✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जुहू चौपाटी, सोबत मै शायर बदनाम चे स्वर आणि मी एकटाच..!

व
विसोबा खेचर यांनी
Sat, 03/07/2009 - 01:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8904 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

नक्षत्रांचे देणे.

मुक्तसुनीत
Sat, 03/07/2009 - 02:27 नवीन
तात्या , तुम्ही ज्या अनुभवाचे वर्णन केले आहे त्याचे वर्णन आरती प्रभुंनीच केलेले आहे : "गेले द्यायचे राहुनि , तुझे नक्षत्रांचे देणे ". तुमच्या या अनुभवाचे याहून चपखल वर्णन दुसरे करता येणार नाही. चौपाटीला अचानक जावेसे का वाटले ? इतक्या गर्दीत या बंगाली माणसाच्या आर्त सुरांची सोबत का वाटली ? अश्रू का वाहिले ? याला उत्तर नाही. न जानामि. न जानसि. कोऽपि न जानति. "आज अचानक गाठ पडे. भलत्या वेळी, भलत्या मेळी , असता मन भलतीचकडे ! " कुणी म्हण्टल्याप्रमाणे , या ऋणानुबंधांच्या गाठी आहेत. अशा अचानक ऊर भरून येण्यातल्या अनामिकतेला मानवी संबंधांच्या डिक्शनरीत शब्द नाही. मात्र कधीतरी अशा व्याकूळ होण्याला एक जिवंतपणाची खूण मानायला हवे ! शेवटी आरती प्रभुंचेच शब्द आठवतात : सायंकालीन वेळ अशी ही , कुण्या कविच्या असेलसुद्धा मृत्यूच्याही गीतामधली ! तुमच्या "मैं शायर बदनाम..."च्या आठवणीत बुडून गेलेल्या या संध्याकाळीचे वर्णन असेच करावे लागेल, नाही का ?
  • Log in or register to post comments

अहाहा

आनंदयात्री
Sat, 03/07/2009 - 02:33 नवीन
अहाहा काय प्रतिसाद दिलाय .. वाह !! सुंदरश्या प्रकटनाला तोलामोलाचा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

+१

बिपिन कार्यकर्ते
Sat, 03/07/2009 - 02:36 नवीन
प्रकटन आणि प्रतिसाद.... उत्कट, अप्रतिम.... हा इफेक्ट जाईपर्यंत आता काही सुचणार नाही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

अतिशय

टारझन
Sat, 03/07/2009 - 12:24 नवीन
अतिशय सुंदर !! प्रकटण आणि सुणित सरांचा प्रतिसादही !!! आवडले तात्याच्या संगितातल्या डेडिकेशनला आणि किशोरदा बद्दलच्या भावणेला सलाम आहे ! त्ये " मै शायर बदनाम " ऐकलं की आमचं बी आसंच काय तरी होतं बा :( (किशोरदा पंखा) टार्‍या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अगदी अगदी!

धमाल मुलगा
Sat, 03/07/2009 - 13:42 नवीन
नेमकं हेच म्हणायचं होतं. बाकी तो एक वेडा फकीर आपल्याच धुंदीत आपल्याच मस्तीत जगत जगत तसाच निघून गेला.... जाताना मात्र हजारो काळीजं तडफडवत गेला. :( ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

+१ वाहवा!!

चतुरंग
Sat, 03/07/2009 - 02:46 नवीन
कलंदर तात्यांची एक मनस्वी आठवण आणि त्यावरचा तितकाच उत्स्फूर्त असा मुक्तरावांचा सुंदर प्रतिसाद! जगाच्या एका टोकाला मुंबईतली चौपाटी आणि दुसर्‍या टोकाला अमेरिकेतला किनारा हे अंतर भौगोलिक आहे भावविश्वातलं नाही. तुमच्या चौपाटीवरल्या त्या आर्त संध्याकाळची वेदना एका क्षणात आंतरजालातून पोचली माझ्यापर्यंत आणि मैं शायर बदनाम ऐकता ऐकता कधी डोळ्यातून पाणी आलं समजलंच नाही! असा एकेक क्षण आयुष्य समृद्ध करुन जातो!! धन्यवाद तात्या आणि धन्यवाद मुक्तराव!!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

