✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मातेचे स्वप्न

श
शुचि यांनी
गुरुवार, 02/24/2011 - 08:00  ·  लेख
लेख
जालावर फिरता फिरता अ मदर्स ड्रीम नावाची कविता वाचनात आली. त्या कवितेवर आधारीत खालील कथा आहे. या कथेचा मुख्य मतीतार्थ हा आहे की भौतिक जगात जरी आपल्या प्रियतम व्यक्तीपासून ताटातूट झाली तरी शोक टाळावा. आपल्याकरता किंवा पुढे गेलेल्या व्यक्तीकरता, कोणाकरताही, शोक हा वाईटच. ___________________________________________________ उदासवाण्या रात्रीच्या अशाच एका प्रहरी, अर्धवट नीद्रीस्त-अर्धवट जागृत अशा अवस्थेत पडलेल्या एका दु:स्वप्नाने मी अस्वस्थ होऊन, घामाघूम होऊन गेले. काय होते बरे ते स्वप्न? मी पाहीले की एका काळोख्या, नीबीड अरण्यात मी एकटी प्रवेश करत आहे. पुढे पुढे जात जात मी अधिकच रस्ता हरवत चालले आहे. माझे परत जायचे मार्ग बंद होत चालले आहेत. आतामात्र मी खरोखरच कंपायमान झाले. माझे काळीज भीतीने धडधडू लागले. पायात गोळे आल्याने माझ्याच्याने एकही पाउल पुढे टाकवेना. घशाला तर अगदी कोरड पडली. तसेच धैर्य एकवटून मी त्या जंगलात पुढे निघाले आणि पहाते तो काय समोरच लहान लहान मुलांची रांग कुठेशी निघालेली मला दिसली. हिरव्या पाचूच्या रंगांचे सदरे अंगावर चढवलेली ही मुले कोठे बरे जात असावीत मी मनाशीच विचार करू लागले. पहाते तो काय प्रत्येकाच्या हातात एकेक तेजस्वी पणती होती. आणि त्या पणतीच्या प्रकाशात एकमेकांच्या मागे आगगाडीच्या डब्यांसारखी ही रांग संथ लयीत, गूढपणे आणि तितक्याच गंभीरपणे पुढे पुढे पुढे सरकत होती. कोणालाच या मुलांच्या गंतव्य स्थानाचा पत्ता नव्हता. रांग खूप लाब होती. विचारात गुरफटले असतानाच माझी नजर याच रांगेतील माझ्या बाळावर पडली. तो बराच मागे होता तसेच त्याच्या हातातील पणती विझलेली होती आणि त्यामुळे तो ठेचकाळत , इतरांच्या तुलनेत हळूहळू चालत होता. त्याला पाहील्याबरोबर मी व्याकुळ होऊन त्याच्याकडे धाव घेतली. त्याला कुशीत घेऊन विचारले "माझ्या बाळा, मला असं एकटं टाकून या अरण्यात का आलास रे? तुझ्यापासून दुरावून मी रात्रंदिवस तळमळते आहे. माझ्या अश्रूंना खळ नाही रे पिल्ला. तुला माझी दया आली नाही का रे मला असं सोडून जाताना? हीच का तुझी आईवरची माया?" माझे ओक्साबोक्शी रडणे ऐकून माझा बाळ मला म्हणाला, "आई आपल्या ताटातुटीमुळे , तू हे जे रडतेस, त्याचा माझ्यावर अनिष्ट प्रभाव पडतो आहे याची तुला कल्पना येणार नाही." थोडा वेळ शांत, स्तब्ध राहून तो मला म्हणाला "आई ही पणती पाहतेस? तुझ्या अश्रूंमुळे ही विझली आहे." ___________________________________________________ ती कविता पुढीलप्रमाणे - As I slept one night I saw this dream Which further increased my vexation I dreamt I was going somewhere on the way Dark it was and impossible to find the way Trembling all over with fear I was Difficult to take even a step with fear was With some courage as I forward moved I saw some boys as lined in nice array Dressed in emerald-like raiment they were Carrying lighted lamps in their hands they were They were going quietly behind each other No one knew where they were to go Involved in this thought was I When in this troupe my son saw I He was walking at the back, and was not walking fast The lamp he had in his hand was not lighted Recognizing him I said "O My dear! Where have you come leaving me there? Restless due to separation I am Weeping every day for ever I am You did not care even a little for me What loyalty you showed, you left me"! As the child saw the distress in me He replied thus, turning around to me "The separation from me makes you cry Not least little good does this to me" He remained quiet for a while after talking Showing me the lamp then he started talking "Do you understand what happened to this? Your tears have extinguished this"!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
भाषांतर

