(अजुन) एक अध्यात्मिक संवाद !
लेखनप्रकार
वेळ : बियर प्यायची अर्थात गुरुवार संध्याकाळ
स्थळ : युनियन स्क्वेयर अर्थात
#मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हा
धागा वर्गीकरण : #मीचीलाल
(संवाद संपुर्ण इंग्लिश भाषेत झालेला आहे केवळ मिपाच्या धोरणांचा आदर राखुन मराठीत अनुवादित करुन लिहिला आहे )
-------------
"हॅरे क्रिश्ना हॅरे क्रिश्ना क्रिश्ना क्रिश्ना हॅरे हॅरे | हॅरे रॅमा हॅरे रॅमा रॅमा रॅमा हॅरे हॅरे"
" च्यायला, इथेपण ह्यांचा तमाशा सुरु आहे का " मित्र वैतागुन बोलला . मी म्हणलो , " थांब रे जरा , बघु तरी ह्यांचे मडके किती पक्के आहे ते "
मित्र हसत हसत म्हणाला - " तुला ना साल्या नुसती बोटं घालायची हौस आहे"
" ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . आमचे गुरुदेवच म्हणालेत - बेबी माय व्होल वर्क इज टु कन्फ्युज यु . ख्यॅ ख्यॅ ख्यॅ "
-------------
" हे पुस्तक तुमच्यासाठी "
गोर्याटंच युवतीने नेहमीचेच टिपिकल कृत्रीम स्मितहास्य करत माझ्या हातात " भगवद्गीता अॅज इट इज" पुस्तक चिकटवले !
" थॅन्क्यु " इतकेच म्हणुन तिच्या कृत्रिमहास्याकडे आणि इतर सुंदर गोष्टींकडे जमेल तितके दुर्लक्ष करत मी चालायला लागलो .
" तुम्ही फक्त ५ डॉलर डोनेशन द्या "
" मी तुम्हाला शष्प एक पेनी सुध्दा डोनेशन देणार नाही " इति अस्मादिक ! टोन : स्वराज्य माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि मी टरफलं उचलणार नाही.
" का बरे ?"
" मी ही पुस्तक वाचलं आहे , आणि भगवद्गीतेचे ह्याच्या इतके चुकीचे इन्टर्प्रिटेशन दुसरे कोणतेही नाही असे माझे स्पष्ट मत आहे"
" व्हॉट ?"
" तसेही तुम्ही म्हणाला ना की पुस्त्क तुमच्यासाठी मग डोनेशन कसलं मागताय ? मी तुम्हाला शुन्य डॉलर डोनेशन देतो. हे घ्या"
" नो नो तुम्हाला पाच डॉलर डोनेशन द्यावे लागेल "
" सांग माझ्या **** ला"
" जस्ट ५ डॉलर्स"
" एकतर तुम्ही डोनेशन म्हणु नका , स्पष्ट किंमत म्हणा ना , खोटारडेपणा कशाला करताय"
ही सारी चर्चा ऐकुन एक काळाशुभ्र साऊदिंडीयन असा माणुस तेच खोटारडे स्मित हास्य घेवुन बोलायला आला ! आता अॅव्हरेज जरा आपल्या कलर चे झाले ! दुत्त दुत्त !
" हॅरे क्रिश्ना ! बोला सर काय काय म्हणाताय ? "
" ॐ नमो नारायणाय "
" अं ?" आव्हरेजिंग वर्स हाल्फ धक्का बसल्यासारखा अविर्भाव !
" जर तुम्ही डोनेशन म्हणयताय तर सक्ती कसली करताय ? मी देईन तितके डोनेशन घ्या ना , शुन्य डॉलर ! नाही तर सरळ स्पष्ट बोला की किंमत आहे म्हणुन "
" नाही नाही सर ते डोनेशनच आहे , पण तुम्ही द्यावे असा आमचा आग्रह आहे , आपण कुठेही पैसे ऊडवतोच कि नै " सिगारेट पिण्याचा निर्देश करत !
ते पाहुन डोकेच सटकले - भेंचो साला इथे गेल्या ३ महिन्यात सिगारेट पिली नाहीये अन हा कोण शहाणा लागुन गेला मला संस्कार शिकवणारा ?
" तुम्ही बिजिनेस मांडलाय माझ्या धर्माचा . इतके चुकीचे आणि मिसलिडींग इंटर्प्रिटेशन मी आजवर वाचले नाहीये भगवद्गीतेचे"
आता समोरच्याचा काळ्याचा सात्विकतेचा क्वोटा संपुन तामसिक क्वोटा बाहेर येवु लागला होता . गोरीटंच अजुनही अवाक ! " तुम्ही कोणताही श्लोक सांगा मला संपुर्ण पाठ आहे "
अस्मादिक - " बाबा रे मी तुझ्या पाठांतराची परिक्षा घ्यायला नाही आलो , अर्थ कळलाय की नाही ह्याची परिक्षा घेतोय , आता सांग नायं आत्मा बलहीनेन लभ्यः ह्या उपनिषदातील श्लोकाचा अर्थ काय ?" गोरी टंच अवाक +२!
" बलहीन माणसाला आत्मतत्वाचे आकलन होणार नाही "
" तुमच्या श्रीकृष्ण ह्या पुस्तकात तुमच्या महामहीमांनी ह्याचा अर्थ बलरामाच्या कृपेशिवाय ईश्वरप्राप्ती होत नाही असा काहीच्या बाही रिडिक्युलस अर्थ काढलाय , आता बोला"
" नाही नाही त्यांचेच बरोबर आहे , तुम्ही पुस्तक घेणार आहे की नाही ते बोला "
" तु ते डोनेशन हा शब्द हटव अन स्पष्ट किंमत म्हण मग बोलु . बिजनेस करतोय तर बिजनेस म्हणावे , उगाच धर्माचा अविर्भाव कशाला ?"
गोरी टंच अवाक +३ अंगावर पाल झटकल्यासारखे "ह्यांना माझ्या पेक्षा जास्त माहीत आहे , हे सांगतील"
" हो आमचा बिजनेसच आहे "
" हां आता कसं स्पष्ट बोललास , ऐक गं टवळे , हा केवळ बिजनेस आहे , ह्यांना आमच्या सनातन वैदिक हिंदु धर्माशी काही घेणे देणे नाही , अब्राहमिक धर्मातल्या जमतील तितक्या वाईट प्रथा सनातन धर्मात घुसडुन तुम्हा लोकांना रुचेल असे बिजनेस मॉडेल उभे केले आहे ह्यांनी . बाकी काही नाही"
आता मात्र टवळी बावरली अन काळ्याकडे बघायला लागली .
" हो आमचा बिजनेसच आहे - तुमच्या आत्म्याला वाचवण्याच्या . पुढच्या जन्मात तुम्हाला कुत्रा व्ह्यायचंय की मांजर ? " आता सात्विकतेचा रंग जवळपास संपत आलेला ! लगेच आम्ही आमचा लाल डबा बाहेर काढला !
" मला फरक पडत नाही , मी पुढच्या जन्माचा विचारच करत नाही . कार्पे डियाम ! मार्कस ऑरेलियस काय म्हणाला - असे जगा की जणु आजचा दिवस शेवटचा आहे! "
" मग भोगा आपल्या कर्माची फळं "
" कसली आलीत कर्माची फळं ? मी कर्मफळाची चिंता न करता कर्म करतो: योगस्थ: कुरु कर्माणि संग त्यक्तवा धनंजय। सिद्धयसिद्धयो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते।।
आता अवाक व्ह्यायची वेळ वेळ काळ्यावर ! क्रोधातिरेकाने काही सुचेनाशी अवस्था !
गोर्या टंच पोरीने अलगद माझ्या हातातुन पुस्तक काढुन घेतले अन हातात एक चॉकलेट ठेवले
" धिस इज प्रसॅद फॉर यु "
" हा हा हा , मला कसला प्रसाद देतेस टवळे , मीच प्रसाद आहे ,
प्रसादे सर्व दुखानाम हानिरस्योपजायते । प्रसन्न चेतसो ह्यायुर्बुद्धि: पर्यवतिष्ठते
आता मात्र काळ्याच्या राग अनावर व्हायला लागलेला . खाऊ का गिळु असे अविर्भाव ! म्हणले अजुन जरा डिवचावे -
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः। ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ||
ह्याचा अर्थ सांगु का रे ह्या लोकांना ? बघु मग किती लोकं येताहेत तुझा बिजनेस करायला !!
आता मात्र काळ्या बिथरलाच. काहीही न बोलता फक्त " म्यॅव म्यॅव म्यॅव म्यॅव " असे करत तो दुर निघुन गेला ! मी आणि मित्र हसत राहिलो !
---------------
" यु नो व्हॉट , वी कॅन कॅचप ओव्हर अ ड्रिंक सम टाईम . आपण कधी तरी भेटुन वाईन पिवुयात का ? मी तुला कृष्ण राधेशी कशी रासक्रीडा करायचा ते समजाऊन सांगेन अगदी जयदेवाने सांगितले आहे ना गीतगोविंद मध्ये तसे -
प्रथम समागम लज्जितया, पटुचाटुशतै: अनुकूलम् |
मृदुमधुरस्मितभाषितया शिथिलीकृत जघन दुकूलम् ||
टवळीला डावा डोळा मिचकाऊन म्हणालो . अर्थात तिला शष्प काही कळले नसणार हे माहीत होते पण आपल्याला आपला लाल रंगाचा डबा संपवल्याचा आनंद !
टवळीने दिलेले चॉकलेट जाता जाता डस्टबीन मध्ये टाकले अन वाचवलेले ५ डॉलर मस्त वाईनहेन्स्टिफनर पिण्यात सत्कारणी लावले !
इत्यलम !
तळटीप :
१) लाल रंगाचा डबा संपला .
२) काही संवाद काल्पनिक.
३) आपल्याकडे विठ्ठलाला काळ्या म्हणले जाते!
४) उत्तरदायित्वास नका रं लागु
वाचने
79338
वाचनखूण
प्रतिक्रिया
96
अप्रतिम गुर्ध्येव
या उपद्व्यापाबद्दल
लय भारी ... विठ्ठल... विठ्ठल
=)) =)) =))
वा.. वा.. वा.. तोडलंत..
अरे चांगले प्रिंटिंग अस्ते
In reply to अरे चांगले प्रिंटिंग अस्ते by अभ्या..
पुढच्य जन्माच्या ऐवजी याच
In reply to अरे चांगले प्रिंटिंग अस्ते by अभ्या..
दारु पिणारे पुढच्या जन्मी
In reply to दारु पिणारे पुढच्या जन्मी by प्रचेतस
द्या द्या, तुम्हीच वाचायला
In reply to द्या द्या, तुम्हीच वाचायला by अभ्या..
तुम्ही जरा शोधायचे कष्ट घ्या
In reply to दारु पिणारे पुढच्या जन्मी by प्रचेतस
डुक्कर होतात
In reply to दारु पिणारे पुढच्या जन्मी by प्रचेतस
त्या पेक्षा हे चालेल का ?
इत्युक्त्वाऽऽलिङ्ग्य वीभत्सुं विसृष्टः प्रययौ मयः'। 2-4-6 (11373) ततः प्रवेशनं तस्यां चक्रे राजा युधिष्ठिरः। अयुतं भोजयित्वा तु ब्राह्मणानां नराधिपः॥ 2-4-7 (11374) साज्येन पायसेनैव मधुना मिश्रितेन च। भक्ष्यैर्मूलैः फलैश्चैव मांसैर्वाराहहारिणैः। कृसरेणाथ जीवन्त्या हविष्येण च सर्वशः॥ 2-4-8 (11375) मांसप्रकारैर्विविधैः खाद्यैश्चापि तथा नृप। चोष्यैश्च विविधै राजन्पेयैश्च बहुविस्तरैः॥ 2-4-9कुंभकोणम इडिशन किंव्वा ह्या इस्कॉन वाल्यांना हे दाखवु का त्यांना >>> उद्योगपर्व यानसंधीपर्व अध्याय ५९ संजय म्हणतो :नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै | यत्र कृष्णौ च कृष्णा च सत्यभामा च भामिनी ||४|| उभौ मध्वासवक्षीबावुभौ चन्दनरूषितौ | स्रग्विणौ वरवस्त्रौ तौ दिव्याभरणभूषितौ ||५|| अर्जुनोत्सङ्गगौ पादौ केशवस्योपलक्षये | अर्जुनस्य च कृष्णायां सत्यायां च महात्मनः ||७||- कृष्णार्जुनाच्या अंतःपुरात अभिमन्यु , नकुल सहदेव वगैरेंना प्रवेश नव्हता , तिथे केवळ कृष्ण सत्यभामा अर्जुन आणि द्रौपदी इतकेच लोक होते ! कृष्ण आणि अर्जुन दोघेही मध्वा ( मधु / माध्वी ) नामक सुरा पिऊन मत्त झालेले होते , त्यावेळी कृष्णाचे दोन्ही पाय अर्जुनाच्या मांडीवर होते तर अर्जुनाचा एक पाय द्रौपदीच्या मांडीवर तर दुसरा सत्यभामेच्या मांडीवर ! सत्यभामेच्या ??? आर यु किडींग मी ? इथे तर माझ्यासारख्या सनातनी माणासालाही ठसका लागला होता , इस्कॉनवाल्यांना काय होईल देव जाणे बहुतेक ९११ ला कॉल करावा लागेल =))))In reply to त्या पेक्षा हे चालेल का ? by प्रसाद गोडबोले
बाब्बो....एकदा सत्संग ठेव
In reply to त्या पेक्षा हे चालेल का ? by प्रसाद गोडबोले
एक शंका
In reply to एक शंका by माहितगार
हां
In reply to हां by प्रसाद गोडबोले
या दुव्यावर दिलेल्या हिंदी
In reply to या दुव्यावर दिलेल्या हिंदी by माहितगार
एक दुवा
In reply to एक दुवा by माहितगार
इंग्रजी अनुवाद
In reply to या दुव्यावर दिलेल्या हिंदी by माहितगार
संपादक कृ. एक पेक्षा अधिक
In reply to हां by प्रसाद गोडबोले
इंग्रजी अनुवादात nor the
In reply to इंग्रजी अनुवादात nor the by माहितगार
बहुतेक यमौ
In reply to हां by प्रसाद गोडबोले
विविध आवृत्त्यांत अध्यायांचे
In reply to एक शंका by माहितगार
..नैवाभिमन्युर्न यमौ तं
In reply to ..नैवाभिमन्युर्न यमौ तं by प्रचेतस
अजून जराशी चिकित्सा
In reply to अजून जराशी चिकित्सा by माहितगार
यमौ शब्द नकुल सहदेव याच
In reply to यमौ शब्द नकुल सहदेव याच by प्रचेतस
यन्तव्य चा http:/
In reply to यन्तव्य चा http:/ by माहितगार
नैवाभिमन्युर्न यमौ तं
In reply to नैवाभिमन्युर्न यमौ तं by प्रचेतस
:)) मान्य देश शब्द कदाचित
In reply to नैवाभिमन्युर्न यमौ तं by प्रचेतस
व्यास आणि गणपती संवाद :))
In reply to व्यास आणि गणपती संवाद :)) by माहितगार
काय ठरलं मग शेवटी? कोण होते
In reply to काय ठरलं मग शेवटी? कोण होते by गणामास्तर
व्यास गणेश संवाद
मस्त! :-)
हॅ हॅ हॅ
जाम भारी.
मिपावाल्यांशी नाद नाही करयचा.
लैच भारी!!!
शाबास...
दुत्त दुत्त....!
In reply to दुत्त दुत्त....! by प्रचेतस
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !
In reply to दुत्त दुत्त....! by प्रचेतस
=)) =)) =))
तुमचा चेहराच तसा असावा म्हणून
भारी अनुभव.
अनुभव
हायला! तुम्ही फारच हजरजबाबी
अवांतर :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]In reply to अवांतर :- by मदनबाण
कितीही गोड बोलुन प्रवचंनं
In reply to कितीही गोड बोलुन प्रवचंनं by प्रसाद गोडबोले
हरे रामा हरे कृष्णा पंथावरील
In reply to कितीही गोड बोलुन प्रवचंनं by प्रसाद गोडबोले
भगवद्गीता अभ्यासायचीच असेल तर
In reply to कितीही गोड बोलुन प्रवचंनं by प्रसाद गोडबोले
कितीही गोड बोलुन प्रवचंनं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]In reply to कितीही गोड बोलुन प्रवचंनं by मदनबाण
जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव
जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव.अगदी सहमत. आमच्या इथल्या इस्कॉन मंदिरात जाम प्रेक्षणीय गरबा भरतो नवरात्रात, ते फार चांगलं आहे.In reply to जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव by गणामास्तर
साला चिंचवड मध्ये होतो ३ वर्ष
In reply to साला चिंचवड मध्ये होतो ३ वर्ष by प्रसाद गोडबोले
इकडे
खिल्ली कोणाची उडवावी?
In reply to खिल्ली कोणाची उडवावी? by गामा पैलवान
नमस्कार गा पै
" स च वैदिको धर्मः | सःच उपनिषदत्परः | इदानिम् तत्सर्वंम् शिथीलायते || ":(In reply to नमस्कार गा पै by प्रसाद गोडबोले
उरलेल्या बाजू
उत्तम खंडन. विवेचन आवडले.
In reply to उत्तम खंडन. विवेचन आवडले. by एस
+१११
मार्कस यांना प्रतिसाद
अध्यात्मिक गोष्टींमध्ये
In reply to अध्यात्मिक गोष्टींमध्ये by शब्दबम्बाळ
रेसिझम ?
In reply to रेसिझम ? by गामा पैलवान
अच्छा. .शब्दबम्बाळ हा
In reply to अच्छा. .शब्दबम्बाळ हा by गणामास्तर
आपला काहीतरी गैरसमज झालाय,
In reply to आपला काहीतरी गैरसमज झालाय, by शब्दबम्बाळ
मग हे नीट पण सांगता आलं असतं
In reply to अच्छा. .शब्दबम्बाळ हा by गणामास्तर
:))
In reply to :)) by माहितगार
वेळेअभावी पूर्ण प्रतिसाद वाचू
In reply to वेळेअभावी पूर्ण प्रतिसाद वाचू by गणामास्तर
गणा जेवण कर टेन्शन घेऊ नको
In reply to गणा जेवण कर टेन्शन घेऊ नको by अभ्या..
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
In reply to ख्यॅ ख्यॅ ख्यॅ by प्रसाद गोडबोले
थोडासा पुरोगामी हो जाय'
In reply to वेळेअभावी पूर्ण प्रतिसाद वाचू by गणामास्तर
ट्विटर वापरुया! दोनच शब्दात
In reply to रेसिझम ? by गामा पैलवान
माहितगार नव्हे शब्दबम्बाळ
In reply to अध्यात्मिक गोष्टींमध्ये by शब्दबम्बाळ
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !
In reply to ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! by प्रसाद गोडबोले
@ मार्कस , शब्द बंबाळ हे माझे
In reply to @ मार्कस , शब्द बंबाळ हे माझे by माहितगार
शब्द बंबाळच्या
In reply to शब्द बंबाळच्या by प्रसाद गोडबोले
तुम्ही सध्या हिरव्या देशात
In reply to तुम्ही सध्या हिरव्या देशात by प्रचेतस
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
In reply to शब्द बंबाळच्या by प्रसाद गोडबोले
...किंव्वा मग मंडालेच्या
In reply to शब्द बंबाळच्या by प्रसाद गोडबोले
खी खी खी (उगाचच!)
In reply to खी खी खी (उगाचच!) by शब्दबम्बाळ
नुकतीच NDTV वर Are Indians
तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥अत्यंत योग्य निर्णय ! अभिनंदन आणि शुभेच्छा !In reply to नुकतीच NDTV वर Are Indians by प्रसाद गोडबोले
कसेही करुन झोडपुन काढावे...
In reply to नुकतीच NDTV वर Are Indians by प्रसाद गोडबोले
मला इथे प्रतिसाद द्यायचा
हे खरंय का?(फॉरवर्डेड)
In reply to हे खरंय का?(फॉरवर्डेड) by उपयोजक
तुम्हाला काय वाटते
गोविंदा गोविंदा गोविंदा'ज् गार्डन
मोष्टंं र्हेवर्हंड
नेमकं काय खटकलं?
In reply to नेमकं काय खटकलं? by स्वधर्म
...नेमकं काय खटकलं?..
In reply to ...नेमकं काय खटकलं?.. by माहितगार
बाकी धागा लेखक अाल्यावर
In reply to बाकी धागा लेखक अाल्यावर by स्वधर्म
होय, धागालेखावरुन प्रथमदर्शनी
In reply to ...नेमकं काय खटकलं?.. by माहितगार
येस.
In reply to येस. by प्रसाद गोडबोले
चालू कराच