हेच म्हणतो

बेसनलाडू
Sat, 03/07/2009 - 02:47 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+२

परिकथेतील राजकुमार
Sat, 03/07/2009 - 11:31 नवीन
हेच म्हणतो ! तात्या बिल वाढवणार आज तुम्ही माझे. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सुंदर प्रतिसाद

मानस
Sat, 03/07/2009 - 02:56 नवीन
आज तात्यांच्या या अनुभवावरून अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. वो भी कुछ ऐसेही दिन थे| ... तात्या ..... क्या बात है? फारच सुरेख आठवण. मला का कुणास ठाऊक शांताबाईंच्या या ओळी सारख्या आठवत आहेत ...... कुणास काय ठाउके कसे कुठे उद्या असू ? निळ्या नभात रेखली नकोस भावना पुसू तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

असेन मी,

विसोबा खेचर
Sat, 03/07/2009 - 09:34 नवीन
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत हे सुरेख..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानस

अशा अचानक

विसोबा खेचर
Sat, 03/07/2009 - 09:32 नवीन
अशा अचानक ऊर भरून येण्यातल्या अनामिकतेला मानवी संबंधांच्या डिक्शनरीत शब्द नाही. मात्र कधीतरी अशा व्याकूळ होण्याला एक जिवंतपणाची खूण मानायला हवे ! मुक्तराव, अतिशय सुरेख प्रतिसाद...! जियो... पंधरा-वीस मिनिटांनंतर तसाच उठलो, थोडा पुढे गेलो. समोर काहीच दिसत नव्हतं. समोर होता तो फक्त अंधारलेला समुद्र! अजून थोडा पुढे गेलो आणि पायाला पाण्याचा स्पर्श झाला..समुद्रही शांतच होता, लाटा त्रासदायक नव्हत्या. त्या हळूच माझ्या पायासोबत खेळल्या आणि मन शांत झालं! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

खरेच

प्रदीप
Sat, 03/07/2009 - 12:16 नवीन
छान, उत्स्फुर्त लेख आणि सुंदर प्रतिसाद. दोन्ही मनापासून आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

+१

नंदन
Sat, 03/07/2009 - 15:06 नवीन
सहमत आहे. लेख आणि प्रतिसाद - दोन्ही आवड्ले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

+१

चित्रा
Sun, 03/08/2009 - 20:45 नवीन
असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

सहमत

संदीप चित्रे
Mon, 03/09/2009 - 08:29 नवीन
इतका सुरेख प्रतिसाद असताना वेगळं काय लिहिणार.... सहमत असेच म्हणतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

लेख आणि मुक्तसुनीत ह्यांचा प्रतिसाद

मनिष
Mon, 03/09/2009 - 14:49 नवीन
लेख आणि मुक्तसुनीत ह्यांचा प्रतिसाद - दोन्हीही एक नंबर!!! खूप आवडले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

वाह तात्या

स्वाती२
Sat, 03/07/2009 - 02:46 नवीन
वाह तात्या आणि मुक्तसुनित.
  • Log in or register to post comments

छान

घाटावरचे भट
Sat, 03/07/2009 - 02:49 नवीन
भावस्पर्शी लेखन!
  • Log in or register to post comments

सुंदर

सहज
Sat, 03/07/2009 - 06:23 नवीन
क्या बात है!
  • Log in or register to post comments

वा!!

अवलिया
Sat, 03/07/2009 - 09:16 नवीन
तात्या आणि मुक्तसुनीत... क्या बात है!!! --अवलिया
  • Log in or register to post comments

+१

शितल
Sat, 03/07/2009 - 09:52 नवीन
सहमत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

व्याकुळ मनाची अवस्था..