प्रतिक्रिया द्या
2946 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

सुंदर कविता आणि तसाच

नगरीनिरंजन
गुरुवार, 02/24/2011 - 08:26 नवीन
सुंदर कविता आणि तसाच भावानुवाद!
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/24/2011 - 08:39 नवीन
सुंदर कविता आणि तसाच भावानुवाद! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

कवितेचा अनुवाद छान जमलाय.

नरेशकुमार
गुरुवार, 02/24/2011 - 08:33 नवीन
कवितेचा अनुवाद छान जमलाय.
  • Log in or register to post comments

शुची -अप्रतिम ...!! कविता आणि

प्रकाश१११
गुरुवार, 02/24/2011 - 08:58 नवीन
शुची -अप्रतिम ...!! कविता आणि अनुवाद .खूप शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

कवीता मस्तच

आत्मशून्य
गुरुवार, 02/24/2011 - 13:12 नवीन
पण ,
या कथेचा मुख्य मतीतार्थ हा आहे की भौतिक जगात जरी आपल्या प्रियतम व्यक्तीपासून ताटातूट झाली तरी शोक टाळावा. आपल्याकरता किंवा पुढे गेलेल्या व्यक्तीकरता, कोणाकरताही, शोक हा वाईटच.
या मतीतार्थाच्या पूरस्कारासाठी काही दाखले देता येतील काय ?
  • Log in or register to post comments

सांख्ययोग

अमित देवधर
गुरुवार, 02/24/2011 - 13:21 नवीन
प्रति आत्मशून्य, गीतेतला सांख्ययोग पहावा. तिथे या मताच्या २ ही बाजू आणि त्यांची मांडणी / खंडन दोन्ही मिळेल. अर्जुनाला या कवितेतील आईसारखंच दु:ख (नातेवाईकांचं प्रेम + त्याना आपण मारणार याबद्दलचं दु:ख + त्यामुळे होणार्‍या अधर्माचं दु:ख) झालं होतं.
  • Log in or register to post comments

कविता

स्वाती दिनेश
गुरुवार, 02/24/2011 - 13:50 नवीन
कविता आणि तिचा भावानुवाद आवडला, स्वाती
  • Log in or register to post comments

कवितेचे रसग्रहन खुप छान

गणेशा
गुरुवार, 02/24/2011 - 14:08 नवीन
कवितेचे रसग्रहन खुप छान आहे...
  • Log in or register to post comments

अनुवाद छान जमलाय. बरोबर आहे

पक्या
Fri, 02/25/2011 - 02:07 नवीन
अनुवाद छान जमलाय. बरोबर आहे ...शोक टाळावाच लागतो. नाहितर आयुष्यात आपण पुढे सरकूच शकणार नाही. प्रियतम व्यक्तीपासून ताटातूट झाल्याचे दु:ख असतेच पण शोक करणे वेळीच थांबवले नाही तर इतरांबरोबर स्वतःला देखील खूप त्रास होतो.
  • Log in or register to post comments

अनुवाद

आनंदयात्री
Fri, 02/25/2011 - 02:53 नवीन
अनुवाद छान आहे. कवितेत उभी केलेली कथावस्तु करूण आहे.
  • Log in or register to post comments

भौतिक जगात जरी आपल्या प्रियतम

मदनबाण
Fri, 02/25/2011 - 16:44 नवीन
भौतिक जगात जरी आपल्या प्रियतम व्यक्तीपासून ताटातूट झाली तरी शोक टाळावा. ह्म्म... जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च।तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि॥२- २७॥ अर्थात :--- क्योंकि जिसने जन्म लिया है, उसका मरना निष्चित है। मरने वाले का जन्म भी तय है। जिसके बारे में कुछ किया नहीं जा सकता उसके बारे तुम्हें शोक नहीं करना चाहिऐ॥ संदर्भ :--- श्रीमद्भगवद्गीता (अध्याय २ रा ) बाकी कविता आणि भावानुवाद छानच... लिहीत रहा...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा