीला शेअर करतो तस विवेकानंद ख्रिस्तीना शी शेअरींग करतांना दिसतात. इथे विवेकानंद मधील केअरींग, लव्हिंग, मनमोकळं शेअरींग करणारा, प्रेमळ रसिक माणुस आपल्या समोर येतो.
विवेकानंदांची थोडी सिच्युएशन या काळातली लक्षात घेण आवश्यक आहे. म्हणजे पत्रांचा अर्थ लवकर लागतो. हा काळ साधारण १८९६ ते १९०० च्या दरम्यान चा आहे म्हणजे विवेकानंद यांच वय असेल साधारण ३३ ते ३७ च्या दरम्यान ख्रीस्तीना साधारण ३० ते ३४. म्हणजे थ्रिलींग थर्टीज मधले दोन्ही. तर या काळात स्वामी सतत पायाला भिंगरी लागल्या सारखा प्रचंड प्रवास सातत्त्याने करत होते. त्यांच जे काय अध्यात्मिक मिशन होत त्यासाठी फ़ंड रेजींग करणे पैसा जमविणे हे तेव्हाच त्यांच प्रमुख कार्य होत. त्यासाठी युरोप अमेरीकेत ते सातत्याने प्रवास करत तिथे व्याख्याने क्लासेस आदि माध्यमातुन ते त्यांच्या मिशन साठी लागणारा पैसा उभा करत असत. परिस्थीती फ़ार चांगली नव्हती, संघर्ष प्रचंड होता. अति प्रवास, कामाचा ताण, व्याख्याने, भेटीगाठी, मग तो पैसा भारतात पाठवायचा, इथल्या कामाला गाईड करायच, को-ऑर्डिनेट करायच इ.इ.. त्यात विवेकानंद अनेक प्रकारच्या शारीरीक व्याधींनी ग्रस्त झालेले होते. डायबीटीस, अस्थमा, इनडायजेशन अनेक व्याधींनी पुरते गांजलेले होते. त्यात पुरेसा पैसा कधी मिळायचा कधी नाही कधी खर्च जास्त होउन जायचा, इ. या सर्वांचे सातत्याने उल्लेख त्यांच्या पत्रात येतात. काही ठीकाणी त्यांनी लिहीलेली खर्चाचे हिशोब हि दिसतात. एका पत्रात ते चिंता हाच माझा मोठा डिसीज आहे अस म्हणतात. एके ठिकाणी लाइफ़ इज नथींग बट मायझरी इ. तर असा हा यंग संन्यासी अतिशय हार्ड स्ट्रगल त्यांच्या नोबल कॉज साठी करत असलेला त्या काळातील होता. आजच्या १०० हुन अधिक वर्षापुर्वीचा काळ लक्षात घेतला तर स्ट्रगल कीती कठीण असेल याची कल्पना येते. म्हणजे कम्युनिकेशन ट्रॅव्हलींग च्या फ़ॅसीलीटीज लक्षात घेतल्या तर खुपच कठीण प्रवास आणि शिवाय अतिशय टोकाची अनिश्चीतता फ़ंड मिळण्या संदर्भात. तर असा हा थकलेला तरुण संन्यासी. एका पत्रात ते माझ्या नर्व्ह्ज ओव्हरटॅक्सड झाल्यात असे म्हणतात ( ओव्हरटॅक्स्ड नर्व्ह्ज- इंटरेस्टींग वर्ड ! ) एका पत्रात मी आता थांबलो नाही तर नेचर वुइल फ़ोर्स मी टु स्टॉप म्हणतात. एका पत्रात माझ्या इतक काम कष्ट कॊणी दुसरा हिंदु करु शकत नाही. इ. तर अशी हि विवेकानंदांची त्या काळातली सिच्युएशन. जी वाचतांना एक चित्र त्यांचे डोळ्यापुढे येते त्याने त्यांच्याविषयी साहजिकच सहानुभुती वाटते.
महत्वाकांक्षा ,ध्येय लौकिक असो वा पारलौकीक रेस कुठलीही असो आंतरीक जगातील वा बाह्य जगातील थकवा अस्वस्थता निरर्थकता अटळ, वाट्याला येतेच त्यावर नंतर कधीतरी,
तर या वरील पार्श्वभुमी लक्षात घेतल्यानंतर या काळातील आपल्याला स्वामी विवेकानंदा नी ख्रीस्तीना ला लिहीलेली पत्रे दिसतात. यात विवेकानंदांचा अधीरता हा जो एक स्वभावविशेष होता तो अधिकच ठळक स्वरुपात दिसुन येतो. तर यात आपल्याला थोडे वेगळे विवेकानंद दिसुन येतात म्हणजे मला तर नरेंद्र अधिक दिसतो, काही पत्रात ते या मैत्रिणीला छान कविता वगैरे पाठवलेली मिळाली का ? विचारणा करतात., एका पत्रात तुला मिस म्हणुन संबोधन वापरल हि चुकच झाली मग तुलाही काउंटरसाइन करतांना मिस लिहाव लागेल (ती साइन करुन सोडवुन घेण्याच्या टाइप मधील पत्र असाव ) इ. , एक रीपीटेड उल्लेख येतो बोस्टन मधल्या आनंदी दिवसांचा ( बहुधा हा त्यांच्या धकाधकीच्या जीवनातील मित्रांबरोबर व्यतीत केलेला सुंदर निवांतपणाचा काळ असावा अस पत्रांमधुन जाणवत) ते लिहीतात, “ आय अम एन्जॉयींग बोस्टन व्हेरी मच एस्पेशियली द ओल्ड फ़्रेंड्स हिअर, दे ऑल आर व्हेरी काइंड “ मग नेहमीच्या अधीरतेने रीप्लाय प्रॉम्प्टली राइट फ़ुली लॅटर ऑन, ख्रीस्तीना ला लिहीलेल्या एका पत्रात मजेदार उल्लेख येतो ते म्हणतात MY DEAR CHRISTINA,
How funny all these dreams and evil prognostications of yours! You don't want to send me evil influences by thinking that way of me! I will be only too glad to lose 50 lbs. of my weight. A little rest puffs me up, and I am the same bloated monk as ever. ख्रिस्तीना ची पत्रे मला उपलब्ध नाहीत मी वाचलेली नाहीत पण बहुधा ती वाढलेल्या वजनात विवेकानंद चांगले दिसतील अस काहिस म्हणत असावी अस वाटत ( केवळ अंदाज आहे कारण एकाच बाजुची पत्रे वाचलेली आहेत ) त्यावर विवेकानंद वरील मस्त मजेदार उत्तर देतात. अनेकदा ते वेट कॉन्शस झालेले वाटतात. बहुधा वाढत असलेल्या वजनाने ते चिंतीत असावेत अस जाणवत. एका पत्रात ख्रिस्तीना ने बहुधा ( तिची पत्रे वाचली नसल्याने अंदाज च लावावा लागतो) भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली त्याला उत्तर देतांना स्वामी तिच्याविषयीच्या काळजीने म्हणतात की “ ख्रिस्तीना तुला भारतीय उन्हाळा सहन होणार नाही मग ते म्हणतात Then, you must not hope of making any living here. It is impossible for me to make a living most times in my own country. आता इथे लिव्हींग म्हणजे नेमक काय अभिप्रेत आहे कळत नाही म्हणजे नौकरी इ. अर्थाने पैसा मिळवणे की नुसत जगण्या संदर्भात बोलताहेत कळत नाही. पुढे फ़ार इंटरेस्टींग वाक्य येते
Then all the surroundings are so, so wretched and different from what you see around you, you will find me going about in loin-cloth — will that shock you? Three-fourths of the population only wearing a strip of white cloth about their loins — can you bear that?
पण मला एक कळल नाही स्वामीं स्वत: विषयी कॉन्शस झालेत की इन जनरल बहुधा ख्रिस्तीना साठी हे सर्व फ़ार जड जाइल या काळजीने ते तिला कल्पना देत असावेत की बघ इथे अस अस आहे तुला झेपेल का या अर्थाने असाव पण तु मला अशा अवस्थेत बघु शकशील का ? हे थोड सेल्फ़ कॉन्शस झाल्यासारख वाटत असो.
परत एका पत्रात तो छान उल्लेख जुन्या मित्रांना भेटण्याचा आनंद व्यक्त होतो तो असा I am getting better again. In my mind the whole of my complaint is bad assimilation of food and nervous exhaustion. The first, I am taking care of; the second will completely pass off when I meet you again. The great joy of meeting old, old friends, you know! Cheer up! There is no cause for anxiety.
आणि लगेच एक अनाकलनीय ओळ नंतर येते
Do not believe a single desponding line I write now, because I am at times not myself. I get so nervous. I start this summer for Europe anyway, as you say in America. With all love
and blessings,
Yours ever in the Lord,
VIVEKANANDA.
अस काय झालय कुठली डिस्पॉन्डींग लाइन काही कळत नाही. पण फ़ार मनमोकळेपणाने ते म्हणतात की ,आय अम अट टाइम्स नॉट मायसेल्फ़ ( जस आपल्या सर्वांच च होत कधी कधी मै अपना आपा खो बैठा सारख ) पण काय ते फ़ारस क्लीअर होत नाही.
स्वितझरलॅन्ड मध्ये असतांना एक सुंदर पत्र स्वामी पाठवतात त्यात ते म्हणतात
Surrounded on all sides by eternal snow peaks, sitting on the grass in a beautiful wood, my thoughts go to those I love —
so I write.
काय गोड पत्र आहे माय थॉट्स गो टु दोज आय लव्ह ............सो आय राइट
आणि मीनीएचर हिमालयाज काय मस्त उपमा देतात बघा.
I am in Switzerland — constantly on the move — getting a much needed rest. It is a miniature Himalayas, and has the same effect of raising the mind up to the Self and driving away all earthly feelings and ties. I am intensely enjoying it. I feel so, so uplifted. I cannot write, but I wish you will have the same for
ever — when your feet do not want, as it were, to touch the material earth —
when the soul finds itself floating, as it were, in an ocean of spirituality.
मग एक कौतुकाने सांगतात प्रो.मॅक्स म्युलर ने माझ्यावर एक लेख लिहीलेला आहे तो वेळ मिळाल्यास जरुर वाच. त्यांना मॅक्स म्युलर विषयी आदर आहे असे जाणवते. आणि त्यांच्यावर लेख लिहीलेला आहे तो ख्रिस्तीना ने वाचला पाहीजे असे ही त्यांना वाटते. आणि मग एक सुंदर पोस्ट स्क्रीप्ट येतो,
A few Alpine flowers growing almost in the midst of eternal snow I send you, praying that you may attain spiritual hardihood amidst all snows and ice of
this life.
आता हि फ़ुल फ़िजीकली पाठवली होती की नाही माहीत नाही पण पाठवली असतील तर क्या बात है. काही पत्रांत ते ख्रिस्तीना ला सातत्याने तिचे फ़ोटोग्राफ़्स पाठवण्याचा आग्रह करतात मग तीने ते पाठवल्या नंतर च्या पत्रात ते म्हणतात. ( ती एक कविता देखील पाठवते फ़ोटो सोबत कुठली माहीत नाही )
DEAR CHRISTINA,
Many, many thanks for the photograph and the poem. I never saw anything half as beautiful.
कविता किंवा फ़ोटो आय नेव्हर सॉ एनीथींग अज ब्युटीफ़ुल कशावर कॉमेंट आहे कळत नाही पण पुढे मग एक उदास ओळ येते. तिने पाठवलेल प्रेशीयस गिफ़्ट ते का अकनॉलेज करायच विसरले त्याच कारण देतात.
The work I had to do to reach Calcutta from Ceylon was so immense that I could not earlier acknowledge your precious gift. The work has broken me down completely, and I have got "diabetes", an incurable disease,
which must carry me off — at least in a few years.
त्याहुन हताश निराशाजनक वाक्य पुढे येत
I am now writing to you from Darjeeling, the nearest hill station to Calcutta, with a climate as cool as London. It has revived me a bit. If I live, I will come to America next year or so.
पुढे परत लगेच कौतुक करुन घेताना तिला म्हणतात ( एव्हाना ते भारतात प्रचंड लोकप्रिय झालेले होते )
You will be glad to know that the Indian people have, as it were, risen in a mass to honour me. I am the idol of the day.
येत नंतर च्या एका पत्रात ते अमेरीकन लोकांच्या कार्यक्षमतेच जुळवुन घेण्याच्या क्षमतेच अत्यंत उमदेपणाने कौतुक करतात. दिज यान्क्स ( हे एक अमेरीकन्स साठी च संबोधन ते नेहमी वापरतात यांकी वरुन ) कॅन डु एनीथींग अस ते अतिशय कौतुकाने तिला सांगतात. त्यांच जुळवुन घेण त्यांना वंडरफ़ुल वाटत.
Mrs. Bull of Boston and Miss MacLeod of New York are now in India. We have changed our Math from the old, nasty house to a house on the banks of the Ganges. This is much more healthy and beautiful. We have also got a good piece of land very near on the same side where Mrs. Bull and Miss MacLeod are putting up now.
It is wonderful how they accommodate themselves to our
Indian life of privation and hardship! My, these Yanks can do anything! After the luxuries of Boston and New York, to be quite content and happy in this wretched little house!!
एका पत्रात ते म्हणतात की कालच चेकअप केल माझ्या किडनीज व्यवस्थित काम करत आहेत मात्र प्रॉब्लेम काय आहे तर ते म्हणतात
So my kidneys are all right, at least at present. The heart is only nervous, requires calming!
म्हणतात आणि त्यासाठी काय सोल्युशन आहे ?
some cheerful company and good, loving friends and quiet.
तेच क्वाएट तीच शांती तीच निस्तब्धता दुर्देवाने त्यांना त्यांच्या हयातीत कधीच मिळु शकली नाही वुइच हि नीडेड मोस्ट.
एका पत्रात तिला ते विचारतात की तुला मी पाठवलेली नविन कविता तुला आवडली का ? मिस नोबल ( निवेदिता ) म्हणते की ती छान कविता आहे मात्र इट इज हर वे वुइथ एव्हरीथींग आय डु. म्हणजे त्यांच म्हणण तिला नोबल ला तर माझ सर्वच आवडत म्हणुन बहुधा ते तिची काय प्रतिक्रीया आहे यासाठी उत्सुक दिसतात मग गमतीने म्हणतात आता माझ सर्व लिखाण मी मिशनरी पेपर्स ना पाठवतो म्हणजे छान जोरदार टिका होइल.
तर असच मग एक अत्यंत विलक्षण अस पत्र पुढे येत. जे वाचल्यावर मी स्तब्ध च झालो. मला विवेकानंदा विषयी नरेंद्र नावाच्या थकलेल्या तरुणा विषयी ते वाचल्यावर खरच सहानुभुती मनात दाटुन आली. ते विलक्षण पत्र त्यांना फ़क्त ख्रीस्तीना शी शेअर करावस वाटल बहुधा. त्यात कमालीचा मोकळेपणा आहे. अत्यंत उत्कट आंतरीक भावना या पत्रात स्वामी विवेकानंद व्यक्त करतात.
या पत्रात ते अतिशय स्वप्नील झालेले दिसतात ते त्यांच एक ड्रीम तीच्याजवळ व्यक्त करतात ते म्हणतात
की मी सध्या वेगाने पैसा कमवतोय पंचवीस डॉलर्स रोजचे मिळतात. मी अजुन काम करेल आणि आशा आहे की पन्नास डॉलर्स पर्यंत पोहोचेल. यातुन मी एक ही डॉलर उधळणार नाही. मी सर्व पैसा माझ्याजवळ च ठेवणार आणि मग मी या पैशातुन हिमालयात एक सुंदर टेकडी एक सहा हजार फ़ुटांवरची विकत घेइल जिथुन सतत बर्फ़ बरसतोय असा छान व्ह्यु मिळेल. तिथे झरे असतील, एक छोट सरोवर असेल, तिथे सर्वदुर फ़ुल च फ़ुल असतील आणि माझी एक सुंदर झोपडी असेल , तिथे माझी छोटी शेती असेल तिथे मी भाजीपाला वगैरे लावेल त्यात मी स्वत: काम करणार. आणि आणि आणि तिथे माझी पुस्तकं असतील. आणि कोणा माणसाच तोंड मी अगदिच क्वचितच कधीतरीच एखादवेळी बघेल ( म्हणजे एकटाच राहिल माणस नको ) आणि जग संपुर्ण जग अगदि उध्वस्त जरी झाल तर होवो खुशाल मला त्याची पर्वा नसेल. कारण मी माझ कार्य संपवलेल असेल. सेक्युलर ऑर स्पीरीच्युअल आणि मग मी रीटायर होइल.
ते मुळ पत्र त्यांच्या शब्दात अस
To Sister Christine
921 WEST 21ST STREET,
LOS ANGELES,
27th December 1899.
DEAR CHRISTINA,
So you are awake and can't go to sleep any more. Good! Keep awake, wide awake. It was good I came here. For, in the first place, I am cured. What do you think of this — able to walk, and every day walk three miles after a heavy dinner! Good! Isn't it?
I am making money fast — twenty-five dollars a day now. Soon I will work more and get fifty dollars a day. In San Francisco I hope to do still better — where I go in two or three weeks. Good again — better, say I — as I am going to keep the money all to myself and not squander it any more. And then I will buy a little place in the Himalayas — a whole hill — about say, six thousand feet high with a grand view of the eternal snows. There must be springs and a tiny lake. Cedars — the Himalayan cedar forests — and flowers, flowers everywhere. I will have a little cottage; in the middle, my vegetable gardens, which I will work myself — and — and — and — my books — and see the
face of man only once in a great while. And the world may go to ruin round about my ears, I would not care. I will have done with all my work — secular or spiritual — and retire.
सेक्युलर आणि स्पीरीच्युअल दोघांपासुन रीटायर होण्याची इछा ते व्यक्त करतात. काय कमाल !
सेक्युलर हा भौतिक जीवन या अर्थाने वापरलेला शब्द आहे सध्याचा राजकीय रंग असलेला सेक्युलर हा शब्द त्यांना अभिप्रेत नाही. म्हणजे भौतिक व आध्यात्मिक दोन्ही पासुन रीटायर होण्याची आस लागलेली आहे.
पुढे परत एक उदास उदास ओळ येते
My! how restless I have been all my life! Born nomad. I don't know; this is the present vision. The future is to come yet.
Curious —all my dreams about my own happiness are, as it were, bound to come to nothing; but about others' well-being — they as a rule prove true.
यानंतर एका ड्रीमी जर्नीमधुन परत ते सावरुन घेतात स्वत:ला पुढे परत नॉर्मल होतात. आय वुइल बी स्ट्रॉंग लाइक अ लायन आणि हार्डि लाइक अ म्युल म्हणतात तेव्हा तर अजुनच करुणा दाटुन येते त्यांच्याविषयी उसन अवसान अधिकच उदास करुन टाकत.
हे पत्र वाचल्यावर पहिल्यांदाच उत्सुकतेने मी या पत्राची तारीख बघितली २७ डिसेंबर १८९९ मग एकदा तोपर्यंत न बघितलेली त्यांच्या मृत्युची तारीख चेक केली ती होती ४ जुलै १९०२.
स्वप्न अर्थातच पुर्ण झाल नाही त्यांच कधीच.........
थांबले नाहीच ते कधीच...
मला एक गाण आठवल होत हे पत्र वाचल्यावर
दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन
बैठे रहे तसव्वुर-ए-जानाँ किये हुए
दिल ढूँढता है...
मुळ गालिब चा शेर त्याला अजुन गुलजार केल गुलजार ने त्याला अजुन सुंदर चाल कोणी पंचम ने बहुधा लावली व उदास संथ आवाजात महेंद्र कपुर च ना तो गातो
खुप आठवत हे गाण हे पत्र आठवत तेव्हा. आणि खास करुन या ओळी
बर्फ़ीली सर्दियों में किसी भी पहाड़ पर
वादी में गूँजती हुई खामोशियाँ सुनें
आँखों में भीगे-भीगे लम्हें लिये हुए
दिल ढूँढता है...
लेखातील भाषेच्या चुका, विस्कळीतपणा , अनुवादाचा कंटाळा इ. इ. सर्व दोषांसाठी क्षमस्व. मुळ पत्रे इथे देतो मुळ च पत्रे वाचा ती अधिक सुंदर आहेत.
१
To Sister Christine
RIDGELY MANOR,
20th September 1899.
DEAR CHRISTINA,
I am much better, thank you. Hitherto, excepting three days, there has not been any wet weather to speak of here. Miss [Margaret] Noble came yesterday, and we are having a jolly good time. I am very, very sorry to say I am growing fat
again. That is bad. I will eat less and grow thin once more.
You are again at work — so do I find — only with a little variation of the old occupation. Better rest than mere idling. Do you like my new poem? (Vide Complete Works, IV for the text of the poem “Peace” enclosed in this letter.) Miss Noble thinks it is nice. But that is her way with everything I do. So you also say. I will
now send my writings to missionary papers to get a fierce criticism.
With all love to you and Mrs. Funkey [Funke],
Ever yours affectionately,
VIVEKANANDA.
२
XCVIII
To Sister Christine
[POSTMARKED: SAAS-FEE]
SWITZERLAND
5th August 1896
BLESSED AND BELOVED,
Surrounded on all sides by eternal snow peaks, sitting on the grass in a beautiful wood, my thoughts go to those I love —
so I write. I am in Switzerland — constantly on the move — getting a much needed rest. It is a miniature Himalayas, and has the same effect of raising the mind up to the Self and driving away all earthly feelings and ties. I am intensely enjoying
it. I feel so, so uplifted. I cannot write, but I wish you will have the same for ever — when your feet do not want, as it were, to touch the material earth — when the soul finds itself floating, as it were, in an ocean of spirituality. Prof. Max Müller has written in the Nineteenth Century an article on my Master. Read it if you can — August number. I hope you are enjoying this beautiful summer and are perfectly rested after hard work.
My love to all. Blessings to all.
Yours ever with love and blessings,
VIVEKANANDA
P.S. A few Alpine flowers growing almost in the midst of eternal snow I send you, praying that you may attain spiritual hardihood amidst all snows and ice of this life.
३
To Sister Christine
921 WEST 21ST STREET,
LOS ANGELES,
27th December 1899.
DEAR CHRISTINA,
So you are awake and can't go to sleep any more. Good! Keep awake, wide awake. It was good I came here. For, in the first place, I am cured. What do you think of this — able to walk, and every day walk three miles after a heavy dinner! Good! Isn't it?
I am making money fast — twenty-five dollars a day now. Soon I will work more and get fifty dollars a day. In San Francisco I hope to do still better — where I go in two or three weeks. Good again — better, say I — as I am going to keep the money all to myself and not squander it any more. And then I will buy a little place in the Himalayas — a whole hill — about say, six thousand feet high with a grand view of the eternal snows. There must be springs and a tiny lake. Cedars — the Himalayan cedar forests — and flowers, flowers everywhere. I will have a little cottage; in the middle, my vegetable gardens, which I will work myself — and — and — and — my books — and see the
face of man only once in a great while. And the world may go to ruin round about my ears, I would not care. I will have done with all my work — secular or spiritual — and retire. My! how restless I have been all my life! Born nomad. I don't know; this is the present vision. The future is to come yet.
Curious —all my dreams about my own happiness are, as it were, bound to come to nothing; but about others' well-being — they as a rule prove true.
I am so glad you are happy and peaceful under Mrs. Bull's hospitable roof. She is a great, great woman — one whom to see is a pilgrimage. No snow here — exactly like northern India in winter. Some days, even warmer — cool in the morning and evening, in the middle of the day, warm, in the sun, hot. The roses are about us, gardens everywhere, and the beautiful
palms. But I like the snow: crisp, crackling under the feet, white, white, white — all round white!
I don't think I have anything with the kidneys or the heart. The whole thing was about indigestion and it is now nearly cured. A month more, and I will be strong like a lion and hardy like a mule. The poor English are getting it hot from the Boers. Mourning in every home in England and still the war goes on.
Such is human folly. How long will it take for man to become civilized! Will wars ever cease? Mother knows! The New Year is sure to bring about a great change. Pray some good may come to India. I send you all joy, all love, all success for the New Year and many, many more to come. So you did well, you think, by coming to Mrs. Bull. I am glad. I wanted you to know Mrs. Bull thoroughly. Remain there as long as you can. It will do you
good, I am sure. Take heart and be of cheer, for next year is sure to bring many joys and a hundred blessings.
Yours truly,
VIVEKANANDA.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एखादा लेख मला कळाला हाच मला
हळूहळू वाचतेय.
फारच सुंदर.
हृदयपुर्वका शुभाशयगळू!
एका अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्वाचे अप्रतिम चित्रण, धन्यवाद!
विवेकानंदांची पत्रं
छान लेख....
खरच हळुहळु वाचते आहे.
लेखाशी संबंधित काही ओरीजनल लेटर्स
विवेकानंद....
सुन्दर. आवडल
सुरेख
सर्व प्रतिसादकांचे मनापासुन धन्यवाद !
धन्यवाद मारवा जी.