प्राजु
Sat, 03/07/2009 - 09:57 नवीन
ही गाणी अशीच असतात. आज मला तसंच अचानक ये नयन डरे डरे.. ऐकावं वाटलं.. हेमंत कुमार यांनी जीव ओतून गायलेलं हे गाणं.. त्यात सुद्धा नयन या शब्दाचं उच्चारणं जीवघेणं आहे... गाणं ऐकताना डोळे कधी आपण मिटतो ते समजत नाही.. आणि गाणं संपलं की, एका वेगळ्याच धुंदीतून अलगद बाहेर येतो आपण. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आग कशी कुठे भडकेल एका गाण्यानी ते

रामदास
Sat, 03/07/2009 - 10:03 नवीन
सांगता येणं कठीण आहे. तात्या, तुम्हाला मै शायर तो नही आठवलं आणि मला गँबलरचं एक गाणं आठवलं.नीरजनी लिहीलेलं हे सुंदर गाणं किशोरकुमारनी जीव ओतून गायलं आहे. हम तो मुसाफीर है कोई सफर हो हम तो गुजर जाएंगे ही लेकिन लगाया है जो दाव हमने वो जीत कर आयेंगे ही.. प्रत्येक सुंदर ओळ आग लावते. दुनीया से जीते और तुझसे हारे यू खेल अपना हुआ.
  • Log in or register to post comments

क्या बात

विसोबा खेचर
Sat, 03/07/2009 - 10:53 नवीन
क्या बात है रामदासभाऊ! जियो..! ही चित्रफीत पाहा. काही लोकं त्याच्यासोबत गायली आहेत, नाचली आहेत! कोण आहेत ही मंडळी? अगदी सर्वसामान्य पब्लिक. पण त्याच्यावर, त्याच्या गाण्यावर प्रेम करणारी! :) आपला, (बनारसी पानाचा प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

शोलों पे चलना था

बोका
Sat, 03/07/2009 - 11:47 नवीन
शोलों पे चलना था, कांटों पे सोना था और भी जी भरके, किस्मत पे रोना था जाने ऐसे कितने, बाकी छोडके काम , मैं चला .. या ओळी किशोरदांच्या तोंडून ऐकल्यावर आणी काय होणार ..
  • Log in or register to post comments

उत्स्फुर्त अणि भावास्पाशि लेख !!!!!

vasumati
Sat, 03/07/2009 - 13:15 नवीन
.अगदि मनापासून आला आहे हा लेख!!! किशोर दा ना सलाम!!!!!!!!!!!!! ..........vasumati.................. ..........वसुमति...................
  • Log in or register to post comments

वाअ

आपलाभाउ
Sat, 03/07/2009 - 14:52 नवीन
तात्या डायरेच्ट घुस्लत ह्र्दयात
  • Log in or register to post comments

वा!

मृदुला
Sun, 03/08/2009 - 03:33 नवीन
लेख वाचला; गाणे ऐकले; लेख पुन्हा वाचला. मग काय ते कळले. मुक्तसुनीत यांच्या पहिल्या प्रतिसादाशी सहमत.
  • Log in or register to post comments

तात्या

गणपा
Sun, 03/08/2009 - 21:33 नवीन
तात्या खुप छान लिहिलय. किशोर सारखा कलावंत परत होणे नाही. त्याच्यी सर्वच विरह गीत काळजाचा ठाव घेणारी. आवांतर : महाविद्यालयात असताना या विरह गीतांनी इतक वेड लावल होत की, मी एका डायरित सगळी गाणी उतरवुन घेतली होती. एकांतात मी ती गाणी गुणगुणत बसायचो. एकदा माझ्या आई आणि बहिणीच्या हाती ती डायरी लागली. त्याना वाटल की पोरग गेल हातातुन, प्रेमभंग..वगैरे झाला की काय.
  • Log in or register to post comments

मी एका

विसोबा खेचर
Mon, 03/09/2009 - 00:28 नवीन
मी एका डायरित सगळी गाणी उतरवुन घेतली होती. एकांतात मी ती गाणी गुणगुणत बसायचो. सुरेख..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

..

मॅन्ड्रेक
Mon, 03/09/2009 - 13:31 नवीन
इतका सुरेख प्रतिसाद असताना वेगळं काय लिहिणार.... सहमत असेच म्हणतो at and post : janadu.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा