संस्कृती vs अंधश्रद्धा
लेखनप्रकार
हे माझ्या मनातील द्वंद्व आहे काही दिवसांपासून..
शीर्षक कदाचित साजेसं नाही (मी स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करणारा विध्यार्थी आहे लेखनाबाबत अजूनतरी प्रगल्भता आलेली नाही) परंतु जे मला सांगायचं आहे त्यासाठी तेच बरोबर वाटतं!
झालं असं आहे की या आठवड्यात गणपती येतायत सगळी कडे लगबग सुरू आहे..
घरी असतो आमच्या गणपती..
सुरुवात मीच केली आहे त्याची किंवा माझाच हट्ट होता त्यासाठी काही वर्षांपुर्वी..
त्यामुळे तयारीही माझ्याचकडे असायची..
साफ सफाई, सजावट सगळंच..
गणपती आले की एकंदरीत सगळं छान असतं, प्रसन्न वाटतं मग मित्रमंडळी, आप्तेष्ट, पाहुणे, आणि अगदी काही जवळची माणसे☺(ज्यांना इतर वेळी घरी बोलावणं अवघड) यांना आमंत्रने जातात!
लोकं येतात, गप्पा गोष्टी करतात, भेटी होतात, एकमेकांची विचारपूस, चर्चा, आणि बरंच काही!
म्हणजेच एकोपा, सद्भावना टिकून राहावी यासाठी हे सण असतात ते यावरून वाटतं आणि मग ही आपली संस्कृती/परंपरा आहे आणि ती आपणच चालू ठेवायला हवी असंही वाटतं!
आता दुसरीबाजू
काय आहे नेमका गणेशोत्सव? नेमका गणपती कोणता?
लोकप्रिय लालबागचा राजा गणपती की jsb चा सर्वात श्रीमंत असलेला गणपती?
गणेश गल्ली चा सर्वात उंच की पेठेतल्या हलवाईंचा छोटा पण मानाचा असलेला गणपती?
सारसबागेतला निसर्गाच्या सानिध्यात असलेला की धारावी च्या गल्लीत गटारावर table ठेऊन बसवलेला?
जर यातला एक आहे तर बाकीचे काय आहेत?
आणि जर यातलाच कोणीतरी असेल तर मग मी घरी आणतो ते काय आहे?
दिवसेंदिवस हा मोठा (मंडळाची श्रीमंती वाढवणारा) आणि वाढत चाललेला (मंडळांची संख्या वाढवणारा) गणपती जेव्हा जातो तेव्हा काय मागे ठेऊन जातो?
चौपाटी वरची घाण,
मंडपा साठी रस्त्यावर केलेले खड्डे,
झाडांच्या फांद्या कापून तिथे लावलेले banner..
आणि मग जर सगळया सणांचा विचार केला तर बऱ्याच मोठ्या आणि महत्त्वाच्या सणांचे हे होणारे दुष्परिणाम दिसतात!
दिवाळी च्या फटाक्यांपासून दहीहंडी ला होणारे मृत्यू सगळे वाईटच आहेत हे माहीत आहे..
पण दिवाळी ला फराळासाठी एकत्र येणारे गणपतीत दर्शना साठी येणारे दहीहंडी ला नाचणारे सगळे
15 ऑगस्ट / 26 जानेवारी ला झेंडावंदनासाठी,
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडे लावण्यासाठी नाहीत येत एकत्र..!
ते संस्कार झालेच नाहीत..!
काय करू मग सांगा?
नास्तिक म्हणून गणपती वर विश्वास नाही म्हणून बंद करू गणपती बसवायचं?
जर सगळे सण साजरे करायचं थांबवल तर 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर ल एवढंच राहील ज्याचं कोणाला सोयरसुतक नाही!
आणि मग हा एकोपा ही सद्भावना टिकवायची असेल तर काय करायला हवं?
संस्कृती च्या नावाखाली चालू असलेली अंधश्रद्धा आणि मूर्खपणा चालू द्यायचा की त्यावर टीका करून त्याचा बहिष्कार करुन आपल्या लोकांपासून दूर व्हायचं?
-योगेश कोयले
वाचने
5698
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
तुम्हाला संस्कृती कुठे सापडली
नास्तिक आहात तर गणपती कशाला
In reply to नास्तिक आहात तर गणपती कशाला by मराठी कथालेखक
दुजोरा १+
संस्कृती च्या नावाखाली चालू
होना हो! गणपतीत प्रदुषनाचा!
तुम्ही घरातला खाजगी गणपती आणि
In reply to तुम्ही घरातला खाजगी गणपती आणि by मराठी_माणूस
हेच म्हणायचं होतं! बाहेरच्या
मस्त व्यक्त झालायस मित्रा..
In reply to मस्त व्यक्त झालायस मित्रा.. by पुंबा
धन्यवाद
In reply to धन्यवाद by योगेश कोयले
थोडे अवांतर - एक मिपिय
In reply to थोडे अवांतर - एक मिपिय by अत्रे
ठीक
In reply to मस्त व्यक्त झालायस मित्रा.. by पुंबा
गणपती उत्सवाबाबत बाहेर
In reply to गणपती उत्सवाबाबत बाहेर by हतोळकरांचा प्रसाद
मात्र आपण हे रोखू शकत नाही,
देव म्हणजे काय
http://timesofindia
पहा यांचे प्रताप.